"गॉल्फ इज डिसेप्टिवली सिंपल अँड एंडलेसली कांप्लिकेटेड; इट सॅटिस्फाय्स द सोल, अँड फ्रस्ट्रेट्स द इंटलेक्ट. इट इज अॅट द सेम टाय्म रिवार्डिंग अँड मॅडनिंग - अँड इट इज विदौट ए डाउट दि ग्रेटेस्ट गेम मनकाइंड एवर इंन्वेंटेड..." - आर्नल्ड पामर
आर्नीच्या या कोटने लेखाची सुरुवात करण्याचं कारण मी हा अनुभव "याची देहि याची डोळा" घेतलेला आहे. वरकरणी एक्स्लुसिव वाटणारा गॉल्फ हा खेळ जगाच्या कानाकोपर्या पर्यंत का खेळला जातो (जागेची वानवा असणार्या जपान, साउथ कोरिया या देशांत सुद्धा), याची वार्षिक उलाढाल जवळजवळ $८० बिलियन का आहे, यातंच या खेळाचं गम्य दडलेलं आहे. या अद्भुत खेळाची थोडक्यात ओळख आणि त्याचा प्रवेश माझ्या आयुष्यात कसा झाला, हे मांडण्याचा प्रयत्न या लेखाद्वारे मी करणार आहे. याकरता आपल्याला रिवाइंड करुन काहि वर्षं मागे जावं लागेल.
मुंबई अगदि सुरुवाती पासुनच एक भला मोठ्ठा मेल्टिंग पॉट आहे. भारताच्या काना-कोपर्यातुन आलेल्यांना मुंबईने सामावुन घेतल्याने त्यांनी सोबत आणलेली त्यांची भाषा, संस्कृती, पाककला इ. चं एक्स्पोझर मुंबईकरांना आपोआप मिळत जातं. त्यात आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे खेळ. क्रिकेट जरी मुंबईच्या डिएनए मध्ये असले तरी क्रिकेट व्यतिरिक्त प्रांतिक विविधतेमुळे मला लहानपणी इतक्या खेळांची ओळख झाली, आणि ते खेळायला मिळाले कि आज त्या आठवणींनी अचंबीत व्हायला होतं (एस्पेशियली माझ्या मुलांना इथे किती कमी खेळ खेळायला मिळाले हे बघुन). शिवाय ते खेळ हि सिझनल, आणि प्रत्येक खेळात अॅट्लिस्ट पांच वेरिएशन्स. काहिं हटक्या खेळांची नांवंच द्यायची तर शीग-रुपी, लेबल्स पावसात; सिगरेट्सची रिकामी पाकिटं, सॉफ्ट ड्रिंक्सच्या बाटल्यांचे बिल्ले, गोट्या हिवाळ्यात; आणि शेवटि पतंग, भोवरे, विटि-दांडु आणि इतर मैदानी खेळ उन्हाळ्यात. मूळात खेळाडु प्रकृतीचा असल्याने नविन खेळांचं आकर्षण मला नेहेमीच होतं. मात्र, सुरुवातीला तरी गॉल्फ हा एक अपवाद. चेंबूरला असताना बाँबे प्रेसिडेंसी गॉल्फ क्लब नजरेस पडायचा, तिथले हिरवेकंच फेरवेज, जोडिला वेल मॅनिक्युर्ड लँडस्केपिंग कुतुहुल वाढवायचे. पण तिथे जाउन खेळायचं सोडा, कोणि खेळतानाहि कधी दृष्टिस पडायचं नाहि. त्यामुळे गॉल्फबाबत एकप्रकारची मिस्टरी मनात कायम होती. ती मिस्टरी सॉल्व व्हायला नव्वदिचं दशक उजाडावं लागलं...
अमेरिकेत आल्यानंतर एकिकडे बास्केटबॉल, फुटबॉल, बेसबॉल या खेळांबाबत माझी रुची वाढत असतानाच, गॉल्फचीहि ओळख वाढत चालली होती. वीकेंड्सना टिवीवर मेजर टुर्नामेंट्सचं ४-५ तास लाइव कवरेज बघुन गॉल्फची कंटाळवाण्या खेळावरुन, समथिंग इंटरेस्टिंग असं वाटण्या पर्यंत प्रगती झाली होती. फ्रेड कपल्स, अर्नी एल्स यांचा स्मुथ, एफर्टलेस स्विंग; डेविस लव द थर्ड, ग्रेग नॉर्मन यांचा संयत पर्सेवरंस, आणि जॉन डेलीचा रासवट (ग्रिप इट अँड रिप इट) गेम या सगळ्यांमुळे उत्सुकता वाढतच चालली होती. शिवाय त्याकाळात ऑफिसमधे टिम बिल्डिंग अॅक्टिविटिज मधे गॉल्फ राउंड असायचाच. दोन-तीन राउंड्स खेळल्यावर हे प्रकरण दिसतं तेव्हढं सोप्पं नाहि याची कल्पना आली, फर्म कमिटमेंट शिवाय हा खेळ आत्मसात होणार नाहि आणि एंजॉय हि करता येणार नाहि याची खात्री पटत गेली. रोड-वॉरियर लाइफस्टाइल मुळे आपल्याला हे झेपेल का, याची शंका (इवेंच्युअली, इट टर्न्ड आउट टु बी ए बून*) होती पण तोपर्यंत गॉल्फचा किडा चावला होता. एका वीकेंडला जाउन गॉल्फची सगळी सामुग्री खरेदि केली, आणि जवळच्याच गॉल्फ कोर्स वर एक कोच गाठुन लेसन्स करता साइनप केलं.
प्रचि. #१: गॉल्फ क्लब्स, सिनियॉरिटी प्रमाणे उजवीकडुन डावीकडे...
