नमस्कार,
हल्ली वर्तमानपत्रातून सतत येत असणार्या बलात्कार, विनयभंग, लैंगिक शोषण यासारख्या बातम्या वाचून मनात खूप कालवाकालव होते. अगदी चारपाच वर्षांचं वय असणार्या कोवळ्या मुलींवर होणार्या बलात्कारांचं प्रमाणही हल्ली खूपच वाढलंय. खरंतर अशा निरागस वयातल्या या मुलींना पाहून त्यांच्याशी खूप खूप खेळावं, त्यांना कडेवर उचलून घेऊन त्यांचा पापा घ्यावा असं वाटायला हवं. पण त्याउलट स्वत:च्या शरीराची निर्लज्ज भूक भागवण्यासाठी या कोवळ्या मुलींच्या शरीराचे लचके तोडण्याचे पाशवी विचार एखाद्याच्या डोक्यात कसे येऊ शकतात हेच कळत नाही. कुठल्या मातीची बनलेली असतात ही माणसं? यांना माणसं तरी का म्हणावं? अशांना फाशीची शिक्षा दिली तरी ती कमीच आहे.
ज्या मुलींना या प्रसंगाला सामोरं जावं लागत असेल त्यांच्या मनावर किती खोलवर आघात होत असेल याची नुसती वर्तमानपत्रातली बातमी वाचून कल्पना येणं खूपच अवघड आहे. आणि मग त्या प्रसंगामुळे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर त्यांना भोगाव्या लागणार्या दुष्परिणामांबद्दल विचार करणं तर खूपच दूरची गोष्ट आहे. कित्येकांची आयुष्य अशा प्रसंगांनंतर उद्ध्वस्त झालेली आहेत आणि होताहेत.
कोणत्याही वयात होणार्या बलात्कारांचं प्रमाण खरोखरच काळजी करण्याइतपत वाढलंय. कालच्या सकाळमधे तर ६५ वर्षाच्या एका महिलेवर बलात्कार झाल्याची बातमी वाचली..... बलात्कार, खून, अपहरण.... हल्ली वर्तमानपत्र हातात घ्यायचीच भिती वाटते.
पुण्यात काही दिवसांपुर्वीच नयना पुजारीच्या बाबतीत जे घडलं त्याने हेही लक्षात यायला हवं की या प्रकारांत बळी पडणार्या मुली, स्त्रिया अगदी तुमच्या आमच्या आजुबाजूला रहाणार्या असू शकतात, नात्यातल्या असू शकतात.... किंवा कदाचित घरातल्याही असू शकतात...
हा विषय थेट चर्चेसाठी नेमका कसा मांडावा हे न सुचल्यामुळे मी आघात या कथेच्या माध्यमातून तो मायबोलीच्या वाचकांसमोर मांडला होता. यावरचे प्रतिसाद मला फक्त एका कथेवरचे प्रतिसाद म्हणून अपेक्षित नव्हते, तर या विषयावर काहीतरी गंभीर चर्चा व्हावी असं वाटत होतं. पण मुळात जागाच चुकल्यामुळे (कथा म्हणून हा विषय समोर ठेवल्यामुळे) मला अपेक्षित अशी चर्चा व्हायच्या ऐवजी फक्त कथेविषयीचे प्रतिसादच आले. म्हणून nandini2911 यांनी सुचवल्याप्रमाणे हा बीबी उघडला आहे.
कथालेखन हा काही माझा प्रांत नाही. त्यामुळे कथेविषयीचे प्रतिसादही मला अपेक्षित नाहीत. पण या कथेच्या अनुषंगाने खालील मुद्द्यांवर चर्चा व्हावी असं मला वाटत होतं:
- असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
- तुम्ही पुरुष असाल तर तुम्हाला काय करता येऊ शकतं?
- गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमधे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करु शकतो का?
- अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे सहभागी असणार्यांना नेमक्या कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद असायला हवी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल?
- प्रसारमाध्यमांची याबाबतीत काय भुमिका असावी?
याव्यतिरीक्त अजूनही काही मुद्दे चर्चेयोग्य वाटत असतील तर तेही इथे मांडावेत ही नम्र विनंती.
-योगेश
मुळात बलात्कार हि मानसिक
मुळात बलात्कार हि मानसिक विकृती आहे.
कडक कायदा असल्यास यावर आडा बसविण्यास मदत होईल.
योगी खरोखरच विचार करण्या
योगी खरोखरच विचार करण्या सारखी गोष्ट आहे.
हा प्रकार पूर्ण थांबवण खरच शक्य नाही, पण आपण काळजी घेण गरजेच आहे,
कडक कायदा असणे म्हणजे नक्की
कडक कायदा असणे म्हणजे नक्की काय?
काही वर्षांपूर्वी
काही वर्षांपूर्वी "बलात्काराच्या गुन्ह्याला फाशीची शिक्शा असावी की नसावी" हा वाद चालु होता. तेव्हा माझ्या मनात विचार होता की या विषयावर वाद किंवा चर्चा काय करायची? असल्या घाणेरड्या गुन्ह्याला हीच शिक्शा योग्य आहे. पण थोडी मोठी झाल्यावर लक्शात आलं की यामधे खूप वेळा निर्दोष माणुसच बळी ठरेल. आपल्या कायद्यातल्या पळवाटा बघता तर हे सहज शक्य आहे. त्यामुळे असा काहीतरी कायदा निघाला पाहीजे की जेणेकरुन या गुन्हा करण्याची दहशत निर्माण झाली पाहिजे आणि योग्य न्याय पण झाला पाहिजे.
हे माझे विचार आहेत.
योगीराज, विषयाची व्याप्ती फार
योगीराज, विषयाची व्याप्ती फार मोठी आहे. पण वर उल्लेखल्याप्रमाणे निर्दोष माणूस फसण्याच्या शक्यता कमी झालेल्या आहेत. मेडीकल सायन्सने तेवढी प्रगती नक्की केली आहे.
बलात्काराची वर्गवारी करण्यात अर्थ नाही. बलात्कार हा बलात्कारच आहे. मग ती स्त्री कोणत्याही वयाची असू दे. त्याला शासन व्हायलाच हवे. यासाठी भर चौकात दिलेली फाशीही कमीच.
माणसातल्या या विकृतीला आळा घालणे कठीण. परक्या माणसाचा सोडा इथे आपल्या माणसावरही विश्वास ठेवता येत नाही. मुलीला बापावर विश्वास ठेवणे कठीण झाले आहे. कैक वर्षे बायका असल्या बलात्कारांना बळी पडतात. कुणी लग्नाच्या आशेने तर कुणी जीवाच्या भीतीने. का त्या या गोष्टींना त्याचवेळी वाचा फोडत नाहीत ? याला कारण काय ? समाज आणि त्यांनी ठरवलेल्या चौकटी की आणखी काही ?
