आवडीप्रमाणे भाज्या : कोबी, कांदा, भोपळी मिरची, गाजर, कमी तिखट मिरची, लसूण
साधा रवा
भाजलेले तीळ आवडीप्रमाणे
२ चमचे दही ऑप्शनल
चिंग शेजवान चटणी / शेजवान सॉस
कुठलेही आवडीचे चीज क्यूब्ज
मीठ-मिरपूड
एक चमचा इनो
प्रथम एका भांड्यात आवडेल त्या प्रमाणात कोबी, कांदा, भोपळी मिरची, गाजर, कमी तिखट मिरची आणि भरपूर लसूण पाकळ्या हे बाsssरीक चिरुन घ्यावे. ह्यासाठी मी दोरी ओढायचा चॉपर वापरते ( माझ्याकडे हे मॉडेल आहे म्हणून ही लिंक दिली. तुम्ही कुठलाही वापरु शकता )
मी साधारण दोन कप चिरलेल्या कोबीला दोन मध्यम कांदे, दोन मध्यम भोपळी मिरच्या, एखादे मोठे गाजर, किमान दहा-बारा लसूण पाकळ्या आणि एखादी पोपटी मिरची घेते.
मग त्यात घट्ट बॅटर होईल अशा अंदाजाने साधा रवा, दोन चमचे दही ( ऑप्शनल ), मीठ- मिरपूड,भाजलेले तीळ, आवडीप्रमाणे शेजवान सॉस आणि लागेल तसे थोडेसेच पाणी घालून कालवून घ्यावे.
आप्पे घालायच्या आधी एक चमचा इनो घालून बॅटर परत एकदा कालवून घ्यावे.
एका चीजक्यूबचे आवडीप्रमाणे सहा वा नऊ असे तुकडे करुन काही चीजक्यूब्ज तयार ठेवावे.
आप्पेपात्रात तेल घालावे.
थोडे मिश्रण घालून प्रत्येक आप्प्यावर चीजचा तुकडा ठेवून वरुन परत क्यूब झाकला जाईल इतके मिश्रण घालावे.
झाकण ठेवून एक बाजू शिजवावी.
सोनेरी झाले की बाजू उलटून घ्यावी आणि झाकण न ठेवता दुसरी बाजू सोनेरी होऊ द्यावी.
नुसतेच खावे वा शेजवान सॉसबरोबर सर्व्ह करावे.
आप्पे मिश्रण :
आप्पेपात्रात घालताना. एक बंद केलाय.
आप्पे :
-बॅटरला नंतर थोडेथोडे पाणी सुटते ह्या हिशोबाने रवा मिसळा. बॅटर घट्टच राहिले पाहिजे. ह्यात भाज्या खूप असल्याने पिठाच्या बॅटरसारखे घट्ट बॅटरचे आप्पे दडस होत नाहीत. बॅटर पुरेसे घट्ट नसेल तर हवे तसे कुरकुरीत होणार नाहीत.
-चीज बर्स्टमुळे मुलांना फार आवडतात. डब्यात द्यायलाही मस्त ! डबा देताना आदल्या रात्री बॅटर तयार करुन फ्रीजमध्ये ठेवू शकता. इनो मात्र आयत्यावेळी घाला.
-तिळांमुळे खूप मस्त क्रंच आणि चव येते. ते शक्यतो वगळू नका. छान दिसण्यासाठी तीळ वरुन पेरु शकता पण मी मिश्रणातच ढकलते.
यम्मि .. हेल्थि पन.. karun
यम्मि .. हेल्थि पन.. karun baghen..
वॉव!
वॉव!
भार्री आयडिया! चीज नसले तरी
भार्री आयडिया! चीज नसले तरी मस्त लागेल असे वाटतेय!
छान
छान
मस्त आहे रेसिपी
मस्त आहे रेसिपी
मस्त दिसतायत!
मस्त दिसतायत!
मस्त. करुन बघायला हवी.
मस्त. करुन बघायला हवी.
छान पाकृ!
छान पाकृ!
मस्त रेसिपी!
मस्त रेसिपी!
छान आहे रेसिपि
छान आहे रेसिपि
यम्मी। मस्त कल्पना
यम्मी। मस्त कल्पना
एक फोटो अर्धा खाऊनही हवा
वॉव ! शेवटचा फोटो मस्तच
वॉव ! शेवटचा फोटो मस्तच दिसतोय.. अगदी प्रोफेशनल !
मस्त आहे रेसिपी. तळलेले चीझ
मस्त आहे रेसिपी. तळलेले चीझ बॉल फार तेलकट होतात. हे हेल्दी होतील.
मस्त दिसताहेत. नक्की ट्राय
मस्त दिसताहेत. नक्की ट्राय करणार!
छान, सोपी वाटतेय रेसिपी. अगो,
छान, सोपी वाटतेय रेसिपी. अगो, रवा जाड का अगदी बारीक कुठला घेतलास?
मस्त.
मस्त.
खूप छान रेसिपी... करून बघणार.
खूप छान रेसिपी... करून बघणार.
मस्तच रेसिपी
मस्तच रेसिपी
वा वा इनोव्हेटिव रेसिपी.
वा वा इनोव्हेटिव रेसिपी.
फोटो पण भारी. आप्पे उचलून खावेसे वाटतायेत.
वा.. कित्ती भारी आहेत हे
वा.. कित्ती भारी आहेत हे अप्पे. या वीकेंड ला करुन बघेन.
मस्त आहेत आप्पे. करून बघेन
मस्त आहेत आप्पे. करून बघेन एकदा.
मस्त रेसिपी अगो
मस्त रेसिपी अगो
<<ह्यासाठी मी दोरी ओढायचा
<<ह्यासाठी मी दोरी ओढायचा चॉपर वापरते >>.
एकच कांदा किंवा एकच टोमॅटो बारीक चिरून होतो का?
पाकृ आवडली. करुन बघेल.
पाकृ आवडली. करुन बघेल.
मस्तच आहेत एकदम
मस्तच आहेत एकदम
धन्यवाद सर्वांना
धन्यवाद सर्वांना
रवा जाड का अगदी बारीक कुठला घेतलास? >>> जाड रवा घेतला. वेगवेगळ्या दुकानांत तो मध्यम ते जाड अशा वेगवेगळ्या प्रतीचा मिळतो. बारीक रव्याचेही होतील. कल्पना नाही पण माझ्याकडे बारीक रवा क्वचितच असतो. साधा रवाच वापरते सगळ्या पदार्थांत.
एकच कांदा किंवा एकच टोमॅटो बारीक चिरून होतो का? >> होतो. पण अगदी एका कांदा टोमॅटोसाठी वापरत नाही शक्यतो. तसा हा चॉपर धुवायला फार सोपा आहे पण तीन पार्ट्स धुण्यापेक्षा एक सुरी धुणे सोपे वाटते म्हणून.
इनोचे काय नियोजन आहे अगो
इनोचे काय नियोजन आहे अगो यामध्ये?