अजुनहि आठवतंय, सुरुवातीला कोचने ९ आयर्न देउन मला (इमॅजनरी बॉलसोबत) प्रॅक्टिस स्विंग करायला लावलं. माझा पर्फेक्ट स्ट्रेट ड्राइव बघुन त्याने स्पष्टं सांगितल कि यु हॅव टु अनडु योर क्रिकेट स्विंग; इट्स टफ, बट डुएबल. इट विल टेक ए व्हाइल टु बिल्ड ए मसल मेमरी फॉर गॉल्फ स्विंग. माझी मानसिक तयारी होतीच, शिवाय फ्रेड, अर्नी, जॉन, आणि गॉल्फ सेंसेशन टायगर वुड्स (तेंव्हा पिजीएचं दार ठोठावत होता) यांच्या स्विंगची पारायणं करुन गृहपाठ हि चालुच होता. पुढे चार आठवड्यांच्या ग्राइंडनंतर कोचने माझ्यातला क्रिकेटर इरेझ करुन गॉल्फर जन्माला घातला. या चार आठवड्यांत कोचने घालुन दिलेले काहि प्रमुख धडे:
१. गॉल्फ ग्रिप (पकड):
१.१ क्लब कसा धरावा, इंटर्लॉक, ओवरलॅप कि बेसबॉल (टेन फिंगर)
१.२ पकड अशी जसं एखादं कबुतर हातात पकडावं. पकड इतकि हळुवार नसावी कि कबुतराला सहज उडुन जाता येईल, आणि इतकि घट्ट हि नसावी कि कबुतर गुदमरुन जावं
१.३ क्लब चोक डाउन कधी, आणि का करावा
२. गॉल्फ स्टांस:
२.१ बॉल कसा अॅड्रेस करावा; क्लबफेस टार्गेट एरियाशी कसा अलाइन करावा
२.२ दोन्हि पायांमधे किती अंतर ठेवावे
२.३ क्लब सिलेक्शन नुसार बॉलची पोझिशन कशी ठरवावी
२.४ पाठ-मान सरळ, पाय गुडघ्यात किंचित बेंड, आणि नजर फक्त बॉलवर कशी ठेवावी
२.५ खांदे, हात कसे सरळ आणि रिलॅक्स्ड, टेंशन फ्री ठेवावे
३. गॉल्फ स्विंग:
३.१ क्लब सिलेक्शन (पार्ट ऑफ कोर्स मॅनेजमेंट) कसे करावे
३.२ लोअर बॉडि (कंबरेखाली) कशी "काम" ठेवावी
३.३ बॅक स्विंग घेताना फक्त टॉर्सो कसा कॉइल करावा
३.४ डावा हात संपुर्ण स्विंग एक्झिक्युट होइपर्यंत सरळ (ताठ) कसा, आणि का ठेवावा
३.५ मान स्थिर आणि नजर न हलवता बॉलवर कायम कशी ठेवावी
३.६ बॅक स्विंग करताना उजव्या पायावर, आणि नंतर बॅक स्विंग ते फॉलो थु करताना उजव्या पायवरुन डाव्या पायाकडे वेट ट्रांस्फर कसं करावं
३.७ स्विंग एक्झिक्युट करताना फक्त टॉर्सो अन्कॉयल कसा करावा
३.८ बॉलशी काँटॅक्ट झाल्यावर, स्विंग फॉलो थ्रु कसा करावा
४. गॉल्फचे बेसिक नियम आणि एटिकेट्सः
४.१ बरोबर खेळणार्या गॉल्फरचं प्रिशॉट रुटिन सुरु झालं कि शांत रहावे बोलु किंवा हालचाल करु नये. मग तो टि-बॉक्स असो, वा फेरवे, वा पटिंग ग्रीन
४.२ फिक्स दि डिवट्स ऑन फेरवे, अँड बॉल मार्क्स ऑन द ग्रीन
४.३ बंकर्स (फेरवे, ग्रीन साइड) शॉट मारल्यावर बंकर्स मधली वाळु रेकने पुर्वि होती तशीच करावी
४.४ ऑनर सिस्टम पाळावी. तुमची टर्न येइस्तोवर तुमचा शॉट खेळु नये
(अजुन भरपुर आहेत, खाली चर्चेच्या ओघात लिहायचा प्रयत्न करेन…)
लेसन्स संपल्यवर मी रिलिजस्ली ड्रायविंग रेंजवर जायला सुरुवात केली. रेंजवर नविन मित्र मिळाले, गॉल्फ ग्रुप तयार झला. सुरुवा-सुरवातीला आम्हि अगदि झपाटल्यासारखे वेळ मिळेल तेंव्हा १८ होल्स खेळत होतो. वीकेंड्स, हॉलिडेज, समरमधे सुर्यास्त ९ वाजता होत असल्याने, कधी-कधी वीकडेजला ऑफिसमधुन लवकर निघुन ९/१८ होल्स खेळायचो. खूप मस्ती केली. बॉल व्यवस्थित, मला हवा तसा स्ट्राइक होत असल्याने माझा कांम्फिडंसहि वाढत होता. मसल मेमरी इंप्रुव होत होती. प्रि-शॉट रुटिन, शॉर्ट गेम, ग्रीन कशी रीड करायची, कोर्स मॅनेजमेंट इ. चे बारकावे अनुभवातुन समजत, उलगडत जात होते आणि आत्मसात होत होते. माझा पर्सनल स्कोर जस-जसा ड्रॉप होत गेला, तस-तसा गेम मी जास्त सिरियसली घेत गेलो, आणि एंजॉय करु लागलो. गॉल्फ जो एकेकाळी एक खेळ म्हणुन मिस्टरी होता, त्याचं रुपांतर आता पॅशन मधे झालं.
गॉल्फ हा एक कंटाळवाणा खेळ आहे असं सुरुवातीला झालेलं माझं मत, आता गॉल्फ जगातला सर्वोत्तम खेळ आहे या मतापर्यंत पोचलं. याला कारणंहि तशीच आहेत. प्रत्येक गॉल्फ कोर्स हा वेगळा, स्वत:चं असं आगळं-वेगळं वैशिष्ठ्य (कॅरेक्टर) मिरवणारा असतो, इतर खेळांसारखा चौकटित बांधला जात नाहि. शिवाय खेळताना गॉल्फ कोर्स हा वारा, पाउस, बर्फवृष्टि, थंडि/उकाडा/आदृता इ. सोबत तुमचा एकाअर्थी प्रतिस्पर्धीच असतो. त्यात आणखी भर म्हणजे गॉल्फ कोर्स मॅनेजमेंटला टी-बॉक्स मागे-पुढे, ग्रीन्सच्या कप पोझिशन बदलत ठेवण्याची मुभा असते. थोडक्यात, एकाच गॉल्फ कोर्सचे डाय्नॅमिक्स, टपाग्रफि सतत बदलता येण्याजोगे असल्याने त्यात नाविन्याची भर पडत असते. हे सगळे बारकावे, त्यांचा रेलवंस सुरुवातीला समजायला कठिण आहेत, पण मी वर लिहिल्या प्रमाणे तो "किडा" एकदा चावला कि अस्वस्थ करत रहातो. मिळेल त्या माध्यमातुन (टिवी, पुस्तकं, ऑडियो) माहिती मिळवुन, ज्ञान वाढवुन गेम इंप्रुव करण्याचा ध्यास लागतो. त्या प्रयत्नात शॉर्ट/लाँग आयर्न, ड्रायवर, वुड्स, हायब्रिड्स यांच्या क्लबफेसचा अँगल, ट्रॅजेक्टरी, बॉल स्लाइस्/फेड इत्यादिंना कारणीभूत असलेले फिजिक्सचे फंडे, जे शाळा/कॉलेजात डोक्यावरुन गेलेले असतात ते आता समजायला लागतात. अशा अनेक गोष्टि हळुहळु उलगडत जात रहातात, आणि त्यात जी मजा आहे ती शब्दात मांडणं कठिण आहे. थोडक्यात, पाण्यात पडल्या शिवाय पोहता येत नाहि असं म्हणतात. तसंच काहिसं गॉल्फबाबत म्हणता येईल - वन कॅनॉट ट्रुली अॅप्रिशिएट गॉल्फ अनलेस फ्यु राउंड्स आर प्लेड...