प्रीती जैनसारख्या प्रकरणांबद्दल बोलण्यात अर्थ नाही. पण शायनी आहूजाला जामिन का मिळावा ? ज्या वकीलाने हा मिळवून दिला त्याच्याच बाबतीत असं काही घडलं तर तो काय करेल ?
एक माणूस म्हणून आपण शक्य तेवढी काळजी घेऊच. पण ती आपल्या मुलाबाळांबाबत. इतरांच काय ?
हाही प्रश्नच. उपाय शोधायचेत. कदाचित काही जबाबदार नागरिकांनी मनावर घेतलं तर यावर उपाय सापडेलही.
त्यासाठीच या विषयावर अधिकाधिक
त्यासाठीच या विषयावर अधिकाधिक चर्चा होणं गरजेचं आहे असं मला वाटतं. कदाचित या चर्चेतूनच आपल्यातल्याच कुणालातरी एखादा जालीम उपाय सापडेलही...
>>बलात्काराची वर्गवारी करण्यात अर्थ नाही. बलात्कार हा बलात्कारच आहे. मग ती स्त्री कोणत्याही वयाची असू दे
अगदी खरंय... पण आजच्याच सकाळ मधे पुन्हा दोन बातम्या वाचल्या बलात्काराच्या... एक विवाहीत महिलेवर लिफ्ट देण्यार्याने केलेला आणि दुसरा एका फक्त अडीच वर्षाच्या मुलीवर केला गेलेला...
इथे पुन्हा पुन्हा मला हा विचार खूप त्रास देतो की इतक्या लहान वयाच्या मुलींकडे अशा विकृत नजरेने बघण्याची मानसिकता कशी काय तयार झालेली असू शकते? याला कोणकोणते घटक जबाबदार असू शकतात? सर्वच दृक-श्राव्य माध्यमांतून उच्छृंखलपणे मांडलं गेलेलं स्त्रीदेहाचं प्रदर्शन? त्यात निर्लज्जपणे सहभागी असणार्या स्त्रिया, ज्यात आघाडीच्या नट्यासुद्धा येतात? की कमीतकमी कपड्यांमधे नाचणार्या मुलींचा समावेश असणार्या आयटेम साँग्जना "हीट" करणारी प्रेक्षक जनता - आपण सगळेजण?
कौतूक, तू म्हणतोस तसं विषयाची व्याप्ती खरंच फार मोठी आहे....
कडक कायदे करून बलात्काराच्या
कडक कायदे करून बलात्काराच्या प्रमाणाला आळा बसेल असं मला वैयक्तिकरित्या नाही वाटत. कारण आपण वाचतो त्या बातम्या समोर आलेल्या, समोर न आलेल्या कित्येक प्रसंगाना तर वाचा सुद्धा फुटत नाही. बलात्कार हा फक्त स्रियांवरच होतो असं नाही पुरूषांवरही होऊ शकतो/होतो. म्हणजे लहान मुलं, आणि तुरूंगात, समलैंगिक पुरूषांवर इ. म्हणायचं आहे मला. सर्वांनीच आपापल्या सुरक्षिततेसाठी योग्य ती उपाययोजना आणि काळजी घेतली पाहिजे. अनोळखि व्यक्तीबरोबर कुठेही एकटे जाणे टाळणे, गेल्यास कुणाला तरी कल्पना देऊन जाणे, दुर्दैवाने आपल्याबरोबर असा एखादा प्रसंग घडलाच तर प्रतिमेआ आणि इभ्रत या गोष्टींची काळजी न करता गुन्हेगाराला योग्य शासन व्हावं म्हणून त्या प्रसंगाला वाचा फोडावी. कारण जर मूग गिळून गप्प बसलो तर गुन्हेगारांचं फावेल. शिक्षा होत नाही आपला गुन्हा उघड होत नाही म्हणल्यावर ते अजून मोठा गुन्हा करायला सोकावतील. शिक्षण आणि जनजागरण हे जास्ती गरजेचं आहे.
मुळात गरज आहे ती निर्भयपणे
मुळात गरज आहे ती निर्भयपणे पुढे येण्याची, त्यासाठी लागणार्या मानसिकतेची, होउन गेलेल्या अपघाताचा बाउ न करणार्या समाजाची आणि आघात विसरायला लावून परत उमेदीने जगण्याची शक्ती देणार्या आधाराची.
असे प्रकार पूर्णपणे थांबवणं
असे प्रकार पूर्णपणे थांबवणं तर आपल्या हातात नाही. पण काय काळजी घेतली पाहिजे?
------------------------------------
माझ्या मते :
१. आयटी किंवा इतर क्षेत्रातही जर तुम्हाला एकटीला थांबावे लागणार असेल तर आपल्या कुटुंबापैकी कोणाला किंवा अतिशय विश्वासातील मित्र/मैत्रीणीला/कलीगला येउन परतीच्या प्रवासात सोबत करण्यास सांगावे. एकटीने कधिही जाउ नये. (थोडा वेळ कंपनीत बसायला लागले तरी चालेल).
२.गाडीत ड्रायव्हर खेरीज इतर पुरुष आणि तुम्ही एकटी असाल तर जाउ नये. (ज्योती चौधरी आणि नयना पुजारी या अशाच बळी गेल्या).
३. कंपनी वाहतुक असेल तर बस मधे जेव्हा बरीच माणसे असतील तेव्हा जावे.
४. ड्रायव्हर किंवा अनोळखी मंडळींशी कामापुरते बोलावे. काही वेळा तुम्ही सहज हसुन बोललात तर या मंडळींच्या मनात गैरसमज होण्याची शक्यता जास्त असते.
५. (भारतात मिळतात की नाही कल्पना नाही)मेस्/पेपर स्प्रे/लाल तिखट असे काही पर्स मधे ठेवावे ज्याचा वेळ पडल्यास उपयोग करता येइल.
६. पेपरवाला, दुधवाला, इस्त्रीवाला, मोलकरीण इ बरोबर कामापुरते बोलावे किंवा मुलाना(मुलगी/मुलगा कोणीही असेल तरी) त्यांच्याबरोबर एकटे सोडु नये.
७. लहान मुलाना/मुलीना त्यांच्या गुप्त जागी कोणी हात लावत्/लावण्याचा प्रयत्न करत असेल तर जोरजोरात ओरडण्यास किंवा चावण्यास शिकवावे.
आपण आपली काळजी घेतलेली उत्तम.. नाही का?
तुम्ही स्वतः एक स्त्री असाल
तुम्ही स्वतः एक स्त्री असाल तर तुम्ही काय काळजी घेतली पाहिजे?
भारतात लैंगीक शोषण खुपच आहे, रस्त्यावर चालण हि सुरक्षीत वाटत नाही, मागुन कधी कोण येईल आणि काय करेल याचा नेम नाही, मागुन काय पण समोरुन येणारी व्यक्ती हि काय करेल याचा नेम नाही.
