Submitted by बिथोवन on 15 September, 2020 - 00:54
तुम्ही सचिन सुप्रिया या जोडगोळीचा "तिरुमला ऑईल" ही जाहिरात पाहिली असेल. ही जाहिरात पाहिल्यानंतर मला पडलेले प्रश्न.
(१) "मला आवडणारे पदार्थ मी नेहमीच खातो" असे म्हणताना सचिन त्याची तुंदीलतनु आतमध्ये खेचतो असे वाटते का?
(२) सचिनचे सुटलेले पोट दिसू नये म्हणून ढगळ असा टी शर्ट घातला असावा का? (कारण तो खरोखर फिट्ट असेल तर शर्ट आतमध्ये खोचलेला दाखवला असता असे वाटते.)
(३) सुप्रिया ज्या पद्धतीने "तिरुमला ऑईल" असे कॅन दाखवत ठासून म्हणते तेंव्हा ती एखादी इंजिन ऑईलची जाहिरात करते असे वाटते का?
(४) सुप्रियाने "तिरुमला ऑईल" असे न म्हणता "तिरुमला तेल" असे म्हंटल्यास योग्य वाटेल काय?
(५) ती दोघं पिळगावकर असल्याने आपल्याला पिळत आहेत असे वाटते का?
जाणकारांनी यावर प्रकाश टाकावा.
.....
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
येडच्याप कपल आहे ते....
येडच्याप कपल आहे ते.... त्यांचं एवढं मनाला लाऊन घेऊ नये.
ती रिपोर्टर काय तर म्हणे - "आम्ही तुम्हाला चक्क बटाटेवडे खाताना बघतोय..!" त्यावर मीम्स आलेत... मग पीळगावकर म्हणतो - "उद्या सकाळी या.. बटाटेवडे टाकतानाही बघाल.." शी.... किळसच आली ते मीम्स वाचुन...
ज्यांनी ज्यांनी ते मीम्स वाचलं असेल त्यांनी त्यांनी तिरुमला तेल विकत घेण्याचं स्वप्न सुद्धा बघणं अशक्य आहे..!
घाला पीठामध्ये तेल
घाला पीठामध्ये तेल
मग1 कोन बनवा रे
हळद मिरची मीठ मिसळून
गरम तेलात तळा रे
असे काही प्रश्न वगैरे पडले
असे काही प्रश्न वगैरे पडले नाहीत, पण ती जाहिरात काही जमली नाही असे मात्र वाटते.
किल्ली << मला पण हेच आठवले.
किल्ली << मला पण हेच आठवले.
शेजारी असते तर अधुनमधून वडे,
शेजारी असते तर अधुनमधून वडे, समोसे, भजी ,अळुवड्या आल्या असत्या. आम्हीही कौतुक केले असते.
पण तेल कोणते? सूर्यफूल, करडी, सरकी, तीळ,शेंगदाणे?
लॉकदाऊनमधे ह्या अॅडने
लॉकदाऊनमधे ह्या अॅडने पिळपिळ पिळले.
शिवाय आत्ता त्यानी tagline पण
शिवाय आत्ता त्यानी tagline पण बदलली आहे असे ऐकताना वाटते.
पूर्वी Fitness ऐकू येई आत्ता त्या ऐवजी happiness ची चिंता don't worry असे ऐकू येते
सचिन पिळगावकरने मराठी फिल्म
सचिन पिळगावकरने मराठी फिल्म इंडस्ट्री काही वर्षे वाचवली म्हणून त्याचे काही फालतू प्रकार पोटात घालावेच लागतील.
लॉकदाऊनमधे ह्या अॅडने
लॉकदाऊनमधे ह्या अॅडने पिळपिळले.....
एक धागा पण आहे ना माबोवरच.
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
तो धागा आणि प्रतिसाद वाचून पोट दुखेपर्यंत हसलो होतो आम्ही.