त्यानंतर गॉल्फ खेळायची एकहि संधी मी दवडली नाहि, रादर संधी निर्माण केल्या. *रोड-वॉरियर लाइफस्टाइल असल्याने क्लायंट मिटिंग्जना, सेल्स सायकल्स, ट्रेड शोज इ. च्या मिक्स मधे गॉल्फ राउंडस् यायला लागले. दुसरीकडे मित्रांसोबत अॅलबामा, नॉर्थ-साउथ कॅरलायना, फ्लोरिडा इ. जवळच्या स्टेट्समधे २-३ दिवसांच्या वार्षिक गॉल्फ ट्रिप्स होउ लागल्या. या ट्रिप्सची आय्टिनररी साधारण अशी असायची - ऑफिसमधुन शुक्रवारी लंचनंतर निघायचं. डेस्टिनेशन्ला पोचल्यावर १८ होल्स खेळायचे. शनिवारी पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन ३६ होल्स खेळायचे; मधे लाइट लंच. डिनरला फिंगर फुड, आणि सदर्न स्टाइल बार्बेक्यु रिब्ज हे स्टेपल फुड. सोबतीला सिंगल माल्ट, सिगार आणि कमराडरी. रविवारी परत पहाटे हेवी ब्रेकफास्ट करुन २७ अथवा ३६ (टाइम पर्मिटिंग) होल्स खेळायचे आणि संध्याकळी परत घरी. तोपर्यंत शरीराची बॅटरी ऑलमोस्ट ड्रेन झालेली असुनहि कुठलिहि तक्रार अजिबात नसायची. आत्मिक समाधान का काय म्हणतांत ते यालाच म्हणत असावेत. इट वाज ऑल्वेज वर्थ टु द लास्ट पेनी...
प्रचि. #२: गॉल्फ कोर्स खेळल्याचा पुरावा, नातवांकरता...
तर मंडळी, असा हा माझा गॉल्फचा प्रवास कित्येक वर्षे चालू आहे आणि पुढेहि चालू ठेवायचा आहे. टेनिस ३-४ वर्षांपुर्वि पासुनंच बंद केलं आहे. आता फक्त गॉल्फ. वीकडेजना संधी मिळेल तेंव्हा, शनिवारी हनी डु लिस्ट हातावेगळी केली कि पुढचा अर्धा रविवार फक्त माझा. त्या अर्ध्या दिवसांत मित्रांबरोबर गॉल्फ डेट - ब्रेकफास्ट+१८ होल्स्+लंच असा साधारण कार्यक्रम असतो. सुदैवाने मी रहातो त्या गावांत १० मैलाच्या रेडियसमधे पब्लिक, सेमाय-प्रायवेट, प्रायवेट असे मिळुन २०+ गॉल्फ कोर्सेस आहेल; माझे जवळपास सगळे खेळुन झाले आहेत. आजहि कामानिमित्त एखाद्या नविन शहरांत गेलो कि तिथले लोकल अॅट्रॅक्शन्स, पटेल स्पॉट्स वगैरे शोधण्या ऐवजी मी जवळपासच्या गॉल्फ कोर्सेसची माहिती काढतो, आणि तिथल्या एखाद्या गॉल्फ कोर्सवर कमीत कमी ९ होल्स तरी खेळण्याकडे माझा कल असतो. दोन्हि मुलांना सुरुवातीला मी स्वतः अणि नंतर कोचमार्फत लेसन्स दिल्याने त्यांच्यातहि आवड निर्माण झाली. दोघेहि आता रेग्युलरली खेळतात, माझ्याबरोबर क्वचित आपापल्या मित्रमंडळीत जास्त. मुलांसोबत टिवीवर गॉल्फ टुर्नामेंट्सचं कवरेज बघणं सहसा सोडत नाहि, मेजर्स तर बघतोच बघतो. टायगर वुड्सचा उभारीचा काळ (९०-०० दशक) आणि माय्केल जॉर्डनचा उतरता काळ बघता आला हे मी माझं परमभाग्य समजतो. एम्जे आणि टायगर यांच्याविषयी काय लिहिणार, जेव्हढं लिहावं तेव्हढं कमीच आहे. नजीकच्या काळातले गोट (ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम) माझ्या मते दोनच आहेत - माय्केल जॉर्डन आणि टायगर वुड्स. एम्जे आता रिटायर झालाय, लेकिन टायगर अभी जिंदा है. त्याचा गेल्या दहा वर्षातला स्लंप नसता तर आत्ता पर्यंत जॅक निकलसचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड कधीच मोडला गेला असता. अजुनहि वेळ निघुन गेलेली नाहि. टेक्निक इतकाच्, अंमळ टेक्निक पेक्षा जास्त गॉल्फ हा माइंड गेम आहे. अजुनहि चौथ्या राउंडला टायगरचं रेड-ब्लॅक आउट्फिट भल्या-भल्यांना इंटिमिडेट करतं, तो लिडरबोर्डच्या आसपास असला तर त्याच्या प्रत्येक ईगल/बर्डि नंतर होणार्या रोअर, आणि फिस्टपंप मुळे प्रतिस्पर्ध्यांचं अवसान गळुन पडतं. सर्वात जास्त पिजिए टुर्नामेंट्स जिंकण्याचा सॅम स्नीडचा रेकॉर्ड टायगरने टाय केला आहे, तो लवकरच मोडलाहि जाईल. जॅकचा १८ मेजर्सचा रेकॉर्ड सुद्धा तो मोडेल याबाबत मला तरी अजिबात शंका नाहि...
