![walache birade](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/recipe_images/2020/09/12/walache-birade.jpg)
भिजवून मोड आलेले वाल सोलून एक वाटी
ओले खोबरे अर्धा वाटी
लसूण 7-8पाकळ्या
हिरवी मिरची एक
1कांदा बारीक चिरून
गूळ आवडीनुसार
2 अमसुलं
जिरेधणे पूड
हिंग, कढिपत्ता, हळद, तिखट, मीठ, तेल, मीठ, कोथिंबीर
प्रथम ओलं खोबरं, मिरची, लसूण एकत्र वाटून घ्यावे.
पसरट भांडयात तेल तापवत ठेवावे, त्यात हिंग, कढिपत्ता टाकावा. लगेच चिरलेला कांदा टाकावा, लगेच वाल टाकावेत. त्यावर हळद, तिखट टाकून पाच सात मिनिटं सगळे परतावे. मग जिरेधणे पूड टाकून पुन्हा परतावे. आता त्यात वाल भिजतील इतके पाणी टाकून छान उकळू दयावे. आता आच बारीक करून झाकण ठेवावे. वाल शिजले की त्यात वाटण, अमसुलं, गुळ, मीठ, कोथिंबीर टाकावी. छान उकळी आली की झाकण ठेउन मंद आचेवर पाच मिनिटं ठेवावे. नंतर आच बंद करावी.
रंगासाठी फोडणीत थोडे तिखट घालावे. गुळ घातल्यावर वाल थोडे आक्रसतात. तेव्हा वाल नीट शिजल्यानंतरच गूळ, मीठ घालावे.
छानच... फोटो पण मस्तच
छानच... फोटो पण मस्तच !
लहानपणी शेजारच्या गुप्तेकाकूंनी भरपूर लाड केलेत माझे. सगळे पदार्थ चवीसकट लक्षात आहेत.
आशिका, येस. चिंच किंवा
आशिका, येस. चिंच किंवा कैरी... ऑसम![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कुठे होतीस काल? मी एकटीच लढले बिरडयाचा किल्ला
वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+
वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+ अंबा लोणचं + गरमा गरम वाफाळता भात अप्रतिम
हे दुसऱ्या दिवशी खायला अजून चविष्ठ लागत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
कुठे होतीस काल? मी एकटीच लढले
कुठे होतीस काल? मी एकटीच लढले बिरडयाचा किल्ला >>बिरडं एव्हढं ऑसम दिसतंय ते एकटच पुरुन उरलंय, किल्ला न लढवताच जिंकलास तु.
काल घरी बरेच पाहुणे होते, राखीसाठी, म्हणून इथे फिरकायलाच नाही मिळालं.
अहा... काय तोम्पासु दिसतय!!
अहा... काय तोम्पासु दिसतय!!![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
तर्री इतकीच असते का याला???
मी_केदार -वालाचे बीर्डे +
मी_केदार -वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+ अंबा लोणचं + गरमा गरम वाफाळता भात>> अगदी अगदी
या यादीत भर घालते:-
सीकेप्यांच्या तेलपोळ्या
चुलीवर शिजवलेले मटण/चिकन
सकाळी अकरा ते दुपारी दोन या
सकाळी अकरा ते दुपारी दोन या वेळेत हा बाफ दिसणार नाही अशी सोय करायला वेमांना सांगायला हवे. कसले अत्याचार होतात जिभेवर! आता डब्यातली भाजी कशी उतरावी घशाखाली?
फोटो ल य भा री - अगदी त्या आमसुलासकट!
वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+
वालाचे बीर्डे + उडदाचा पापड+ अंबा लोणचं + गरमा गरम वाफाळता भात अप्रतिम >>>>> +१००
फोटो जबरी, आज संध्याकाळीच वालाचं बिरड खाणार. तोपर्यंत तळमळ.. तळमळ....:)
गूळ आवडीनुसार >> हे सगळ्यात
गूळ आवडीनुसार >> हे सगळ्यात जास्त आवडलं. नाहीतर तिकडं मूगाच्या बिरड्यात चिंचेच्या निम्माच गुळ?