असुरक्षीततेच्या ह्या एका कारणानेच भारतात यायच मला खुप भय वाटत.
भारतात कस रहायच हा प्रश्न येताच माझ्या डोक्यात आधी डॉबर-मॅन जातीचे कुत्रे पाळायचे हा विचार येतो. शक्य असेल तीथे सगळी कडे आपल्या डॉबर-मॅन ला घेऊन जायच. याशीवाय
कराटे, सेल्फ डिफेन्स च ट्रेनिंग घ्यायला हव. हे ट्रेनिंग मुलींना शाळेत सक्तिच करायला हव.
सोबत पर्स मध्ये लहानशी सुरी वै. ठेवायला हवी.
मोबाईल फोन सोबत हवा आणि दोन-तीन पोलीस स्टेशन चे फोन नंबर त्यात हवेच एन वेळेवर पोलीसांना कॉल करण्यासाठी
आपला दिवसभराचा काय प्लॅन आहे तो कुणाला तरी सांगुन जायच. एकट रहात असलो तरी आपला दिवस भराचा प्लॅन कुणाला तरी मेल करुन, कागदावर लिहुन मग जायच म्हणजे आपण प्लॅन नुसार परतलो नाहितर घरातले आपला शोध सुरु करु शकतात, एकट असु आणि काहि झाल तर आपला प्लॅन वाचुन पोलीसांना मदत मीळु शकते.
बाहेर असतांना दिवस भरात अधुम मधुन घरचे , मीत्र मैत्रीणी यांना फोन करायचा.
गेल्या काही आठवड्यांत वाचनात आलेल्या बातम्यांमधे अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे अगदी १२-१४ वर्षे वयाच्या मुलांचाही सहभाग असल्याचं दिसून आलं. एवढ्या लहान वयात या मुलांच्या मनात अशा भावना कशामुळे निर्माण झाल्या असतील? याबाबतीत आपण काही करु शकतो का?
सेक्स एज्युकेशन आणि मोकळे पणाने ह्या विषयावर मुलांशी चर्चा याचा नक्किच उपयोग होऊ शकतो.
अशा प्रकारच्या गुन्ह्यांमधे सहभागी असणार्यांना नेमक्या कशा प्रकारच्या शिक्षेची तरतूद असायला हवी म्हणजे गुन्ह्यांचं प्रमाण कमी होईल? प्रसारमाध्यमांची याबाबतीत काय भुमिका असावी?
सजा एकच..... तडपातडपा के Death..... ज्या व्यक्ती वर अन्याय/अत्याचार झालाय त्या व्यक्तीला, अन्याय-अत्याचार करणार्याला कस संपवायच हा हक्क हवा..... फाशी नाही हंटरचा मार, चटके आणि अश्या प्रकारच्या वेदना देऊन भर चौकात मारायला हव अश्यांना आणि प्रसारमाध्यमांनि याच थेट (Live) प्रक्षेपण करायला हव mandatory on all channels.... नुसतच Live नाही तर वरचे वर टेलीकास्ट केले पाहिजे हे.
(माझे विचार खुपच ऊग्र आहेत मला माहित आहे पण मला ते चुक वाटत नाहीत)
एखाद्या मुलीवर बलात्कार झाला
एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणजे तीच सगळ संपल हि जी विचारसरणी आहे ती संपली पाहिजे. बलात्कार झाला म्हणजे काही आयुष्याचा एंड नसतो...... भारतात, बलाक्तार झाला याचा खुपच बाऊ केला जातो आणि अन्याय झालेल्या व्यक्तीलाच नको नको ते "आत काय करायच" , "तुझ सगळ संपल" .... वै. आणि आणखी एक "तुझी ईज्जत गेली..." अस आंगण्यात येत.
माझ्या मते बलात्कार आणी ईज्जत जाण ह्यांचा काही संबध नाही. एखाद्या वक्ती बरोबर (विशेषता मुली बरोबर) कुणी बळेच शाररीक संबध प्रस्थापीत केले तर ह्यात त्या व्यक्तीचा कय दोष???? ऊलट जो अस कुकर्म करतो त्याची ईज्जत जाते त्याला समाजाने धडा शीकवला पाहिजे. आणि.... ज्या व्यक्ती वर अन्याय झालाय तीला सपोर्ट करुन, तीला तुझ्या सोबत केवळ एक शाररीक अपघात झालाय त्याने जीवन वा जगण्यातला आनंद संपत नाही हे पटवायला हव.
भारतात लैंगीक शोषण खुपच आहे,
भारतात लैंगीक शोषण खुपच आहे, रस्त्यावर चालण हि सुरक्षीत वाटत नाही, मागुन कधी कोण येईल आणि काय करेल याचा नेम नाही, मागुन काय पण समोरुन येणारी व्यक्ती हि काय करेल याचा नेम नाही.
>>>सास यांच्या ह्या वाक्याव्यतिरिक्त बाकी मुद्दे बरेच practical आहेत.
बाकी सास ह्या गोष्टी फक्त भारतातच आहेत असा बाउ करणं आणि रस्त्यावर फिरताना कोण काय करेल वगैरे हा मात्र टोकाचा विचार! इतकीही वाईट अवस्था नाहीये!![Angry](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/angry.gif)
सास यांच्या दोन्ही पोस्टला
सास यांच्या दोन्ही पोस्टला अनुमोदन, त्यातल्या त्यात दुसरी जास्तच महत्वाची वाटते.
फार वर्षांपुर्वी, माझ्या परिचयाच्या एकीला असल्याच प्रकारच्या हिन प्रवृत्तीला सामोरे जावे लागले होते. बहादुर होती म्हणुन लढली, कोर्टाच्या पायर्या झिजवल्या... पण... समाजाची मानसिकता गुन्हा करणार्या पेक्षा त्याला बळी पडणार्यालाच जास्त कडक शिक्षा देतो... अनेक वेळा या बाबतीत 'ब्लॅक मेल' केले गेल्याचेही वाचतो. ते अजुनही वाईट.
जळगांवला काही वर्षांपुर्वी वासनाकांड झाले होते त्यात किती लोकांना शिक्षा झाली ? प्रथम असे प्रकार फार कमी प्रमाणात पुढे येतात. जे फार थोडे पुढे येतात, त्यातील बर्याच प्रकरणात आरोपी
सलामत सुटतो.
@दक्षिणा: कडक कायदे करून
@दक्षिणा:
कडक कायदे करून बलात्काराच्या प्रमाणाला आळा बसेल असं मला वैयक्तिकरित्या नाही वाटत. कारण आपण वाचतो त्या बातम्या समोर आलेल्या...
