अव्वाच्या सव्वा लाईटबील कमीत कमी यावे म्हणुन काही उपाय आहेत का..?

Submitted by DJ.. on 2 July, 2020 - 05:22

आजकाल वीजबीलांचा शॉक बसलेले बरेच जण आजुबाजुला दिसत आहेत. प्रत्येक घराचा वीजवापर हा त्या त्या घरात राहणार्‍या कुटुंब सदस्य संख्येवर आधारीत असावा असा माझा कयास. कुटुंबात जास्त सदस्य असतील तर कदाचीत जास्त वीजबील येत असावं असा माझा (गैर)समज होता. परंतु समोर रहाणार्‍या ३ सदस्य संख्येच्या कुटुंबाला पण १ हजाराच्या आसपास महिन्याचं वीजबील येतं हे पाहुन थक्क व्हायला झालं.

कसं ते माहीत नाही पण आमच्या शेजारच्या ४ सदस्य संख्या असणार्‍या घरात महिन्याचं वीजबील ४००-४५० रुपयांच्या च्या घरात असतं (महिन्याचे ५५-६०युनिट लागतात). अर्थात दोन्ही कुटुंबातील काही गोष्टी चर्चा करताना समजल्या त्या अशा :

१. सदस्य संख्या ३ असणार्‍या घरात आंघोळीचा गिझर १८ लिटर क्षमतेचा असुन ४ सदस्य संख्या असणारे कुटुंब गॅस गिझरचा वापर करते.
२. सदस्य संख्या ३ असणार्‍या घरातील कपड्यांना इस्त्री घरीच केली जाते तर ४ सदस्य संख्या असणारे कुटुंब इस्त्री साठी बाहेर दुकानात कपडे देते.
३. सदस्य संख्या ३ असणार्‍या घरात आठवड्यातुन ४ वेळा वॉशिंग मशिन लावली जाते तर ४ सदस्य सख्या असणार्‍या घरात आठवड्यातुन २ वेळा.

या काही फरकांमुळे वीजवापरात फरक पडत असावा. परंतु अजुनही काही उपाय आहेत का ज्याने आपण आपले वीजबील कमीत कमी आणि नियंत्रणात ठेऊ शकु..??

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुख्यतः फ्रीज व अन्य उपकरणे जसे टीव्ही, पंखा, बल्ब एनर्जी एफिशियंट घेणे.

फ्रीजची उघडझाप कमी करणे

गॅस गिझर बसवणे , गॅस स्वस्त पडत असेल तर अंघोळीचे पाणी गॅसवर तापवणे.

आमच्या सोसायटीत एका कुटुंबाने फ्रेंच विंडोज बसवल्यात , त्याही काळ्या काचांच्या . दिवसभर दिवे आणि पंखे / एसी चालू असतात.

इंग्लंडची राणी पण एका खोलीतुन दुसरी कडे जाताना दिवा बंद करून जाते. असे वाचले होते. मी रिटाय र मेंट मोडात असल्याने कायम वीज
वाचवत असते. माझ्याकडे गॅस नाही सर्व स्वयं पाक इंडक्षन कुक टॉप वरच. त्यामुळे करंट काटला तर उपाशी बसावे लागेल अशी लॉक्डाउन मध्ये भीती वाटत होती. माझे पेमेंट मी बँक थ्रू करते पूर्वी लायनीत उभे राहुन पण बिले भरली आहेत अर्थात. तर न्यु बिल प्रेजेंटेड फॉर पेमेंट असे दोन तीन दा आल्याने कट व्हायला नको म्हणून लगेच पेमेंट केले हे ९६० रु. दोन दा जास्तीचे भरले . मग मे मध्ये बिल नाही. क्रेडिट बॅलन्स. व आता जुलैत ७६० रु आले. ते लगेच भरले. महा वितरण फार मेसेज करून व त्यांच्या साइट ची लिंक देत असते तसेच हे सर्व मराठीत. मग मी तेही चेक केले

फ्रिज आहे. मिक्सर चा थोडा बहुत वापर होतो. गिझर नाहीच वापरला जात. अगदी पाच मिनिटे लागला तर. बाकी फोन चार्जिन्ग लॅपटॉप चार्जिन्ग हे पूर्ण झाले की ते स्विचेस पण बंद करते.