चुकून दुप्पट ऐवजी निम्मा लिहिलंस काय?
बाकी खायला कधी येऊ ते सांग पटकन![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
अवांतर : अंबा लोणचं म्हणजे
अवांतर : अंबा लोणचं म्हणजे अंबेने घातलेले की काय!!
कैरी लोणचं ना!
विनीता
विनीता![va.gif](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u33445/va.gif)
अवल, झक्कास पाकृ आणि फोटो पण
अवल, झक्कास पाकृ आणि फोटो पण
छानच लागत असेल. पहिल्या वाफेच्या जीरेसाळ भातासोबत वरून तुपाच्या धारेखाली अ हा हा लागेल !
आम्हीपण डाळिंब्याच म्हणतो. मी ओलं खोबरं न वाटता तसंच घालते.. नो लसूण, नो कांदा. बामणी पद्धतीनं. गोडा मसाला हव्वाच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
पूर्वी सदाशिव पेठेतल्या 'लज्जत'मधे पुरी-डाळिंब्यांची उसळ मिळायची. मस्त असायची. आता मिळते की नाही माहिती नाही.
व्वा..खुप सही आहे पा.क्रु.
व्वा..खुप सही आहे पा.क्रु.
फोटो तोंपासु आहे!
फोटो तोंपासु आहे!
केदार नमस्कार करतोयस की डोकं
केदार नमस्कार करतोयस की डोकं आपटतोयसं![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
धन्यवाद अवल, अगदी authentic
धन्यवाद अवल, अगदी authentic मूळ पाकृ दिल्याबद्दल![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
जबरी फोटो... एकदम तोंपासु...
जबरी फोटो... एकदम तोंपासु... मला फार म्हणजे फारच आवडते![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
माझ्या साबा मस्त करतात हे बिरडे...
वालाचे भटी बिरडे विथ गोडा मसाला पण आवडतेच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
वॉव काय फोटो आहे!!
वॉव काय फोटो आहे!!
मी कांदा लसूण न घालता करते. आता असं करून बघते एकदा. घरून आणलेले कडवे वाल संपलेत नेमके. इथे कडवे वाल मिळत नाहीत. जे वाल मिळतात ते लहानसे, लवकर शिजणारे आणि चवीलाही वेगळे असतात. तरी करून पाहीन.
य्मम
य्मम
मस्त! फोटो झकास.
मस्त! फोटो झकास.
एक नोव्हीस शंका: वाटण शेवटी शेवटी टाकायचंय, त्यात लसूण आहे, ते कच्चंच चांगलं लागतं?
यस
यस![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
तसही सीकेप्यांना लसूण भयंकर प्रिय
जोक्स अपार्ट वालाचा हरवसपणा (स्ट्रॉंग वास) लसणाने मारला जातो. शिवाय एक उकळी काढायचीय वाटण टाकल्यावर
अवल, आता रोज रोज जेवायला काय
अवल, आता रोज रोज जेवायला काय करू पण अपडेट करा(च) की![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
(No subject)
या पद्धतीने आज वालाचे बिरडे
या पद्धतीने आज वालाचे बिरडे केले. खूप आवडले. धन्यवाद अवल.
वैदेही मस्तच फोटोही सुंदर
वैदेही मस्तच![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
फोटोही सुंदर
हो मीही केलं होतं. कडवे वाल
हो मीही केलं होतं. कडवे वाल नाही, दुसरे छोटे वाल होते त्यांचं. मस्तच झालं होतं
इथे लिहायला विसरले.
मायबोली वाचून खुप नवीन गोष्टी
मायबोली वाचून खुप नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या
वालाच बिरडं मस्तच
Pages