Science Olympiad Foundation
सायन्स ऑलिम्पियाड फाऊंडेशन
वेबसाईट लिंक - http://www.sofworld.org/
मुलीच्या शाळेतून या स्पर्धापरीक्षेबद्दल समजले. (मुलगी पहिल्या ईयत्तेत गेली आहे.)
परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन जरी शाळेमार्फत होणार असले तरीही शाळा कुठलीही तयारी करून घेणार नाही म्हणून शाळेने आधीच सांगितले आहे. थोडक्यात सर्वस्वी जबाबदारी पालकांचीच आहे.
वर दिलेली साईट चाळली तर साधारण लक्षात आले की आमच्यावेळच्या स्कॉलरशिप, गणित प्रज्ञा स्पर्धा वा होमी भाभा सायन्स परीक्षा असायच्या त्या प्रकारची परीक्षा असावी.
माझे हे सगळे करून झाल्याने मुलीनेही अश्या शालेय स्पर्धा-परीक्षा द्याव्या अशी ईच्छा आहे.
पण प्रॉब्लेम असा आहे की तेव्हा आमची शाळा जबाबदारी घ्यायची, आता आपले आपणच बघायचे आहे.
तर या परीक्षेबद्दल कोणाला काही माहीती वा अनुभव आहेत का? जमल्यास प्लीज शेअर करा.
कोणाची मुले आता हि परीक्षा देत असतील त्यांनीही ईथे जरूर लिहा.
(तसेच जर कोणाच्या मते या परीक्षा बंडल असतात असे काही असेल तर आपले मतही जरूर नमूद करा. कारण मला याबद्दल काही माहीत नाही. फक्त यावरून वाद नकोत ईतकेच)
मला समजेल तशी माहिती मी धाग्यात वा प्रतिसादात अपडेट करेनच.
परीक्षेत मला पाच विषय किंबहुना पाच परीक्षा दिसत आहेत. पाचही स्वतंत्र आहेत. आम्ही तरी सर्वांचेच रजिस्टर करायचे विचार करतोय. (शाळेने ३१ जुलै रजिस्टर करायची लास्ट डेट सांगितली आहे.)
1. NCO - National Cyber Olympiad
2. NSO - National Science Olympiad
3. IMO - International Mathematics Olympiad
4. IEO - International English Olympiad
5. IGKO - International General Knowledge Olympiad
साईटवरून सॅम्पल पेपर डाऊनलोड केले, त्यात लोड घेण्यासारखे काही आढळले नाही. प्रत्येक प्रश्नाला चार पर्याय असा नेहमीसारखाच छान सुटसुटीत पॅटर्न वाटला. म्हणजे मुलीवर कुठलाही अतिरीक्त ताण न टाकता तिच्या कलाने तयारी करून परीक्षा देता येईल. एखादा विषय तिच्या आवडीचा नाही हे लक्षात आले तर सोडताही येईल.
सिलॅबस चेक करायला Books and Additional Reference Books यावर क्लिक करताच ई़जिनिअरींगसारखे कित्येक पब्लिकेशन्स आणी ऑथरची पुस्तके आढळून आली. त्यामुळे काय घ्यावे हे गोंधळून गेलोय. काही ई बूक्स आहेत तर काही हार्डकॉपी. तर गेल्या पाच वर्षांचे पेपर सेट देखील विक्रीला आहेत. आणि हे सर्व प्रत्येक विषयासाठी वेगवेगळे आहे. त्यामुळे याची कोणाला आयड्या असेल तर प्लीज शेअर. ई-बूक्स शेअर करून वापरता येतात का याचीही मला कल्पना नाही. आजवर कधी मागवले नाहीत.
तुर्तास ईतकेच
वेबसाईट लिंक पुन्हा देतो - http://www.sofworld.org/
प्रतिसादांच्या प्रतीक्षेत,
धन्यवाद,
ऋन्मेष
माझ्या भावाच्या मुलाने दिली
माझ्या भावाच्या मुलाने दिली होती ही परीक्षा त्यालाच विचारून सांगते. पण त्याच्या शाळेने तयारी करून घेतली होती आणि ह्याचा वेगळा होमवर्क असायचा. त्याच्या पुस्तकाबाबत तुमची शाळा/ शिक्षक नाही का सांगू शकणार , कुठली घ्यावी वगैरे ? करोनामुळे ते जबाबदारी झटकत आहेत का की हे ते करतच नाहीत !!