लेखाची सांगता बॉबी जोन्सच्या या कोटने मी केली नाहि तर ते उचीत ठरणार नाहि. गॉल्फ टॅलंट म्हणजे काय असतं याचं बॉबी जोन्स हा चालतं--बोलतं उदाहरण, दुसरं अर्थात टायगर. बॉबी जोन्सने स्थापन केलेला, आणि नंतर त्याच्या स्मृतीप्रित्यर्थ आमच्या गांवात हलवलेला अॅटलांटा अॅथलेटिक क्लब, बॉबी जोन्स ड्राइव पास करताना एक अद्भुत अशी लहर, चाटाहुची नदिवरुन येते आणि हृदयाला स्पर्शुन जाते. गॉल्फ ने आयुष्यात दिलेल्या सुवर्णक्षणांची आठवण करुन देत...
"गॉल्फ इज दि क्लोजेस्ट गेम टु द गेम वी कॉल लाइफ. यु गेट बॅड ब्रेक्स फ्रॉम गुड शॉट्स, यु गेट गुड ब्रेक्स फ्रॉम बॅड शॉट्स - बट यु हॅव टु प्ले द बॉल व्हेअर इट लाइज..." - बॉबी जोन्स
प्रचि. #३: युअर्स ट्रुली अॅट पिजिए टुर, चॅपियनशिप ट्रॉफि, शुगरलोफ कंट्री क्लब...
हो.. हा विकेंड राखुन ठेवला
हो.. हा विकेंड राखुन ठेवला आहे.. यु एस ओपन टेनीस फायनलसाठी व पुढचा विकेंड...यु एस ओपन् गॉल्फसाठी...
यु एस ओपन टेनीसमधे जाकोव्हिकच्या अनफॉर्च्युनेट व शॉकिंग एक्झिट मुळे.. व नदाल/ फेडररच्या अनुपस्थितीमुळे... टुर्नामेंटची मजाच गेली... आता डॉमिनिक थिम व मेड्वेडेव्ह मधे जो उपांत्य फेरीचा सामना आहे.. तो सामना जो जिंकेल तोच यु एस ओपन जिंकेल असा माझा अंदाज आहे. बघुयात.
यु एस ओपन गॉल्फ मधे ज्या फॉर्म मधे डी जे आहे त्यावरुन.. ही हॅज टु बी द हँड्स डाउन फेव्हरेट टु विन धिस यिअर्स यु एस ओपन..
टायगर खुप इन्कन्सिस्टंट खेळत आहे.. या वर्षीच्या लिमिटेड टुर्नामेंट्स मधे तो एकदाही कन्सिस्टंटली चार सलग सॉलिड राउंड खेळलेला नाही. पण एखाद्या- दुसर्या राउंडमधे .. ही स्टिल शोड अस द ग्लिंप्स ऑफ द टायगर व्हेन ही वॉज इन हिज प्राइम.. पण मेजर्स मधे यु कॅन नेव्हर काउंट हिम आउट!( ऑल्दो इट्स अ लाँग शॉट.. बेस्ड ऑन हिज गेम धिस यिअर)
पण राज... मायबोलीवर गॉल्फ आवडणारा( व प्रत्यक्ष खेळणारा!) एक नॉलेजेबल गॉल्फ प्रेमी बघुन मला खुप आनंद झाला आहे ...
>>जिम नँस सुद्धा?<<
>>जिम नँस सुद्धा?<<
हाहा, गुड ऑब्झरवेशन. बहुतेक तो सेम ऑडियो लेवल ठेवायचा प्रयत्न करत असेल.
टायगरच्या बाबतीत सहमत. आय थिंक, हि इज नॉट ड्रिवन इनफ इन रेग्युलर टुर इवेंट्स. बट हि विल ब्रिंग हिज ए-गेम टु मेजर्स, फॉर शुअर. जॅकचा १८ मेजर्सचा रेकर्ड सतत त्याला वाकुल्या दाखवत असेल...
जोकोचं मला हि वाईट वाटलं. व्हॉट कॅन हि डु, इट्स व्हॉट इट इज..
टुर्नामेंटची मजाच गेली... >>
टुर्नामेंटची मजाच गेली... >>>> अरे असं कसं म्हणतोस.. बिग थ्रींचं कोविड आणि डिफॉल्टींग ह्या कारणांनी असणं वाईट आहे पण नवीन खेळाडूंना बघायला मजा येते आहे की. कोस्टा, शापो, झ्वेरेव, FAA, मेडवेदेव आणि थीम सगळे मस्त खेळले की. २००७ च्या टी२० वल्डकपमध्ये नाही का फॅब ४ च्या अनुपस्थितीत पुढची पिढी उदयाला आली, तसच काहीसं.
सॉरी राज, जरा विषय सोडून झाली पोस्ट
मला गोल्फ म्हटले की फक्त
मला गोल्फ म्हटले की फक्त वूडहाऊसच आठवतो. त्याची पुस्तके वाचून मला गोल्फ थोडासा समजू लागलेला आणि बऱ्यापैकी आवडायला लागलेला.
चेंबूरचा तो गोल्फकोर्स मी पाहिलाय..तो गोल्फकोर्स ही वेगळीच दुनिया आहे. बाहेरच्या रुक्ष जगाशी फटकून असलेली. अर्थात कोणी कधी खेळताना पाहिले नाही. आमच्या नव्या मुंबईचा त्याहूनही मोठा गोल्फकोर्स आहे.
टायगर वूड चे एकही व्हिडिओ
टायगर वूड चे एकही व्हिडिओ पाहिले नव्हते.. धन्यवाद राज सजेस्ट केल्याबद्धल.. शब्दच नाहीत...
यु आर वेल्कम, च्रप्स. १९९७ची
यु आर वेल्कम, च्रप्स. टायगर बाबतचा एक किस्सा. १९९७ची मास्टर्स, १२ स्ट्रोक्स्ने जिंकल्यावर (कोर्स रेकर्ड, अजुन अबाधित) टायगरचे वडिल, अर्ल वुड्स एका मुलाखतीत म्हणाले होते. "टायगर विल डु मोर दॅन एनी अदर मॅन इन हिस्टरी टु इंपॅक्ट ह्युमॅनिटि...". त्या वाक्याला एका बापाचे बोल या व्यतिरिक्त जास्त मह्त्व दिलं गेलं नाहि. मात्र पुढिल दहा वर्षांनी ते शब्द प्रत्यक्षात उतरले...
