Submitted by VB on 21 September, 2020 - 07:23
हल्ली बहुतेक मुली लग्नानंतर नाव बदलत नाहीत. लग्नाआधी मधले नाव आडनाव वेगळे अन लग्नानंतर वेगळे असते. अश्यावेळी बाळाच्या जन्मदाखल्यात वडिलांचे नाव आडनाव कसे लावतात? हॉस्पिटलमध्ये जर सगळी कागदपत्रे लग्नाआधीच्या नावावर असली तरीही बाळाला वडिलांचे नाव अन आडनाव लावण्यासाठी काय करावे लागते. कोणती कागदपत्रे आवश्यक असतात?
कृपया माहीत असल्यास सांगा.
तसेच, ऑनलाईन जन्मदाखला कसा मिळवायचा माहीत असेल तर तेही सांगा प्लिज.
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
Also बाळाच्या नावा आडनावाशी
Also बाळाच्या नावा आडनावाशी आई वडिलांच्या नावा आडनावाचा संबंध नाही. >>
बरोबर. साऊथ मध्ये तर आडनाव नसते आणि मध्ये वडिलांचे नावसुद्धा नसते. काय इनिशीयल्स लावायचे ते आपले आपण ठरवतात.
>> हॉस्पिटलमध्ये सांगितले की
>> हॉस्पिटलमध्ये सांगितले की इकडे जर लग्नाआधीचे नाव असेल तर जन्मदाखल्याला प्रॉब्लेम येईल.
नक्की काय प्रोब्लेम येईल म्हणतात ते? बाळाच्या आईचे पूर्ण नाव आणि बाळाच्या वडिलांचे पूर्ण नाव... महापालिकेकडे जन्मनोंद करण्यासाठी इतके पुरेसे नाही का त्यांना?
ते म्हणतात, इकडे आईचे जे
ते म्हणतात, इकडे आईचे जे आडनाव असेल तेच जन्मदाखल्या वर येईल
VB ऑफीडेवीतने काम होईल बहुतेक
VB ऑफीडेवीतने काम होईल बहुतेक.
अजून मी काय केलं ते सांगते - जर बाळांची नाव ठरवली असतील तर दवाखान्यातही त्यांच्या फॉर्मवर बर्थ सर्टिफिकेट वर तिथेच सांगून टाका म्हणजे आता ते B/O लिहून मग नंतर नाव ठेवल्यावर परत नावाच सर्टिफिकेट घ्यावाच लागत ना? मी नाव आधीच ठरवली होती त्यामुळे हॉस्पिटलमध्ये लेकीच नाव सर्टिफिकेट वर लिहिलं.0
>>नुसती तारीख टाकली कि त्या
>>नुसती तारीख टाकली कि त्या दिवशी पुण्यात जन्म नोंद झालेल्या सर्व मुलांचे बर्थ सर्टिफिकेट दिसतात >> महान!![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
जन्मदाखल्यावर काय आडनाव हवे हे जैविक आई बाबांच्या एकत्रित मताने सही करून अजुन भारतात ठरवू शकत नाहीत बघुन आश्चर्य वाटले (
नाही). ते ठरवायला लग्नाचा दाखला आणि डिफॉल्ट बाबांचे आडनाव कशाला हवे? डिफॉल्ट काही नकोच. काय आडनाव हवे ते विचारुन लिहा की! बाकी भारतीय साईट बघितल्या की ऑनलाईन नकोच! माझा डेटा किती ठिकाणी लीक करतील त्याचा नेम नाही. फाईलींच्या जंजाळात तो जास्त सुरक्षित असेल. सिक्युरिटी थ्र्रू ऑब्स्क्युरिटी!पिंकी, अहो ऑफीडेवीतने काम
पिंकी, अहो ऑफीडेवीतने काम होईल की नाही तेच कळत नाही.
ती नाव आधीच ठरवायची कल्पना छान आहे, पण घरच्यांना मान्य नाही, असो.
वेबसाईटवर काहीच नीट माहिती दिली नाही. किमान faq तरी ठेवायचे, सम्पर्क नंबर ठेवायचा काही नाही.