तुझ्या लेकीला शुभेच्छा.
ह्या परीक्षेच्या अभ्यासासाठी
ह्या परीक्षेच्या अभ्यासासाठी CBSE/ICSE ची त्या इयत्तेची पुस्तके वापरतात. तसेच त्यांचे सँपल पेपर आणि सराव संच त्यांच्या वेबसाइटवरून विकत घेता येतात.
पुढील उत्तर मी इंग्लिश मध्ये लिहीत आहे.
These exams test your practice and speed in giving accurate answers in the exam. If you search in the net 'difference between sof imo and rmo', you will get answers (mainly on quora). They might help you in deciding whether it's worth putting your child in this grind.
तुम्हाला आणि तुमच्या लेकीला शुभेच्छा.
माझ्या मुलाने पहिली पासून या
माझ्या मुलाने पहिली पासून या परीक्षा देणे सुरू केले. खूप छान अनुभव आहे. मुलांच्या विचारशक्तीला चालना मिळते. फारसा ताण आम्हाला तरी आला नाही. SoF ची छोटी छोटी पुस्तके आहेत, तीच सोडवली. आणि जुने पेपर्स. तयारी सुरूवातीला आम्ही करून घेतली. आता मुलगा स्वतःच करतो.
. शाळेच्या वेळेतच या परीक्षा होतात. Second level February मधे असते.
मी तरी सांगेन की तुमच्या मुलीला नक्की बसवा.
majhya muline gelya varshi ya
majhya muline gelya varshi ya pariksha dilya hotya. changalya asatat ani khoop load vagaire hoat nahi. tyanchi ji basic workbooks ahet tyatun survaat karun practice karun ghetali ki changali tayari hote.
Nakki basava parikshela.
English typing baddal kshamasva.
ऋन्मेऽऽष नेहमीच चांगल्या
ऋन्मेऽऽष नेहमीच चांगल्या मुद्यांवर धागे काढतो, ऋन्मेऽऽष तुम्हाला आणि तुमच्या लेकीला मनापासून शुभेच्छा
ऋन्मेष, तुला व तुझ्या गोड
ऋन्मेष, तुला व तुझ्या गोड लेकीला अनेक शुभेच्छा.
तुझे आणी माझे शाहरुख व इतर काही वरुन भलेही वाद असतील पण ते तिकडेच.
तुझ्या मुलीला आत्तापासुनच गोष्टी ऐकणे, टिव्ही वरील लहान मुलांच्या सायन्स क्वीझ ( टाटा स्काय वर वगैरे आहेत का ते बघ. ) बघणे, पेपर मधली कोडी सोडवणे, अशा गोष्टीत गुंतवायला सुरुवात कर. ती अजून लहान असल्याने पुस्तके वाचत नसेल पण मोठी व्हायला लागली की वाचनाची गोडी तिला लाव. मोबाईल पासुन दूर ठेव. अॅक्टिव्हिटी बुक्स मधून पण मुलांना फायदा होतो. तिला लायब्ररी लावुन दे. आमच्या इथल्या लायब्ररीत भरपूर पुस्त्तके आहेत. ( लॉक डाऊन मुळे लायब्ररी उघडी असेल नसेल कदाचीत )
एकदा का तिला वाचनाची गोडी लागली की तुझे ७५ टक्के टेन्शन कमी होईल. कारण वाचनातुन लॉजिक पण हळू हळु समजु लागते आणी तसेही या ऑलिंपीयाड मध्ये जनरली शाळेतल्या पुस्तकांमधलेच विचारले जाते. उदाहरणार्थ इंग्लिश पेपर असेल तर त्यातले ग्रामर वगैरे. त्याचा पण सराव करवुन घे, काही कठिण नाही.
