इथे सांडग्यांच्या भाजीच्या रेस्प्या आहेत पण त्या वाळवणाच्या वड्या कश्या करायच्या हे नाही दिसलं. बायडीनं यावेळी मिश्र डाळींचे सांडगे केले आणि त्याची भाजीही एकदम फर्मास झाली होती. नक्की करून पाहा. लागणारा वेळ हा फक्त वाळवण्याच्या स्टेप पर्यंतचा आहे (डाळी भिजवण्याचा वेळही यात धरलेला नाहीय).
तर साहित्य -
सगळ्या मिळून अर्धा किलो मिश्र डाळी. यात ज्या होत्या त्या सगळ्या थोड्या थोड्या घेतल्या - मूगडाळ, सालाची मूगडाळ, मटकी, तूरडाळ, हरबरा डाळ, उडदाची डाळ. (यात उन्नीस बीस चलेगा)
१०/१५ हिरव्या मिरच्या
आल्याचा चांगला ३-४ इंचाचा गठ्ठोबा
मोठा लसणाचा कांदा
मीठ चवीनुसार
पाव ते अर्धा चमचा हळद
हवं असेल तर अर्धा चमचा लाल तिखट
भाजी करण्याकरता साहीत्य-
१ वाटीभर वाळवलेले सांडगे
१ टोमॅटो
२ कांदे
५/६ लसणीच्या पाकळ्या
इंचभर आल्याचा तुकडा
एखादी हिरवी मिरची
थोडा खडा गरम मसाला - २ तमालपत्र, लहानसा दालचिनीचा तुकडा, २/३ मिरीदाणे
हळद पाव चमचा
लाल तिखट अर्धा चमचा
मीठ चवीनुसार, चिमटीभर साखर आणि पाव चमचा हिंग, पाव चमचा मोहोरी
वड्या तेलावर परतण्याकरता आणि नंतर भाजीकरता सगळं मिळून अर्धी वाटी तेल
डाळी एकत्र करून ३-४ वेळा पाण्यानी धूवून पुरेश्या पाण्यात ५/६ तास भिजत घालाव्यात. आलं धूवून सालं काढून मोठे तुकडे करावे, लसणी सोलून घ्यावी आणि मिरच्यांचे डेखं काढून धूवून मोडून घ्याव्यात.
डाळी वाटून घ्याव्यात आणि एका मोठ्या भांड्यात ठेवाव्यात.
मिरची, लसूण आणि आलं वाटून ते वाटलेल्या डाळींत घालावं.
यात आता मीठ, हळद घालून हातानी नीट मिसळून तेलाचा पुसट हात लावलेल्या ताटांमध्ये सांडगे घालावेत. अती लहान नको अन अती मोठेही नकोत हे आकारांत.
एक दिवस कडकडीत उन्हांत हे वाळवण घालावं. नंतर सांडगे ताटांतून सोडवून एखाद्या पसरट भांड्यात काढून अजून एखाद दिवस वाळवावेत.
चांगले खडखडीत वाळले की एखाद्या जाड प्लॅस्टिक च्या पिशवीत बांधून हवाबंद डब्यात ठेवावे.
भाजी/रश्श्याची कृती -
कांदा सोलून मोठे तुकडे करून घ्यावा, लसणी सोलून घ्यावी, मिरची धूवून डेखं काढून मोडून घ्यावी. आलं धूवून मोठाले तुकडे करावेत.
कांदा, आलं, लसूण आणि मिरची एकत्र बारीक वाटून घ्यावं. टोमॅटो निराळा वाटून पेस्ट करून घ्यावी.
एखाद्या पातेल्यात दीड कप पाणी उकळायला ठेवायचं आणि दुसर्या एखाद्या श्क्यतो लोखंडी कढईत ४ चमचे तेल घालून सांडगे परतायला घ्यावेत.
सांडगे चांगले लालसर परतायचेत; पेशन्स ठेवून मंद आचेवरच हे करायचं.
चांगले लाल झाले की उकळत्या पाण्यात शिजायला घालायचे.
ज्या कढईत सांडगे परतले त्यात जरा तेल असेलच तर त्यात अजून जरा तेल घालून खडा मसाला घालावा अन काही सेकंद परतून कांद्याचा वाटलेला मसाला घालावा. हा चांगला परतला गेला की टोमॅटो ची पेस्ट घालून चांगल तेल सुटेस्तोवर परतावं.
यात आता हळद, तिखट, मीठ, साखरेची चिमटी घालून अजून काही सेकंद परतून सांडगे उकळत्या पाण्यातून निथळून घालावेत.
जरा परतून (सांडगे शिजवलेलं) उकळतं पाणी घालून भाजी चांगली शिजू द्यावी.
गरमागरम भाजी, भाकरी/भाताबरोबर खायला घ्यावी.
शिजतेय अजून -
मीठ घालतांना जरा जपूनच, सांडगे वाळून आकारमानानं कमी होतात तेव्हा मीठ आधी बरंच असेल तर खारटपणा पुढे येइल चवीत
भाजी तयार करतांना, मीठ जरा जपून; सांडगे वाळवतांना या गोष्टी घातलेल्या आहेतच. भाजी जरा तिखट चांगली लागते सो, प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी/जास्त करता येइल.
