Submitted by मानव पृथ्वीकर on 26 September, 2015 - 05:12
डाव्या कानात हलकासा कर्णनाद सुरु झाला. ENT Specialist आणि Neurosurgeon यांच्या सल्ल्यानुसार MRI, कान तपासणी, नादाच्या / ऐकु येणाच्या वेगवेगळ्या चाचण्या इत्यादि झाले, आणि शेवटी हा Tinnitus असून त्याला तसा काही उपाय नाही असे सांगण्यात आले आणि Ginkgo Biloba या गोळ्या दोन महिन्यांसाठी घेउन बघा असे सांगितले. त्या घेतल्या पण कर्णनाद कमी झाला नाही, हळुहळु ब~याच प्रमाणात वाढला.
आयुर्वेदिक उपचार करुन विशेष फरक नाही.
अलिकडे उजव्या कानात सुद्धा कर्णनाद सुरु होतोय असे अधुन मधुन जाणवते.
कुणाला याबद्दल अधिक माहिती, अनुभव, इतर उपाय माहिती आहे का?
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सर्दी झालीय का ? त्यानेही हा
सर्दी झालीय का ? त्यानेही हा त्रास होतो, पण तो तसाच बराही होतो. नाकपुड्या बंद करून श्वास सोडता येतो का बघा, आधी फार जोर लावू नका. मला झाला होता त्रास पण या उपायाने एका दिवसात बरा झाला.
नाही. सर्दी पडसे काही नाही.
नाही. सर्दी पडसे काही नाही. चार महिन्यापासून सतत सुरु आहे कर्णनाद.
नाकपुड्या दाबून कानातून श्वास जातो.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.
लता मंगेशकरांना अशा प्रकारे
लता मंगेशकरांना अशा प्रकारे त्रास(अनाहत नाद) झाल्याचे वाचले होते.कायम हाय पीचमधे गायल्यामुळे हा त्रास झाल्याचे वाचले होते.
मलाही virtigo मुळे सुरु
मलाही virtigo मुळे सुरु झालेला हा त्रास २ वर्षे होता. खरच त्यावर नेमका असा उपाय नाहिये.
ह्या आवाजाकडे दुर्लक्ष होईल असा दूसरा कर्णप्रिय आवाज सतत ऐकणे हा एक उपाय आहे. हलका ac चा आवाज किंवा हलके संगीत.
माझा हा त्रास आता कायमचा गेलाय्. मी त्यावर हा उपाय केला होता. सतत कानात earphones घालून काहीही ऐकणे. tv पाहतानना डायरेक्ट तो आवाज कानावर आदळु नए म्हणून मी cordless headphones वापरते. त्यामुळे आधीचा कानातला तो सतत वादळ चालु असल्यासारखा आवाज बंद किंवा दुर्लक्षित होतो. त्या headphones ची मला इतकी सवय झालीय . तो वापरतांनाच् एकदा लक्षात आलं की आपल्या कानातला आवाज थांबलाय. मग हेडफोन्स वापरणे थांबवले तरी तो आवाज परत आला नाही.
हा उपाय मला असाच इंटरनेट वर ह्या tinnitus problem विषयी शोधतांना कळला. आणि लागू पडला हे विशेष. साधारण ३-४ महीने तरी लागतील पण.
धन्यवाद! हा खुपच आशादायी
धन्यवाद!
हा खुपच आशादायी प्रतिसाद आहे.
मला वाटत होते, हेडफोन्स वापरले तर उलट होईल, त्रास वाढेल की काय.
करुन बघतो हा उपाय.
मानव...तुम्ही केलात का वरील
मानव...तुम्ही केलात का वरील उपाय.तुम्हाला काही फरक पडला का? ईतर काही उपाय केलेत का तुम्ही कर्णनादावर,कृपया सांगा.
बऱ्याच उशीरा उत्तर देतोय.
बऱ्याच उशीरा उत्तर देतोय.
मी तो उपाय करून पाहिला पण काही फरक पडला नाही.
इतर कुठले उपाय केले नाहीत.
कर्णनाद तसाच सुरू आहे, तिकडे दुर्लक्ष करायला शिकलो आहे. अधून मधून कधी जास्तच जाणवतो, पण त्यावरही दुर्लक्ष करतो.
माझ्या एका ओळखीच्या बाईंना
माझ्या एका ओळखीच्या बाईंना होमिओपाथीच्या औषधाचा उपयोग झाला होता. चौकशी करून बघा.