माझा मुलगा मागच्या वर्षी
माझा मुलगा मागच्या वर्षी इंग्लिश आणि मॅथ्स ह्या दोन परीक्षांना बसला होता.
Sof चे टेस्ट पेपर्स सॉल्व्ह करून घेतले होते. बाकी काही वेगळी तयारी करून घेतली नव्हती.
तो इंग्लिश च्या 2nd लेव्हल ला 2 मार्क्स कमी पडले म्हणून qualify व्हायचा राहिला.
त्याला इंग्लिशसाठी bronz मेडल मिळाले आहे.
SOF चे टेस्ट पेपर्स सॉल्व करून घेणं पुरेसं होतं.
तसं इतर स्टडी मटेरियल गुगल केलं तर मिळेल पण मुलांच्यानी तेवढं सोडवणं झालं पाहिजे.
माझा मुलगा दरवर्षी गणिताची
माझा मुलगा दरवर्षी गणिताची परीक्षा देतो
यातली गणिते सोडवून इतकी तयारी होते की त्यापुढे शाळेची (सिबीएससी) पण सोपी वाटू लागतात असा त्याचा अनुभव आहे
आम्ही माझ्या एका मित्राच्या मुलाकडून त्याची जुनी पुस्तके आणि सराव पेपर आणतो
तो एक वर्षाने मोठा आहे
अत्यंत हुशार मुलांना स्कॉलरशिप वगैरे आहे पण आपल्याला मुलांचा चांगला अभ्यास होतो हे समाधान जास्त मिळते
मध्ये आम्ही त्याला भाषा ऑलिम्पियड ला पण बसवले होते
रुटीन शाळा आणि परीक्षा पेक्षा ह्या विविध स्पर्धात्मक परीक्षांना जरूर बसवावे पण त्याचा फार बाऊ करू नये आणि मुलावर अवाजवी दबावही टाकू नये
रुटीन शाळा आणि परीक्षा पेक्षा
रुटीन शाळा आणि परीक्षा पेक्षा ह्या विविध स्पर्धात्मक परीक्षांना जरूर बसवावे पण त्याचा फार बाऊ करू नये आणि मुलावर अवाजवी दबावही टाकू नये >> + १००००
माझा लेक गेली २-३ वर्श सायन्स , मॅथ्स , सायबर , ईन्ग्लिश चारही परिक्शाना बसतोय.
आम्ही काही टेन्शन देत नाही , घेतही नाही .
त्यान्ची पूस्तकं मिळतात , त्यांच्यातून अभ्यास करवून घ्यायचा . थोडं ईतर अवांतर वाचन असणं चांगलचं .
मुलांना आवड निर्माण झाली की पूढच्या वर्शी स्वतंच मागे लागतात फॉर्म भर म्हणून .
स्पर्धा परीक्षाना बसवणं नेहमीच चांगलं , असं माझ व्यक्तिगत मत आहे.
तुला आणि लेकीला शुभेच्च्छा
ऋन्मेऽऽष
ऋन्मेऽऽष
आपल्याला आणि आपल्या छोटया लेकीला माझ्या शुभेच्छा.
इथे सर्व लोक्स आपल्याला उपयोगी सजेशन देत आहेत. त्या सर्व लोकांच्या मताविरुद्ध मी माझे मत नोदवू इच्छितो. राग मानू नका.
आपल्या मुलीचा कोणत्या विषयाकडे कल आहे हे आपल्याला समजले आहे काय? ती बहुदा सहा सात वर्षाची असावी.इतक्या लहान वयात मुलाना कसलीही जाण नसते. गंमत म्हून सांगतो त्यावेळी मला मास्तर व्हायचे होतेे. लगेच पुढच्या वर्षी मला इंजिन ड्रायवर व्हायचे होते. आपली मुलगी अर्थात माझ्या इतकी मूर्ख नसणार. हे खेळायचे वय आहे तिला भरपुर खेळूद्या.
