भारतातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी कसे पैसे बनवते ?

Submitted by ताजे प्रेत on 24 September, 2020 - 13:46

हि अत्यंत धक्कादायक माहिती हाती आली आहे
या कंपनीने बराच काळ नेटवर्क फुकट ऑफर केले आणि मग सत्यात स्वस्त सेवा सुरु केली . हे खूप पैसे घेणार असे बोलले जात होते पण यांनी दर कमीच ठेवले आहेत आणि इतर स्पर्धकांची वाट लावली आहे
तर हे नक्की पैसे बनवतात कसे ?

मोबाईल संपर्क दोन्ही बाजूने असतो..( mobile communication is 2 way ) तर वापरकर्ता पण टॉवर कडे डेटा पाठवत असतो , म्हणजे wave communication चालू असते.

तर यांचे 4जी हे hyper efficient network आहे, म्हणजे फोन चार्ज करायला खरे तर जवळपास एक तृतीयांश ( खरे तर 31.7595 %) वीज लागते. आता कोणाचे वीज बिल यांचे नेटवर्क वापरत असल्याने कमी झाले आहे का ? नाही कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते. 

आणि एक मोठी वीज कंपनी यांच्या बंधू चीच होती तिला हे देतात ,आता तुमच्याच भागातले त्यांचे मित्र चालवतात - ते एकच आहेत हे सर्वांना माहीत आहे.. 

म्हणजे तुम्ही अधिक डेटा वापरा याना तुमचीच वीज मिळेल आणि ते तुम्हालाच ती विकत देतील!
हे विलक्षण धक्कादायक आहे .

Group content visibility: 
Use group defaults

अरे भारी आयडीया. मोबाईल मधून लिंकलोकल अ‍ॅड्रेसला (म्हणजे परत स्वतःलाच) मेसेज पाठवत राहिलं की कधी मोबाईल डिश्चार्जच होणार नाही. Rofl

पण त्याला 4G microwave to Electricity converter - काही अब्ज डॉलर्स ला तो पडतो

कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते. >>>
धन्य झालो, आता सुडोमी.

शिवाय मोठे काहीतरी डाउनलोड होत असताना त्यावर ते चक्की फिरवून जनरेटर चालवून वीज निर्माण करत असतील ती आणि वेगळीच

कारण ही वीज टॉवर कडे microwave form मध्ये परत पाठवली जाते आणि तिचे परत wave particle theory, uncertainty principle, Einsteins Nobel winning equation E=MCsq वापरून परत विजेमध्ये रूपांतर केले जाते. >>> यापेक्षा डिप्रेशनचा धागा जास्त सोप्पा होता.

गाईज हा धागा सिरीअस आहे की थट्टेचा?
या माहितीत तथ्य आहे की गण्डलेली आहे?
शाळेत आर्किमिडीजची तत्वे शिकलेल्या सर्वांनी उत्तरे द्यावीत

Wireless Transmission of Electric Energy is possible.

२०१३ चा संशोधन निबंध दिसतोय. मायक्रोवेव्ह एकाच तरंगलांबीच्या असल्याने प्रकाशाचे (ज्यात अनेक तरंगलांबींचे मिश्रण असते) रुपांतर विद्युत लहरीत करण्यापेक्षा मायक्रोवेव्ह चे विद्युत रुपांतर जास्त कार्यक्षम आहे म्हणे. पण तीव्रतेचं काय करायचं? पुरेशी तीव्रता पाहिजे ना लहरींची. फार कार्यक्षम प्रकल्प होणार नाही. संकल्पनेचा पुरावा तयार होईल फार तर. (असं प्रथमदर्शनी मत तयार झालं)
पूर्ण मराठीत लिहिलं आहे. समजेल अशी अपेक्षा.

हे असं काही हाय पॉवर बरोबर केलं तर डार्विन नक्की खूष होईल! (तिकडे पण प्रतिक्रियांत कोणी तरी हे लिहिलं आहे)

हो पुरेशी तीव्रता हवी.
आणि एका सेलफोन मधून टॉवर कडे जाणारे वेव्हज त्या फोनच्या बॅटरीत असणाऱ्या ऊर्जे इतकी ऊर्जा नाही बनवू शकणार. लॉसेस आणि इफिशियनसी धरून कमीच.
तेव्हा बॅटरी चार्जड ठेवण्या इतपत ऊर्जा मिळवणे अशक्य.