तिकडे ते marriage रजिस्ट्रार अडून बसलेत की दोघांना जावे लागेल. पण १२-१३ तासांचा प्रवास शक्य नाही, त्यात तिकडे गेल्यावर १४ दिवस quarantine करतात.
आधीच सी सेक्शन सांगितले आहे त्याचे किमान दीड लाख होतील. इन्शुरन्स असून सुद्धा नावाच्या घोळामुळे ते पण मिळणार नाही बहुतेक, कारण डॉक्टर अडून बसलीये. त्यात जन्मदाखला प्रॉब्लेम वेगळाच. सगळेच कठीण झाले आहे.
लग्न झाले तेव्हा बोलले की ४ दिवसात देतो लग्नदाखला तुमच्या सासर्यांना. नेमके तेव्हा सासरे आजारी पडले अन नंतर टाळेबंदी.
खूप वैताग आलाय सगळ्याचा. आपला समाज विचारसरणी पाहता, बाळाला भविष्यात काही त्रास नको व्हायला, म्हणून इतका खटाटोप.
आता नाही त्रास करून घ्यायच
आता नाही त्रास करून घ्यायच तब्येतीवर परिणाम होईल, निघेल यातूनही मार्ग.
One can apply at the Sub
One can apply at the Sub-Registrar office through filled registration form ( Jurisdiction, the husband or wife resides with a valid address proof)
म्हणजे तुम्ही राहता तिथेही लग्न प्रमाणपत्र मिळवता येईल, तुमच्या मिस्टरांना इकडे यावे लागेल, तेव्हा ते शक्य होत असेल तर पहा.
किंवा
तुमच्या डॉक्टरलाच विचारा मी affidavit करून देते नावाचे, मग माझे लग्ना नंतरचे नाव घालाल का?
Affidavit वर दोघांच्याही सह्या हव्याच म्हणाले तर तुमच्या मिस्टरांना तिकडून स्टॅम्प पेपर विकत घेऊन त्यावर affidavit प्रिंट करून सही करून, कुरियरने पाठवायला सांगू शकता.
एकदा हॉस्पिटलमध्ये तुम्हाला हव्या त्या नावाने नोंद झाली की पुढे काही प्रॉब्लेम नसावा.
https://www.pmccare.in/birth
https://www.pmccare.in/birth-certificate
इथे जा. रजिस्टर करा. आणि लॉगीन करून एखादी जन्मतारीख टाकून काही जन्मदाखले पहा.
१. जन्म दाखल्यांमध्ये बाळाच्या आईचे फक्त नाव आलेले दिसत आहे. आडनाव नाही. बाळाच्या वडिलांचे मात्र पूर्ण नाव या दाखल्यात आलेले दिसते. (त्या हॉस्पिटल मध्ये बाळाच्या वडिलांचे सुद्धा पूर्ण नाव अर्थातच तुम्ही देणार आहात)
२. वडिलांचे पूर्ण नाव या दाखल्यात असते. "बाळाचे आडनाव" असा कोणताही उल्लेख त्यात नसतो. त्यामुळे चिंतेचे काही कारण मला तरी दिसत नाही. (अर्थात हा कायदेशीर सल्ला नव्हे. निरीक्षणावर आधारलेले मत)
३. जरी तुमची भीती खरी ठरली आणि समजा बाळाच्या जन्मदाखल्यावर आईचे माहेरचे नाव आलेच, तरी भयंकर समस्या निर्माण होईल असे वाटत नाही. कारण त्या दोघांचे लग्न प्रमाणपत्र तसेही नंतर मिळणार आहे. तसेही, आईच्या आधीच्या कागदपत्रांवर तिचे माहेरचेच नाव असते. (पुन्हा, हा कायदेशीर सल्ला नव्हे. निरीक्षणावर आधारलेले मत)
४. त्या साईटवर वरती ग्राहक सेवा केंद्राचा नंबर दिला आहे. तिथे विचारा कि सद्यस्थितीमुळे लग्नदाखला उपलब्ध होऊ शकला नाही, म्हणून बाळाच्या जन्मदाखल्यावर आईचे माहेरचे नाव जर आले तर ते लग्नदाखला मिळाल्या नंतर बदलता येईल का?