>>>>माझे हे सगळे करून झाल्याने मुलीनेही अश्या शालेय स्पर्धा-परीक्षा द्याव्या अशी ईच्छा आहे.<<<<
पहा आपल्या अतृप्त इच्छा मुलांवर लादू नका . त्याना त्यांच्या कलाने घेऊ द्या. जर ती गणित , शास्त्र वा कोणत्याही इतर विषयांत जिनिअस असेल तर प्रश्नच मिटला. परिक्षा वगैरे द्यायची गरजच नाही.
आई बाबांसाठी कष्ट करणारी लहान मुले बघितली कि मला वाईट वाटते मग ती विटांच्या भट्टीवर राबणारी असोत वा घरी स्पर्धा परीक्षांची तयारी करणारी असोत. एकूण एकच
मी इथे पोस्ट टाकली आहे , ती
मी इथे पोस्ट टाकली आहे , ती पण पहा.
https://www.maayboli.com/node/75468
छान प्रतिसाद आले. सर्वांचे
छान प्रतिसाद आले. सर्वांचे एकत्रित आभार मानतो आणि एकत्रित रिप्लाय देतो. आणि हो, शुभेच्छांबद्दल मनापासून धन्यवाद
पुस्तकांबद्दल आपण सुचवल्याप्रमाणे शाळेलाच विचारून बघतो. निदान त्यात तरी काही कल्पना त्यांना आहे का चेक करतो.
सँपल पेपर फक्त सँपल पुरते आहेत. मागच्या पाच वर्षांचे पेपर आहेत विक्रीला. ते घ्यायचा विचार आहे. माझी इंजिनीअरींग त्यावरच झालीय
पण केवळ परीक्षेपुरता म्हणून नाही तर शिकायला म्हणून सिलॅबसवर आधारीत टॉपिकवाई़ज पुस्तके वाचलेली / सोडवलेली चांगले असे मला वाटते.
SoF ची छोटी छोटी पुस्तके आहेत, तीच सोडवली.
>>>>
अनेकांनी हा उल्लेख केला आहे. तीच नक्की कुठली हा प्रश्न पडला आहे.
तुम्हाला कोणाला कल्पना असेल तर नेमके सांगू शकाल का?
वेबसाईटवर गणिताची पुस्तके चेक केल्यावर असे बरेच काही आले. यातले काय उपयुक्त ठरेल?
http://www.sofworld.org/imo/class-1/books-and-additional-reference-books...
हे असे प्रत्येक विषयाला आहे.
एकाच पब्लिकेशनचे एकत्रित असेल तरीही उत्तमच.
अर्थात सगळंच काही एकदम घेणारही नाही. शेवटी तिची करायची ईच्छा आहे तेवढेच ती करणार
@ रश्मी, हो ईतर वैचारीक वाद ईतर ठिकाणीच

आणि वाचनाची आहे तिला थोडीफार आवड. अर्थात स्टोरीबूक्सच
आम्ही दोघे फावल्यावेळात मोबाईलवर पझल गेम्स खेळत असतो. तिला काल सँपल पेपरमधील प्रश्न दाखवले. आणी ही परीक्षा नाही तर आपण खेळतो तश्या गेम्सचीच एक कॉप्मिटीशन आहे म्हटले तर तिचा बघायचा दृष्टीकोन बदलला आणि उत्साहाने स्वतःच तयार झाली. त्यानंतरच मी ईथे धागा काढला
@ प्रभूदेसाई, निश्चिंत राहा, तिचे करीअर प्लानिंग करत नाहीये. रजिस्टर केल्यावर तिला जे विषय नावडीचे वाटतील ते सोडूनही देता येतील. थोडेसे पैसे फुकट जातील. पण त्यानिमित्ताने केलेला अभ्यास आणि मिळवलेले ज्ञान वाया जाणार नाही
तसेच मुलगी पुरेशी हुशार आहे तर तिच्या बुद्धीला चालना मिळेल अश्या गोष्टी करणे उत्तमच ना ! उद्या तिला याचीच गोडी लागण्याची शक्यता आहेच.
SOF ही खरी किंवा HBCSE
SOF ही खरी किंवा HBCSE Olympiads नाही हे माहीत असेलच.