दुपारी खिडकी उघडी टाकली व किचन चे दार उघ डे ठेवले तर छानच वारे येते. एसी ची गरजच नाही पडत. एक एसी आहे ते मे महिन्यात थोडे बहुत वापरले जाते. कारण इथली हवा म्हणजे माझा व्हिगन कुत्रा चालवून आणला तरी घामाघुम व्हायला होते.

एकूण काटकसरीचा मामला आहे. टीव्ही नाहीच आहे.

मी फ्रिज बदलल्यावर माझे बिल महिना 250 ते 400 च्या घरात कमी झाले. माझा फ्रिज 20 सेक वर्ष जुना होता, नव्या तंत्रज्ञानाचा फ्रिज वीज कमी खातो. मीही पंखे दिवे वगैरे आवर्जून बंद करते आणि इतरांना करायला लावते.

@ अमा : तुम्ही म्हणता तसे वेळेत बिलं भरली की येणारी बिलं बर्‍यापैकी नियंत्रणात रहातात.
@ साधना : हो.. तेही एक कारण आहे. आम्ही आमचा जुना टी.व्ही. बदलुन एल्सीडी घेतला आणि जुन्या लईट ट्युब्स बदलुन एलईडी ट्युब्स बसवल्या तेव्हाही असाच फरक जाणवला.
@ भरत : गॅस गिझर नक्कीच परवडतो.. स्वच्छ सुर्यप्रकाश आणि खेळती हवा असेल तर पंखा/कुलर्/लाईट्स कमी वापराव्या लागतील यात शंकाच नाही पर्यायाने वीजबील कमी होईल.

जुन्या हाफिसात असताना तिथे मोट्ठे मोनिटर असायचे. आमचा प्रोजेक्ट मॅनेजर सर्वांना नेहमी सांगायचा की जागेवरुन उठताना मॉनीटर ऑफ करा. मीटिंग रुम मधुन बाहेर येताना लाईट ऑफ करा. सर्वांना सतत सांगितल्यामुळे अक्षरशः सवय लागली सर्वांना. १० वर्ष होऊन गेली, ऑफिस बदललं, मॅनेजर बदलला पण त्या मॅनेजरने लावलेल्या सवयी आजही तशाच पाळतो मी.. त्याचा घरात देखील उपओग झाला म्हणाल तर वावगे ठरणार नाही.

धाग्याबद्दल धन्यवाद आमचे सरासरी बिल ५ हजार येते. उन्हाळ्यात वाढते. गेले तीन चार वर्षातील सर्वाधिक बिल आठसाडेआठ हजार होते.

घर दोनबीएचके आहे
चार पंखे एक एसी
पाच ट्यूबलाईट, आणि पाच सहा छोट्यमोठ्या लाईट जोडा.
फ्रिज, वॉशिंगमशीन, ओवन, गिझर, टीव्ही, लॅपटॉप, वायफाय वगैरे उपकरणे आहेत.

या आधी गपगुमान भरायचो. पण आता माबोवर ईतरांची बिले ऐकून मी जरा जास्तच भरतोय वा जास्तच वीज खर्च करतोय असे वाटू लागलेय.

ते अंबानी शाहरूख वगैरे लोकं असतात त्यांचे साधारण किती येते हे एकदा बघायला हवे असेही आता वाटू लागलेय.

असो
महिन्याभरात घर बदलतोय. तिथे फरक पडतो का बिलात हे चेक करायला हवे. अन्यथा आहेच मी आणि हा धागा...

तुमचा मोबाईल चोवीस तास चालू असतो मायबोली online राहण्यासाठी त्याच्या चार्जिंग चे युनिट हे मुख्य कारण असावे...

त्याच्या चार्जिंग चे युनिट हे मुख्य कारण असावे...
>>>.
हा जोक आहे याची कल्पना आहे.
पण ते ऑफिसलाच कराय्चो. कारण ऑफिसला असताना सतत फोन चार्जिंगलाच लागलेला असायचा. वॉशरूमला जातानाच काय तो सोबत न्यायचो.

असो.
सध्या घरीच करतो. रात्री झोपताना लावतो ते बॅटरी फुल झाली तरी चालूच राहते. त्याचे बिल येते का?