तिरुमला ऑइल असेच ब्रॅण्ड नेम
तिरुमला ऑइल असेच ब्रॅण्ड नेम वगैरे असेल तर ' तेल' फक्त मराठी भाषिकांसाठी नसेल बदलता येत...
जाहिरात बनवणे एजन्सी मार्फत होत असावे त्यामुळे कपडे,शब्दफेक ह्या बाबी सर्वस्वी टीम वर्क असतील..
पण
क्वालिटी टिकवणे/ स्पर्धेत उतरून शून्यापासून 4-5 प्लांट उभे करणे तेही 3 वर्षात .. हे नक्कीच फक्त ब्रँड अँबेसिडर मुळे / बटाटेवडया मुळे नाही जमवता येणार
जाहिरात नॉर्मल च वाटली पण
जाहिरात नॉर्मल च वाटली पण मिस्टर आणि मिसेस महागुरूंमुळे विशेष ट्रोल झाली
एजंसीला तरी थोडं कळायला हवं
एजंसीला तरी थोडं कळायला हवं की नको.. कुणाला जाहिरातीत घ्यावं ते. अशा सो कॉलड सेलिब्रेटींमुळे ब्रँड कायमचा धोक्यात येऊ शकतो.
तिरुमला ऑईलवाले मराठी
तिरुमला ऑईलवाले मराठी व्यवसायिक असून बीडचे आहेत. त्यांचा कपड्याचा पिढीजात व्यवसाय होता/आहे. आता बराच विस्तार आहे. कमी काळात बरीच झेप घेतली आहे त्यांनी. बाकी या तेलाचा काही अनुभव नाही पण सतत एवढ्या जाहिराती चालू असतात म्हनजे मोठा खप असणार.
जाहिरातीने नुकसान झाले असते
जाहिरातीने नुकसान झाले असते तर बंद केली असती ना.
म्हणजे जाहिरातीचा फायदा होतोय असं म्हणावं लागेल.
काय माहित... लॉकडाऊन च्या आधी
काय माहित... लॉकडाऊन च्या आधी तरी डी-मार्ट मधे यांचा ब्रँड विक्रीस नव्हता. आसपास च्या सुपरशॉपी मधे पण कधी दिसले नाहीत. कदाचीत बीड मधेच सगळे तेल विकले जात असावे आपण नुसत्या जाहिराती बघुन पिळुन निघतोय.![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
(No subject)
म्हणजे तुम्ही खास करुन हा
म्हणजे तुम्ही खास करुन हा ब्रँड दिसतोय का हे बघत होतात. जाहीरातीतून हेच अपेक्षीत असते.
ज्यांचा सचिनवर राग नाही, जे महागुरुचे ते सिरियल्स बघतही नव्हते त्यांना हा लक्षात राहिलेला ब्रँड घेण्यास हरकत नसेल, जे त्या जाहीरातीने साध्य होत असेल.
नाही नाही... उलट चुकुन सुद्धा
नाही नाही... उलट चुकुन सुद्धा हा ब्रँड ग्राहकांच्या नजरेला पडु नये अन आपल्या मार्ट वर / सुपरशॉपी वर परिणाम होऊ नये म्हणुन त्या त्या मालकांनी / मॅनेजमेंट ने इतकी वर्षं किती खबरदारी घेतली हे यावरुन सिद्ध होतं![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
मला तर वेगळीच शंका येते... तिरुमला नावाचं असं काही तेल वगैरे अस्तित्वातच नसेल... सर्व तेल कंपन्यांनी मिळुन मुद्दाम अशी जाहिरात करवुन घेतली असणार आणि तिरुमला ऐवजी ग्राहकांनी आपलं तेल भरभरुन विकत घ्यावं अशी आत्मघातकी मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरलेली असावी असं वाटतंय.
बाकी पिळगावकर इतर कोणत्या जाहिरातीत दिसतात का बरे..??
