जगातले प्रगत देश हर्ड इम्युनिटीचा दाखला देऊन लॉकडाऊनला विरोध करत आहेत. ८०% लोक आपोआप बरे होत आहे हे अगदी बरोबर आहे. पण आजवर जे तीन लाख दोन हजार मृत्यू झाले आहेत ती प्रत्येक केस कुठल्या ना कुठल्या कुटुंबावर कोसळलेले आभाळ आहे. यातले ८६०००+ एकट्या अमेरिकेतले आहेत.
वुहान मधले मृत्यूचे तांडव लॉकडाऊन नंतरच नियंत्रणात आले. जर्मनीची साथ लॉकडाऊनने आटोक्यात आली. दक्षिण कोरियानेही नियंत्रण मिळवले.
व्हिएतनाम या देशाचे कौतुक. वैद्यकीय सुविधा तुटपुंज्या असतानाही शून्य मृत्यू.
चीनच्या आजूबाजूच्या अनेक राष्ट्रांनी कोरोना नियंत्रणात ठेवला.
व्हिएतनाम आणि चीनच्या आसपासचे जे विकसनशील / अविकसित देश आहेत त्यांनी वुहान मधे कोरोनाच्या उद्रेकाच्या बातम्या आल्याबरोबर चीनबरोबर असलेली सीमा सील केली. नंतर बाहेरून येणारे प्रवासी, विमाने यांना प्रवेश नाकारला.
ज्या देशांनी वेळेतच सीमा लॉकडाऊन केल्या , त्या देशातले अंतर्गत व्यवहार सुरळीत झाले.
व्हिएतनामने विमानतळ सील करेपर्यंत कोरोनाने प्रवेश केला. ताबडतोब या देशाने कर्फ्यु जाहीर केला. कोरोना पॉझिटिव्हचा शोध घेतला आणि त्यांचे अलगीकरण केले. हे सर्व जानेवारीतच झाले. गेल्या महीन्यापासून व्हिएतनाम मधे सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले आहेत. अगदी सुरूवातीलाच विमानतळं सील करून कर्फ्यु लावल्याने कोरोना बाधितांना शोधणे सोपे गेले. एकही केस आली नाही या निअक्षावर हळू हळू जिल्हे खुले केले. सर्वात शेवटी ते १४ जिल्हे खुले केले ज्यात केसेस सापडल्या होत्या.
दक्षिण कोरोया आणि जर्मनी या देशांमधे लॉकडाऊन उठवल्यानंतर पुन्हा कोरोनाचा उद्रेक पहायला मिळत आहे. आर नंबर ०.६ वरून थेट १.१ वर गेला आहे. वुहान मधे पुन्हा कोरोनाचा उद्रेक झाल्याची लक्षणे आहेत.
बुहान व अनेक देशात लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घरपोच सामान, भाज्या , दूध व इतर जीवनावश्यक वस्तू पोहोचवले गेले. ती व्यवस्था त्यांच्याकडे होती. नियोजन झाल्यानंतर लॉकडाऊन केलं गेलं.
हर्ड इम्युनिटीच्या भरवंशावर जर वरील सर्व निकालात काढले तर हाहा:कार नाही होणार का ?
स्वाईन फ्ल्युचं ठीक आहे. त्याची लस घेतली आहे. हा आजार जर परतला तर हर्ड इम्युनिटीच्या भरवंशावर शरीर त्याच्याशी लढू शकतं. पण कोरोना वेगळा आहे. ना त्याचे हमखास औषध आहे ना लस तयार आहे. शरीरात अॅंटीबॉडीज कुठून तयार होणार ?
२०% लोक मृत्युमुखी पडली तर ८०% पेक्षा हा आकडा कमी आहे अशी तुलना करायची का ? रेष छोटी दाखवायचा उद्योग नाही का हा ?
अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला पाहीजे पण साथ नष्ट झाली पाहीजे असा तोडगा निघणारच नाही असे शक्य नाही.
काय उपाय असू शकतात ?
चांगला विषय आहे. हर्ड
चांगला विषय आहे. हर्ड इम्युनिटि कितपत आधार देइल यातंहि मतभेद आहेत. विएटनाम बरोबर तैवानचा हि उल्लेख आवर्जुन करायला हवा. देशाच्या सीमा ताबडतोब सील करुन, आवश्यक ती खबरदारी घेउन त्यांनी दैनंदिन व्यवहार चालुच ठेवले. भारतात लॉकडाउन उठवताना (फेज बेस्ड अॅप्रोच?) या देशांचं उदाहरण डोळ्यासमोर ठेवण्यासारखं आहे...