पण मुलांना अभ्यासाचे वळण लावण्यासाठी अशा स्पर्धा परीक्षांना बसवणे उत्तमच.
अशीच अजून एक प्रायव्हेट olympiad आहे.
https://www.unifiedcouncil.com/
ही पण साईट बघा.
पहिल्या इयत्तेतली मुलगी आणि
पहिल्या इयत्तेतली मुलगी आणि करियर प्लँनिंग ची शंका? हसावे की रडावे ... Lol
ऋन्मेष तुमच्या मुलीला शुभेच्छा ... मजा येणार तिला ...
च्रप्स धन्यवाद
च्रप्स धन्यवाद
पीनी, ओके. धन्यवाद. खरी खोटी अधिकृत अनधिकृत याबद्दल विचारही केला नव्हता. आपण म्हणता तसे अभ्यासाचे वळण लावायच्या दृष्टीनेच विचार केला. आणि त्यादृष्टीनेच विचार करता दर्जा कसा आहे अशी चौकशी करत आहे.
अनेक संस्था ऑलिम्पियाड
अनेक संस्था ऑलिम्पियाड स्पर्धा घेत असतात.
http://www.sofworld.org/
https://www.silverzone.org/
https://www.unifiedcouncil.com/
https://www.hummingbirdeducation.com/
http://www.eduhealfoundation.org/
संस्थाना पैसा मिळवून देणे हे अशा स्पर्धांचे उद्दिष्ट मानले जाते. पण आई वडील यातील यशाचा , अपयशाचा बाऊ करत नसतील आणि आपल्या मुलांना सवयी लावणे, त्यांच्या अभ्यासाच्या पद्धती बघणे, आवडीनिवडी ओळखणे हे करू शकत असतील तर या संस्थाना चार पैसे गेले तरी चालतील.
बहुतेक स्पर्धा शाळांतून घेतल्या जातात त्यामुळे आपल्या शाळेने जी स्पर्धा स्वीकारली आहे तीच द्यावी लागते.
सर्वांच्या दर्जामध्ये फारसा फरक नसावा.
च्रप्स
च्रप्स
हो, हो मलाही हसावे की रडावे कळत नाही .
करिअर प्लॅनिंग तिथला विषय निराळा होता. इथे मी कुठे करिअर प्लॅनिंग हा शब्द काढला आहे?
कळीचा मुद्दा असा आहे की Rote Learning आणि Meaningfull Learning ह्या मधला फरक पालाकांना समजला
तरी खूप झाले. परीक्षा खूप आहेत पुढे. पुढची अठरा वर्षे परीक्षाच द्यायच्या आहेत. पण गेलेलं बालपण पालक मुलाना परत करणार आहेत ? आणि कसे ?
सध्या दहावीच्या परीक्षेत मुलांना मराठी, इंग्रजी इत्यादी भाषा विषयांत ९९/१०० असे गुण यांबद्दल आपल्याला काय वाटते. किंवा संकृत बद्दल आजकल जे अफाट प्रेमाचे भरते आले आहे ते कशामुळे?
आपल्या सर्वांच्या प्रतिसादातून एक गोष्ट समजली जी शाळेतल्या शिक्षणाचा काही उपयोग नाही. तिथे जाऊन मुलांची आकलनशक्ती वाढत नाही का अभ्यासाची गोडी लागत नाही. म्हणून ह्या परीक्षा द्यायच्या. छान !!!
पिनी माहितीबद्दल धन्यवाद
पिनी माहितीबद्दल धन्यवाद
एकूणात हि परीक्षा देण्यात काही नुकसान नाही हे कळलेम्
@ प्रभूदेसाई >>> इथे मी कुठे करिअर प्लॅनिंग हा शब्द काढला आहे?>>>>
तुम्ही त्या करीअर प्लानिंग लेखाची लिंक ईथे दिली. तसेच त्या लेखावरही माझ्या पोस्टचा संदर्भ दिलात.
