कचोरीच्या पारीसाठी -
१. मैदा - २ कप
२. गरम वितळलेले तूप - ४ चमचे
३. गरम पाणी - गरजेनुसार (१ ग्लासला थोडं जास्त)
४. मीठ - अर्धा चमचा
सारणासाठी
१. मुगडाळ - अर्धी वाटी
२. बेसन - ४ टेबलस्पून
३. जिरे - एक चमचा
४. बडीशेप - एक चमचा
५. काळी मिरी - अर्धा चमचा
६. कसुरी मेथी - एक चमचा अथवा मेथीच्या बिया - पाव चमचा
७. गरम मसाला - एक चमचा
८. काळे मीठ - पाव चमचा
९. मीठ - एक चमचा.
१०. धने - एक चमचा
११. आलं आणि मिरची पेस्ट - एक चमचा
१२. तिखट - अर्धा चमचा
१३. तेल - अडीच टेबलस्पून
१४. आमचूर पावडर - एक चमचा
तळण्यासाठी -
तेल - छोटी कढई अर्धी भरून
आज मातृदिनानिमित्त अस्मादिकांनी स्वयंपाकाची जबाबदारी स्वतःकडे घेतली होती. त्यात ओढा मसाल्याच्या पदार्थांकडे जास्त असल्याने कचोरी करावयाचे योजले.
तर जास्त लांबण न लावता रेसिपीकडे वळूयात.
पहिल्यांदाच रेसिपी लिहीतोय, चुकभूल माफी असावी.
कृती
१.सारण
सर्वप्रथम मुगडाळ २ तास पाण्यात भिजवून घ्या. भिजवतानाच आधी डाळ नीट धुवून साफ करून घ्या, आणि मगच भिजवा. २ तास झाल्यानंतर डाळ नीट निथळून घ्या, सर्व पाणी काढून घ्या, आणि मिक्सरवर फक्त आठ सेकंद फिरवा. डाळ अर्धवट तुटलेली अशी पेस्ट असायला हवी.
जिरे, बडीशेप, काळी मिरी, कसुरी मेथी, धने हे सर्व खलबत्यात कुटून घ्या. हे सर्व एकत्र न करता वेगवेगळ कुटायचं आहे, याने या सर्वांची चव अबाधित राहते.
एका पॅनमध्ये तेल अतिशय मंद आचेवर तापवून घ्या. तेल गरम झाल्याबरोबर जिरे, बडीशेप आणि धने टाकून नीट १ मिनिटापर्यंत परतवा. त्यानंतर आलं आणि मिरचीची पेस्ट टाकून अजून एक मिनिटं परतवून घ्या. यानंतर बेसन पीठ टाकून तपकिरी रंग येईपर्यंत परतवत राहा.
यानंतर उरलेले सर्व जिन्नस जसे की गरम मसाला, काळे मीठ, काळी मिरी, मीठ, तिखट आणि आमचूर पावडर घालून मिनिटभर नीट परतवा, व त्यानंतर शेवटी मुगडाळ मिश्रणात घालून चांगल्यारित्या मिक्स करून गॅस बंद करून बाजूला काढून घ्या. आता हे मिश्रण थोड्यावेळ थंड होऊ द्या.
२. पारी
एका मोठ्या परातीत २ कप मैदा घ्या. त्यात विरघळलेले कोमट तूप घाला, व अर्धा चमचा मीठ घाला. आता हे मिश्रण चांगल्यारित्या मिक्स करायला सुरुवात करा. या पिठाचे ठिसूळ गोळे झाले पाहिजेत. त्यानंतर थोडं थोडं गरम पाणी करून कणिक भिजवायला सुरुवात करा. कणिक चांगल्या रित्या मळली गेली पाहिजे. कणिक जास्त घट्ट भिजवली जायला नको, लवचिकच भिजवा.
कणकेतून एक छोटा गोळा तोडून बघा. तो गोळा तोडताना लवकर कणकेतून विलग होत नसेल, तर आपली कणिक चांगल्या रित्या भिजवली गेली आहे.