आमचा 3bhk aahe. 5 fan, 3 tubelight, 3 cfl bulb, fridge, washing machine, 1 AC, 2 laptop ani 2 phone ase aahe. Dar manina sarasari 100 unitparyant bill yete. Oct te feb 90 unit ani march te june 120 unit. Ghari pipeline gas aahe ani bathroom madhe solar water. Gas geyser aahe jo shakyato mansoon madhe lagato. AC cha vapar fakt april-may ratri 1 tas. Aamhi lockdown madhe reading swata gheun mahavitaranchya app madhe upload keli. Tyamule april madhe bill 2390 ani may madhe 1700 aale. Velich payment keli. 3 mahinyache sarasari bill april te jun itakech yete tyamule kahi kalaji nahi
Jyani velevar reading dili nahit ani sarasari bill pan bharali nahit tya sagalyana vij darvadhicha fatka basala aahe.

सियोना, गेल्या एप्रिल आणि मे च्या तुलनेत तुमचं आताचं बिल किती अधिक आलं आहे?

तुमचा हा आणि पुढला प्रतिसाद या धाग्यावर टाकाल का?
https://www.maayboli.com/node/75259

@ ऋन्मेष, तुमच्या मीटर मधुन दुसर्‍या कुणाच्या घरात लाईट वापरली जाते का ते चेक करा. एवढं ४-५ हजारांचं लाईट बील येण्यामागे जी काही कारणं आहेत त्या मधे लाईट चोरी हेही एक कारण असु शकतं असं मला वाटतं.

Vij vapar electric gyser mule jast vadhato ha anubhav aahe. Tyamule gharat ek electric gyser asun suddha aamhi gas gyser lavun ghetala ani billat farak padala. Bathroom haveshir asel tar gas gyser ghyave ugach kondat jagi gas gyser basavu naye.

आमच्या इथे सगळे दिवे एलईडी आहेत (मॅक्स १५ वॉ), ४०० लीटर चा फ्रीज, एक फ्रंट लोड वॉम (ज्यात शक्यतो ४० डिग्री वर कपडे धुतल्या जातात; आठवड्यातून २ दा लावावे लागते); एक इन्वर्टर पॉवर बॅक अप करता आणि १ टन चा इन्व्हटर एसी (एसी दिवसा साधारण पणे २ तास आणि रात्री ७-८ तास वापरल्या जातो). मिक्सर वगैरे अगदी कमी प्रमाणात. अरे हो, इन्संटंट गीझर आहे आणि १०/१५ मिनिट रोज वापरल्या जातो.

नॉर्मली बील १०००/१५०० च्या घरात येतं.

धाग्याबद्दल धन्यवाद आमचे सरासरी बिल ५ हजार येते>>>

विजेची लाईन किती फेजची आहे हे बघा. मोठ्या घरांमध्ये 3 फेज असते व त्याचे बिल जास्त येते.

काही जणांच्या घरी power saver नावाचे एक डिवाईस लावलेले असते, शक्यतो मेन स्वीचजवळ. त्याने खरोखरच काही फायदा होतो का? काही वर्षांपूर्वी दारोदार विकायला यायचे ते device विकणारे.

विजेची लाईन किती फेजची आहे हे बघा. मोठ्या घरांमध्ये 3 फेज असते व त्याचे बिल जास्त येते.
>>>
अच्छा हे नव्हते माहीत. चेक करायला हवे. तसेही आता हे घर सोडणार आहे लॉकडाऊन शिथिल होताच.तरी पुढच्या घरात काय काळजी घ्यायची याची लिस्ट करतोय. हे फेज प्रकरणही जोडतो त्यात.

या निमित्ताने ईतरांची बिले कळली म्हणून मला माझे जास्त वाटू लागलेय. अन्यथा जगदुनियेची अशीच असतात असे वाटायचे.

ओवनही आमच्याकडे बराच वापरला जातो. तो सुद्धा कितीवीज खातो हे बघायला हवे.
घरचे कुठले उपकरण किती युनिट खाते याचा हिशोब निळाला असता तर काम सोपे झाले असते.

कोणाकडे ईन जनरल अशी काही लिस्ट आहे का?

३ फेज पॉवर सेंटर (PCC/MCC) मध्ये वापरतात. सबस्टेशनपासून जवळच्या डिस्ट्रीब्यूशन ट्रान्सफॉर्मरपर्यंत ३ फेज सप्लाय येतो आणि ते वेगवेगळ्या घरात फिरवले जातात. पण घरामध्ये सिंगल फेज येतो. त्यामुळे जर एखादा फेज गेला तर काही घरात दिवे जातात, पण शेजारच्या घरात दिवे चालू असू शकतात. अमेरिकेत मात्र घरात ३ फेज (टेक्निकली २ फेज, १ न्यूट्रल, १ अर्थ) सप्लाय येतो. (तरीही वापराची शक्यता खूप कमी, मुख्यतः इलेक्ट्रिक ड्रायर आणि कुकिंग रेंजसाठी).

