१) २ वाटी बाजरीचे पीठ ,
२) भाजलेले तीळ २ चमचे (फराळाचा चमचा),
३) प्रत्येकी १ टीस्पून जिरे, ओवा,
४) २ हिरव्या मिरच्या आणि अर्धा चमचा लाल तिखट,
५) अद्रकचा छोटा तुकडा ,
६) ४-५ पाकळ्या लसूण ,
(हे तीनही जिन्नस वाटून घ्या, जाडसर पेस्ट बनवा)
७) चिमूटभर हळद ,
८) चवीनुसार मीठ
९) पिण्यायोग्य पाणी
१) खारोड्या करायच्या आदल्या रात्री /संध्याकाळी बाजरीचे पीठ कोरडे भाजून घ्या.
२) त्यात १ फराळाचा चमचा दही घालून चांगले फेटून घ्या.
इडलीचं batter असतं त्या consistancy मध्ये भिजवायचं, येथे अंदाजे दीड वाटी पाणी हवं.
३) हे मिश्रण रात्रभर भिजू द्या.
४) दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजता ऊन निघायच्या आधी) कढईत तेल घालून तेलात जिरे, ओवा, आलं लसूण मिरची पेस्ट , हळद , तिखट हे घालून परतून घ्या.
५) ह्या फोडणीत २ वाटी पाणी घालून त्याला उकळी येऊ द्या.
६) पाण्यात चवीनुसार मीठ घाला.
७) रात्रभर भिजवलेले बाजरीचे पीठ ह्या पाण्यात घाला. हे मिश्रण हळूहळू घाला आणि पिठलं घोटतो तसे घोटा /हटवा.
८) ह्याला दणदणीत वाफ येऊ द्या.
९) वाफ आल्यावर त्यात तीळ घाला.
१०) हे मिश्रण थंड होऊ द्या .
११) चमच्याने किंवा हाताने (हाताला थोडे तेल लावुन घ्या म्हणजे मिश्रण चिकटणार नाही)हे मिश्रण थोडे थोडे करून जाड प्लास्टिक पेपरवर घाला.
उन्हात वाळवायला ठेवून द्या.
१२) चांगले खडखडीत वाळू द्या.
- ह्या खारोड्या, भाजलेले शेंगदाणे, बारीक चिरलेला कांदा आणि कोथिंबीर असे सर्व्ह करा. मस्त चटपटीत हेल्थी स्नॅक आहे.
- मराठवाड्यात उन्हाळ्यात वर्षभराच्या खारोड्या करतात.
- गच्चीवर/अंगंणात खारोड्या घालणे हा प्रोग्राम प्रत्येक घरी पाहवयास मिळतो.
ही माझ्या आईची पद्धत आहे, सोपी आहे. लोकं अजुन वेगवेगळ्या प्रकारे हा पदार्थ बनवतात.
amchyat asa nay karat, pan
amchyat asa nay karat, pan foto chan ahe.
हम्म.. धन्यवाद योकु.
हम्म.. धन्यवाद योकु.
ज्वारीचे पीठ भाकरीसाठी नेहमी असते घरात म्हणून विचारला होता प्रश्न. बाजरीचे आणीन खारोड्यांसाठी. उरलेल्या पिठाची भाकरी करता येईलच.
आवडता प्रकार! मावशीकडे गेले
आवडता प्रकार! मावशीकडे गेले कि ती द्यायची.. तांदळाच्या कण्यांची खाल्लीये का कुणी?? ती सुद्धा भारी लागते चवीला.. :गावाकडच्या आठवणींनी टडोपा:
दारूसोबत चकणा म्हणून मस्त
दारूसोबत चकणा म्हणून मस्त लागेल... त्या दारूच्या धाग्यावर टाकता का किल्ली...
कधीच हा पदार्थ खाल्ला नाहीये
कधीच हा पदार्थ खाल्ला नाहीये पण एक वेगळा पदार्थ म्हणुन आणि बाजरीचे पीठ इझीली अव्हाईलेबल करून बघणार आहे.
किल्ली , शक्य असेल तर पुढच्यावेळी करशील तेव्हा सगळ्या स्टेपचे फोटो घेशील का?
मला वाटले तळून खायच्या. दात
मला वाटले तळून खायच्या. दात दुखत नाही इतकं कडक खावून..
तळून नाही खायच्या का?
तळून नाही खायच्या का? कच्च्याच खायच्या?
धन्यवाद आदू, श्रवू, मंजूताई,
धन्यवाद आदू, श्रवू, मंजूताई, वावे, स्वाती२,मीरा..,ऋन्मेऽऽष, साधना, राजसी, प्राजक्ता,Shreya_11 , योकु, आदिश्री, भरत, जाई, चन्द्रा,रुन्मेश२, सीमा, झंपी, राहुल१२३,च्रप्स,, मन्या
तळून नाही खायच्या का? ? >>>>>
तळून नाही खायच्या का? ? >>>>> नाही, वाळल्या की थेट खायच्या, तशाच
दात दुखत नाही इतकं कडक खावून..>> नाही दुखत हो
पुढच्यावेळी करशील तेव्हा सगळ्या स्टेपचे फोटो घेशील का? >> हो घेइन
रात्रभर जे पीठ भिजवायचे ते इडली बॅटर सारखे हवे. दुसर्या दिवशी फोडणी देवून २ वाट्या पाणी उकळवायचे आणि त्यात हे पीठ ओतायचे आणि शिजवायचे. हे पीठ शिजवून गार होईल तेव्हा बोटांनी सांडग्याप्रमाणे घालता यावे इतपत घट्ट झालेले असेल. +!१११
खारोड्या मी काही करणार नाही.