बाकी पिळगावकर इतर कोणत्या
बाकी पिळगावकर इतर कोणत्या जाहिरातीत दिसतात का बरे..??>>>>>> अजून डोकेदुखी हवीय?
नको नको.... झाली तेवढी पुरे
नको नको.... झाली तेवढी पुरे आहे![Biggrin](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/biggrin.gif)
जाहिरात थोडीशी ओबडधोबड आणि
जाहिरात थोडीशी ओबडधोबड आणि प्राथमिक स्तरावरची वाटली. म्हणजे सफाई आणि पॉलिश ची कमतरता. पण conspicuous आहे त्यामुळे लक्ष वेधून घेते.
मलाही तेच वाटतं हीरा.
मलाही तेच वाटतं हीरा. दुकानात गेल्यावर लोकांच्या लक्षात रहातेय तेच जाहीरातदारांना / जाहीरात कंपन्यांना हवं असतं.
बाकी तेल घेण्याबाबत लोक जागॄत होत असले तरी टक्केवारी कमीच असावी असे वाटते. दुकानात रिफाइंड तेलच भरपुर असतातच, फिल्टर्ड तेल फक्त भूईमूगाचेच असते. तेल आलटून पालटून घ्यावं म्हणतात पण सूर्यफूल, राइसब्रान, करडइ इत्यादि तेलं फक्त रिफाइंडच मिळतात.
आमच्या जवळपास घाणी एकच पण त्याच्या कडेही भूईमूग आणि तीळाचे तेल तेवढे घाणीचे असते बाकी सगळे ब्रँडेडच.
कोल्डप्रेस्ड तेलं दुकानात जी मिळतात ती सगळी सेंद्रीय आणी भयंकरच महाग.
विशेष आवडण्यासारखी नसली, तरी
विशेष आवडण्यासारखी नसली, तरी विशेष डोक्यात जाण्याइतकी पण वाईट नाही वाटली जाहिरात. सुप्रिया पिळगावकर आवडते मला
<<<जाहिरात नॉर्मल च वाटली पण
<<<जाहिरात नॉर्मल च वाटली पण मिस्टर आणि मिसेस महागुरूंमुळे विशेष ट्रोल झाली>>>+१११
तिरुमला ऑईलवाले मराठी
तिरुमला ऑईलवाले मराठी व्यवसायिक असून बीडचे आहेत. त्यांचा कपड्याचा पिढीजात व्यवसाय होता/आहे. आता बराच विस्तार आहे. >>> हो का?
आमच्या ईथे , एक तिरुमलाम्म्हणून मोठ्ठ कपड्याच शोरूम आहे . मी ईतके दिवस कोणतात री दाक्षिणात्य ब्रॅण्ड समजत होते - नल्ली सारखा .
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू
आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू मधे
तिरूमला दुध दही तुप मिळते
आम्ही बेळगावाला महाराष्ट्रात
आम्ही बेळगावाला महाराष्ट्रात मोजतो, म्हणून मला तर कर्नाटक साऊथ मध्ये येते हे कधी खरे वाटतच नाही. तिरुमल्ला असाच प्रकार असावा कदाचित
<<<घाला पीठामध्ये तेल
<<<घाला पीठामध्ये तेल
मग1 कोन बनवा रे
हळद मिरची मीठ मिसळून
गरम तेलात तळा रे>>>
कुठले तेल? तिरुमला ऑईल?
पण तिरुमला हे तेल कुणी कधी
पण तिरुमला हे तेल कुणी कधी वास्तवीक जीवनात कुठे विक्रीस उपलब्ध असलेलं पाहिलं आहे का..? पाहिलं असेल तर विकत घेऊन वापरलं आहे का..?? कसा अनुभव आहे..???
घाला पीठामध्ये तेल > या
घाला पीठामध्ये तेल > या जाहिरातीत घरजावई मालिकेतील प्रांजल आहे ना सिंगिंग शेफ?
Pages