आता पूर्ण कणिक ओल्या फडक्यात २० मिनिटे गुंडाळून ठेवा.
३. सारण भरणे.
सारणाचे समान आकाराचे छोटे गोल गोळे करून घ्या. (मी गुलाबजामच्या आकाराचे केले होते.) त्यानंतर जितके गोळे होतील, त्याच्या २/३ संख्येत कणकेचे गोळे करून घ्या. (म्हणजे सारणाचे १५ गोळे असतील, तर मैद्याचे १० गोळे असायला हवेत. १-२ कमी जास्त चालतील.)
आता तळहातावर कणकेचा एक गोळा घेऊन दुसऱ्या हाताने जोरात दाबा. याने त्याला चपटेपणा येईल. मग त्यात सारणाचा गोळा भरून सर्व बाजूनी गोल फिरवत पॅक करा (मोदकासारखं) व वरचा उरलेला गोळ्याचा भाग काढून टाका.
असे सर्व मैद्याचे गोळे संपतील, पण सारणाचे गोळे उरतील. तर आता काढून टाकलेल्या भागाचे गोळे बनवा, व त्यात सारण भरा.
आता हे सर्व भरलेले गोळे तळहातावर दाब देऊन चपटे करून घ्या, म्हणजे कचोरीचा शेप येईल.
४. तळणे
तेल मस्त कडकडीत तापवून घ्या, व मध्यम आचेवर एक एक करून तळा. एक कचोरी पाच मिनिटं एका बाजूने व पाच मिनिटे दुसऱ्या बाजूने अशी तळा. दहा मिनिटात मस्त सोनेरी होऊन फुलते.
५. अवांतर
अ. या साहित्याच्या प्रमाणात १५ सारणाचे गोळे होतात.
ब. तिखट आवडत असल्यास तिखट एक चमचा घालू शकतात.
क. कचोरीला थोडा आंबटपणा हवा असल्यास आमचूर पावडर दीड चमचा घालू शकतात.
ड. डाळ भिजत घातल्यावर तासाभराने कणिक बनवायला घेतल्यास बराच वेळ वाचतो.
इ. कुणी कितीही सांगितलं, हळद टाक, हिंग टाक, सरळ फाट्यावर मारावे. या दोन पदार्थाना अंगभूत उग्रपणा असतो, ज्याने चव बिघडतेच.
फ. 'त्या पिठात ओवा घाल की थोड्याश्या.' तरीही दुर्लक्ष करावं. कारण हे पीठ आपण कचोरीसाठी भिजवणार आहोत, समोश्यासाठी नाही.
ग. जर दोन्ही हात वर्किंग असतील तर हे काम अजून सोपं होतं. प्लास्टरमधील बोटांनी काम करण्यात बऱ्याच अडचणी येतात, व मदत लागू शकते.
ह. लागणाऱ्या वेळात डाळ भिजवल्यापासूनच वेळ गृहीत धरलेला आहे.
इ. हवाबंद डब्यात या कचोऱ्या ४ ५ दिवस नक्कीच टिकतात.
ही कचोरी नुसती खायलाही छान लागते, आणि चिंच गूळ चटणी आणि दह्याबरोबर अप्रतिम लागते.
(No subject)
.
छान आहे रेसिपी. मला ह्या
छान आहे रेसिपी. मला ह्या कचोऱ्या खूप आवडतात. सोबत चिंचगूळहिरवी चटणी, शेव, दही वगैरे असले की स्वर्गच...
कमी प्रमाणात करून बघेन नक्की.
मस्तच
मस्तच
अभिनंदन. छान रेसिपी
अभिनंदन. छान रेसिपी
मातृदैवताला नैवेद्य आवडला का?
विरघळलेले कोमट तूप - वितळलेले
त्याच्या १/३ संख्येत कणकेचे गोळे - २/३
कचोरीत मधोमध भोक करून त्यात चिंचगुळाची चटणी वगैरे घालून खाल्ली तर जास्त छान लागते.
