Submitted by मुक्ता.... on 13 April, 2020 - 12:31
श्रीकृष्णाचे कुणी आराध्य दैवत होते का? जसे श्रीरामाचे महादेव होते.
श्रीकृष्ण स्वतः कुणा आराध्याचे पूजन करत असावेत असं माझ्या तरी वाचनात आलेलं नाही.
याबद्दल काही अधिक माहिती असल्यास जेष्ठ आणि जाणकार मित्रांनी प्रकाश टाकावा ही विनंती.
हा प्रश्न सहज जन्मला आहे....केवळ ज्ञानहेतुसाठी...बाकी काही उद्देश नाही...
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
महादेव होते.
महादेव होते.
विष्णूंच्या प्रत्येक अवतारात
विष्णूंच्या प्रत्येक अवतारात महादेव हेच त्यांचे आराध्य राहिले आहेत.
श्रीकृष्ण तर अमरनाथ ला गेल्याच सुद्धा मी वाचलं आहे. सत्यासत्यते बद्दल खात्री नाही.
श्रीविष्णु यांचे आराध्य
श्रीविष्णु यांचे आराध्य महादेव, तर महादेवांचे आराध्य श्रीविष्णु आहेत. असे मला कुठेतरी वाचल्याचे आठवते..
ईडा माते ची पूजा आणि गरबा
ईडा माते ची पूजा आणि गरबा करायचे यादव.
आणि. गोकुळात ए़कवीरा देवी. आभीरभानु वंशाची देवी.
श्रीकृष्णाचे कुणी आराध्य दैवत
श्रीकृष्णाचे कुणी आराध्य दैवत होते का?>> महादेव.
हरी ह्रदयी सांब भोळा उमेचा
हरी ह्रदयी सांब भोळा उमेचा
हरु अंतरी ध्यास तो राघवाचा
असे येकयेकासि ध्याती स्वभावे
तया भेद नाहीच शास्त्रार्थ दावे
_____/\____
महादेव आणि विष्णू दोघेही
महादेव आणि विष्णू दोघेही एकमेकांचे आराध्य आणि भक्त.
मनापासून आभार कुटुंबिय
मनापासून आभार कुटुंबिय
विष्णू आणि महादेव हे एकाच
विष्णू आणि महादेव हे एकाच वेळी एकमेकांचे आराध्य आहेत. जेंव्हा सत्यभामाने स्वर्गातून पारिजातक वृक्ष पृथ्वीवर आणण्याचा मोह धरला आणि इंद्राने तो देण्यास मनाई केली तेंव्हा श्रीकृष्णांनी इंद्रासोबत युद्ध करण्याआधी महादेवाची आराधना केली होती आणि महादेवांनी त्यांना युद्धात विजयी होण्याचा आशीर्वादही दिला होता
( ही माहिती रामानंद सागर यांच्या श्रीकृष्ण सिरीयल मधून साभार)