मटण पाव किलो. (त्यातही थोडं फॅट काढून टाकल्याने सुमारे २०० ग्रॅमच असावे. मसाले व इतर प्रमाण त्याच हिशोबाने आहे) धुवून, तुकडे करून, हवे तसे ट्रिम करून घेणे. लहान तुकडे लवकर शिजतात.
खडे मसाले :
लवंग २
काळे मिरे ४-५
नखाएवढी दालचिनी
अर्धा चमचा जिरं
एक हिरवी वेलची
अर्धी लहान सुकी लाल मिरची
१ चमचा आलं + १ चमचा लसूण पेस्ट.
एक टमाटा भाजून त्याची साल काढून पेस्ट करून.
दीड मध्यम कांदा, चिरून, तळून. (हा माझ्याकडे रेडीमेड होता)
दही : १-२ चमचे, फेटून.
(आंबटपणा जास्त, तर दही कमी घ्या. टमाटा व दही दोन्ही आंबट असतील तर फायनल चव बिघडेल.)
१-२ हिरव्या मिरच्या उभ्या चिरून. (वरील फोटोत नाहीत. गार्निशिंगची कोथींबीरही नाही.)
सुके मसाले :
जिरेपूड
धणेपूड
हळद
लाल तिखट
मिरेपूड
फोटोनुसार क्लॉकवाईज, हे सगळे मसाल्याच्या डब्यातला उलुसा चमचा असतो, ते २-२ भरुन. रफली सपाट टीस्पून. मिरेपूड कमी घेतलीय.
कसूरी मेथी
मीठ.
साजुक तूप.
छोट्या प्रेशर कुकरमधे आधी तूप गरम केले.
त्यात सगळे खडे मसाले परतून घेणे. १५-२० सेकंदात होतात.
त्यात आलं+लसूण पेस्ट घालून कच्चा वास जाऊन रंग पालटेपर्यंत परतणे.
त्यात मटन घालून परतावे. मटनाचा रंग बदलून ऑफ व्हाईट झाला की थोडे मीठ घालावे. भरपूर पाणी सुटते, ते सुकेपर्यंत परतायचे आहे. भुना गोश्त आहे. ते खरपूस भुनणे गरजेचे आहे. मटन घालण्याआधी गॅस मोठा करणे, अन मोठाच ठेवणे.
पाणी सुकले, की सुके मसाले घालावे, पुन्हा परतावे. खाली लागत असेल तर थोडेसे(च) पाणी घालून परतावे. या स्टेपला गॅस कमी. नाहीतर जळेल.
यात तळलेला कांदा व फेटलेले दही व हिरवी मिरची घालून पुन्हा थोडं परतावे.
हे सगळं एकंदर सुमारे ८-१० मिनिट परतल्यानंतर त्यात अर्धा पेला (सुमारे १००-१२५ मिलि) पाणी घालून उकळी येऊ दिली, अन कुकरला झाकण लावून एक शिटी काढली. गॅस मंद करून सुमारे १५ मिनिटं मटन गळेपर्यंत शिजवले.
वाफ काढून टाकून झाकण उघडावे.
पाणी जास्त असेल तर थोडे आटवून त्यात टोमॅटो प्युरी घालून परतणे. मटनाचा अंदाज पाहून झाकण ठेवून शिजू देणे.
थोडी कसूरी मेथी, मिठाची चव अॅडजस्ट करणे.
शॉर्टकट टेस्टी भुना गोश्त तय्यार आहे.
हा अंगच्या रश्श्यातला प्रकार आहे. नुसते चमच्याने खायलाही छान लागते. सोबत पोळी/नान/भात आपापल्या चॉईसनुसार घेणे.
कुकर वापरायचा नसेल, तर मटन शिजायला अर्धा तास किंवा जास्त लागू शकतो.
बरं, आता सगळ्या प्रतिसादकांना
बरं, आता सगळ्या प्रतिसादकांना रिस्पॉन्स.
फोटो भारी आहे . पैकीच्या पैकी मार्क !
