कुबेराचे चौर्यकर्म

Submitted by अग्निपंख on 21 May, 2020 - 00:59

लोकसत्तात एक लेख आला होता, कोविडोस्कोप ह्या सदरात.
नंतर समोर आलं की जो लेख स्वतः च्या नावावर खपवला होता तो तर शब्दशः फक्त भाषांतर करुन टाकला होता. (परवानगी न घेता)
बराच गाजावाजा होउन पण कुबेरने चकार शब्दही काढला नाही की माफी मागितली नाही, बहुतेक तो लेख गुप्चुप काढुन टाकला आहे.

EYDWUevU0AAbLvb.jpg

ह्या काही लिंक्स,

https://www.opindia.com/2020/05/loksatta-editor-girish-kuber-plagiarism-...

आणि हे andrew lilicoचं ट्वीट,
andrew_1.JPG
andrew ने हे प्रकरण बरच स्पोर्‍टिली घेतलेलं दिसतय.
andrew_2.JPGandrew_3.JPG

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खाली दिलेली लिंक हा कोविडोस्कोप चा पहिला लेख..त्यात स्पष्टपणे उल्लेख आहे.

मग हा ‘कोविडोस्कोप’ काय?

शब्दश: असंख्य बातम्या, लेख, संपादकीय, चर्चा, परिसंवाद.. आणि आता हे वेब-संवाद.. या एका विषाणूभोवतीच फिरत असले तरी हा विषाणू आणि तत्संबंधी अनेक बाबी बातम्यांच्या रकान्यातून आणि वृत्तनिवेदकांच्या चऱ्हाटातून निसटून जातायत. कारण असं की या तपशिलात माहिती आहे. पण बातमी नाही. या माहितीला बातमीच्या व्याख्येत बसवता येत नाही. कॅलिडोस्कोपमध्ये भरले जाणारे बांगडय़ांचे तुकडे, कचकडय़ाचे मणी वगैरे एरवी अगदी अनाकर्षक असतात. आपण काही त्यांना पाहायला म्हणून जात नाही. पण हा सर्व ऐवज कॅलिडोस्कोपमध्ये घातला.. आणि जरा त्याला धक्का दिला की दरवेळी हरखून जाऊ इतके त्याचे विभ्रम असतात.

‘कोविडोस्कोप’मागचा विचार हाच आहे..

https://www.loksatta.com/vishesh-news/article-on-covidoscope-abn-97-2138...

आता हे कुबेर लिहीत आहेत म्हणून विरोध असेल तर काहीच हरकत नाही.. पण असले elite आरोप करून शिव्या घालण्यात काय समाधान मिळवायचं..राजकीय भूमिका मान्य नसणे यात काय चूक आहे..त्याला विरोध करायला हवाच मग..पण अडून अडून न पटणाऱ्या विचारांशी भांडण अस का करायचं....

पण हा सर्व ऐवज कॅलिडोस्कोपमध्ये घातला.. आणि जरा त्याला धक्का दिला की दरवेळी हरखून जाऊ इतके त्याचे विभ्रम असतात. >> जेव्हा मजकूराला धक्का न देता नुसताच दुसरीकडून उचलून मांडला जातो तेव्हा हरखून जाऊ असे विभ्रम दिसत नाहीत.

जिज्ञासा, आपण केलेले टीकात्मक परीक्षण योग्य असू शकते...
हा धागा लेखांच्या दर्जा वर भाष्य करीत नसून कुबेरांवर चौर्यकर्माचा म्हणजे सोप्या भाषेत चोरीचा आरोप करित आहे त्यात तथ्य नाही एवढेच...,राजकीय भूमिकेचा विरोध आपली भूमिका मांडून करण्याऐवजी समोरच्या व्यक्तीच्या विश्‍वसनीयता वर हल्ला करणे हा प्रकार हल्ली जोर धरतोय...त्यामुळे पुढे मग काय म्हणतोय या पेक्षा लोक कोण म्हणतोय हे आधी पाहून पुढे सरकतात...नावडती राजकीय भूमिका जास्त लोकांपर्यंत जात नाही आणि आपली बाजू त्यांच्या पर्यंत पोहचवण्याचे कष्ट वाचतात....या राजकीय रणनीती ला वापरण्यात डावे,उजवे किंवा मधले असे कोणीही अपवाद नाहीत..

फडणवीसांच्या मुलाखतीवरून आता गिरीश कुबेर आणि राजू परुळेकर यांच्यात वाग्युद्ध सुरू झाले.
https://twitter.com/girishkuber/status/1276018001532186626
https://twitter.com/rajuparulekar/status/1276062165837901829

Pages