आमचा ही 2bhk आहे, बिल 600 ते सातशे च्या दरम्यान येते.
घरात, एकूण सहा माणसे आहेत, चारही खोल्यात फॅन, दिवे, बाथरूम मध्ये एक सीएफएल, एका एलईडी दिवा आहे.
फ्रिज सतत चालू असतो, वॉशिंग मशीन रोज वापरतो, पाणी तापवायला गीजर्स आहेत दोन्ही बाथरूम मध्ये.
एक खोलीत एसी आहे, तो इन्व्हर्टर एसी असल्याने त्याचे बिल कमी येते, उन्हाळ्यात वापर होतो, तेंव्हा 1000 च्या आसपास बिल येते.
घरात सगळीकडे छान प्रकाश, वारे येते, शिवाय खोलीतून बाहेर पडताना दिवे, फॅन बंद करतो आणि म्हणतो की एक युनिट विजेची बचत ही सव्वा युनिट विजेची निर्मिती असते.
ओव्हन आहे पण वापर कमी आहे. मिक्सर भरपूर वापरतो.

लॉकडावून पासून कोणी घरातलं व्होल्टेज चेक केलंय का? आधी २२० च्या खाली असायचं आता सर्रास २५०+ भरतंय (इंडस्ट्रीयल लोड कमी झाल्यामुळे). रेजिस्टन्स सेम आहे, व्होल्टेज वाढलंय तर अ‍ॅम्पिअर देखील वाढणार. समजा रेझिस्टन्स १०० ओहम आहे तर आधी २२० व्होल्टेज असताना करंट २.२ अ‍ॅम्पिअर असणार म्हणजे वॅटेज = व्होल्टेज गुणिले करंट = २२० गुणिले २.२ = ४८४ वॅट्स. आता जर व्होल्टेज २५० असेल तर करंट देखील २.५ अ‍ॅम्पिअर होईल. म्हणजेच वॅटेज = व्होल्टेज गुणिले करंट = २५० गुणिले २.५ = ६२५ वॅट्स. ज्या उपकरणाची ताकद आधी ४८४ वॅट्स होती ती आता वाढून ६२५ वॅट्स म्हणजेच ३० टक्के अधिक झाली. साहजिकच तीस टक्के अधिक वीज खर्च होणार आणि बिल तर कदाचित ४० ते ५० टक्केदेखील वाढू शकते कारण वरच्या टप्प्यात वीज दर अधिक असतात.

व्होल्टेज स्टॅबिलायजर बसविले तर हे टाळता येऊ शकेल.

घरगुती ग्राहकांपैकी थ्री फेज मीटर कनेक्शन मोठे बंगले किंवा सोसायटीच घेतात शक्यतो. एक तर कनेक्शन, मीटर आणि डिपॉझिट सगळाच खर्च प्रचंड जास्त असतो. शिवाय पुढे मीटर भाडे व इतर स्थिर आकार हे देखील दर महिन्याला फार जास्त असतात.

बीपीनचंद्र, सतत व्होल्टेज जास्त राहिलं तर बिल वाढेल, पण तुम्ही म्हणताय त्या प्रमाणात नाही.

पंख्याचं पॉवर कन्झम्पशन वाढेल, आणि पंखा नेहमी आपण आपल्याला हवा तेवढा वेळ चालू ठेवतो म्हणून त्याचं एनर्जी कन्झम्पशनही वाढेल. (एनर्जी कन्झम्पशन = पॉवर * वेळ)

आता घरात LED दिवे असतात. त्यात इलेक्ट्रॉनिक ड्राइव्हर सर्किट असते. ते व्होल्टेज रेग्युलेट करतं का, असेल तर किती प्रमाणात हे मला ठाऊक नाही. तेव्हा पंख्याप्रमाणेच त्यांचं सुदधा एनर्जी कन्झम्पशन वाढेल असं गृहीत धरू.

गिझर: गिझरमध्ये थर्मोस्टॅट असतो. पाणी ठराविक तपमानाला पोचलं की तो गिझर कॉइलचा सप्लाय कट ऑफ करतो. आता वाढलेल्या व्होल्टेजमुळे, पॉवर कन्झम्पशन वाढेल, पाणी लौकर तापेल आणि थर्मोस्टॅट लौकर कट ऑफ करेल. तेवढ्या पाण्याचे तेवढे तपमान वाढवायला लागलेले एनर्जी कन्झम्पशन तेवढेच राहील, वाढणार नाही.