>>आमच्या नव्या मुंबईचा त्याहूनही मोठा गोल्फकोर्स आहे.<<
मागच्या भेटित तो अंडर कंस्ट्र्क्शन (९ होल्स तयार होते, बहुतेक) होता, आता बहुतेक ओपन झाला असेल. माझ्या माहिती प्रमाणे बाँबे प्रेसिडेंसी हा मुंबईत एकच १८ होल चँपियन्शिप कोर्स आहे. एक कुलाब्याला आहे पण त्याची जास्त माहिती नाहि. तो फक्त सर्विसेस करता आहे. महालक्ष्मी, रेस कोर्स जवळचा विलिंग्ड्न १८ होल आहे पण तो शॉर्ट (एक्झिक्युटिव) कोर्स आहे. बाकि इतर फुटकळ आहेत, आरे कॉलनी, ठाणे वगैरे...
मी दोनदा मित्रांबरोबर बाँबे प्रेसिडेंसीला खेळलो आहे. इथल्या तुलनेत कोर्सचा दर्जा सो-सो आहे, पण मी एंजॉय केला. कदाचित लहानपणीच्या आठवणींचा वाटा असेल त्यात. कोर्स तसा अजिबात चॅलेंजिंग नाहि, फक्त एक डिफिक्ल्ट होल आहे बॅक नाइनवर. पार ४, डॉग लेग राइट, टाइट फेरवे, वॉटर इन प्ले. फेरवेच्या दोन्हि बाजुला अगदि लागुन जुन्या रेसिडेंशियल बिल्डिंग्ज आहेत. फक्त तेच होल थोडं चॅलेंजिंग असल्याने लक्षात राहिलेलं आहे…
राज.. उद्या टायगर इज पेअर्ड
राज.. उद्या टायगर इज पेअर्ड विथ कॉलिन मॉरीकावा... एक उगवता तारा.. एक अस्ताला जाणारा... मजा येइल त्या दोघांना एकत्र बघायला.. जस्टिन थॉमसही त्यांच्याबरोबरच ८: ०७ इस्टर्न टाइम...
२००६ मधे यु एस ओपन विंग्ड फुट ला झाले होते तेव्हा टायगर मिस्ड द कट..पण तेव्हा नुकतेच त्याचे वडिल वारले होते. बघुया तो काय करतो या वर्षी..
फर्स्ट राउंड..टायगर .. ३
फर्स्ट राउंड..टायगर .. ३ बोगीज व २ बर्डी... .. थ्रु ९ .. एकदम इन्कन्सिस्टंट.. एकाही होलवर ही कुड नॉट हिट द फेअरवे..असाच खेळला तर ही वोंट स्टिक अराउंड फॉर द विकेंड! मॉरीकावा सुद्धा फाल्तु खेळतोय.. उलट जस्टीन थॉमस कन्सिस्टंट व एकदम स्टेडी खेळतोय.. २ अंडर थ्रु ९.
राज.. बघतोयस का? जस्ट लाइक
राज.. बघतोयस का? जस्ट लाइक दॅट.. ३ बर्डीज इन अ रो फॉर टायगर.. नाउ १ अंडर.. अँड मिस्ड ४थ जस्ट बेअरली. ऑन पार ५ ... १२थ होल..बॉल ऑल्मोस्ट होल एजला सर्कल करुन आत जाता जाता मिस झाला..टाइड फॉर ६थ....
पण जस्टीन सुद्धा ३ बर्डीज इन अ रो.. लिडींग अॅट ४ अंडर आफ्टर १२.
मॉरीकावा.. गोइंग फ्रॉम बॅड टु वर्स्ट..
अधुन-मधुन बघतोय रे. टायगरचा
अधुन-मधुन बघतोय रे. टायगरचा रोलर कोस्टर राउंड चालु आहे. चौथी बर्डी पण येता-येता निसटली. हि वाज रॉब्ड ऑन #१२; डिस्पाय्ट ए पर्फेक्ट लाइन हिज बॉल जस्ट लिप्ड आउट. तिथुन पुढे त्याचा मोमेंटम बिघडला. एनीवे, आयॅम नॉट वरीड यट. उद्यापासुन पिक्चर क्लियर होत जाईल. कोर्स इज टफ, एस्पेशियली ग्रीन्स. इट्स गोइंग टु बी वेरी इंपॉर्टंट व्हेअर द बॉल इज लँडेड ऑन ग्रीन. वी विल गेट टु वॉच ग्रेट गॉल्फ ओवर द वीकेंड...
इट्स ए ब्लडबाथ. टायगर, डिजे ३
मुकुंद, इट्स ए ब्लडबाथ. टायगर, डिजे ३ ओवर पार; लेफ्टि ९ ओवर पार! ग्रीन्स आर ट्रु, अँड मर्सिलेस. टायगरचा हा पट बघ, #१२. क्ल्पना कर, पुढे काय होईल, कप लोकेशन चेंज केल्यावर...
धिस इयर, विंन्ग्ड फुट इज मोर ब्रुटल दॅन एवरिबडि थॉट. मला वाटत नाहि, टुडे एनिबडि हॅड ए बोगी फ्री राउंड. टायगरच्या आजच्या राउंडचे हायलाइट्स बघ. एस्पेशियली #१८ १६:२३च्या पुढे. ए हंबलिंग मोमेंट फॉर टायगर...
छान लेख राज.
छान लेख राज.
मला पण बघायला खूप आवडतो गोल्फ. ७-८ वेळेस ड्राइविंग रेंजला हात मारल्यावर तर अजूनच.
क्रिकेट मेमरी मात्र गेली नाही. एक तर दोन्ही पायावर समान वजन हे झेपायचे नाही आणि डोळ्याखाली बॉलचा कॉन्टक्ट ही सवय. पण एखादा शॉट बसला की खूप मजा वाटायची. बाकी सगळे ड्राइव.
माझा भाउ मात्र खेळतो. त्याला नेहमी म्हणतो मी. Golf is the only outdoor game where you tend to increase your weight.
पण तुम्ही दिलेली quotes पण आवडली. Like cricket, Golf is the story of life .बट यु हॅव टु प्ले द बॉल व्हेअर इट लाइज..." - बॉबी जोन्स.
मस्त.
राज.. हायलाइट्स कसले दाखवतोस.
राज.. हायलाइट्स कसले दाखवतोस.. टायगरची पुर्ण राउंड बघीतली...
