Submitted by देवकी on 24 May, 2013 - 14:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
२० मिनिटे
लागणारे जिन्नस:
एक वाटी चणाडाळ, अर्धा नारळ(ओला) , पाऊण वाटी गूळ,काजू किंवा ओल्या नारळाचे काप,वेलची पावडर
क्रमवार पाककृती:
कुकरमधून चणाडाळ, शिजवून घ्यावी.
थंड झाल्यावर पळीने थोडीशी गरगटावी. नारळाचे दाट व थोडेसे पातळ दूध काढून घ्यावे.
गरगटलेल्या चणाडाळीत गूळ ,काजू, मिसळून एक उकळी आणावी.
गॅस मंद ठेवून त्यात नारळाचे दाट दूध हळुहळू घालावे.सतत ढवळावे नाहीतर दाट होण्याऐवजी फाटेल(चोथापाणी होईल)
वेलची पावडर घलून थोडेसे पातळ दूध घालावे.
वाढणी/प्रमाण:
२-३ जण
अधिक टिपा:
डाळ एकदम एकजीव करू नये.
माहितीचा स्रोत:
पारंपारिक
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
गरगटलेल्या चणाडाळीत गू,, >>
गरगटलेल्या चणाडाळीत गू,, >> आई ग!! 'ळ' हवाच!!
ए सिमन्तिनी , बाई ग! 'ळ'
ए सिमन्तिनी ,
बाई ग! 'ळ' वाचूनच कर!
एक 'दि हेल्प' नावाचा सिनेमा
थेंक्स सिमन्तिनी!
थेंक्स सिमन्तिनी!
छान साऊथ चे हैग्रीव हेच का ?
छान
साऊथ चे हैग्रीव हेच का ?
माझी आई बनवत असे हि डिश आणि
माझी आई बनवत असे हि डिश आणि मला पण खूप आवडायची. पण ती गेल्यावर गेल्या २०-२५ वर्षात खाल्लीच नाही. करून पाहावीशी वाटतेय खरी. बघुयात. थँक्स रेसिपी बद्दल