*
जाईशी सहमत
<<
थ्यांकू!
*
अकेले क्युं खाना?!
<<
नेक्स्ट टाईम एक किलो बनवतो मग बोलावतो. हे अगदीच घासभर झालं होतं. नहायेगा क्या निचोडेगा क्या स्टाईल
*
कशाबरोबर खाल्लेत?
<<
पोळी.
*
दीड तास नाही लागणार कुकराच्या रेसिपीला अगदी मटण धुण्यापासून सुरुवात केली तरी असं वाटतय.
<<
मी अगदीच अळमटळम करत टमाट्याची प्युरे कर, लसूण सोल, आलं किस वगैरे एकामागे एक करून हळूहळू केलं म्हणून वेळ लागला. दरम्यान मटनातल्या लिव्हरला थोडं फ्रायही करून गट्टम केलं.
मटण भूना आणि रुमाली रोटी
मटण भूना आणि रुमाली रोटी फेव्हरेट होते एकेकाळी. आमच्याईथे शालीमारला कधी चरायला गेलो तर स्टार्टरमध्ये एखादे चिकन सिझलर आणि मेन कोर्समध्ये मटण भूना व रुमाली रोटी दहापैकी सात वेळा ठरलेलेच असायचे. मधले काही वर्षे हे कुठेच खाणे झाले नाही. बरी आठवण केलीत. आता स्विगी झिंदाबाद. आजूबाजूचे सारे रेस्टॉरंटस ट्राय करतो..
'दवे का दिव्य' ब्रँड
'दवे का दिव्य' ब्रँड मसाल्यांची परवा इंदौरला जाहिरात पहिली.
बाकी ह्या रेसीपीतल कायबी कायबी कामाचं नाही!
पाणी सुकले, की सुके मसाले
पाणी सुकले, की सुके मसाले घालावे, पुन्हा परतावे. खाली लागत असेल तर थोडेसे(च) पाणी घालून परतावे. या स्टेपला गॅस कमी. नाहीतर जळेल.
<<
ह्या स्टेप आधी, मटणाला स्मोक फ्लेव्हर देऊन वरिल स्टेप करायला घेतली तर मटणाच्या चवीत कितपत फरक पडेल? कारण पाककृतीचे नाव 'भुना गोश्त' आहे म्हणून विचारतोय.
--
बाकी रेसीपी आवडली.
टमाट्याची प्युरी गॅसवर भाजून
टमाट्याची प्युरी करताना टमाटे गॅसवर भाजून केली, तर पुरेसा स्मोकी फ्लेवर येतो. @ अनिरुद्ध..
आज या पद्धतीने मटण करून
आज या पद्धतीने मटण करून पाहिले. छान रेसिपी आहे. माझ्याकडे रेडिमेड टोमॅटो पेस्ट होती म्हणून मी लिक्वीड स्मोक वापरला. चांगला फ्लेवर आला.
नॉनव्हेज आम्ही खात नसलो तरी
नॉनव्हेज आम्ही खात नसलो तरी काय झाले? डॉ आणी जागू यांच्या धाग्यावर नियमीत येणे जाणे होते. डॉ तुम्ही पाककृती बरोबर त्या डिशचे फोटो पण फार छान काढता. खूप टेंप्टिन्ग असतात.
आजच या कृतीने भुना चिकन करून
आजच या कृतीने भुना चिकन करून पाहीले. शिजवताना पाणी थोडे जास्त झाले. (चिकन असल्यामुळे फक्त दह्यात शिजवले असते तरी चालले असते असं आता वाटतयं) ते आटवण्यासाठी वेळ आणि पेशन्स नव्हता. त्यामुळे ग्रेवी झाली.
मी थोडे बदल केलेत. म्हणजे आलं लसणाबरोबर कोथिंबीर पुदीना वाटणात घातले. हिरवी आणि लाल मिरची स्कीप केली. फक्त लाल तिखट टाकले.
एक सौम्य तरीही रिच चवीचा हा प्रकार घरात सगळ्यांना आवडला.
Pages