परत एकदा हार्टब्रेक...खर सांगु.. गेल्या दहा वर्षात याची सवय झाली आहे... पण आता असा टायगर बघवत नाही रे.. टुथलेस..
म्हणजे तेंडुलकर/ कोहलीची सातत्यपुर्ण व डॉमिनेटींग बॅटींग बघायची सवय झाल्यावर.. जर ते एक एक रन स्कोर करायला स्ट्रगल करु लागले तर जश्या यातना झाल्या असत्या/ होतील ... तसच टायगरचा खेळ बघताना होते सध्या..
मान्य आहे विंग्ड फुट वॉज नेव्हर काइंड टु टायगर... अँड धिस कोर्स इज प्लेइंग टफ... तरीही.. टायगरला एवढा इन्कन्सिस्टंट व शेकी खेळताना बघुन असे वाटते की ही शुड रिटायर.. मे बी जस्ट प्ले मास्टर्स एव्हरी यिअर... दॅट कोर्स स्टिल सुट्स हिज गेम.
विथ हिज बॅक इंज्युरी अँड एज कॅचींग अप विथ हिम.. ही इज जस्ट अ शॅडो ऑफ अ प्लेयर वन्स ही वॉज...
अर्थात लेफ्टीबाबतही हेच म्हणता येइल.
तुला मी कॉलिन मॉरीकावाबद्दल सांगीतले होते.. ही विल बी अनदर जॉर्डन स्पिथ... टायगर वॉज वन्स इन अ लाइफटाइम काईंड ऑफ गॉल्फर.. मी स्वतःला भाग्यवान समजतो की त्याची पहिल्या १५ वर्षाची सोनेरी कारकिर्द्र मी माझ्या डोळ्यांनी एंजॉय केली. सिंपली मॅजिकल अँड अनबिलिव्हेबल!
>>Golf is the only outdoor
>>Golf is the only outdoor game where you tend to increase your weight. <<
ह्या बाबतीत अंशतः सहमत. रॅकेट स्पोर्ट्स्च्या तुलनेत गॉल्फ्मधे कमी दमछाक होते पण व्यायाम होतो. तुम्ही १८ होल्स चालायचं ठरवलं तर १०-१२हजार स्टेप्स आरामात होतात. शिवाय, तुम्ही जेव्हढे जास्त स्ट्रोक्स माराल तेव्हढा (स्कोर वाढला तरीहि) व्यायाम जास्त...
गॉल्फचा अजुन एक अॅडवांटेज हा कि वय वाढतं तसा तुम्हाला गेम अॅडजस्ट करता येतो. इतर खेळांच्या बाबतीत तसं करता येत नाहि...
आणी जखमेवर मिठ चोळायला म्हणुन
आणी जखमेवर मिठ चोळायला म्हणुन आत्ताच एन बी सी च्या पिकॉक अॅप वर टायगर जेव्हा २००० यु एस ओपन मधे १५ स्ट्रोकने जिंकला त्याचे हायलाइट्स दाखवले... विनिंग अ मेजर बाय १५ स्ट्रोक्स... व्हॉट अ डॉमिनंस! अर्नी एल्स व मिग्युएल येमिनेझ .. जॉइंट सेकंड.. जोकींगली म्हणाले... आता टायगर “त्याची “ यु एस ओपन जिंकला... आता बाकीच्या उरलेल्या प्लेअर्समधे आम्हा दोघातला प्लेऑफ्स कधी सुरु करायचा? ... ..
आणी तुला माहीत असेलच की अर्नी एल्स काही लेचापेचा गॉल्फर नव्हता.. त्याच्या सारख्या गॉल्फरला त्याने यु एस ओपन मधे १५ स्ट्रोकने हरवले होते... मला वाटते मेजर्स मधे हा एक रेकॉर्ड असावा..
>>टायगरची पुर्ण राउंड बघीतली.
>>टायगरची पुर्ण राउंड बघीतली...<<
मस्त! :थंब्स अपः
अरे इतक्यात रिटायर करु नकोस त्याला. अजुन ४-५ वर्ष तरी आहेत त्याच्या कडे, लेट्स होप हि मेक्स देम गोल्डन. आजचा राउंड क्रुशल आहे, बघुया काय होतं ते...
बाय्दवे, माझ्या मते झॅक जॉन्सनचा हा पट कालच्या राउंडचा हायपॉइंट, च्रप्स वॉच धिस...
>>मला वाटते मेजर्स मधे हा एक
>>मला वाटते मेजर्स मधे हा एक रेकॉर्ड असावा..<<
यप, अँड मास्टर्स (९७) हि बिट टाम काइट बाय १२ स्ट्रोक्स. हा सुद्धा मास्टर्स्चा रेकर्ड आहे बहुतेक...
कार्नेज!... ब्लडबाथ... काहीही
कार्नेज!... ब्लडबाथ... काहीही म्हण.. भल्या भल्यांना विंग्ड फुटने हंबल केले.. टायगर वोंट स्टिक अराउंड.. कालच्यापेक्षाही अजुन वाइट खेळतोय आज..बंद केले बघायचे..
फक्त ४ जण अंडर पार थ्रु २ न्ड राउंड.. आज तर फक्त २ जण कुड ब्रेक अ पार स्कोर फॉर द राउंड.. ब्रायन डिशेंबो.. -२ व बबा वॉटसन.. -१
पॅट्रिक रीड लिडींग .. -४.... आय हेट पॅट्रिक रीड... ही इज व्हेरी अॅरोगंट अँड वर्स्ट.. ही इज अ चिटर... आय रिअली होप... एनी बडी.. अदर दॅन हिम विन्स धिस यु एस ओपन!
तळटीपः १२ थ होल... पार ५.... ( होल नेम “ केप“ ) ..६३३ यार्ड्स.. अबब!.. माझ्यासारख्याचा स्कोर.. फक्त याच होलवर.. ७२ होइल...
गॉल्फ कोर्स खेळाडुंचा
गॉल्फ कोर्स खेळाडुंचा प्रतिस्पर्धी कसा होउ शकतो याचं उदाहरणंच विंग्ज्ड फुटने घालुन दिलेलं आहे. द वे कोर्स हॅज प्लेड लास्ट ३६ होल्स, आय वुडंट बी सर्प्राय्ज्ड टु सी विनर स्कोरिंग ओवर पार. द गॉल्फ कोर्स वुड बी द रियल विनर...