५. एखाद्या वकिलाला (ह्या क्षेत्रातल्या) फोन करून याबद्दल नीट माहिती विचारू शकता
६. महापालिकेत जन्म-मृत्यू नोंदणी विभागाचे व तिथे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांचे नंबर आजकाल पोर्टलवर मिळतात थोडे शोधले तर. त्यांना सुद्धा विचारू शकता.
(डिस्क्लेमर: हा प्रतिसाद निरीक्षणे व अनुभवाच्या आधारे केवळ मदत करण्याच्या उद्देशाने लिहिला आहे. हा कोणत्याही प्रकारे या क्षेत्रातील तज्ञ वा अधिकृत व्यक्तीकडून मिळालेला कायदेशीर सल्ला नव्हे)
तुमच्या डॉक्टरलाच विचारा मी
तुमच्या डॉक्टरलाच विचारा मी affidavit करून देते नावाचे, मग माझे लग्ना नंतरचे नाव घालाल का?
....
नाही चालत
त्यांनी जरी दिले तरी इन्शुरन्स क्लेम ला नाही चालणार कारण त्या नावाचा आयडी प्रूफ नाही
>> आता नाही त्रास करून घ्यायच
>> आता नाही त्रास करून घ्यायच तब्येतीवर परिणाम होईल, निघेल यातूनही मार्ग.
+111
काहीही कायदेशीर अडचण येत नाही
काहीही कायदेशीर अडचण येत नाही. मी आडनाव बदललेले नाही. आम्हाला कुठलाही त्रास न होता जन्मदाखला मिळाला. भारतीय कायदा कुठेही आईने लग्नानंतर आडनाव बदलावे असे म्हणत नाही. तुम्ही ठाम राहा.
त्यांच्याकडे लग्नाचं
त्यांच्याकडे लग्नाचं सर्टिफिकेट नाही ही त्यांची (म्हणजे डॉक्टरांची) मुख्य अडचण असावी.
डॉक्टरांनी आम्हाला कधीही
डॉक्टरांनी आम्हाला कधीही लग्नाचा दाखला मागितला नाही, त्यांना तो विचारायचा अधिकार नाही
उद्या एखाद्या विधवेला, लग्न न केलेल्या स्त्रीला मूल होणार म्हणून ते जन्माची नोंद करायला नकार देणार का? हा अधिकार कुणी दिला त्यांना?
बाळाला त्याच्या वडलांचं नाव
बाळाला त्याच्या वडलांचं नाव आणि आडनाव लावण्याची त्यांची इच्छा आहे म्हणून असेल.
लग्न झालेलंच नसेल किंवा नवरा गेलेला असेल तर स्त्री स्वतःचंच नाव आणि आडनाव लावत असेल बाळाला.
बाळाच्या वडिलांचे नाव येणार
बाळाच्या वडिलांचे नाव येणार आहेच जन्मदाखल्यावर. त्यामुळे बाळाला अर्थातच ते नाव आडनाव लागेल.
त्यांची भीती आहे त्या दाखल्यावर आईचे आडनाव वेगळे (माहेरचे) येईल व त्यामुळे पुढे कदाचित काही समस्या येऊ शकतील.
बाय द वे, लग्नप्रमाणपत्रच नाही मिळालेले म्हणजे आईच्या बाकीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर (आधारकार्ड/पासपोर्ट इत्यादीवर) लग्नाआधीचेच नाव असणार आहे.
@वरदा: सहमत
<<<त्यांच्याकडे लग्नाचं
<<<त्यांच्याकडे लग्नाचं सर्टिफिकेट नाही ही त्यांची (म्हणजे डॉक्टरांची) मुख्य अडचण असावी.>>> हो, तीच समस्या झाली आहे. आतापर्यंत वाटत होते की वेळ आहे निघेल काहीतरी मार्ग.
कालच नवरा गेला आहे गावी, प्रयत्न करतो बोलला अन तेवढ्यात सासरे कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याचे कळलेप.