सांडगे नेहेमीच्या भाजीसारखे अगदी मौ शिजत नाहीत, जरा खुटखुटीतच राहातात (आधीच ते वाळवलेले असतात आणिक नंतर तेलावर परतलेले म्हणून), तसे ते झाले की भाजी तयार झाली समजावी.
रस ही आपल्याला आवडेल त्या प्रमाणात कमी/जास्त करता येइल. जशी भाजी निवत जाते तसा रस जरा आळतो.
मस्त क्रुती आहे ! करुन बघते
मस्त क्रुती आहे ! करुन बघते आता उन तापायला लागलियेत इकडे, मटकी म्हणजे आपली उसळीची ना !? मटकिची डाळ वैगरे असते वेगळी?
प्राजक्ता, मटकीची डाळ असते.
प्राजक्ता, मटकीची डाळ असते.
हरभरा डाळ प्रमाणापेक्षा जास्त झाली तर सांडगे चिवट होतात आणि लवकर शिजत नाहीत ना??
मटकी आपण नेहेमी उसळीकरता जी
मटकी आपण नेहेमी उसळीकरता जी वापरतो तीच घेतली, मोड वगैरे आणायच्या फंदात काही पडलो नाही; जेवढी बाकी डाळींसोबत भिजली तेव्हढी पुरेशी झाली. मटकीची डाळ वेगळी असते.
हरभरा डाळ प्रमाणापेक्षा जास्त झाली तर सांडगे चिवट होतात आणि लवकर शिजत नाहीत ना >> हे काही माहीत नाही.
बायडीनं सांडगे तेलावर लाल होईपरेंत परतले आणि मग बुडतील इतक्या पाण्यात ते ग्रेव्ही/मसाल्यात टाकायच्या आधी निराळे शिजवून घेतले. अर्थात सांडगे शिजवलेलं पाणी रश्श्यातच वापरलं नंतर.
पुढची रस्सा रेसीपी पण लिहाल
पुढची रस्सा रेसीपी पण लिहाल का?
राजसी, +१.
राजसी, +१.
यावेळी मीही डांळींचे सांडगे केले आहेत. लसूण घालताना जीव मागेपुढे होत होता.पण चांगले लागत आहेत.
सांडगे करणं इतकं सोपं असतं का
सांडगे करणं इतकं सोपं असतं का? मी आजवर एकही वाळवणाचा प्रकार घरी केला नाही, पण हे वाचून थोडीशी हिंमत करावीशी वाटते आहे. शिवाय इतक्यातच महाबळेश्वरला एके ठिकाणी सांडग्यांचा अप्रतिम रस्सा खाल्ला होता तेव्हापासून सांडगे आणावेसे वाटत होते.
योकू, पुढची सांडगे रश्शाची रेसिपीसुद्धा लिहून टाका.
https://www.maayboli.com/node
https://www.maayboli.com/node/34809
ही माझी रेसिपी
Wa!
Wa!
Ata sandgyanchi bhaji karun pahayala havi.
वर हेडर मध्ये सुरुवातीलाच
वर हेडर मध्ये सुरुवातीलाच लिंक आहे त्यात बर्याच रेस्प्या आहेत.
मीरानी जी रेस्पी केली ती वर हेडर मध्येच अपडेट करतो जरावेळानी. फोटो पण आहे तो ही डकवतो.
योकु , डिमार्ट अथवा सुपरस्टोर
योकु , डिमार्ट अथवा सुपरस्टोर मध्ये सांडगे काय नावाने मिळतात ?
मंगोडी (बहुधा) पण आजवर कधीही
मंगोडी (बहुधा) पण आजवर कधीही सुपरस्टोर मधून नाही आणलेत.
छान पाककृती आहे योकु..
छान पाककृती आहे योकु...धन्यवाद. मला हवी होती. इथे जुलै महिन्यात उल्कावर्षाव होतोय असे वाटणारे ऊन पडते. तेव्हा करून बघते . तो पर्यंत निवडक दहा मध्ये टाकून ठेवते.
योकू, भारी एकदम!
योकू, भारी एकदम!
योकु,
योकु,
हे सांडगे आत थोडेसे मऊ असतात का? कारण मी केलेले सांडगे खडखड वाजताहेत्,पण एखादा खाल्ला तर सहज चावा घेता येतोय. अर्थात त्यांना फक्त २ ते ५ चे ऊन मिळतेय.३ दिवस झाले आहेत आजचा धरून.
देवकी, चांगले खणखणीत वाळले
देवकी, चांगले खणखणीत वाळले पाहिजे म्हणजे टिकतात वर्षभर. मागच्या वर्षीच्या एका भाजीच्या वड्या आहेत. माझाही उद्या करायचा विचार आहे. बादवे कुरडया कश्या झाल्या?
मंजुताई, लिंकसाठी आभार.
मंजुताई, लिंकसाठी आभार.
योकू, सांडगे ग्रेव्हीची रेसिपी लिहिलीत हे बेस्ट केलंत, म्हणजे सांडगे केल्यावर इथल्या इथे पुढची भाजीची कृती मिळून जाईल.
