दुधी भोपळ्याचे सूप

Submitted by MSL on 11 September, 2020 - 13:45
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक मध्यम अकराच कोवळा दुधी भोपळा,
एक कांदा,
लसूण ,हिरवी मिरची,आले,यांचे बारीक तुकडे,चवीनुसार,
मीठ,मिरी,लवंग,दालचिनी,तूप, जिरे
बटर/ लोणी

क्रमवार पाककृती: 

: दुधी चे तुकडे करून , दुधी आणि कांद्याचे तुकडे,आले,मिरची,लसूण,हे सगळे कूकर ल ३- शिट्ट्या करून घ्यावे...पाणी घालू नये
: नंतर मिश्रण मिक्सर वर फिरवून घाबे
: कढईत तूप घालून गरम करून, जिरे हिंग मिरी लवंग दालचिनी हे घाऊन परतावे...मग त्यात तयार ग्रेव्ही घालून ,गरज वाटल्यास थोडेसे गरम पाणी घालून मीठ घालावे..
: बटर / लोणी घालून गरमागरम सर्व करावे..
: चवीसाठी वरून थोडी मिरपूड घालावी...

वाढणी/प्रमाण: 
४-५
अधिक टिपा: 

दुधी अतिशय हेल्थ साठी चांगला असून, इतर पदार्थ पेक्षा,हा सोपा तसेच लहान आणि मोठ्यना आवडणारा चविष्ट पदार्थ आहे

माहितीचा स्रोत: 
Myself
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो?

>> दुधी अतिशय हेल्थ साठी चांगला असून, इतर पदार्थ पेक्षा,हा सोपा तसेच लहान आणि मोठ्यना आवडणारा चविष्ट पदार्थ आहे >>
अगदी अगदी. समारंभातल्या बुफेत तर दुधीचेच पदार्थ असतात.

लाल भोपळ्याची खीर करतो तशी दुधीची खीर छान लागते.
दुधी मुठीया, दुधी थेपला यासारख्या गुजराती रेसिपीज करू शकता.
सिंधी सेल भाजी, दुधी कोफ्ते पण चवीला छान लागतात.

छान सोपं आहे. पण फोटो का नाही?
आमच्या बागेत भरपूर पीक आल्यामुळे दुधी च्या वेगवेगळ्या रिसीपी चालू आहेत...<<< ट्राय करून इथेही पोस्ट करा.

दुधी चे भरीत
...दुधी किसून परतून घ्याचा तूप जिरे हिंग असे घालून...
... नेहमी प्रमाणे भरीत चे दही करायचे,न त्यात हा किस घालायचं
... न शिजवता भरीत तयार..

दुधी ची खीर...
किसून शिजवून घ्याचाय...
.... ## गूळ आणि गार दूध मिक्स करून,त्यात केशर बदाम काजू ई घालून ,त्यात, शिजवून गार झालेला किस घालायचं...ढवळून झाले की खीर तयार..
## साखर शिवाय ची खीर...एकदम टेस्टी...

दुधी पराठे...
## किसलेला दुधी चाळणीवर टाकून ठेवणे..
## कणीक मीठ िििििििििििििििििििििििििििििििििििि
चमचाभर घट्ट दही ,भोपळा किस, लसूण+ मिरची+ कोथिंबीर याची पेस्ट, हे सर्व घट्ट मळून घ्यायचे..पाणी घालायचे नाही...
## दुधी ल खूप पाणी सुटते...
## लगेच पराठे लाटायला घ्यावे...गरमागरम च खावे...

आपण कोथिंबीर वडी करतो ना, अगदी तशीच दुधी भोपळ्याची वडी करते मी. बाकीचे साहित्य आणि कृती same, फक्त कोथिंबीर ऐवजी दुधी किसून घालते. तशीच उकडून तळून घ्यायची. छान लागते.
आमच्या स्वयमला वडी खूप आवडते, त्यामुळे मी कसली ना कसली वडी नेहमी करते.
अशाच पद्धतीने कोबी, बीट किसून घालते आणि कोबीची, बीटची वडी करते. मेथी /पालक चिरून टाकते कोथिंबीर ऐवजी. मग मेथीची, पालकची वडी बनते.
वडी बनवताना त्यात थोडे कॉर्नफ्लोअर /तांदळाचे पीठ घालते, त्यामुळे वडी छान खुसखुशीत बनते.

हो...कोथिंबीर वडी तसेच इतर वडी करताना आमच्याकडे त्यात भाजणी मिक्स करतात...एकदम चविष्ट...
दुधी/ कोथिंबीर/ मुळे भाजी चे पाला ची वाडी ई...
::' त्यात थोडासा रवा मिक्स करून शॅलो / deep फ्राई करायचे...एकदम कुरकुरीत आणि खमंग...

मी खिरीसाठी दूध थोडं कस्टर्ड पावडर घालुन शिजवून घेते. छान लागतं.....
### थिकनेस साठी तांदूळ कणी पण वापरता येते...मस्त लागत...