पटलं, पण तरीही कायदे कडक असायलाच हवेत. निदान दहापैकी २-३ जणतरी घाबरतील कायद्याला...
बलात्कार हा फक्त स्रियांवरच होतो असं नाही पुरूषांवरही होऊ शकतो/होतो. म्हणजे लहान मुलं, आणि तुरूंगात, समलैंगिक पुरूषांवर इ.
खरं आहे... वर मधुकर.७७ यांनी म्हटल्याप्रमाणे ही एक मनोविकृती आहे.
दुर्दैवाने आपल्याबरोबर असा एखादा प्रसंग घडलाच तर प्रतिमेआ आणि इभ्रत या गोष्टींची काळजी न करता गुन्हेगाराला योग्य शासन व्हावं म्हणून त्या प्रसंगाला वाचा फोडावी. कारण जर मूग गिळून गप्प बसलो तर गुन्हेगारांचं फावेल. शिक्षा होत नाही आपला गुन्हा उघड होत नाही म्हणल्यावर ते अजून मोठा गुन्हा करायला सोकावतील. शिक्षण आणि जनजागरण हे जास्ती गरजेचं आहे.
१००% सहमत.
@मनस्मि१८
खूपच चांगले मुद्दे मांडलेत तुम्ही. विशेषतः ७ वा मुद्दा खूप महत्त्वाचा वाटला.
@सास
तुमचा कराटे, सेल्फ डिफेन्स टेक्नीक्स चा मुद्दा खूप महत्वाचा वाटला. शहरी भाग वगळता अजूनही मुलींना स्वसंरक्षणासाठीचं प्रशिक्षण देण्याबद्दल बरीच उदासीनता आढळते. शहरी भागातसुद्धा हे प्रमाण खूप आशादायक आहे असं नाहीच.
मोबाईलमधे जवळच्या पोलीस स्टेशनचा नंबर ठेवण्याचा उपायही उत्तम. कधीही, कुठेही उपयोगी येऊ शकतो. १०० वर दरवेळी संपर्क होतोच असं नाही. परवाच पावसामुळे जवळच्या एका रस्त्यावर वीजेच्या तारा पडून धोकादायकरित्या लोंबकाळत होत्या. त्याबद्दल कळवण्यासाठी १०० वर बराच वेळ प्रयत्न करुनही संपर्क होऊ शकला नाही.
सेक्स एज्युकेशन वगैरे याबाबतीत उपयोगी पडेल असं व्यक्तीशः मला वाटत नाही. त्यासाठी आधी खोलवर जाऊन "एज्युकेशन" या विषयावरच चर्चा व्हायला हवी.
बाकी, शिक्षेबद्दल तुम्ही जे काही लिहीलंय तसंच आधी मलाही वाटत होतं. पण आता खूप जास्त गोंधळ होतोय विचारांचा की नेमकी काय शिक्षा असायला हवी....
एखाद्या मुलीवर बलात्कार झाला म्हणजे तीच सगळ संपल हि जी विचारसरणी आहे ती संपली पाहिजे. बलात्कार झाला म्हणजे काही आयुष्याचा एंड नसतो...... भारतात, बलाक्तार झाला याचा खुपच बाऊ केला जातो आणि अन्याय झालेल्या व्यक्तीलाच नको नको ते "आत काय करायच" , "तुझ सगळ संपल" .... वै. आणि आणखी एक "तुझी ईज्जत गेली..." अस आंगण्यात येत. .
माझ्या मते बलात्कार आणी ईज्जत जाण ह्यांचा काही संबध नाही. एखाद्या वक्ती बरोबर (विशेषता मुली बरोबर) कुणी बळेच शाररीक संबध प्रस्थापीत केले तर ह्यात त्या व्यक्तीचा कय दोष???? ऊलट जो अस कुकर्म करतो त्याची ईज्जत जाते त्याला समाजाने धडा शीकवला पाहिजे. आणि.... ज्या व्यक्ती वर अन्याय झालाय तीला सपोर्ट करुन, तीला तुझ्या सोबत केवळ एक शाररीक अपघात झालाय त्याने जीवन वा जगण्यातला आनंद संपत नाही हे पटवायला हव.
१००% सहमत.
@Champ:
बाकी सास ह्या गोष्टी फक्त भारतातच आहेत असा बाउ करणं आणि रस्त्यावर फिरताना कोण काय करेल वगैरे हा मात्र टोकाचा विचार! इतकीही वाईट अवस्था नाहीये!
१००% सहमत.
>>>>> याला कोणकोणते घटक
>>>>> याला कोणकोणते घटक जबाबदार असू शकतात? सर्वच दृक-श्राव्य माध्यमांतून उच्छृंखलपणे मांडलं गेलेलं स्त्रीदेहाचं प्रदर्शन? त्यात निर्लज्जपणे सहभागी असणार्या स्त्रिया, ज्यात आघाडीच्या नट्यासुद्धा येतात? की कमीतकमी कपड्यांमधे नाचणार्या मुलींचा समावेश असणार्या आयटेम साँग्जना "हीट" करणारी प्रेक्षक जनता - आपण सगळेजण?
विशिष्ट मर्यादेपर्यन्त हे मुद्दे ग्राह्य धरता येतात
सोनेनाणे चोरले जाते, त्यावर दरोडा पडू शकतो हे माहित असलेले लोक स्वतःकडचे सोनेनाण्याचे "प्रदर्शन" करत नाहीत, तद्वतच सौन्दर्यावर "घाला" पडतो हे माहित असलेले लोक त्याचेही "प्रदर्शन" करीत नाहीत, आणि ती मर्यादा बुरख्यापर्यन्त येऊन पोचते! पण हे उपाय बचावात्मक आहेत! स्त्रिस्वातन्त्र्यावर/कौटुम्बिक रचनेवर घाला घालणारे आहेत! सबब, कायमस्वरुपी नव्हेत
मग कायमस्वरुपी काय व्हायला हवे?
सन्स्कार??? ... अशक्य!
बाह्य दृकश्राव्य माध्यमातून जागोजागी स्त्री ही केवळ भोगवस्तु असल्याचे प्रदर्शन मान्डले जात असताना अतिशय अवघड आहे!
याउप्पर अनेकानेक सिनेमातून, स्त्रीवर या ना त्या प्रकारे "प्रेमाची " जबरदस्ती केल्याचे दाखवुन काय साध्य होते ते एकतर्फी प्रेमातुन घडणार्या घटनातून दिसतेच आहे
एखादे गुलाबाचे फुल, सगळ्ञान्नाच सुन्दर दिसते झाडावर असताना, पण काही विशिष्ट विकृत लोकान्ना ते फुल ओरबाडुन्/हिसकावुन/जबरदस्तीने स्वतःकरताच हवे असते! पण म्हणून काय फुलाने फुलु/उमलुच नये? सुन्दर दिसूच नये???
