१.250ग्राम चिकन (शक्यतो बोनलेस)
२.दही- 1 मोठा चमचा
३.आले लसूण पेस्ट- 1.5 चमचा
४.लाल मिरची पावडर
५.हळद
६.तेल
7.मीठ
८.लिंबू-1
९.सजावटीसाठी कोथिंबीर
1.चिकन स्वच्छ धुवून घ्या
2.एका भांड्यात चिकन,दही, अर्धा चमचा आले-लसूण पेस्ट,लाल मिरची पावडर, जराशी हळद,थोडं मीठ लावून दोन तास मॅरीनेट करून घ्या.
3.दोन तासानंतर,गॅस स्टोव्ह चालू करा.
4.त्यावर फ्राईंग पॅन ठेवा, पॅनमधे एक चमचा तेल टाका
5.तेल गरम झाले की एक चमचा आले-लसूण पेस्ट टाका.
6.आले-लसूण पेस्ट छान परतून घ्या.
7.आता मॅरीनेट केलेले चिकन पॅनमधे टाका, फूल गॅस करून दोन मिनिटे चिकन परतून घ्या असं केल्याने चिकन ज्युसेस चिकनमधेच लॉक होतात.
8.दोन मिनटानंतर गॅस सिम करा, आणि चिकन झाकून निवांत शिजू द्या पाणी आटेपर्यंत.
9.मधे मधे बघा पाणी आटले का ते.
10.चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
11.गॅस बंद करा. वरून एक लिंबू पिळून टाका.कोथिंबीर टाकून सजवा.
लेमन चिकन फ्राय तयार.
स्टेप 10 मध्ये variation
- चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, एक चमचा मीरे पावडर टाकून 10 मिनिटे परतून घ्या.
पेप्पर चिकन फ्राय तयार.
-चिकनमधले पूर्ण पाणी आटल्यावर, मीठ आणि मिरची
पावडर, पुदिन्याची पाने कापून टाका,10 मिनिटे परतून
मिन्ट चिकन फ्राय तयार.
मस्त व सोपी रेसेपी.
मस्त व सोपी रेसेपी.
यम्म्म्
यम्म्म्
सोपी रेसिपी, फोटो पण मस्तच
सोपी रेसिपी, फोटो पण मस्तच
छान पाकृ.
छान पाकृ.
करून बघण्यात येईल.
एक सूचना : गै, मै, पै च्या ऐवजी गॅ, मॅ, पॅ लिहिले तर वाचताना छान वाटेल.
धन्यवाद sumit...
धन्यवाद sumit...
धन्यवाद कविता१९७८,तेजो.
एक सूचना : गै, मै, पै च्या ऐवजी गॅ, मॅ, पॅ लिहिले तर वाचताना छान वाटेल.
@चामुंडराय
हो ना, बरोबर आहे सूचना.
पण अजून मराठी टायपिंग शी म्हणावी तशी गट्टी जमलीच नाहिये....म्हणून तर कमेंट्स मधे पण कधी कधी डायरेक्ट इंग्रजी लिहिते...ईथे मध्येच इंग्रजी बरे दिसले नसते ना...
तरी एडिट करता येते का बघते.
...आभारी
भारीच बनलेलं दिसतय.
भारीच बनलेलं दिसतय.
पण आज गुरुवारी उपासाच्या दिवशी चिकनच्या धाग्यावर प्रतिसाद देताना जीवाची घालमेल होतेय.(ह्याचा संबंध वयाच्या धाग्यावर वय सांगताना होणार्या जीवाच्या घालमेलीशी लावु नये)
माझं एक व्हेरीएअशन असं आहे.
चिकन आणल्यावर त्यातले मांसल भागाचे सर्वसाधारण तुम्ही केलेत त्याच आकाराचे तुकडे करुन त्यात दही, आलंलसुण पेस्ट तिखट व मीठ टाकुन रात्रभर मॅरिनेट करतो. सकाळी आप्पेपात्रात थेंब थेंब तेल टाकुन २-२ मि. दोन्ही बाजुने क्रिस्पी भाजतो. तेलाचे थेंब टाकणं न टाकणं तुमच्यावर आहे.
भारी रेसिपी.... मला असेच
भारी रेसिपी.... मला असेच चिकन आवडते. आईला खोबऱ्याच्या ग्रेव्हीत बुडवून आवडते. मला किचनमध्ये जायचा कंटाळा, त्यामुळे खोबरे रेसिपी निमूट गिळावी लागते. आता ही रेसिपी देईन तिला.
जे.बाँ.यांच्यासारखेच मीही
जे.बाँ.यांच्यासारखेच मीही करते.पण त्यात घरचा मसाला,गरम मसाला,धणे-जिरेपूड,पुदिना,कोथिंबीर आणि कसुरी मेथी घालते.मॅरिनेशन तासभरच होते.
भारीच Try करून पाहणारे
भारीच
Try करून पाहणारे
धन्यवाद जेम्स बॉन्ड, साधना
धन्यवाद जेम्स बॉन्ड, साधना ताई, देवकी ताई.
थँक्स जाई.
थँक्स जाई.
खाऊगल्ली वर एकदा तु रेसिपी विचारली होती ना, तेच होतं लक्षात.. म्हणून टाकली रेसिपी.