अरे तु पॅट्रिक रीडचा इतका उपहास का करतोस? तो बुलडॉग आहे म्हणुन? सो डज बब्बा. कि त्याचा कांट्रावर्शोयल पास्ट? एनीवे, आयॅम नॉट गोइंङ टु पुट माय डाइम ऑन एनीबडि. गॉल्फ कोर्सचं इतका फाडु आहे तर यु नीड गॉल्फ गॉड्स विथ यु टु विन धिस ट्रॉफी...
>>६३३ यार्ड्स.. अबब!.. <<
तु कदाचित हे वाचलं असशील. ऑल मेजर टुर्नामेंट्स रेनवटेड अँड अॅडेड मोर यार्ड्स टु पार फाय्वज - सिंपली टु कर्ब टायगर्स विनिंङ स्ट्रीक. आर्नी, जॅक, फ्रेडच्या काळात पार फाय्व्ज वेर नेवर मोर दॅन ५५० यार्ड्स. टायगर विथ हिज पंप्ड अप मसल्स स्टार्टेड हिटिंग ३००+ ड्राइव्ज, फिनिश विथ इगल्स अॅज इफ इट्स ए पीस ऑफ केक. मग सगळ्यांचे डोळे उघडले, अँड दे स्टार्टेड एक्स्टेंडिंग पार फाय्व्ज टु ६००+, अँड इवन पार फोर्स टु ५००+. होपिंग द कोर्स वुड बी टायगर रेडी...
गोल्फ चे बेसिक्स समजवण्यास
गोल्फ चे बेसिक्स समजवण्यास कोणी धागा काढेल का...
राज.. पॅट्रिक रिड चिटर आहे हे
राज.. पॅट्रिक रिड चिटर आहे हे सगळ्या जगाला माहीत आहे. बंकर मधल्या वाळुला मागे सरकवुन बॉलचा लाय बदलायची त्याची सवय सगळ्या जगाला माहीत आहे. तिच गोष्ट रफमधे त्याचा बॉल गेल्यावर चार चार वेगळे वेगळे वेगळे आयर्न क्लब्स.. बॉलच्या मागे प्रॅक्टीस स्विंग करायचा आविर्भाव करुन... बॉलचा लाय अनुकुल करुन घ्यायचा चिटरपणा सुद्धा सगळ्या जगाला माहीत आहे. तो जिथे जिथे खेळायला जातो तिथे तिथे त्याला “चिटर” ....“चिटर”....असेच हॅकल करतात. इट हॅज नथिंग टु डु विथ ही बिंग अ जॉर्जिया बुलडॉग. ही इज अ डिसग्रेस टु द गेम ऑफ गॉल्फ.
ब्रायसन डिशेंबो .. द ओनली गाय अंडर पार.. वन यु एस ओपन..
माझे निरिक्षण.. जे गॉल्फर्स मास्टर्समधे दादा आहेत( वुड्स, मिकल्सन, गार्सिया, बबा, ,जॉर्डन स्पिथ) ..... ते सगळे या कोर्सवर निष्प्रभ ठरले.
ऑन अ डिफरंट नोट... राज.. आज तुमचे फाल्कन्स् परत एकदा चोक झाले.. दॅट ऑल्सो आफ्टर डॅलस काउबॉइज फंबल्ड ६ टाइम्स अँड गेव्ह बॉल टु फाल्कन्स ६ टाइम्स! अनबिलिव्हेबल!
संपली एकदाची टुर्नामेंट, असा
संपली एकदाची टुर्नामेंट, असा कित्येकांनी नि:श्वास टाकला असेल. मुकुंद, तु वर म्हणाला तसा कार्नेज शेवटच्या राउंड पर्यंत सुरुच होता. ओन्ली डिशंबो हंग इन देर विथ अॅन अंडर पार. कोर्स वाज ब्रुटल थ्रुआउट, नो मर्सी व्हॉटसोएवर. डॅनी लीज फोर फुटर मेल्ट डाउन सेज इट ऑल. यु डोंट गेट टु सी सच "टिन कप मोमेंट्स" (सँस गिम्मी अनदर बॉल) इन मेजर्स...
बाय्दवे, अनदर ब्लड्बाथ अकर्ड इन अमेरिकन फुटबॉल टुडे, बट आय डोंट वाना टॉक अबाउट इट. मुकुंद, आय विल बाय यु ए बिअर, इफ यु डोंट ब्रिंग इट अप इन योर थ्रेड - अमेरिकन फुटबॉल...बॅड डे फॉर अॅटलांटा. साला,
बॅड डे फॉर अॅटलांटा. साला, मायामी के साथ भी हार गया, सॉकरमे...
अंकल आर्थर नीड्स टु स्टेप इन...
नाही रे.. मी पण खुप
नाही रे.. मी पण खुप फ्रस्ट्रेट झालो होतो तुमच गेम बघताना... मला डॅलस काउबॉइज आवडत नाहीत. उलट शेवटी ऑन् साइड किक वेळचा डिबाकल बघताना मीच ओरडत होतो... पिक अप द बॉल... पिक अप द बॉल... यु गाइज... व्हॉट् इज राँग विथ यु गाइज...!
आम्ही पण काही मोठे दिवे लावले नाहीत काल.. कसे बसे जिंकलो.. थँक्स टु अवर... स्टार.. आइस कुल किकर... हॅरीसन बटकर!
बाय द वे... आमच्या गेममधे.. सोफी स्टेडियम प्रथमच बघायला मिळाले.. आय वॉज इमॅजीनींग मायसेल्फ इन दॅट स्टेडिअम.. इन २०२८ लॉस एंजेलिस ऑलिंपिक्स!... .. बट माय गॉड... ५ बिलिअन( बिलिअन...... विथ कॅपिटल बी! ) डॉलर प्राइस टॅग फॉर दॅट स्टेडिअम.. माइंड बॉगलींग!
काय जबरदस्त बांधलंय स्टेडियम!
काय जबरदस्त बांधलंय स्टेडियम! आमच्या फाल्कन्सचं $१.५ बिलियन मर्सेडिज-बेंझ सोफाय्च्या समोर फिकं पडेल. २०२२ सुपरबोल पण आहे ना तिथेच? पुढचा रॅम्स्/चार्जर्सचा होम गेम नक्कि बघणार...
राज.. काल तु जे म्हणालास की
राज.. काल तु जे म्हणालास की पी जी ए मेड शुअर दॅट ऑल् गॉल्फ कोर्सेस आर मेड टायगर प्रुफ.. त्याबद्दल....