फ्रिज: फ्रिज मध्ये सुद्धा कॉम्प्रेसर चालू बंद होत रहातो. रेफ्रिजरंट गॅस ठराविक दाबाला कॉम्प्रेस झाला की कॉम्प्रेसर कट ऑफ होतो. व्होल्टेज वाढले तरी ठराविक आकारमानाचा गॅस ठराविक दाबाला कॉम्प्रेस करण्यास लागणारे एनर्जी कन्झम्पशन तेवढेच राहील, वाढणार नाही.

एसी: वरील प्रमाणेच. आपण सेट केलेल्या तपमानच तो कायम ठेवेल, व्होल्टेज वाढले म्हणुन तपमान जास्त खाली न आणता, कॉम्प्रेसर लवकर कट ऑफ होत राहील.

पाण्याची मोटर: इथेही ठराविक आकारमानाचे पाणी ठराविक उंचीवर चढवायला लागणारे वर्क डन तेच राहील एनर्जी कन्झम्पशन वाढणार नाही.

टीव्ही, संगणक वगैरे: यात SMPS ने व्होल्टेज रेग्युलेटेड असते त्यामुळे पॉवर कन्झम्पशन वाढत नाही.

तेव्हा वाढलेले बील हे मुख्यत्वे एकुण एनर्जी वापरात पंखा आणि दिवे यांच्या एनर्जी वापराचं प्रमाण किती यावर अवलंबून असेल.

@ बिपिनचंद्र आणि मानव : अत्यंत उपयुक्त माहिती.. ज्ञानात मोलाची भर टाकल्याबद्दल मनापासुन आभार..!

टाटा पॉवरने अखेर ऑगस्टमध्ये मीटर रीडिंग घेऊन बिलं पाठवली. आमचे या चार महिन्यांतले बिल्ड युनिट्स गेल्या वर्षीच्या तुलनेत ३ कमी आहेत.
गेल्या दसर्‍याला आम्ही वरच्या लिंकमधले पॉवर सेव्हर पंखे बसवले होते .
तसंच मायक्रोवेव्ह आणि ओव्हन दोन्ही बिघडले आहेत. पण त्यांचा वापर मायक्रोवेव्ह आठवड्या / पंधरवड्यातून एकदा फार तर दहा मिनिटे आणि ओव्हन महिन्या दोन महिन्यांतून एकदा व्हायचा.

आता एक ट्यूब लाइट आणि एक बल्ब गेलेत . ते बदल ण्यासाठी वरच्या लिंकवरूनच ऑर्डर करणार आहे.

जुन्या दोन ट्युबलाइटनी राम म्हटल्यावर एल ई डी दिवे लावले होते.

Submitted by मानव पृथ्वीकर on 8 September, 2020 - 12:01

अधिक विश्लेषणाबद्दल धन्यवाद पण काही इंडक्टंस बेस्ड उपकरणे हाय व्होल्टेजला हाय करंट खेचूनही प्रत्यक्षात त्यांची इफिशिअंसी कमी होत असल्याने कमी वेळात कार्य पूर्ण करतील असे घडत नाही. त्यामुळे व्होल्टेज वाढल्याने गीझर आपले काम कमी वेळात करेल पण सेम प्रिन्सिपल पाण्याची मोटर, फ्रीज किंवा एसीला लागू होईलच असे नाही. यातल्या मोटर्स या इंडक्टिव्ह लोड असल्याने त्यांची इफिशिअन्सी किती व्होल्ट आणि अ‍ॅम्पिअरला मॅक्स आहे हे डिझाईन करतानाच ठरलेले असते. त्यात बदल झाला तर इफिशिअन्सी खाली जाऊन वीज खर्च अधिक झाली तरी पावर आऊटपूट त्या प्रमाणात वाढेल याची खात्री नाही. हे सारे थोडे जास्त कॉम्प्लिकेटेड आहे त्यामुळे इथे समजावणे अवघड वाटते. फ्रीज आणि एसी बाबत अजून (किवा कुठल्याही मोटर बेस्ड उपकरणाबाबत) कधी कधी असेही घडते की व्होल्टेज घसरले तरीही उपकरणावर ताण येऊन ते जास्त करंट खेचते. इथे आपले साधे गुणाकार भागाकाराचे गणित लागू होत नाही.

Pages

Back to top