असो,
अश्या परीक्षेला मुलांना बसवणे म्हणजे त्यांच्यावर अभ्यासाचा लोड वाढवणे हा निष्कर्श फार घाईचा वाटत नाही का? याच न्यायाने मुलांना चित्रकला हस्तकला स्पर्धेत भाग घ्यायला लावणे, स्विमिंग, डान्स वा मार्शल आर्ट क्लासला टाकणे, त्यांना घरच्या घरी स्वयपाक करायला शिकवणे, योगा करयला लावणे, हस्ताक्षराचा सराव घेणे वगैरे वगैरे सारेच त्यांचे बालपण कोमेजून टाकण्यात मोजाल का?
तुम्ही अभ्यास म्हणजे लहान मुलांची नावडती आणि नाईलाजाने करावी लागणारी गोष्ट असे जे गृहीतक धरले आहे ते अगदीच चुकीचे नाही.
पण त्यावर उपाय म्हणून अभ्यासाला कटाप करायचे की त्याची मुलांना गोडी कशी लावता येईल हे बघायचे ..
अगदी आताचेच उदाहरण देतो. सकाळी उठल्यावर पोरगी मला येऊन म्हणाली, पप्पा चल ना आपण ते ब्रेनचे प्रीब्लेम सोडवूया. आता हे ब्रेनचे प्रॉब्लेम म्हणजे त्यादिवशी याचाच तिला दाखवलेला सॅंपल पेपर
अनेकांनी हा उल्लेख केला आहे.
अनेकांनी हा उल्लेख केला आहे. तीच नक्की कुठली हा प्रश्न पडला आहे.>>>>
तुम्ही परिक्षेला रजिस्टर केलेत की तुम्हाला त्यांच्याकडुन छोटी पुस्तक मिळतात सरावासाठी.. सगळे त्याबद्दल बोलत आहेत..
तिथुन घ्यायची नसतील तर तीच पुस्तक बाहेर / अॅमेझॉन वर पण मिळतात
उदा
https://www.amazon.in/International-Mathematics-Olympiad-Class-2019-20/d...
http://www.e-periwinkle.in/
http://www.e-periwinkle.in/
Hya website var CBSE/ICSE chya books che kahi video ani quiz aahet. Thode roj dakhavu shakata.
सियोना धन्यवाद. चेक करतो.
सियोना धन्यवाद. चेक करतो. लिंक
मृनिश
तुम्ही परिक्षेला रजिस्टर केलेत की तुम्हाला त्यांच्याकडुन छोटी पुस्तक मिळतात सरावासाठी >>> ओके हे माहीत नव्हते. चौकशी करतो याचीही शाळेत.
Sof चा छोटा फॉर्म शाळेकडून
Sof चा छोटा फॉर्म शाळेकडून मिळतो.यात सर्व 5 परीक्षांची माहिती असते, त्यातल्या कोणकोणत्या परीक्षांना बसायचं, पुस्तकं कोणकोणती पाहिजेत यावर टिक करून तो फॉर्म आणि सर्व परीक्षांचे मिळून पैसे शाळेला पाठवायचे असतात.शाळेत याबद्दल नीट मार्गदर्शन मिळेल(फॉर्म कसा भरायचा, पैसे कश्या स्वरूपात द्यायचे वगैरे)
छोटी पुस्तकं अधिक आपली आणि इंटरनेट ची मदत हे पुरेसे आहे.
पालकांची हौस कॅश करण्या साठी हल्ली काही हजार भरून प्रिपरेशन वर्कशॉप असतात.त्यांची मेल्स आली की थेट ट्रॅश मध्ये टाका.
मुलांना परीक्षा द्यायला मजा येते.ते गोलात रंग नीट भरणे, एकाच प्रश्नावर अडून न राहणे इतके बेसिक फक्त शिकवावे लागते.
फार लोड घेऊ नका परीक्षेचा.9 किंवा 12 चॅपटर असतील.प्रत्येक वीकेंड ला एक या वेगानेही अभ्यास नीट होईल.परीक्षा नोव्हेंबर ते फेब पर्यंत कोणतेही 5 दिवस असतात, जर 5ही परीक्षांना भाग घेतला तर.नाहीतर जितक्या परीक्षा भाग घेतला तितका प्रत्येकी 1 दिवस.(igko, ieo, nso,IMO,ico या क्रमाने.)
