Submitted by BLACKCAT on 12 April, 2020 - 03:57
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
३० मिनिटे
लागणारे जिन्नस:
टरबूजे , लिम्बु, संतरे गर
साखर
मीठ
चाट मसाला
आले किसुन
पाणी
क्रमवार पाककृती:
3 टरबूजे घेतली
वरुन छोटीशी स्लाइस कापून घेतली.
आतील बिया काढून टाकल्या.
चमच्याने सगळा गर काढून घेतला. अर्धा लिम्बु पिळला.
एक संतरेही ढकलुन दिले.
मिक्सरमध्ये गर , साखर , मीठ, आल्याचा किस, अर्धा चमचा चाट मसाला घालून फिरवले, अगदी किंचित पाणी घातले.
टरबूजाच्या वाटीतच ज्यूस ओतुन घेतला.
चियर्स
टरबुज ज्यूस
वाढणी/प्रमाण:
2-3
अधिक टिपा:
आंबयाची फोड़ही खपेल
माहितीचा स्रोत:
प्रयोग
आहार:
पाककृती प्रकार:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान दिसतंय
छान दिसतंय
दूध घालून मिल्क शेक आणि गोड
दूध घालून मिल्क शेक आणि गोड दही घालून लस्सीदेखील बनते.
यू ट्यूब वर आहेत.
मी फक्त साखर आणि मीठ घालते.
मी फक्त साखर आणि मीठ घालते. मला टरबूज चा ओरिजनल फ्लेवर आवडतो.
छान! मस्त प्रयोग.
छान! मस्त प्रयोग.
पण आय डाऊट फोटोत मला खरबूज दिसतयं..
तुमच्या इथे ह्या फळाला टरबूज म्हणतात का?
आमच्या इथे टरबूज म्हणजे कलिंगड आणि फोटोत दिसतय ते खरबूज..
मस्क मेलन
मस्क मेलन
चांगलं वाटतंय सरबत. अलीकडे
चांगलं वाटतंय सरबत. अलीकडे लॉक डाउनात दाराशी भाज्यांचा टेंपो बोलवतात सोसायटीवाले. त्यात कलिंगडापेक्षा टरबुजंच जास्त करून असतात. आता ती घेऊन असा रस करून बघायला पाहिजे.
मॉकटेल रिकाम्या फळातच सर्व्ह
मॉकटेल रिकाम्या फळातच सर्व्ह करायची कल्पना छान आहे.
कर्णाटकात असे एक ज्यूस सेंटर
कर्णाटकात असे एक ज्यूस सेंटर आहे , तो त्या त्या फलाच्या कवचात ज्यूस व शेक देतो.
ते बघून सुचले
https://youtu.be/z0ue7jVvFdM
मी फक्त साखर आणि मीठ घालते.
मी फक्त साखर आणि मीठ घालते.
>>>> यात जराशी मिरपूड घातली तर अजून छान टेस्ट येते
हे तर खरबूज(muskmelon)आहे.
हे तर खरबूज(muskmelon)आहे. टरबुज/कलिंगड वेगळं आहे. एनीवेज ह्याच्या बिया फेकून न देता साफ करून वाळवून,कुटून खात जावा. चांगल्या पौष्टिक असतात.
छान दिसतंय
छान दिसतंय
मागे ज्या फळाची भाजी केली होती ते टरबुज.
आत्ताच फोटोत दिसतंय ते खरबुज.