उत्तम धागा आणि विषय !!!!
उत्तम धागा आणि विषय !!!!
पण लोकडोवन खरा लोकडोवन आहे का... दोन तासासाठी जरी लोक मिसळत असतील तर त्यापेक्षा लोकडोवन काढलेला काय वाईट... बारा गावचे पाणी पिलेले लोकाना काही होणार नाही.... जे मरणार आहेत ते मरणार आहेतच... व्हेंटिलेटर त्यांना वाचवू शकत नाही ...
कोरोना आणि हर्ड इम्युनिटी
कोरोना आणि हर्ड इम्युनिटी बद्दल मायबोलीवरील डॉ खरे, डॉ कुमार, डॉ शिंदे, किंवा इतर डॉक्टरांचे मत जाणून घ्यायला आवडेल. डॉक्टरांनी जमल्यास यावर नक्की लिहावे.
बंडी
बंडी
धागा तर लय जोरात काढलाय .
पण तुम्हीच ह्या धाग्याची वाट लावू नका.
मध्येच राजकारण वर येवुन.
तुम्हाला मध्ये मध्ये हुक्की येते म्हणून सावध केले.
ढे.पो. काका चांगला विषय घेतला
ढे.पो. काका चांगला विषय घेतला चर्चेला.
Heard immunity
Heard immunity
म्हणजे नक्की काय?
ती कशी निर्माण होते म्हणजे त्या पाठी असलेले कारण काय?
Heard immunity ha prayog करण्यासाठी किती लोकांचा समूह लागतो.?
आपल्या देशात कथित विज्ञानवादी खूप आहेत त्या मधील १०००. - २००० लोकांनी मिळून हा प्रयोग केला तर त्याचा निष्कर्ष देशाला फायदेशीर होईल .
हे कथित विज्ञान वादी देश प्रेमी सुद्धा असतात(असा ते स्वतःच दावा करतात पण वागतात नेहमी उलटे) तर त्यांनी हा प्रयोग आत्ता पर्यंत का समूह बनवून का केला नाही.
मी एका लेखात वाचल्याप्रमाने
मी एका लेखात वाचल्याप्रमाने कोरोना ची हर्ड immunity अस्तित्वात येण्यासाठी १०० टक्के लोकांना कोरोना व्हावा लागेल.
https://www.rediff.com/news/column/coronavirus-in-india-modiji-please-ex...
.
@प्रशांत255 सहमत, आतापर्यंत
@प्रशांत255 सहमत, आतापर्यंत कोरोनाच्या हर्ड इम्म्यूनीटी चे फक्त आडाखे आहेत. प्रत्यक्ष प्रयोग जनतेवर करणे घातक ठरू शकते, विशेषतः एखाद्या छोट्या जनसमुदायावर प्रयोग झालेले नसताना... त्यात विविध देशातील जनसंख्या या रोगाला वेगवेगळ्या प्रकारे प्रतिसाद देत आहे, त्यामुळे एका देशाचे संशोधन दुसऱ्या देशाला लागू होईल याची शाश्वती नाही. तरीही हर्ड इम्म्यूनिटी वर भारत सरकारने स्वतचे संशोधन नक्कीच करायला हवे. कारण लॉक डाऊन जास्त काळ चालू ठेवता येणार नाही.
सर्व उपचार व्यवस्था सिध्द
सर्व उपचार व्यवस्था सिध्द ठेवून भारतात लोकसंख्येचा छोट्या समूहावर हा प्रयोग पहिल्या वेळेस करायला हवा.
स्वयं सेवक म्हणून १३० करोड मध्ये लाख भर लोक तरी तयार होतील .
आणि जो निष्कर्ष निघेल त्या वर पुढील निर्णय अवलंबून.
बऱ्याच साथीची रोगात अशी प्रतिकार शक्ती माणसात तयार झालेली नाही अशी पण उदाहरणे आहेत .
झाली आहे अशी पण उदाहरणे आहेत.
Heard immunity hi ek theory
Heard immunity hi ek theory aahe.
Practically proof झालेली नाही.