खारोड्या मी काही करणार नाही. बाजरीचे पीठ नाही घरात.
तुझी ओळख झाली खारोड्या मुळे ह्यातच आनंद आहे.
विपु बघ प्लीज
आज या करून वर गच्चीवर वाळत
आज या करून वर गच्चीवर वाळत घातल्या. पण नेमकं आज ऊनच नाही
हो ना, ज्या दिवशी पाकृ इथे
हो ना, ज्या दिवशी पाकृ इथे पोस्ट केली, त्या दिवशीपासुन मेलं उनच गायब झालय..
विशाखा, शक्य तेव्हढ्या उन्हात खडखडीत वाळवुन घे, आता उन्हाची तीव्रता कमी झालीये तर २-३ दिवस ठेव उन्हात
वावे,
वावे,
कशा झाल्या खारोड्या?
वाळल्या का?
होय होय, सांगायचं राहिलंच.
होय होय, सांगायचं राहिलंच. दोन तीन दिवस वाळवल्या. चांगल्या खडखडीत झाल्या. जाता येता खाऊन संपल्या दोन दिवसात. छान झाल्या होत्या.
Killi, kalach kelya ga..
Killi, kalach kelya ga.. jara shanka hoti.. na talata kasha khata yetil mahanun, pan mast zalya ekdam. Thanks for the recepie.
Killi, kalach kelya ga..
Killi, kalach kelya ga.. jara shanka hoti.. na talata kasha khata yetil mahanun, pan mast zalya ekdam. Thanks for the recepie.
Njoy ! Photo?
Njoy !
Photo?
aaj sandhyakal paryant
aaj sandhyakal paryant shillak rahilya tar photo takate. lol
उन्हाळा आणि कडक ऊन आहे
उन्हाळा आणि कडक ऊन आहे
वर काढतेय
आईच्या खरोड्या करून झाल्या
आता सासूबाई करणार आहेत
मी खाणार!
छान
छान
भन्नाट...!
भन्नाट...!
आईच्या खरोड्या करून झाल्या
आईच्या खरोड्या करून झाल्या
आता सासूबाई करणार आहेत>>> मज्जा आहे.
पुढच्यावेळी करशील तेव्हा सगळ्या स्टेपचे फोटो घेशील का? >> हो घेइन Happy>>> एक वर्षापूर्वी या दिल्या शब्दाला जाग आणि फोटो घेऊन इथे टाक
Okay, साबा करतील तेव्हा फोटो
Okay, साबा करतील तेव्हा फोटो काढते, त्यांची पद्धत जरा detail आहे
मस्त दिसताएत खारोड्या.
मस्त दिसताएत खारोड्या.
पहिल्यांदा पाहतेय पण आवडतील खायला
डिटेल फोटो आणि स्टेप्स टाका
डिटेल फोटो आणि स्टेप्स टाका किल्ली ह्या वेळेला.
पहिली स्टेप : नवऱ्याला
पहिली स्टेप : नवऱ्याला lockdown मध्ये सकाळी लवकर उठवून हातात वायर ची पिशवी, मास्क आणि sanitizer देऊन दीड किलो बाजरी आण म्हणून किराणा दुकानात पाठवणे (आमच्या येथे ऑनलाईन डिलिव्हऱ्या येत नाहीत)
५२₹ प्रति किलो भाव असताना त्याने चौकशी न करता सरळ
५५₹ प्रति किलो ने आणलेली बाजरी मुकाट्याने accept करणे
आज एवढंच घडलं बाकी जसं पुढे घडेल तसे update देईन
(ह्या step चा फोटो आपण स्वतः आणि नवरा किंवा बाजरी घेऊन येणारी व्यक्ती ह्यांना imagine करून मनात तयार करावा )
किल्ली
किल्ली
पुढील स्टेप च्या प्रतिक्षेत.
नवऱ्याचा नको पण बाजरीचा फोटो
नवऱ्याचा नको पण बाजरीचा फोटो टाकू शकतेस.
यु ट्यूब वर एकाने कोथिंबीर
यु ट्यूब वर एकाने कोथिंबीर घातली आहे
त्याच्या खारोड्या हिरव्यागार झाल्या आहेत
वाह.. माझ्या भागातला हा खास
वाह.. माझ्या भागातला हा खास पदार्थ इथे पाहून भारी वाटलं. किल्ली तुमची पद्धत आमच्याहून वेगळी असली तरी छान वाटतेय.
आमच्याकडे बाजरी आधी भाजतात, मग ती दिवसभर पाण्यात भिजवतात, मग सावलीत सुकवतात, ती बरीचशी कोरडी झाली की मग तिला भरडतात. पूर्वी जात्यावर भरडायचे. आता मिक्सर वर भरडतात. ती भरड मग कांदा, लसूण, जीरं, तिखट, मीठ इ. घालून शिजवतात आणि सकाळी सकाळी गच्चीवर जाऊन बोटाने मोडून त्याच्या खारोड्या घातल्या जातात. एक-दोन दिवस कडकडीत ऊन दिलं की चविष्ट खारोड्या तयार! बरेच जण तळून खातात. मला कच्च्याच आवडतात. माझी आई हमखास माझ्यासाठी दरवर्षी बनवते..
Pages