व्यवस्थित वेळ मिळतो.
पालकांची हौस कॅश करण्या साठी
पालकांची हौस कॅश करण्या साठी हल्ली काही हजार भरून प्रिपरेशन वर्कशॉप असतात.त्यांची मेल्स आली की थेट ट्रॅश मध्ये टाका.>> हो
धागाही याचसाठी काढला आहे. कमीतकमी आणि नेमके वेचायला.
I hate exams (for children).
I hate exams (for children). I like continuous learning for all.
विद्यार्थी की परीक्षार्थी...
विद्यार्थी की परीक्षार्थी... लहानपणीचा निबंधाचा विषय आठवला
विचार चांगला आहे. पण परीक्षा हव्यातच. परीक्षा स्वत:चे मूल्यांकन self assessment करायला गरजेच्या आहेत. फक्त लहान वयात तरी त्या परीक्षा ईतर विद्यार्थ्यांशी स्पर्धा करायला नसून आपल्याला किती येतेय हे जाणून घ्यायला हव्यात.
जसे आमीर खान तीन ईडियट्समध्ये म्हणाला होता - किसी की अच्छाईया बुराईया हम क्यू ऐसे बोर्ड पे लगाते है
आता ज्यांना स्पर्धा करायची आहे ते करतीलच. पण ज्या कोणाला स्पर्धेत पडायचे नाही त्यांना तसे वागण्याची मुभा शिक्षणपद्धतीने द्यायला हवी.
माझ्या मुलाच्या स्कूल मधे पन
माझ्या मुलाच्या स्कूल मधे पन ही exam आहे
तुमच्या मुलिचा अनूभव कसा आहे तीने दिली का exam
हो ती देते एक्झाम. दरवर्षी
हो ती देते एक्झाम. दरवर्षी
अनुभव चांगला आहे.
मॅथ्स सायन्स इंग्लिश या तीन विषयांच्या देते.
कॉम्प्युटर आणि जीके ह्या नाही देत.
सिलॅबस तोच असतो जो शाळेचा आहे. डिफिकल्टी लेवल आणि प्रश्न विचारांची स्टाईल मात्र वेगळी असते.
पण आम्ही एक्स्ट्रा अभ्यास काही करत नाही. शाळेचाच करते हे नशीब. पण एक्झाम द्यायला मात्र लावतो. नक्कीच फायदेशीर आहेत. आणि तो फॉरमॅट सुध्दा मला छान वाटतो. जरूर द्या. त्यांची दोन पुस्तके मिळतात. तेवढे केले तर आणखी काय करायची गरज नाही
इथे बरेच छोट्या मुलांचे पालक
इथे बरेच छोट्या मुलांचे पालक दिसतायत म्हणून खालील लिंक टाकत आहे, ज्यात मुलांसाठी उपयुक्त लिंक्स आहेत
https://www.maayboli.com/node/83434
मागे मी माबोवर एका धाग्यात वाचलेलं की बैजू किंवा तत्सम क्लास मध्ये अगदी पहिली दुसरासाठी एक-दोन लाख फी भरून प्रवेश घेतल्याचं. म्हणून हे फ्री resources ची लिंक असलेला लेख माबोवर टाकला होता.
इथे बरेच छोट्या मुलांचे पालक
इथे बरेच छोट्या मुलांचे पालक दिसतायत म्हणून खालील लिंक टाकत आहे, ज्यात मुलांसाठी उपयुक्त लिंक्स आहेत
https://www.maayboli.com/node/83434
मागे मी माबोवर एका धाग्यात वाचलेलं की बैजू किंवा तत्सम क्लास मध्ये अगदी पहिली दुसरासाठी एक-दोन लाख फी भरून प्रवेश घेतल्याचं. म्हणून हे फ्री resources ची लिंक असलेला लेख माबोवर टाकला होता.
Thank you for information
Thank you for information
Pages