वरदा, मलाही असेच वाटले होते की काही प्रॉब्लेम येणार नाही. पण डॉक्टरांनी घाबरवले, म्हणाल्या की मला माहित आहे खूप अडचण येईल अन मुख्य म्हणजे बाळाला जन्म दाखल्यावरच्या वेगळ्या नावाने भविष्यात त्रास होऊ शकतो.
<<<त्यांची भीती आहे त्या
<<<त्यांची भीती आहे त्या दाखल्यावर आईचे आडनाव वेगळे (माहेरचे) येईल व त्यामुळे पुढे कदाचित काही समस्या येऊ शकतील.
बाय द वे, लग्नप्रमाणपत्रच नाही मिळालेले म्हणजे आईच्या बाकीच्या महत्वाच्या कागदपत्रांवर (आधारकार्ड/पासपोर्ट इत्यादीवर) लग्नाआधीचेच नाव असणार आहे.>>> हो, त्यामुळे मी क्लेमच्या पैश्यांचा विचार सोडून दिला आहे, पण निदान जन्मदाखला तरी नीट हवा
काहीही कायदेशीर अडचण येत नाही
काहीही कायदेशीर अडचण येत नाही. मी आडनाव बदललेले नाही. आम्हाला कुठलाही त्रास न होता जन्मदाखला मिळाला. भारतीय कायदा कुठेही आईने लग्नानंतर आडनाव बदलावे असे म्हणत नाही. तुम्ही ठाम राहा. +111
विवाह दाखला पाहिजेच हो
आम्हाला जिथे तिथे दाखवावा लागतो
अजून एक, माझ्या passport मध्ये spouse column मध्ये नवऱ्याचे नाव आहे, हा सुद्धा प्रूफ म्हणून चालायला हवा
माझ्या नवऱ्याच्या
माझ्या नवऱ्याच्या जन्मदाखल्यावर कित्येक वर्षे ( वीस-बाविसाव्या वर्षी पासपोर्ट काढला तोपर्यंत) 'बेबी ऑफ... (आईचं नाव) असं नाव होतं.
अर्थात सासूबाईंंचं आडनाव सासरचं होतं. तेव्हा पासपोर्टसाठी काही तरी कागदोपत्री खटपटी करायला लागल्या होत्या बहुतेक.
तुम्ही लग्नाचं सर्टिफिकेट मिळवून ठेवा. जन्मदाखल्यावर जे काही नाव येईल त्यासोबत लग्नाचं सर्टिफिकेट जोडलं की पुढे कुठे अडचण यायचं कारण नाही असं मला वाटतं. (मला कायदेशीर माहिती नाही. जे वाटतंय ते सांगितलं.)
passport मध्ये spouse column
passport मध्ये spouse column मध्ये नवऱ्याचे नाव आहे, हा सुद्धा प्रूफ म्हणून चालायला हवा>> त्यासाठीसुद्धा लग्नाचा दाखला लागतोच.
आत्ताच्या परिस्थितीत
आत्ताच्या परिस्थितीत तब्येतीवर लक्ष द्या.बाकी टेन्शन घेऊ नका.नंतर सर्व कागदपत्रे मिळवता येतील. अगदीच काम झाले नाही तर बाळाला तुमचे नाव लावा.
नंतर सर्व सव्यापसव्य करा.मुख्य आहे ते पिल्लाचे आगमन.
देवकी +१
देवकी +१
वर माझ्या नवऱ्याचं उदाहरण यासाठीच दिलं, की काही आकाश कोसळत नाही दाखल्यावर काही वेगळं नाव असलं तरी. नंतर तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा या खटपटी करा.
एकदा दाखला मिळाला की काहीही
एकदा दाखला मिळाला की काहीही अडचण येत नाही. आमच्याकडे पुढे पासपोर्ट, आधार, मी guardian आणि लेक मायनर असं बँक अकाउंट, शाळेचा प्रवेश असं सगळं सगळं या वेगवेगळ्या नाव आडनावासकट विनासायास पार पडलेलं आहे
Marriage certificate दिलेत तर
Marriage certificate दिलेत तर क्लेम मिळेलच
कोण आहे टिपीए ?
