3 वांगी
2 कांदे
4 टोमेटो
लसुण , कोथिम्बीर
दही
टोमेटो सॉस
तिखट , मीठ , बेसन
तेल , मोहरी , जीरे
1. वांग्याचे काप
वांगयाचे काप करावेत.
बेसन , तिखट , मीठ थोड़े पाणी घालून पेस्ट करावी , त्यात काप भिजवून रवा लावून शैलो फ्राय करावेत.
2. टोमेटो ग्रेवी
2 चमचे तेल गरम करून मोहरी , जीरे , हळद घालावेत , बारीक कांदा , लसुण घालून परतावे , मग टोमेटो फोड़ी घालावयात , तिखट , मिठ , थोड़ी साखर घालून शिजवावे , गरजेनुसार पाणी घालावे. शेवटी थोड़े टोमेटो सॉस घालून शिजवून घ्यावे.
3. दही
फेटुन त्यात कांदा लसुण ठेचुन घालावे.
एका ताटात काप ठेवावेत , त्यावर टोमेटो ग्रेवी पसरावी , वर दही पसरावे.
-------------
1. मूळ प्रक्रियेत नुसते काप डीप फ्राई करतात, पण त्यात तिखट , मीठ, शैलो फ्राय करणे अशी अनेक वेरीेेएशन्स करता येतात.
2. टोमेटो ग्रेवी अगदी पातळ ते अगदी घट्ट काहीही करू शकता.
3. ग्रेवी शिजत असताना त्यात काप घालून शिजवतात , किंवा काप लेयर लावून त्यावर ग्रेवी घालून शिजवतात. लेयर लावून ओवनमधून काढणे , असाही ऑप्शन आहे. पण हे पुन्हा शिजवणे आज वेळ नसल्याने केले नाही.
बोरानी बैगन
अफ़गानी डिश
अफगाणी डिश
(No subject)
मस्तच
मस्तच
mastch.. n sopi suddha..
mastch.. n sopi suddha..
छान दिसतोय पदार्थ. पण
छान दिसतोय पदार्थ. पण वांग्याच्या तळलेल्या कापांवर ग्रेवी, दही असे शिंपडले तर ते मऊ नाही का पडणार? की तशीच चव अपेक्षित आहे?
तशीच चव असते
तशीच चव असते
मूळ कृतीत फ्राय काप ग्रेव्हीत पुन्हा शिजवतात,
असे दिसते
https://www.google.com/search?q=borani+baingan&tbm=isch&ved=2ahUKEwig8Nr...
ओके
ओके
वाटतोय छान,पण वांग्याच्या
वाटतोय छान,पण वांग्याच्या कचऱ्या नुसत्याच खायला आवडतील.
बाकी प्रोफाईल मधील माऊ छान आहे.
छान वाटते आहे रेसिपी आणि सोपी
छान वाटते आहे रेसिपी आणि सोपी पण. याला तुम्ही अफगाणी डिश म्हणाला आहात, पण मी असे वांग्याचे काप (शॅलो फ्राईड आणि टोमॅटो ग्रेव्हीमध्ये डीप केलेले, )स्वित्झर्लंड - 'ब्युल' टाऊनमध्ये खाल्ले आहेत. जुनी आठवण जागी झाली. . फक्त दह्याऐवजी क्रीम चीज टॉपिंग असायचं (साहजिकच आहे, स्वित्झर्लंड मध्ये) .
मला ही डिश एवढी आवडायची की जवळजवळ प्रत्येक वीकेंड डिनर / लंच मध्ये ही ऑर्डर केली जायची. दोन क्युट लुकिंग मैत्रिणी आजी हे रेस्टॉरंट चालवतात. त्यांना ही डिश किंचित स्पायसी बनवायला शिकवलं होतं. माझ्यासाठी ती फारच माईल्ड लेव्हल होती, पण त्या दोघीजणी चिली पावडर घालताना खुप घाबरायच्या.
इथे अजून एक आहे
इथे अजून एक आहे
दिनेशदा
https://www.maayboli.com/node/53585
हे काप अगदी पातळ काढून
हे काप अगदी पातळ काढून बेसनाच्या पिठात बुडवून सांबार मसाल्यात घोळवून कडक कुरकुरीत शॅलो फ्राय करायचे आणि गरम असतानाच त्यावर हवे ते टॉपिंग ( चीझ किसून/ कांदा बारीक शेव लिंबू/ मिरगुंड कुसकरून/ वगैरे) घालून खायचे. भन्नाट म्हणता येणार नाही, पण जरा वेगळी चव. खजूर चिंच धनेजिरे तिखट चटणीसुदधा बरी लागते. सांबार मसाला वगळला किंवा वरून शिवरला तरी चालेल.
हे काप अगदी पातळ काढून
डु प्र
छान
छान
मस्त
मस्त
मस्त!
मस्त!
वांगं आणि टोमॅटोचं कॉम्बो
वांगं आणि टोमॅटोचं कॉम्बो आवडत नाही पण प्र चि पाहून तों पा सु हा पदार्थ करून बघेन!
अरे वा, छान वाटते आहे.
अरे वा, छान वाटते आहे.
रेसिपी खूप मस्त वाटते आहे.
रेसिपी खूप मस्त वाटते आहे.
छान दिसतेय तयार डिश.
छान दिसतेय तयार डिश.
ग्रेव्हीत पुन्हा शिजवतात म्हणजे आधी ते काप सगळा मालमसाला लावून फक्त सिअर करायचेत असं वाटतंय.
टोमॅटो, दही (त्यात कच्चा कांदा, लसूण) आणि वांगं असं कॉंबो जरा वेगळं वाटतं आहे. करून पाहायला हवं.
सिअर म्हणजे ?
सिअर म्हणजे ?
सिअर म्हणजे पदार्थाची फक्त
सिअर म्हणजे पदार्थाची फक्त आउटर लेअर क्रिस्पि करून घेणे, बहुतेक वेळी मांसाच्या पदार्थाला वापरतात.
इथे याबद्दल जास्तीची माहीती मिळू शकेल.