वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज जामतारा / जमतारा / जमताडा फाईल्स बघून संपवली. अभिनय आवडला. पण एका वाईटातून दुसरं वाईट.. त्यातून तिसरं वाईट.. आणि सगळ्याचा शेवटही वाईटच.. ते सगळं कितीही अस्सल दिसत असलं तरी बघताना अजिबात आनंद झाला नाही. कथा संपेपर्यंत सुखांत असावा अशी खूप इच्छा होऊ लागली होती. पण संपल्यावर विचार केला तर कथेचे नायक नायिका असले तरी तेही चुकीच्याच रस्त्याने चालले होते. त्यामुळे त्यातून काहीही पॉझिटिव्ह आऊटकम मिळेल ही अपेक्षा चुकीची होती. शेवटी ब्रीजेश यातूनही सुटेल अशी भीती लागून राहिली. तिथेही न्याय मिळाला की नाही देव जाणे.

अवांतर: यात दहापैकी एकाही भागात किसिंग सीन्स किंवा सेक्स वगैरे नाही दाखवलाय. (हल्ली लोक सरसकट वेब सिरीज म्हणजे असं काहीतरी असेलच असं गृहीत धरतात त्यांच्यासाठी)

आणि काय हवं बघतेय सध्या. जरा हलकीफुलकी सिरीज बघायची होती सध्याच्या वातावरणात, ही परफेक्ट आहे. पुपो एपिसोडचा शेवट भन्नाट आहे Lol

उमेश अतिसहज करतो अभिनय, आवडतोच मला तो.

म्याक्सवर ! सिरीज / सिनेमा बद्दल लिहीताना कुठे पाह्यली ते ही लिहावी. >>> हो हो MX playerवर. इथे चर्चा झालीय बहुतेक आणि काय हवंची आधी त्यामुळे नाही लिहिलं, माहिती असेल असं गृहीत धरलं, आता यापुढे नक्की उल्लेख करेन कुठे बघतेय त्याचा.

! सिरीज / सिनेमा बद्दल लिहीताना कुठे पाह्यली ते ही लिहावी. >> अनुमोदन. आधी कोणी लिहिले असेल तरीही लिहा. शोधावे लागत नाही.

हल्लीच Amazon Prime वर Suits , Season १ बघितला..
खूप छान आहे..
संवादातले शह काटशह पण मस्तच..

हॉटस्टार - क्रिमिनल जस्टीस. आवडली.

>> जेलमध्ये घडणाऱ्या घटना अंगावर काटा आणतात. तुरुंग ही इतकी नीच जागा आहे हे क्रिमिनल जस्टीस न बघता कधी लक्षात आलं नसतं.

असुर वूट सिलेक्ट वर . मला शेवट निराशाजनक वाटला .>>>>>>>>>>>>> +१ अतिशय निराशादायी. कितीतरी वेळ मनात मळ्भ आल्यासारखं होतं.
स्पॉयलर होईल पण 'तो' "तो' होता ते काही पटलं नाही. Lol म्हणजे तो अ‍ॅक्टर मोठा झाल्यावरचा 'तो' तसा वाटला नाही.

असुर मी बघितली पूर्ण, पहिल्या भागात अतिशय मह्त्वाकांक्षी वाटणारी सिरिअल, शेवटाकडे जाताना पूर्ण सपक होते.
काही गोष्टींची लावलेली लिंक, केलेली उकल मनाला बिलकुल पटत नाही, फक्त संबंध जोडायचा म्हणून जोडलाय असं वाटत. (अशावेळी ratsasan ची प्रकर्षाने आठवण होते.)

मला पण वर्किंग मॉम्स आवडली, पुढच्या सिझनची वाट बघतेय :).
मनी हाइस्ट पण आवडली, एकदम फिल्मी आहे , पाहिली नसेल त्यांनी पहायला घ्या, नवा सिझन येतोय लवकरच !
मनी हाइस्टचं देसी व्हर्जन काढलं तर प्रोफेसरच्या रोलमधे केके मेननला ऑलरेडी इमॅजिन केलं नुकतच स्पेशल ऑप्स पाहिलाने :).

अवांतर: यात दहापैकी एकाही भागात किसिंग सीन्स किंवा सेक्स वगैरे नाही दाखवलाय. (हल्ली लोक सरसकट वेब सिरीज म्हणजे असं काहीतरी असेलच असं गृहीत धरतात त्यांच्यासाठी)
>>> मग स्किप मारलेली बरी ...

Mx player वर forbidden fruit ही turkish series पाहिली. हिंदी डब केलेली होती. पण दहाच भाग आहेत. पुढे बघायची इतकी उत्सुकता होती की गुगल वर सर्च केले.. तर एक आॅफिशियल वेबसाईट वर (turkfans. Com) सगळेच भाग सापडले. तब्बल 75 भाग आहेत.!
आता ते केव्हा हिंदीत डब होऊन येतील देव जाणे. त्या वेबसाईट वर फक्त turkish भाषेतच आहेत. इंग्रजी सबटायटल्स किंवा इंग्रजी भाषेत नाहीत.
कुणी तरी सांगा प्लीज इंग्रजीत किंवा सबटायटल्स सह कुठे बघता येईल? खुप हुरहुर लागली आहे..

तुर्की सीरिअल्स चा बऱ्याच वेळेला हाच प्रॉब्लेम होतो....मी सुद्धा हार्ट बीट ही सीरियल बघत होते....अतिशय सुंदर...28 भागांचीचं आहे..पण 19व्या भागानंतर सब टायटल गायब....काहीच कळत नाहीये...मी सुद्धा शोधतीये कुठे मिळतील बाकीचे एपिसोड with subtitles...
अवांतर - तुर्की सीरिअल्स खरंच खूप छान असतात.

>>पण 19व्या भागानंतर सब टायटल गायब....काहीच कळत नाहीये..<<
१९ भाग बघेपर्यंत सबटायटल्स वाचुन, त्याची भाषेशी सांगड घालुन तुम्ही तुर्कि शिकला असाल असा त्यांचा समज असेल... Wink Light 1

पंचायत पाहीली.....mx player वर .... मस्तच जाम आवडली season 1 एक दिवसात बघून संपवली....waiting for season 2.....

ओझार्क चा तिसरा सीजन संपवला आज. वेस्टवर्ल्ड चा तिसरा सीजन एकदम अपेक्षाभंग करतोय. उरलेल्या भागांत थोडी एक्साइटमेंट येईल अशी अपेक्षा.

दीपांजली Money Heist मला हि खूप आवडली
Money Heist - Netflix
एकदम भन्नाट आहे .. तिसरा season पण आजच संपवला

Pages