जेम्स बॉन्ड
जेम्स बॉन्ड
रात्रभर मॅरिनेट करून चिकन फ्रिजमध्ये ठेवता कि बाहेरच?
देवकी ताई, आप्पे पात्रात शिजते का चिकन व्यवस्थित?करपत नाही ना?
मी ही करून बघेन मग आप्पे पात्रात.
रस्सा वगैरे प्रकार फारसे आवडत
रस्सा वगैरे प्रकार फारसे आवडत नाहीत त्यामुळे हे करुन बघणार. चिकन छान दिसत आहे.पुलेशु
छान रेसिपी, पण दही अन लिंबु
छान रेसिपी, पण दही अन लिंबु वर्ज्य असल्याने पास.
ही गुलटी लोकांची फेव डिश आहे.
ही गुलटी लोकांची फेव डिश आहे... मला देखील आवडते.. यापेक्षा जास्त मला घुंघुरा चिकन आवडते... कोणी तरी रेसीपी टाका...
गुलटी म्हणजे??
गुलटी म्हणजे??
घुंघुरा नाही हो घोंगुरा
साऊथ मधे मिळते ती भाजी... पुण्यात कधी पाहिली नव्हती.. अजून मिळते का कुठे?
देवकी ताई, आप्पे पात्रात
देवकी ताई, आप्पे पात्रात शिजते का चिकन ............ मी नाही आप्पे पात्रात करत.तव्यावर करते.
जेम्स बॉन्ड आप्पेपात्र वापरतात.
@mrunali.samad पाककृती
@mrunali.samad पाककृती लिहण्यासाठी कृपया "पाककृती" हा लेखन प्रकार वापरा. तुम्ही "लेखनाचा धागा" वापरला आहे. "पाककृती" लिहण्याचा मोठा फायदा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारामधे त्याचे आपोआप वर्गीकरण होते. उदा. "शाकाहारी का मासाहारी" , भारतीय का इतर देशीय.
लेखनात मुख्य फोटो दिला असला तरी मजकुरातली इमेज संपादन करून तुमची तुम्हाला सहज काढता येते. मी इथे योग्य तो बदल केला आहे , पण "संपादन करून" तुमचाही तुम्हाला करता येईल.
असेच कोथिंबीर, पुदीना आणि
असेच कोथिंबीर, पुदीना आणि हिरवी मिरची(अर्थात दही+कसुरी मेथी हे आहेतच) वाटून करून पाहिले होते.मी खात नसल्याने कसे झाले माहीत नाही.पण लेकाला आवडले
यू tyube var पाहिले..
सकाळी आप्पेपात्रात थेंब थेंब
सकाळी आप्पेपात्रात थेंब थेंब तेल टाकुन २-२ मि. दोन्ही बाजुने क्रिस्पी भाजतो.>>>
हे दोन दोन मिनिटे एकेक बाजू असे किती मिनिटे करता??
बाकी इतका पेशन्स मला असेल का माहीत नाही, नसावा...
Webmaster,
Webmaster,
प्रतिसाद दिल्याबद्दल आभार.
मी रेसिपी पोस्ट केल्यावर लक्षात आले कि मी 'पाककृती' लेखन प्रकार वापरायला हवा होता.
आता मला हलवता येईल का रेसिपी 'लेखनाचा धागा' मधून'पाककृती' मधे?
@mrunali.samad सॉरी असा सोपा
@mrunali.samad सॉरी असा सोपा प्रकार नाही.
पण तुम्ही नवीन रेसीपी सुरु करून कॉपी पेस्ट करू शकता आणि मी नंतर हा धागा काढून टाकेन.मी नंतर पाहतो मला काही करता येते का ते.
@मृणाली, मॅरीनेट चे २ तास +३५
@मृणाली, मॅरीनेट चे २ तास +३५ मिनिटे असा एकूण लागणारा वेळ २ तास ३५ मिनिटे आहे ना? (बदल आवश्यक असेल तरच करा)
हो ना
हो ना..पाफा...
बरोबर.. लक्षातच आले नाही लिहिताना...
मॅरीनेट वेळ +३५मिनिटं असं लिहायला हवे होते...Max 2तास पण आपल्या सोयीनुसार 30 मिनिटे ते 2 तास मॅरीनेट करू शकतो अशी टिप लिहायला हवी होती.
थँक्स.
मृणाली तुम्ही नवीन बिझिनेस
मृणाली तुम्ही नवीन बिझिनेस रिकवायरमेन्ट दिलीत.... धागा एका ग्रुप मधून दुसऱ्या मध्ये हलवणे... कामाला लावताय वेमा ना
आभार webmaster
आभार webmaster.
तुम्हाला तसदी दिल्याबद्दल क्षमस्व.
(No subject)
च्रप्स, ते खरंच चुकुन झाले हो
च्रप्स, ते खरंच चुकुन झाले हो..
अजून रुळले नाही मी माबोवर (लेखन प्रकारात)
चुका होताएत.
धन्यवाद VB.
धन्यवाद VB.
धन्यवाद केशव तुलसी.
अरे वा मस्त इझी रेसिपी सापडली
अरे वा मस्त इझी रेसिपी सापडली. उद्याच करायचं आहे ड्राय स्टार्टर एका फॅमिलीकरता. हेच करून बघते. धन्यवाद!
Pages