Maternity बेनेफिट मिळायला
Maternity बेनेफिट मिळायला लग्नाचा काहीही संबंध नाही. तुम्ही तुमच्या इन्शुरन्सवाल्याला विचारा.
https://m.economictimes.com/wealth/insure/health-insurance/can-single-ma...
अभिनंदन
अभिनंदन
मी माझा ताजा अनुभव सांगते.
birth certificate .साठी माझे व नवर्याचे आधार कार्ड दिले होस्पीटल मध्ये. तिथून परस्पर BMC ward मधून certificate घ्यायचे. माझ्या मुलांचे नाव आम्ही नाव- माझे नांव as middle name -नवर्याच आडनांव as surname असे ठेवलेय.होस्पिटल मध्ये च birth certificate application form मध्ये च दोन्ही मुलांची नावे ठेवून दिली, नंतर add करण्याचे हेलपाटे वाचवण्यासाठी. तरीपण तिथल्याbusy माणसाने। एका मुलाच्या नावात spelling mistake केली व एक जास्त फेरी झाली. लोकडाऊन असल्याकारणाने थोडा त्रास झाला कारण कमी कर्मचारी असत वोर्ड मध्ये.
अवांतर:
मी स्वेच्छेने माझ्या वडीलांचे नांव व आडनाव लावते. माझे आधार कार्ड व सर्वच महत्वपूर्ण कागदपत्रे वर वडिलांचे घराचा पत्ता आहे.
तर सारांश असा, मला मुलांच्या birth certificate करीता मेरैज सर्टिफिकेट (आमच्या बालकांचे मातापिता म्हणजे मी व माझा नवरा एकमेकांशी legally wedded आहोत याचा माझ्याकडे असलेला एकमेव पुरावा) MCGM G North ward ला लागले नाही. आधार कार्ड ने काम झाले. माझ्या दोन्ही मुलांनी माझे नांव व वडिलांचे आडनाव लाउनही.
चिंता खरू नका. अगदी च जास्त चिंता विटत असेल तर
डिलीवरी जिथे कराल तिथल्या होस्पिटल मध्ये विचारपूस करून घ्या.
शुभेच्छा
Maternity बेनेफिट मिळायला
Maternity बेनेफिट मिळायला लग्नाचा काहीही संबंध नाही.
------//////
सिंगल मदर मध्ये ती स्वतः पॉलिसी होल्डर असते , तिचे मुलही तिच्या नावाचे , म्हणून प्रॉब्लेम येत नाही
ह्यांचे नवऱ्याबरोबर लग्न होऊन त्याच्या पॉलिसीत ह्या एड असणार आणि आता ह्यांचे आडनाव व मूल / नवर्याचे आडनाव डिफर होत असल्याने मॅरेज सर्टिफिकेट लागेल
मुळात ह्याना पॉलिसीतही लग्न झाल्या झाल्या एड केले नसणार , कारण तसे करताना मग इन्शुरन्स वाल्यानी तेंव्हाच मॅरेज सर्टिफिकेट मागितले असते व तो प्रश्न तेंव्हाच सोडवला गेला असता
आता मेंटरणीती आल्यावर मग केशलेस वगैरे करताना प्रॉब्लेम सुरू झाले असणार, असा माझा अंदाज
मी आत्ताच certificates
मी आत्ताच certificates .बघितले. issued by MCGM 2 months back .
त्यावर बालांचे नाव , लिंग
जनम तारीख जन्म ठिकाण
आईचे पूर्ण नाव। वडिलांचे पू्ण नाव
आधार क्र. आधार क्र.
जन्माच्या वेलेस आईवडिलांचा पत्ता
नांदणी क्र. व दिनांक
Remarks: इथे जन्मवेल दिले आहे
Marriage certificateकशाला लागेल? अशी मला शंका आहे
नवीन Submitted by BLACKCAT on
नवीन Submitted by BLACKCAT on 22 September, 2020 - 17:22
मलाही असेच वाटतेय.
VB तुम्ही सध्या claim.ची चिंता करू नका.तब्येत सांभाला. नवर्याला सांगा insurance वाल्यांबरोबर coordinate करायला.
Pages