तेव्हा उपाय एकच, विकृत व्यक्तिन्वर व्हायला हवा, फुलावर नव्हे हे विसरुन चालणार नाही!
>>भारतात लैंगीक शोषण खुपच
>>भारतात लैंगीक शोषण खुपच आहे, रस्त्यावर चालण हि सुरक्षीत वाटत नाही, मागुन कधी कोण येईल आणि काय करेल याचा नेम नाही, मागुन काय पण समोरुन येणारी व्यक्ती हि काय करेल याचा नेम नाही.
असुरक्षीततेच्या ह्या एका कारणानेच भारतात यायच मला खुप भय वाटत.<<
संपूर्णपणे असहमत. भारताबद्दल हे असे चुकीचे ग्रह बाळगू नका आणि अभारतीयांना असल्या चुकीच्या समजुती करून देऊ नका.
जगातल्या सगळ्या ठिकाणी हा प्रश्न येऊ शकतो. कुठे कमी कुठे अधिक. न्यूयॉर्कच्या काही रस्त्यांवर रात्री ९:३० ला सुद्धा भिती वाटावी अशी परिस्थिती मी पाह्यलेली आहे. युनिव्हर्सिटीज चे कॅम्पस विशेषतः युनिव्हर्सिटी टाउन्स असलेले कॅम्पस हे कितपत सुरक्षित आहेत याबद्दल शंकाच आहे.
मलातरी आजतागायत रात्री अपरात्री एकटीने फिरताना मुंबई-पुणे-कोल्हापूर-सांगली, पश्चिम महाराष्ट्र व कोकणातली गावे अगदी सुरक्षित वाटलेली आहेत. (महाराष्ट्रातल्या इतर भागात मी रात्री अपरात्री एकटी फिरले नाहीये त्यामुळे माहीत नाही.) लोक भाषा येत असेल, समजत असेल तर ग्रामीण भागातही आपण बर्यापैकी सुरक्षित असतो हा अनुभव रायगडातल्या आदिवासी वस्त्या आणि गोव्यातला.
दिल्लीमधे फिरताना जरा भितीदायक वाटते एवढे नक्की. गुवाहाटी ते नॉर्थ लखिमपूर आणि परत असे दोन्ही रात्रीचे बसचे प्रवास एकटीने केले आहेत. भाषा अजिबात येत नव्हती, हिंदी बोललो तर आपल्याला शत्रू समजतात अशी तिथे परिस्थिती असूनही तिथले कंडक्टर, ड्रायव्हर यांचा चांगलाच अनुभव आला. बसमधल्या एकाने टाइट होऊन छेडखानी करायचा प्रयत्न केल्यावर ड्रायव्हरने गाडी थांबवून त्या माणसाला त्याच्या सामानासकट रस्त्यात मधेच कुठेतरी उतरवले.
मुंबईत तर एवढी गर्दी आहे की गर्दीचा फायदा घेऊन स्पर्श करणारे लोक सोडले तर दिवसाढवळ्या बाकीचे अनुभव येण्याची शक्यता कमी तुम्ही नीट असाल तर. आणि असे स्पर्श करणारे लोक कुठेही असतात जगाच्यापाठीवर. ज्या क्षणी असं काही घडेल त्या क्षणी मागे वळून कानाखाली वाजवणे किंवा निदान आवाज चढवणे एवढं जरी करता आलं तरी आजूबाजूचे लोक पिटून काढायला मागेपुढे बघत नाहीत हाही मुंबईतलाच अनुभव.
>>भारतात कस रहायच हा प्रश्न येताच माझ्या डोक्यात आधी डॉबर-मॅन जातीचे कुत्रे पाळायचे हा विचार येतो. शक्य असेल तीथे सगळी कडे आपल्या डॉबर-मॅन ला घेऊन जायच. <<
खूपच विनोदी वाक्यं. डॉबर मॅन शिवाय पावलापावलाला बाईची इज्जत लुटलीच जाते असं काहीसं विकृत चित्र आहे का तुमच्या मनात भारताबद्दल?
>>कराटे, सेल्फ डिफेन्स च ट्रेनिंग घ्यायला हव. हे ट्रेनिंग मुलींना शाळेत सक्तिच करायला हव.<<
हे भारतातच नाही कुठेही महत्वाचं आहे.
>>सोबत पर्स मध्ये लहानशी सुरी वै. ठेवायला हवी.<<
हल्ली बहुतांश ठिकाणी सुरक्षा तपासणीच्या इथे ही सुरी काढून घेतली जाईल. काय उपयोग मग?
>>मोबाईल फोन सोबत हवा आणि दोन-तीन पोलीस स्टेशन चे फोन नंबर त्यात हवेच एन वेळेवर पोलीसांना कॉल करण्यासाठी<<
ह्म्म्म चालेल.
>>आपला दिवसभराचा काय प्लॅन आहे तो कुणाला तरी सांगुन जायच. एकट रहात असलो तरी आपला दिवस भराचा प्लॅन कुणाला तरी मेल करुन, कागदावर लिहुन मग जायच म्हणजे आपण प्लॅन नुसार परतलो नाहितर घरातले आपला शोध सुरु करु शकतात, एकट असु आणि काहि झाल तर आपला प्लॅन वाचुन पोलीसांना मदत मीळु शकते. बाहेर असतांना दिवस भरात अधुम मधुन घरचे , मीत्र मैत्रीणी यांना फोन करायचा.<<
कुठे जातोय ते कुणाला तरी माहीत पाहिजे हे ठिक पण तरी हे जरा जास्त पॅरानॉइड झाल्यासारखं होतंय.
>>ज्या व्यक्ती वर अन्याय झालाय तीला सपोर्ट करुन, तीला तुझ्या सोबत केवळ एक शाररीक अपघात झालाय त्याने जीवन वा जगण्यातला आनंद संपत नाही हे पटवायला हव.<<
अगदी बरोबर..
लिंब्या,
>>तद्वतच सौन्दर्यावर "घाला" पडतो हे माहित असलेले लोक त्याचेही "प्रदर्शन" करीत नाहीत, आणि ती मर्यादा बुरख्यापर्यन्त येऊन पोचते! पण हे उपाय बचावात्मक आहेत! स्त्रिस्वातन्त्र्यावर/कौटुम्बिक रचनेवर घाला घालणारे आहेत! सबब, कायमस्वरुपी नव्हेत
मग कायमस्वरुपी काय व्हायला हवे?
सन्स्कार??? ... अशक्य!
बाह्य दृकश्राव्य माध्यमातून जागोजागी स्त्री ही केवळ भोगवस्तु असल्याचे प्रदर्शन मान्डले जात असताना अतिशय अवघड आहे!