______________________________________________________
Netflix ,Jio TV,Whatapp.
[Services]
______________________________________________________
Android,IOS,KaiOs.
[OS]
______________________________________________________
OnePlus,Jiophone, Samsung.
[Device]
______________________________________________________
Vodafone,Airtel,Jio.
[Telecom]

१.Apps
२.OS
३.Device
४. Telecom

हा आहे consumer stack

या कंपनीने सर्व स्तरात आपले पाय रोवले आहेत म्हणून ती यशस्वी आहे.

https://the-ken.com/the-nutgraf/jio-is-in-the-endgame-now/

यातील टेलिकॉम, डीव्हाईस, ओएस (आणि जीओ टीव्ही फक्त सर्विसेस मध्ये धरलं तर सर्विसेस ही) मधुन खर्चा इतकं तरी उत्पन्न होतं का? उत्पन्नाचा स्त्रोत काय आहे?
कंझ्युमरला जाहिराती दाखवणे आणि वस्तू विकणे हा स्त्रोत आहे. डीव्हाईस इ. आर नॉट प्रॉडक्ट. यू (कंझ्युमर) आर द प्रॉडक्ट!

शाळेत आर्किमिडीजची तत्वे शिकलेल्या सर्वांनी उत्तरे द्यावीत>>>>

नको रे राजा, आपल्या अकलेचे दिवाळे काढू सारखा
हास्यास्पद होतं बघ मग सगळं
वरती प्रेताने स्पष्ट लिहलं आहे आइन्स्टाइन म्हणून, का ते इंग्रजीत असल्याने वाचू शकला नाहीयेस
अर्थात याचेही प्रोनौन्स आर्किमिडीज सारखे होते असे म्हणशील याची खात्री आहे Happy

नको रे राजा, आपल्या अकलेचे दिवाळे काढू सारखा >> आइन्स्टाइन शाळेत आर्किमिडीजची तत्वे शिकल्यामूळेच Nobel winning equation E=MCsq शोधू शकला म्हणून असेल रे Lol

आईनस्टाईनच्या शाळेत कशावरुन आर्किमिडिजचे तत्त्वे शिकवत असत? काही पुरावा आहे का? यावर धागा आहे का? नसेल तर काढून टाक रे एक.
रच्याकने: दुर्दैवाने E=MCsq हे Nobel winning equation नाही ती एक वेगळी गोष्ट.

ईनस्टाईन
र्किमिडीज
ईझॅक न्यूटन
शूचॅम्प
पला ऋन्मेष Happy

सच्चे दिल से शोधो तो कोई ना कोई साम्य मिल ही जाता है
शुभरात्री !!!

आई नस्टाईन आणि आई झॅकन्यूटन हे जास्त महान कारण ते आईच्या जवळ जातात आणि तुमच्या लक्षात रहातात. त्या आई मुळे एक आपुलकी जिव्हाळा टिकतो आणि नोबेल देऊन जातो. बाकीच्या कोणाला नोबेल नाही मिळालं.
न्यूटनला नाही मिळालं म्हणताय! तीच तर गम्मत आहे ना. अपवादाने नियम सिद्ध करुन टाकलान बेट्यानं. आई झॅक न्यूटन आहे तो शेवटी!
लिहुन टाक एक व्हॉअ‍ॅ लेख.

आई झॅक न्यूटन
आई लाईक न्यूटन

न्यूटनला नोबेल दिला नाही कारण सरसकट सर्व नोबेल विजेत्यांना न्यूटनच्या पंक्तीत बसवल्यासारखे झाले असते. तो आमचा देव आहे. मी दिवसातून काही हजार वेळा तरी त्याच्या नावाचा जप करतो. पोस्ट धाग्यावर अवांतर असेल तर क्षमस्व

हा जो कोणी आइन्स्टाइन आहे त्यास मोठ्या कंपनीने आपल्या टीममध्ये घेतल्यानेच इतरांची वाट लागली काय? त्यांना हे अगोदरच कसं काय सुचलं नाय?

आई सगळयात पावर फुल . स्टीव्ह जॉब पण आई घालूनच यशस्वी झाला. आई फोन, आई पॅड, आई मॅक.... पण मूळ लेख किडन्यांच्या हार्ट मध्ये हार्ट अ‍ॅटॅक देऊन गेला....

जर आपल्या मोबाईल मधून निघून काही मीटर / किलोमीटर चा प्रवास करून towers कडे जाणाऱ्या microwaves मुळे जर 'विकता येण्याइतपत' वीज निर्माण होत असेल तर मग घरातल्या WiFi router ला supply द्यायलाच नको! उलट त्याने संपूर्ण घराला वीज पुरवली पाहिजे!!!

Pages