उद्योगासाठी फंड कसा मिळवावा?

Submitted by विनिता.झक्कास on 10 August, 2020 - 03:16

नमस्कार मंडळी,

माझ्या मागिल धाग्यावरुन आपणांस लक्षात आले असेल की आम्ही एक स्पोर्टस व आर्ट्स ट्रेनिंग इंन्स्टीट्युट काढत आहोत. तयारी सुरु झाली आहे.
सध्या स्टार्ट अप साठी शासनाच्या काही योजना आहेत असे लक्षात आले. पण नेमके कुठे व कसे अप्रोच करावे ते कळत नाहीये. आमचे प्रोजेक्ट बरेच मोठे असल्याने फंड बराच लागेल.
तर...
स्टार्ट अप साठी फंड 'शासन किंवा संस्था' यांकडून कसा मिळवता येईल. कृपया जाणकारांनी मार्गदर्शन करावे.
धन्यवाद!!

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

कृपया अवांतर प्रतिसाद देवू नका. कुणी काय केले होते ह्याच्याशी माझा काही संबंध नाही.

विचारलेय त्यासंबंधी काही माहीती असेल तर सांगा

तुमचा प्रॉजेक्ट रिपोर्ट तयार आहे का? खर्च किती त्यातुन इनकम किती, टॅक्सेस किती लागतील. परवाने घेतलेले आहेत का? गुंतवणू क दार काय बघतो त्याला रिटर्न्स किती? त्याला तुम्ही खात्री देउ शकता का कि आज १०० रु गुंतवले तर तीन वर्शात किती % फायदा होईल. त्याला रिटर्न किती मिळेल? ह्या सर्वाचे पीपीटी बनवून एक प्रेझें टेशन तयार करा व एंजल इन्वेस्टर फर्म ला भेटा. तो फ्रॉड नाहीना ती आधी चौकशी करून घ्या. बँक कर्ज पण मिळेल.

किती मुले रजिस्टर झाली तर तुमचा धंदा ब्रेक इव्हन होईल? व नफा कमवु लागेल. व किती वर्शात ह्याचे काय गणित केले आहे? ते पीपीटीत लिहा.

सल्याबद्दल धन्यवाद अमा..पण तुम्ही ज्या पध्दतीने प्रश्न विचारलेत ते प्रोत्साहन देण्यासाठी विचारलेत असे वाटत नाहीत...
संस्था / कंपनी कशी उभी करायची? नोंदणी/ लायसन्स ह्याची मला पूर्ण माहीती आहे. मी स्वत: accounts Manager म्हणून करोंडोंचा टर्नओव्हर असलेल्या कंपनीचे accounts सांभाळते..
मी फंड उभारणीची माहीती विचारली कारण माबोवर अनेक क्षेत्रांतली माणसे आहेत..
एंजल इन्वेस्टर म्हणजे काय हे तुम्हांला माहीत आहे का? आधुनिक सावकारीचा हा प्रकार आहे..म्हणजे माझा उद्योग सुरू होण्याआधीच तुम्ही मला सावकाराच्या दारात उभे रहायला सांगताय.
त्यापेक्षा बँका चांगल्या!
मी शाासकीय योजना विचारल्या, त्याचे नावच नाही..असो ज्याची त्याची विचारसरणी!
नवीन उद्योग सुरू करण्यासाठी काही माहीती मला मिळाली आहे. वेळोवेळी इथे अपडेट करत राहीन.. ज्यांना खरंच स्वत:चे काही करायचे आहे, त्यांना ते उपयोगी पडेल. धन्यवाद

माझ्या मते अमा यांनी एखादी बँक किंवा एखादा इन्वेस्टर काय बघून लोन देईल, या द्रूष्टिकोनातूनच दिला आहे.
कृपया हमरीतुमरीवर येऊ नका. मराठी लोक तसेही धंदा करायचा म्हटले की जरा मागेच असतात. वरील माहितीचा/सल्ल्याचा उपयोग झाला तर ठीक, नाही तर सोडून द्या. तुमच्या उद्योगाला शुभेच्छा.

https://www.startupindia.gov.in/content/sih/en/home-page.html या ठिकाणी काही माहिती मिळतेय का, ते बघा.

पण तुम्ही ज्या पध्दतीने प्रश्न विचारलेत ते प्रोत्साहन देण्यासाठी विचारलेत असे वाटत नाहीत...
संस्था / कंपनी कशी उभी करायची? नोंदणी/ लायसन्स ह्याची मला पूर्ण माहीती आहे. मी स्वत: accounts Manager म्हणून करोंडोंचा टर्नओव्हर असलेल्या कंपनीचे accounts सांभाळते..>> ही माहिती तुम्ही बाफ काढताना दिलेली नाही. तुम्हाला व्यवसायास शुभेच्छा.

मला कशाची माहीती हवी आहे ते मी स्पष्टपणे लिहीले आहे...सगळं लिहणं मला गरजेच वाटलं नाही.

शुभेच्छासाठी धन्यवाद!

सेवा देणारे लोक तयार आहेत पण फंड हवा असा मुद्दा दिसतो आहे. >> बरोबर एसआरडी

साईटच्या लिंकसाठी धन्यवाद ऊबो. मी पण हीच साईट पाहातेय.
नवीन उद्योग सुरु करणार्‍यांसाठी ही साईट उपयुक्त आहे, धन्यवाद !