याउप्पर अनेकानेक सिनेमातून, स्त्रीवर या ना त्या प्रकारे "प्रेमाची " जबरदस्ती केल्याचे दाखवुन काय साध्य होते ते एकतर्फी प्रेमातुन घडणार्या घटनातून दिसतेच आहे
एखादे गुलाबाचे फुल, सगळ्ञान्नाच सुन्दर दिसते झाडावर असताना, पण काही विशिष्ट विकृत लोकान्ना ते फुल ओरबाडुन्/हिसकावुन/जबरदस्तीने स्वतःकरताच हवे असते! पण म्हणून काय फुलाने फुलु/उमलुच नये? सुन्दर दिसूच नये???
तेव्हा उपाय एकच, विकृत व्यक्तिन्वर व्हायला हवा, फुलावर नव्हे हे विसरुन चालणार नाही!<<
या सगळ्यासाठी करोडो मोदक.
Champ बाकी सास ह्या गोष्टी
Champ
बाकी सास ह्या गोष्टी फक्त भारतातच आहेत असा बाउ करणं >>> हे टोकाच झाल मान्य..... पण .....
.....रस्त्यावर फिरताना कोण काय करेल वगैरे हा मात्र टोकाचा विचार नाही इतकी वाईट अवस्था , आहे ...
१. आमच्या शेजारच्या काकु त्यांच्या १०-११ वि तल्या मुलीला सोडायला जायच्या क्लासला कारण ती जायची त्या रस्त्यावर एक माणुस सायकल ठिक करतोय अस नाटक करुन येणार्या जाणार्या मुलींना त्रास द्यायचा.... मैत्रीणीं बरोबर त्या रस्त्यावरुन जातांना त्याचे शुक शुक करुन बोलावण, डोळा मारण वै मुर्ख प्रकार मी हि अनुभवलेत... दोन तीन मुली सोबत असल्या तरी तो अस करायचा एकट्या मुलीला किती त्रास देत असावा.... हे एका शहरात... चांगल्या भागात..
२. ...माझी एक मैत्रीण दुसर्या शहरात शीकायला गेली, तीचा हा अनुभव त्यांच्या रुम वरुन मेस ला जाणारी गल्ली खुप भयाण होती... दिवस असो वा रात्र ह्या गल्लीत मुलींना घाण अनुभव यायचे.... धावत वा सायकल वरुन येणारे मुर्ख गल्लीत घुसुन गल्लीतुन जाणार्या मुलींना मागुन वा पुढुन हात लावुन, चपाटा मारुन जायचे... त्या सगळ्या मुली शेवटि लांबचा रस्ता पकडुन मेसवर जाऊ लागल्या.. गल्ली सोडुन...
३. माझी हिच मैत्रीण सकाळी ७ वाजता (पंजाबी ड्रेस मध्ये) रस्त्यावरुन चालत असतांना मागुन तीन मुल बाईक वरुन आली आणि तीला मागे जोरात मारुन, तीला दात दाखवुन निघुन गेली आणि परत येऊन पुन्हा त्या मुर्खांनि तीच्या कडे पाहुन दात दाखवले ..... पुण्या सारख्या शहरात हे असले प्रकार होतात भर सकाळी तेही चांगली वस्ती, चांगली कॉलेजेस असलेल्या भागात![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
हे सर्व प्रकार अमेरिकेतल्या
हे सर्व प्रकार अमेरिकेतल्या कुठल्याही टाउनमधे, शहरामधेही होतात.
फुकट केवळ भारताला बदनाम करणं बंद करा.
नीधपा, धन्यवाद! ते पोस्ट
नीधपा, धन्यवाद!
ते पोस्ट मुद्दामहून आधीच टाकुन घेतले,
कारण "स्त्रियान्च्या " पोषाखामुळे "पुरुषान्च्या भावना चळतात अन म्हणून बलात्कार वगैरे होतात नि म्हणून स्त्रियाच दोषी, नि म्हणून स्त्रियान्च्या पोषाखावर, वावरावर बन्दी आणा" असे म्हणणारे "तालिबानी" आपल्या देशातही काही कमी नाहीत!
खर तर चळण्यार्या विकृताला उघडी/झाकलेली स्त्रीच कशाला? नागडी गाढवीणही चळण्यास पुरी पडते हे "मानसिक विकृतीचे" सत्य नाकारुन कसे चालेल? तेव्हा उपाय शोधायचे तर विकृतान्करता शोधले जावेत!
[अन्यथा मग आहेच चर्चा, अशापासुन जपुन कसे रहावे याचे बचावात्मक सल्ले वगैरे वगैरे]
या वरच्या तिन्ही उदाहरणांमधे
या वरच्या तिन्ही उदाहरणांमधे मुली मूर्खासारख्या घाबरट होत्या हे म्हणायला जागा आहे.
दात दाखवल्याने, शुक शुक केल्याने, डोळा मारल्याने मुलींना काय झालं? लक्षच नाही आणि ऐकूच येत नाही आणि फरकच पडत नाही अश्या त्या गेल्या तर किती दिवस हे करत रहातील?
चापट मारणारा कितीही फास्ट गेला तरी एकदा अनुभव आल्यावर दुसर्या वेळेला त्याला पकडता येईल किंवा गेलाबाजार त्याच्या सायकल वर लाथ मारून त्याला पाडता येईल इतपत त्याला स्लो व्हावेच लागते. ते करायची हिंमत जिथे नाही तिथे लोक सोकावणारच.
नीधपा, माझा देशाला बदनाम
नीधपा,
माझा देशाला बदनाम करण्याचा विचार नाही.... मी केवळ देशात कसे कसे वाईट अनुभव येतात/येऊ शकतात ते नोंदवत आहे .... आपल्या देशातल्या वाईट अनुभवांवर चर्चा आहे म्हणुन आपल्या देशा बद्दल लिहल बाकी हेतु वाईट नाही
डॉबर-मॅन च तुम्हाला विनोदि वाटेल पण मला मात्र तो एक भक्कम साथी वाटतो आणि मला घरात/सोबत असा एखादा रक्षक असला कि वाईट हेतु असलेल्या लोकांवर वचक रहातो अस हि वाटत![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
दात दाखवल्याने, शुक शुक
दात दाखवल्याने, शुक शुक केल्याने, डोळा मारल्याने मुलींना काय झालं?>>>>
मी घाबरले होते मैत्रीणी सोबत असुन प्रत्येक जणच धाडसी नसतो असला तरी अस अचानक काही वावग घडल तर घाबरायला होऊ शकत ... प्रसंगी धक्का लागुन घाबरण हि सहाजीक नैसर्गीक बाब आहे त्याने कुणी मुर्ख नसतो होत.
लक्षच नाही आणि ऐकूच येत नाही आणि फरकच पडत नाही अश्या त्या गेल्या तर किती दिवस हे करत रहातील?