आज मी धीर करून अत्यन्त लहान qty मध्ये डाळ भिजत टाकली होती. आताच सांडगे वाळत ठेवले. जेमतेम एक प्लेट झाले आहेत, म्हणजे एक वेळेस भाजी होईल एवढेच. माझ्या पहिल्यावहिल्या वाळवणाचा प्रचंड आनंद झाला आहे. आता पुढच्या आठवड्यात सांडगे ग्रेव्ही केली की दोन्हीचे फोटो एकदमच दाखवेन.
रस्सा रेसिपी साठी धन्यवाद.
रस्सा रेसिपी साठी धन्यवाद. करून बघते.
रच्याकने, मुंबईत असाल/ बाहेर
रच्याकने, मुंबईत असाल/ बाहेर दमटसर वातावरण असेल तर वाळवणंही बाय डिफॉल्ट फ्रिजात्/ फ्रिजरमध्ये टाकायची.
आज केले मिक्स डांळींचे सांडगे
आज केले मिक्स डांळींचे सांडगे. त्यातल्याच मिश्रणाचे चार वडे तळून गट्टम केले.
आज केले मिक्स डांळींचे सांडगे
आज केले मिक्स डांळींचे सांडगे. त्यातल्याच मिश्रणाचे चार वडे तळून गट्टम केले.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
आज केले मिक्स डांळींचे सांडगे. त्यातल्याच मिश्रणाचे चार वडे तळून गट्टम केले. >>> वाह.
एकूण ८ वडे तळले म्हणजे...
एकूण ८ वडे तळले म्हणजे...
दोघांनी मिळून चार रे बाबा!
दोघांनी मिळून चार रे बाबा!
हे कधी खाल्लं नाहिये, पण मस्त
हे कधी खाल्लं नाहिये, पण मस्त वाटतंय.
काल फलाफल मिक्सचे फलाफल केले तेव्हा त्याच पिठाचे सांडगे घालू पुढच्यावेळी असं ठरवलंय. पीठ जाड आहे आणि त्यात वर दिलेले सगळे घटक आहेत. शिवाय भिजवायला आणि मग ग्राईंड करायला नको. तास भर भिजवुन योकुने दिलेल्या रेसिपी सारखे व्हावेत असं वाटलं.
केले की (/तर ) सांगतो इथे.
अमित तुला मुदलात आवडतो का हा
अमित तुला मुदलात आवडतो का हा प्रकार? उगा चांगलं फलाफल मिक्स (वाया) घालवायला निघालाय म्हणून विचारते.
माझ्या इंडिया ट्रीप मध्ये खास कानाग्राहास्तव ही अशी वड्यांची पाकिटं नेहमी बॅगांमध्ये आमच्याही नकळत घातली जातात आणि मी बघू-करू म्हणून शेवटी पँट्री क्लिनप टायमाला फेकली जातात. यावेळी हे काम बहुतेक जानेवारीत झालं.
अगदी सुरुवातीला बघच करुन असं म्हणून जी रेसिपी दिली होती ती योकुच्याच रेसिपिसारखी असावी पण मला काय तो प्रकार झेपला नाही ( अगदी गव्हाचा चिक्/डाळ-बाटी सारखं आता मार पडणारच आहे तर सगळ्यांनी एकदमच काय ते मारा. सॉरी योकु) मग ज्याला वाटायचं की हे त्यांच्याकडचं काहीतरी उच्च खाणं आहे बहुतेक त्यालाही त्याचा काय तो नॉस्टालिजया वगैरे यायचा बंद झाला. (त्याला कारण माझी ती ट्राय केलेली रेसिपी असू शकेल पण जौद्या) त्यामुळे आता पुढच्या ट्रीपांपासून नम्रपणे नकार देणार आहे मी. त्याऐवजी थोडा कोंडाजी चिवडा मागेन. निदान नॉस्टॅल्जिक लोकं तरी खातील.
असो. योकु रेसिपी इतकी सुसंगत लिहिलीस तरी वरचं पुराण लिहायचा मोह आवरला नाही. तुला हवं तर तू अमितव ला जबाबदार धर.
फ्लाफळला बुरा येईल की काय
फ्लाफळला बुरा येईल की काय
चालायचंच वेका! नो इश्यूज.
चालायचंच वेका! नो इश्यूज.
एका वेळच्या भाजीची सोय होते आणि सध्या वेळ आहे जरा (विकांताला इ. बाकी शक्यतो नाही), भाज्या अगदी इझीली मिळत नाहीयेत इ कारणं होती हे वाळवण करायला. नाहीतर आम्ही कधीच विकत आणल्या नाही या अन आई/आजी लोक्स आजकाल करतही नाहीत घरी सो आयत्या मिळाल्या हा प्रकारही नाहीच.
छान रेसीपी.
छान रेसीपी.
आम्ही तुरीच्या उसळीत घालतो सांडगे.
आमटी करताना सांडगे भाजून घ्यायचे आवळजावळ. आणि शेंगदण्याचा कुट मिक्स करायचा. आणि मग फोडणी.