प्लास्टर मधील बोटांनी टाइप करायला त्रास होत नाही का?
@साधना - धन्यवाद.
@साधना - धन्यवाद.
हो, पुदिना चटणी, गोड चटणी आणि दही मिक्स करून कचोरीत भरल्यास चव अप्रतिम लागते.
@नौटंकी - धन्यवाद
@ भरत - हो! खूपच.
तुम्ही सांगितल्याप्रमाणे बदल केले आहेत. धन्यवाद!
आणि एकाच हाताने टाइप करता येतंय, पण गुगल व्हॉइस टायपिंग वरदान सिद्ध झालंय याकाळात..
Chan ahe ... I will try
Chan ahe ... I will try
A report by a Union Home
.
मस्त रेसिपी! नक्की ट्राय करेल
मस्त रेसिपी! नक्की ट्राय करेल.
रेसेपी मस्त आहे. आले लसूण
रेसेपी मस्त आहे. आले लसूण पेस्ट ने एक खमंगपणा येईल त्यात!
मस्त रेसिपी... त्यापेक्षा
मस्त रेसिपी... त्यापेक्षा तुम्ही आईसाठी खास मातृदिनानिमित्त केली हे जास्त आवडले
प्लास्टरमधील बोटांनी काम करण्यात बऱ्याच अडचणी येतात, व मदत लागू शकते.>>>> बापरे, काळजी घ्या.
रेसिपी साठी धन्यवाद ! फोटो ही छान आहे.
सुंदर झालीय डिश...
सुंदर झालीय डिश... मातृदिनाच्या शुभेच्छा ....
वा!!.. मस्तच.. छान रेसीपी ..
वा!!.. मस्तच.. छान रेसीपी ..
Mast रेसिपी.try करायला हवी.
Mast रेसिपी.try करायला हवी.
मस्त रेसीपी! कचोर्या उचलून
मस्त रेसीपी! कचोर्या उचलून खाव्याश्या वाटताहेत
सॉरी, लेट रिप्लाय देतोय.
सॉरी, लेट रिप्लाय देतोय.
@उर्मिला - नक्की ट्राय कर. आवडतील तुला.
@दिप्ती - नक्कीच ट्राय कर.
@धनि - धन्यवाद. लसूण न घेण्याचं कारण म्हणजे लसणाची एक वेगळीच चव असते, व एक उग्रपणा असतो. सारणाची चव बिघडू शकते.
आलं आणि मिरचीची पेस्ट मी माझ्या स्पेशल खलबत्यातच कुटून घेतली होती. (खलबत्याची एक स्पेशल स्टोरी आहे.)
@आदिश्री - हो थोडे दिवस अजून काळजी घ्यावी लागेल. सदिच्छासाठी धन्यवाद.
आणि बॅचलर असल्याने एकटा असताना बरेच पदार्थ करतो. पण आईला खाऊ घालण्याचा आनंद निराळाच.
@च्रप्स - धन्यवाद. सगळ्यांना मातृदिनाच्या शुभेच्छा.
@अजय चव्हाण - धन्यवाद! आणि तू लिहायला प्रोत्साहन दिलंस म्हणून रेसिपी टाकली. मोटीवेशनल फॅक्टर _/\_
@देवकी - नक्की ट्राय करा आणि सांगा.
@योकु - धन्यवाद!!!! पुढच्या वेळी जमलं तर पार्सल पाठवून देईन
छान क्रुती आणि फोटो सुद्धा
छान क्रुती आणि फोटो सुद्धा
रेसिपी मस्त!
रेसिपी मस्त!
मस्तच दिसतेय
मस्तच दिसतेय
@प्राजक्ता - धन्यवाद
@प्राजक्ता - धन्यवाद
@अनामिका - धन्यवाद
@mi_anu - धन्यवाद
Ajun try ch nahi kelya ...
Ajun try ch nahi kelya ... Ata kuni bnvun dilya tr khaych vichar kren