लक्षच नाही आणि ऐकूच येत नाही आणि फरकच पडत नाही अस तर साधारण पणे बर्याच मुली करतात आणि त्रास देणारे इतक्या सहजा सहजी थांबणारे असले तर मग बलात्कारा सारखे प्रसंग होणार नाहीत.
चापट मारणारा कितीही फास्ट गेला तरी एकदा अनुभव आल्यावर दुसर्या वेळेला त्याला पकडता येईल किंवा गेलाबाजार त्याच्या सायकल वर लाथ मारून त्याला पाडता येईल इतपत त्याला स्लो व्हावेच लागते. ते करायची हिंमत जिथे नाही तिथे लोक सोकावणारच.>>>> हे सगळ एन वेळे वर सुचायला हव प्रत्येकाला ते शक्य नाही, मनाला धक्का लागलेल्या अवस्थेत तर नाहीच.... आणि त्रास द्यायला आज कोणी बाईक वरुन उद्या कोणी सायकल वरुन येईल हे ठाऊक नसत आधी पासुन...
नमस्कार, विषयांतरा साठी
नमस्कार,
विषयांतरा साठी क्षमा,
माझा इथे अनुभव नोंदवितांना कुणाला , कुठल्या देशाला, प्रांताला कमी लेखण्याचा हेतु नाही.... विषयाला धरुन लिहण्याचा मी प्रयत्न करत आहे... प्लीज ऊगाच गैर समज नसावे आणि प्लीज इथे नसते वाद, अपमान करु नये....
सगळे सारखेच नसतात .... झाशी ची राणी एकच होती... सगळ्या स्त्रीयांनी राणी सारख धाडसी असण चांगलच होत पण ती कुवत ज्या स्त्रीयां मध्ये नव्हती त्याने त्या स्त्रीया कमी दर्ज्याच्या , घाबरट वा मुर्ख होत नाहीत.
माझा इथे अनुभव नोंदवितांना
माझा इथे अनुभव नोंदवितांना कुणाला , कुठल्या देशाला, प्रांताला कमी लेखण्याचा हेतु नाही.... विषयाला धरुन लिहण्याचा मी प्रयत्न करत आहे... प्लीज ऊगाच गैर समज नसावे आणि प्लीज इथे नसते वाद, अपमान करु ये>> सॉरी, तुम्हेए माझ्या देशाला कमी लेखायचा प्रयत्न करताय आणि तो वर दिसतोच आहे!!
मी घाबरले होते मैत्रीणी सोबत असुन प्रत्येक जणच धाडसी नसतो असला तरी अस अचानक काही वावग घडल तर घाबरायला होऊ शकत ... प्रसंगी धक्का लागुन घाबरण हि सहाजीक नैसर्गीक बाब आहे त्याने कुणी मुर्ख नसतो होत.>>> मग धाडसी बनायला शिका. नाहीतर बुरखे पांघरून घरातच बसा घराबाहहेर पडलात तर चार चांगले आणि दोन वाईट अनुभव येणारच! त्याची तयारी ठेवा.
आणि अजून एकः- हा बीबी बलात्कारावर चर्चअ करण्यासाठी आहे. रोड रोमिओ वा तत्सम व्यक्तीबद्दल नव्हे!!
नंदीनीला अनुमोदन.. रोडरोमिओ
नंदीनीला अनुमोदन..
रोडरोमिओ हे जनरली बलात्कारापर्यंत जाण्याइतके निर्ढावलेले नसतात.
जुहूच्या झोपडपट्टीतले अनेक रोडरोमिओ २६ जुलैच्या पुराच्या वेळेला स्वतःच्या घरात पाणी शिरलेलं आहे अश्या अवस्थेतही पाण्यात अडकलेल्या अनेक बायाबापड्यांना सुखरूपपणे सुरक्षित ठिकाणी जायला मदत करताना दिसत होते. ते काही बायकांचे हात हातात घ्यायला मिळावे म्हणून नाही.
वाद घालायचा मुद्दाच नाही सास पण ज्या देशात मी रहाते, उदरनिर्वाह मिळवते, ज्या देशात मी वाढले, जी काय आहे ती बनले त्या माझ्या देशाबद्दल कुणी अतिरंजित काहीतरी सांगू लागलं तर ऐकून घ्यायचं कारणच नाही.
सगळ्या स्त्रीयांनी राणी सारख
सगळ्या स्त्रीयांनी राणी सारख धाडसी असण चांगलच होत पण ती कुवत ज्या स्त्रीयां मध्ये नव्हती त्याने त्या स्त्रीया कमी दर्ज्याच्या , घाबरट वा मुर्ख होत नाहीत.<<
स्वतःचं बेसिक पातळीवर संरक्षण करता न येणं याला कुठलीही पळवाट असू शकत नाही.
नीधप, सास तिचे अनुभव लिहितेय
नीधप, सास तिचे अनुभव लिहितेय हे बरेचदा भारतात येतात. शाररिक नव्हे तर मानसिक शोषण देखिल लोक करतात. एखाद्या मुलीचे नाव रस्ताभर लिहून ठेवणे, गर्दीच्या ठिकाणी किंवा अगदी एकांतात अचकट विचकट बोलणे हे भारतात सर्रास होते. बाहेरगावी जाणवले तरी नाही कदाचित सगळाच मोकळा कारभार असल्याने असेल. आपल्याकडे सगळेच छुपं! आणि हे बर्याचजणांना जाणवतं.. मुलांनाही तू विचारू शकतेस.
मला वाटतं की मुख्य फरक आपल्या "योनीशुचिते"चा बाऊ करणार्या संस्कृतीचा आहे. किती बाप किंवा आया आपल्या मुलीला छेडणार्याला दम देतात? ८०% लोक तू दुसर्या रस्त्याने जा असे शिकवतात. किती आईवडील आपला मुलगा इतर किंवा घरातल्याच मुलींशी कसा (रिस्पेक्टफुली की नाही) वागतो ह्यावर लक्ष ठेवतात? किती आया आपल्या मुलींना गर्दीच्या ठिकाणी नीट संभाळतात.
माझा वैयक्तिक अनुमान ह्याबाबतीत १०% एवढेच आहे. एक उदाहरण सांगते.
