१.250ग्राम चिकन (शक्यतो बोनलेस)
२.दही- 1 मोठा चमचा
३.आले लसूण पेस्ट- 1.5 चमचा
४.लाल मिरची पावडर
५.हळद
६.तेल
7.मीठ
८.लिंबू-1
९.सजावटीसाठी कोथिंबीर
1.चिकन स्वच्छ धुवून घ्या
2.एका भांड्यात चिकन,दही, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर, जराशी हळद,थोडं मीठ लावून दोन तास मॅरीनेट करून घ्या.
3.दोन तासानंतर,गॅस स्टोव्ह चालू करा.
4.त्यावर फ्राईंग पॅन ठेवा, पॅनमधे एक चमचा तेल टाका
5.तेल गरम झाले की एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका.
6.आले-लसूण पेस्ट छान परतून घ्या.
7.आता मॅरीनेट केलेले चिकन पॅनमधे टाका, फूल गॅस करून दोन मिनिटे चिकन परतून घ्या असं केल्याने चिकन ज्युसेस चिकनमधेच लॉक होतात.
8.दोन मिनटानंतर गॅस सिम करा, आणि चिकन झाकून निवांत शिजू द्या पाणी आटेपर्यंत.
9.मधे मधे बघा पाणी आटले का ते.
10.चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
11.गॅस बंद करा. वरून एक लिंबू पिळून टाका.कोथिंबीर टाकून सजवा.
लेमन चिकन फ्राय तयार.
स्टेप 10 मध्ये variation
- चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, एक चमचा मीरे पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
पेप्पर चिकन फ्राय तयार.
-चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, पुदिन्याची पाने कापून टाका,10 मिनिटे परतून
मिन्ट चिकन फ्राय तयार.
>>घुंघुरा नाही हो घोंगुरा
>>घुंघुरा नाही हो घोंगुरा Proud
>>साऊथ मधे मिळते ती भाजी... पुण्यात कधी पाहिली नव्हती.. अजून मिळते का कुठे?
घोंगुरा म्हणजे अंबाडी. मिळते पुण्यात.
धन्यवाद राखी...माहिती
धन्यवाद राखी...माहिती दिल्याबद्दल.
थँक्स अंजली_१२.
थँक्स अंजली_१२.
मृणाली - गुलटे म्हणजे तेलगू
मृणाली - गुलटे म्हणजे तेलगू लोक... इकडे अमेरिकेत तेलगू लोकांना गुलते म्हणायची फॅशन आहे... तामिळ लोकांना तमडी म्हणतात...
Slang आहेत हे...
हे हे...भारीए.
हे हे...भारीए.
जेम्स बॉन्ड
जेम्स बॉन्ड
रात्रभर मॅरिनेट करून चिकन फ्रिजमध्ये ठेवता कि बाहेरच?
आधीचे २/३ तास बाहेर म्ग फ्रीजमधे, सकाळी बनवण्याआधी १ तास बाहेर रुम टेम्प्रेचरला आणुन.
हे दोन दोन मिनिटे एकेक बाजू असे किती मिनिटे करता??
प्रत्येक तुकडा पुर्ण मिळुन फक्त ३ ते ४ मिनीट...तेवढ्यात शिजते. मी तर ते करतानाच मटकावतो.
आप्पे पात्रात शिजते का चिकन व्यवस्थित?करपत नाही ना?
नाही करपत आणी शिजतेही व्यवस्थित. सुरुवातीपासुन गॅस मिडियम ठेवायचा. मी तर बिना तेल करतो फक्त पहिल्यांदा २-२ थेंब टाकतो मग दही नी चिकनचं पाणीच पुरेसं होतं.
हे मीनी तंदुरी चिकन टाईप झाले
हे मीनी तंदुरी चिकन टाईप झाले...तेल न टाकता भाजलेले..
करून बघेन एकदा.
हे मीनी तंदुरी चिकन टाईप झाले
.
हो तेल लागत नाही.चिकनची चरबी
हो तेल लागत नाही.चिकनची चरबी पुरेशी होत असवी.
गोंगुरा म्हणजे अंबाडी ची भाजी
गोंगुरा म्हणजे अंबाडी ची भाजी..थोडी आंबट असते अम्बाडीसारखीच
हे आप्पेपात्रातले चिकन कमी
हे आप्पेपात्रातले चिकन कमी तेलात कमी वेळात होणारे मस्त आहेत..२ राऊंड मध्ये दोघांची वाढणी होईल.. मला हि कल्पना खूप आवडली..
पण आप्पेपात्र नवीन आणावे लागेल.. आहे त्या आप्पेपात्रात प्रसादाचे अप्पे बनतात..गणपतीसाठी..