मला माहीत होते की मास्टर्स साठी ऑगस्टा टायगर प्रुफ करण्यात आले होते पण टुरवर सगळीकडे ते एफर्ट्स घेत होते हे मला माहीत नव्हते. पण मला आश्चर्य नाही वाटले. कारण टायगर यायच्या आधी गॉल्फ वॉज प्रिडोमिनंटली गोर्या लोकांचा गेम होता. टायगरच्या डॉमिनंसने निश्चितच गोर्यांच्या पोटात दुखायला लागले.. त्यामुळे पी जी ए ने टायगरप्रुफ कोर्सेस बनवायला सांगीतले असेल तर त्यात नवल नाही.
पण या आठवड्यात ब्रायसन डिशेंबोला बराच वेळ खेळताना बघीतले... मला नाही आठ्वत की तो कधी एवढा प्रचंड मस्क्युलर होता. मला तर त्याच्याकडे बघुन बेसबॉलमधले मशहुर स्टेरॉइड्स घेणारे चिटर्स...होजे कन्सेको, मार्क मॅग्वायर, सॅमी सोसा, बॅरी बाँड्स व अलेक्स रॉड्रिगस त्याच्यात दिसत होते... द गाय इज डेफिनेटली डुइंग स्टेरॉइड्स... नो डाउट अबाउट इट.. त्याचे ड्राइव्ह्स बघीतलेस? अॅट्लिस्ट... २५ ते ३० परसेंट लाँगर दॅन हिज क्लोजेस्ट कंपॅटिटर.. हिज बॉडी लुक्स अॅबनॉर्मली बिफ्ड अप लाइक दोज बेसबॉल ड्रग किंग्स आय मेन्शन्ड... आय होप आय अॅम राँग... बट हिज ड्रास्टिक इन्क्रीज इन बॉडी बल्क लुक्स सो मच लाइक बॉडी पंप्ड अप विथ स्टेरॉइड्स...
>>बट हिज ड्रास्टिक इन्क्रीज
>>बट हिज ड्रास्टिक इन्क्रीज इन बॉडी बल्क लुक्स सो मच लाइक बॉडी पंप्ड अप विथ स्टेरॉइड्स...<<
मुकुंद आय थिंक, इन रिगार्ड टु स्टेरॉइड्स, योर डिडक्शन इज राँग. कारण, आज-काल डोपिंग टेस्ट इतक्या कडक झालेल्या आहेत कि वन कॅनाट एस्केप. पण तुझ्या या शंकेतुन एक महत्वाचा मुद्दा समोर आला. टेक्नालजी. गॉल्फ एक्विपमेंट्स, गॉल्फ बॉल्स यांच्यातंच इतकि क्रांती गेल्या काहि वर्षांत झालेली आहे कि, इवन ए ५'८' गाय लाइक रोरी मॅकल्रॉय कॅन इझिलि हिट ३००+ ड्राइव. मागे मी एक टायट्लिस्ट प्रो विचा विडिओ पाहिला होता. इट वाज अॅस्टाउंडिंग टु सी व्हॉट डिफरंस ए सिंपल साइज अँड पोझिशन ऑफ ए डिंपल ऑन गॉल्फ बॉल कॅन मेक ऑन डिस्टंस+स्पिन. अमेझिंग...
राज.. डॅन क्विन मस्ट गो! इनफ
राज.. डॅन क्विन मस्ट गो! इनफ इज इनफ... तुमचे गेम नॅशनल टीव्ही वर असतात आमच्या इथे.. आजचा पण तुमचा गेम पाहीला.. डॅन क्विन मस्ट गो.. दॅट्स ऑल आय विल से..
आता वेध मास्टर्सचे.. जाणार का ऑगस्टाला.. नोव्हेंबर मधे.. अॅट लिस्ट प्रॅक्टिस राउंडला...
पण नोव्हेंबर मधे.. र्हॉडेडेंड्रॉन व अझेलिया ब्लुम्स शिवाय.. मास्टर्स बघायला कसेतरीच वाटेल.. शिवाय.. ग्रिन्स हार्ड व ट्रु असतील का नोव्हेंबरमधे.. विल कोर्स प्ले लाँग अॅज युज्वल ऑर शॉर्टर.. ऑर इव्हन लाँगर?... तुला काय वाटते?
शेवटच्या पझेशनमधे.. यु गाइज
शेवटच्या पझेशनमधे.. यु गाइज कुड हॅव्ह रन द टाइम बाय फ्यु रनींग प्लेज.. बट ७ थ्रोज? डॅन क्विनच्या डोक्यात दगड भरले आहेत.. दॅट्स ऑल आय विल से.. सिअॅटल सिहॉक्सना याच्याच डिफेन्सने २ दा लागोपाठ सुपरबोलला नेले होते हे तुमच्या डिफेन्सच्या कॉन्स्टंट फोर्थ क्वार्टर मेल्टडाउन कडे बघुन वाटत नाही...सॉरी!
बाय द वे.. निक फोल्स स्टिल हॅज इट इन हिम.. ही शुड बी द स्टार्टींग क्वार्टरबॅक फॉर द शिकागो बेअर्स..
>>जाणार का ऑगस्टाला..<<
>>जाणार का ऑगस्टाला..<<
नाहि रे. यावर्षी प्रेक्षकांना बंदि आहे, प्रॅक्टिस राउंड्स धरुन.
नॉर्मली, फॉलमधे ग्रीन्स एरिएट करतात, टु मेक देम रेडि फॉर नेक्स्ट सिझन. यावेळेला काय करतात ते एक कोडं आहे. बट हे, इट्स मास्टर्स माय फ्रेंड, ग्रीन्स वुड बी इन प्रिस्टिन कंडिशन, फेरवे बर्मुडा कुड बी डॉरमंट; लेट्स सी. हौएवर, अॅज फार अॅज डिस्टंस अँड कोर्स लेआउट गोज, अगस्ता वुड बी अॅज टफ (इफ नॉट मोर) अॅज इट हॅड बीन इन द पास्ट. मार्क माय वर्ड्स (प्लेइंग गॉल्फ इन फॉल, इज टफर दॅन स्प्रिंग ड्यु टु विन्ड, टेंपरेचर ड्रॉप एटसेट्रा दॅट अॅफेक्टस बॉल ट्रॅजेक्टरी)...
फाल्कन्स वाज ए बिग लेट डाउन यार. सुपरबोल धरुन चोक (ब्लुअप डबल डिजिट लीड) झाल्याची आता हॅटट्रिक झाली. होप थिस इज दि बॉटम, वी विल हॅव टु राइझ अप फ्रॉम दि डेब्रिज...
Pages