मोबाईल , लॅपटॉप , टॅब साठी 'नॉट मेड इन चायना ' पर्याय हवे आहेत.

Submitted by अग्निपंख on 17 May, 2020 - 08:23

वुहान कोरोना व्हायरसने जगाची वाट लागली आहे. सगळे चायना ला पर्याय शोधत आहेत. पण हे नक्की की सगळ्याच गोष्टींना पर्याय मिळणे अवघड आहे.
तूर्तास मोबाईल , लॅपटॉप , टॅब साठी 'नॉट मेड इन चायना ' पर्याय हवे आहेत. (अर्थात ह्या वस्तुंमधला एक ना एक तरी भाग 'मेड इन चायना' असणारच. )
asus, Dell, चायनिज नाहीत बहुतेक.
lenovo आजच माहिती झालं की फुल ऑन चायनिज आहे.

Group content visibility: 
Use group defaults

पतंजलीचे येतील बहुतेक. सुरू केल्यावर रामदेव बाबा डोळा मारतील. पाठीमागे बालकृष्णाचे च्नित्र असेल. शीर्षासन करून दाखवल्याशिवाय सुरू होणार नाही. अनुलोम विलोम आणि कपालभाती केली की चार्ज होतो. कव्हर रिलायन्सने बनवलेलं असेल (ऑर्डर फिलिपिन्सला देनार).
बाकी आतले एकूण एक पार्ट्स चायनीज असणार. नाईलाज.

गुंतागुंत आहे.काही कंपनी सर्व गोष्टी भारतात बनवून त्यावर चिनी किंवा तैवान ब्रँड चा शिक्का मारून त्याखाली विकतात.
काही पूर्ण भारतीय ब्रँड 90%पार्ट चीन मधून मागवून इथे फक्त असेंबल करतात.
ज्या तत्वासाठी आपण अशी खरेदी करू इच्छितो ते तत्व वेल इंफॉर्मड निर्णयाने अवलंबता येत नाही ही आताची अडचण.खूप लागेबांधे इथेतिथे असतात.
आपल्या शहरात सर्वात जास्त सर्व्हिस स्टेशन कोणाची, चांगली रेंज कोणाची, मोबाईल चा मुख्य उपयोग इंटरनेट/ऑफिस काम/गेमिंग/बोलणे/कॅमेरा पिक्सेल आणि फोटो quality , आपल्या शहरातल्या दुकानातील डिल्स यावर ठरवता येईल.

सॅमसंग मोबाइलला ला अनुमोदन
sturdy पण आहेत , features थोडे कमी आहेत पण चांगला चालतो , २ वर्षात एकदा सुद्धा हँग झाल्याचा अनुभव नाही

"Made in USA" ला एक अधिकृत व्याख्या आहे. इथे माहिती मिळेल. असे इतर देशांत करत असतील तर ते शिक्के पाहून घेता येइल.

का पण पर्याय? चायनाला पर्याय म्हणजे पूर्ण प्रॉडक्षन तुमच्या देशात हलवले तरच त्या त्या देशात मेड अशी ती वस्तू होईल. का भावनिक गरज आहे? का सुरक्षितता म्हणून

भावनिक गरज आहे? का सुरक्षितता >> दोन्ही
दृष्टीआड सृष्टी>> हो , फायदा आहे कंपन्यांचा त्या एव्हढ सहज सोडनार नाहीत, बॅक डोर चायना असनारच आहे..
माझा असुस चा फोन चायना मेड्च आहे, भले कंपनी तायवान्ची आहे.

Samsung चि टॅब मिळाली, मेड इन व्हियेतनाम. (बहुतेक सध्या स्टॉकची बोंबा बोंम्ब आहे, एकतर सप्लाय नाही, आणि मागनी जास्त (बहुतेक इस्कुल आणि इलर्निंग मुळे).
इशान्य सिमेवर चायना चि मुजोरी वाढत चालली आहे, भारतियांनी खरच मनावर घ्यायला हवे आता.

Lithium Battery ला soldering करण्यासाठी spot welder ची गरज असते. त्यात Non made in China पर्याय माहिती आहे का कोणाला???

https://www.iball.co.in/
घरी या ब्रँडचा टॅब घेतलाय. चांगला वाटतोय. अर्थात किती टिकतो बघायचा.

Back to top