गोंगुरा म्हणजे अंबाडी ची भाजी
गोंगुरा म्हणजे अंबाडी ची भाजी..थोडी आंबट असते अम्बाडीसारखीच......
घोंगुरा म्हणजे अंबाडी च ना?? आंबटच असते ना? दोन्ही भाज्या एकच आहेत का?
अम्बाडीसारखी का म्हणते??
कन्फ्यूजन व्हायला लागले आता......
अंबाडी आंबट असते तशी त्याची
अंबाडी आंबट असते तशी त्याची पाने पण आंबट असतात.. असे म्हणायचे..आहे..
मृणाली, रेसिपी आवडली आणि करता
मृणाली, रेसिपी आवडली आणि करता येईल इतकी सोपी वाटली.
जेम्स बॉण्ड, मला तुमच्या टिप्सने आप्पे पात्रात करायची आयडिया खूप आवडली. माझ्याकडे ग्रीलिंगचा तवा आहे, त्यावर करता येईल.
धन्यवाद मीरातै.
धन्यवाद मीरातै.
तुम्ही म्हणताय तो ग्रीलिंगवाला तवा माझ्याकडे आहे तो मी फक्त चिकन पीसेस वर जळक्या रेषा उमटवायला वापरतो. :)) ( केएफसी कॉस्मेटिक लुक)
बिर्यानीसाठी मॅरिनेट केलेल चिकन मी त्या तव्यावर तेल न टाकता ग्रील करुन घेतो ते ही फारसा त्रास न पडता शिजते..हो हो लेग पीस सुद्धा.
मग त्याला फक्त जी सुकी/ग्रेव्हीत बर्बटुन घेवुन बिर्यानीला रचतो.
मृणाली मस्त रेसिपी, पण मी घरी
मृणाली मस्त रेसिपी, पण मी घरी चिकनबिकन करत नाही बाहेर जाऊन हादडते.
007 किती वर्णन? आता लाळ गळेल माझी
धन्यवाद मीरा
धन्यवाद मीरा
थँक्स धनुडी.
थँक्स धनुडी.
मृणाली, भारीच दिसतेयं लेमन
मृणाली, भारीच दिसतेयं लेमन चिकन फ्राय.. तुझ्या रेसिपीप्रमाणे नक्की करून बघेन.
रूपाली थँक्स
रूपाली थँक्स
छान दिसतं आहे. बघतो करुन. हेच
छान दिसतं आहे. बघतो करुन. हेच चिकन ६५ का?
पाणी आटेपर्यंत म्हटलंय पण पाणी घातलंच नाहीये. दही लावुन चिकनला सुटेल तेच पाणी ना?
थँक्स.
थँक्स.
दही लावुन चिकनला सुटेल तेच पाणी ना?
हो तेच पाणी.
छान आहे.
छान आहे.
पण घरी नॉनव्हेज नाही करत, खाणारा मी एकटाच. आणि आता बाहेरचे खाणे बंद.
कालच याचं एक वर्जन बघितलं.
कालच याचं एक वर्जन बघितलं.
चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.>>>>>>>>> हे झाल्यावर कांदा टॉमेटो चिरून घातले . १० मि . परतून घेतले.
मस्त
मस्त
घरी ढकलतो हि लिंक
म्हणजे चर्चा वाचून करावेसे वाटेल
घरी ढकलते ही लिंक. मला त्या
घरी ढकलते ही लिंक. मला त्या निमित्ताने अप्पेपात्र वापरले जाईल असे वाटते. नाहीतर आपलं घरगुती ग्रिडल आहेच.
धन्यवाद मानव
धन्यवाद मानव
धन्यवाद ऋन्मेष
धन्यवाद वेका.
आज करून बघितलो..
आज करून बघितलो..
कसं होईल, चांगलं लागेल का?? या विचाराने थोडंच केलं
मृणाली तै भारी आहे रेसिपी , टेस्ट पण भारी येते
बाकीच्या चिकनचं मग करी केलो
संशोधक मस्तच..तोंडाला पाणी
संशोधक मस्तच..तोंडाला पाणी सुटलं बघून...
करी पण लय भारी...
मी नॉनव्हेज खात नाही
मी नॉनव्हेज खात नाही
चुकून हा धागा उघडला आणि अचानक खायची इच्छा झाली !सरड्याची धाव कुंपणापर्यंत - या म्हणीनुसार, पनीर -रंगीबिरंगी ढब्बू मिरची - फ्लॉवर वगैरे वापरून सेम पदार्थ केला.
सगळ्यांना आवडला .
थँक्यू.
Pages