स्थळ - मुम्बै - गोरेगाव पश्चिम - टोपीवाला थिएटरची गल्ली
वेळ - शनिवार संध्याकाळ
मी आणि माझी बहिण स्टेशनच्या दिशेने चालत होतो. बोळाच्या दोन्ही बाजूला रस्त्यावरची दुकानच दुकानं! आमच्या मागे आम्हाला संशयास्पद व्यक्ती जाणवली. त्यामुळे आम्ही त्या माणसापसून दूर होऊन त्याला पुधे जाऊ दिलं. मग मी पुन्हा गप्पा मारायला सुरूवात केली. एवढ्यात एक ६ वर्षाची मुलगी आणि तिची आई थिएटरच्या दिशेने गेल्या. त्यामाणसाने त्यामुलीला छातीला चिमटा काढला. ती मुलगी एकदम घाबरली पण आईचे लक्षच नाही. माझ्या बहिणीने हे बघितलं आणि त्याला जोरात मानेवर पाठून मारलं, मग मी पण थोडा आवाज चढवला, त्याला खाली पाडला. ती बाई मख्ख! रस्त्यावरचे सगळे पुरुष (?) मख्ख! मला दुकानदार सांगतो जाऊ द्या ना? तुम्हाला काही केलय का? मी त्याला विचारलं तुझी मुलगी अश्या किंवा वाईट प्रसंगात असेल तर पण अशीच गप्प बसू का? आणि तू पण बसशील का?
ह्या प्रसंगातून आपल्या समाजाची मानसिकता स्पष्ट व्हावी. बाहेरच्या देशातही अशी मानसिकता असेल पण निदान पालक लहान मुलांच्या बाबतीत. तिथे एखाद्या भागात एखादा "चाईल्ड मोलेस्टर" आला किंवा एखादा गुन्हा नोंदला की "नेबरहूड" मध्ये सगळे पालक एकमेकांना संपर्क करून कळवतात. आपल्याकडे अशी सोयच नाही !![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
बाकीइ वरचे सगळे उपाय आणि चर्चा, अनुमोदन!
नीधप आणि नंदिनी, आज किती
नीधप आणि नंदिनी, आज किती आईवडील आपल्या बलात्कारित मुलीला सपोर्ट करतात?
फक्त शाररिक सीमा ओलांडणं म्हणजे बलात्कार? रोड रोमिओस मुलींच्या मनावर रोज बलात्कार करतात (अस मला वाटत - invading my personal space. And why should I neglect it? )
आपल्या समाजाने मुलीला अरेला का रे करायला शिकवलं पाहिजे.. तरच सगळे आपलं "व्यक्ती" म्हणून बेसिक संरक्षण करू शकतील.
जाईजुई, तुमच्या पोस्टचा रोख
जाईजुई, तुमच्या पोस्टचा रोख समजला नाही!!!
फक्त शाररिक सीमा ओलांडणं म्हणजे बलात्कार? रोड रोमिओस मुलींच्या मनावर रोज बलात्कार करतात (अस मला वाटत - invading my personal space. And why should I neglect it? )>> तो तुमचा प्रॉब्लएम आहे!! मग त्या रोड रोमिओजच्या कानाखाली जाळ पण काढायची हिंमत तुम्ही ठेवलेलीच आहे ना!! पण ती हिंमत न ठेवता जर कुणी "अख्ख्या भारताला" असुरक्षित म्हणत असेल तर ते मान्य नाही!!
आपल्या समाजाने मुलीला अरेला का रे करायला शिकवलं पाहिजे.. तरच सगळे आपलं "व्यक्ती" म्हणून बेसिक संरक्षण करू पाहतील.
>>> आपल्याच का??? जगातल्या प्रत्येक मुलीला हे शिकवायला पाहिजे. मुलीनी ते शिकून घ्याय्ला पाहिजे. माझ्यावर जर कुण्या पुरूषाने जबरदस्ती करायचा प्रयत्न केला तर मी काय करू शकते हे प्रत्येकीने मनाशी ठरवलेलंच पाहिजे. तसा सराव देखील घरच्या घरी करून बघा!!
जुन्या मायबोलीवर पण ही चर्चा होती. मिळ्ते का बघते!!
जाईजुई, सासच्या बोलण्यात हे
जाईजुई,
सासच्या बोलण्यात हे अनुभव केवळ भारतात दर पावलालाच येत असतात आणि त्यासाठी डॉबरमॅन कुत्रा घेऊन फिरायला हवे असे जे अतिरंजित उल्लेख आहेत त्यावर आक्षेप आहेत. हे माझं पोस्ट नीट वाचलंस तर कळू शकेल.
तसेच इथे तिथे करण्यात अर्थ नाहीये.. मी पण अमेरीकेत राह्यलेय आणि अमेरीकेतही काही सगळं सुरक्षित आहे असं म्हणता येण्यासारखं नाहीये.
माझा अमेरिकन प्रोफेसर मुंबईत आला होता तेव्हा त्याने लोकल्स बघायचा हट्ट धरला. तिथे पोचल्यावर घाण इत्यादी बद्दल नेहमीसारखीच प्रतिक्रिया त्याची होती. तेवढ्यात एक लोकल आली समोरून आणि ती पूर्ण थांबायच्या आधीच एक मुलगी उतरायला गेली आणि स्पीडचा अंदाज न आल्याने प्लॅटफॉर्मवर पडली. तिला सावरायला पटकन चार माणसं धावली. तिला उठवलं, कोणीतरी पाणी दिलं, कुणी तिची पर्स पडलेली उचलून दिली. ते बघून माझा प्रोफेसर चकीत होता. तो म्हणाला की हे असं दृश्यं इथेच बघायला मिळत असेल बहुतेक. असो.. कदाचित ही ही अतिशयोक्ती असेल त्याची पण ज्या पद्धतीने सासने भारतातला प्रत्येक पुरूष हा पावलोपावली आजूबाजूच्या बाईला कसं हॅरॅस करता येईल हेच बघत असतो असे अतिरंजीत आडाखे मांडलेत ते मला माझ्या देशाबद्दल तरी अपमानास्पद वाटतात आणि वस्तुस्थितीला सोडून वाटतात.
मी आज मुंबईतच रहाते. अश्या क्षेत्रात काम करते की ज्यामुळे एकटीने रात्री अपरात्री हिंडण्याचे प्रसंग कैक वेळा येतात. बर अशी ठिकाणं असतात की जिथे ट्रेनने जाण्यात काही अर्थ नसतो (पार्ल्यातून सात बंगला, लोखंडवाला भाग जिथे बहुतांशी एडिट आणि साउंड स्टुडिओ आहेत) त्यावेळेला रिक्षा नाहीतर बस हाच पर्याय असतो. तरीही मला गेल्या ८ वर्षात असा अनुभव कधी आलेला नाही.
वर सांगितलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या वेळेलाही बाईपणाचा फायदा उठवणारे लोक कमी आणि मदत करणारे लोक जास्त दिसत होते. हीच गोष्ट अतिरेकी हल्ल्यांच्या वेळेचीही म्हणायला हरकत नाही.
केवळ सास म्हणते म्हणून मी माझ्या रोजच्या अनुभवातली वस्तुस्थिती नजरेआड करू शकत नाही.
बाकी बलात्कारीत स्त्री कडे पाहण्याचा दृष्टीकोन या संदर्भात भारतीय मानसिकतेमधे घोळ आहेत हे मी पण वरती मान्य केलेय.
Pages