वेबसीरीज.

Submitted by बी.एस. on 9 April, 2018 - 01:55

सध्या अनेक वेबसीरीज येत आहेत. नेहमीच्या रटाळ दैनंदिन मालिके पेक्षा ह्या वेबसीरीज ना जास्त पसंती मिळत आहे. विशेषतः तरुण वर्गाची.. कारण मर्यादित भाग असल्याने बघण्याची उत्सुकता टिकून रहाते.. चला तर मग येथे चर्चा करुया वेबसीरीज.. तुम्हाला आवडलेली किंवा न आवडलेली..त्यासाठीच हा लेखनाचा धागा..

मला आवडलेल्या काही हिंदी वेबसीरीज.
1. लवबाईट्स..भाग 1 आणि 2
2. ब्लॅक काॅफी
3.स्पाॅटलाईट भाग 1
4. ट्विस्टेड भाग 1
5. अनटचेबल्स...
मराठीत अजून काही पाहिल्या नाहीत.

ह्या अजून काही वेबसीरीज
Pitchers (absolute must watch)
Bang Baaja Baarat
TVF Roommates
#movingOut (Marathi)
and absolutely hilarious How to train your dad

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इन्साइड एज पूर्ण बघितली (२ सीझन. अ‍ॅमेझॉन प्राइम). शेवटपर्यंत एकदम खिळवून ठेवले होते. यातील क्रिकेट व त्याच्याशी संबंधित गोष्टी अत्यंत चपखल आहेत. राजकारण थोडे ढोबळ आणि वरवरचे आहे, पण तरीही इंटरेस्टिंग आहे. खटकणार्‍या एक दोन गोष्टी म्हणजे फिक्स केलेल्या स्पॉट्स करता वापरलेले सिग्नल्स खूप ऑब्वियस वाटतात. आणि दुसरे म्हणजे यातील मराठी दाखवलेल्या लोकांचे मराठी उच्चार भीषण आहेत.

बाकी मस्त. दुसर्‍या सीझनचे शेवटचे एपिसोड्स एकदम "बिंज वॉचिंग" वाले आहेत. यातील कथानक क्लायमॅक्स कडे जाताना त्यातले क्रिकेट अत्यंत जबरदस्त सादर केले आहे. अंगद बेदी, तनुज विरवानी, अमित सियाल, सिद्धांत चतुर्वेदी, मुंबईचा कोच दाखवलेला तो कलाकार यांच्यामुळे शेवटचे भाग जबरी झाले आहेत. मात्र क्लायमॅक्स चे राजकारण तितके डीप नाही. ते जरा लेटडाउन आहे.

पण एकूण १००% रेको.

Man in the High Castle. (Amazon Prime..) >> बघतेय

Out of love पाहीली.आवडली.
कुनूरच वातावरण मस्तच.
कपूर्स चा बंगला , अभिची शाळा , मीराच हाँस्पिटल , आलिया चा स्टुडियो , रस्ते , रैल्वे स्टेशन .Small town feelings !!

City of dreams पण बघितली.
डोक दुखायला लागलं. वैताग आलाय.
मला फक्त एकच व्यक्ती खूप आवडली. ती कटरीना .
कसली गोड मुलगी आहे ती.

हंटर्स - अ‍ॅमेझॉन प्राइम - अगदीच कै च्या कै आहे. मॅन इन द हाय कॅसल मुळे रेको मिळाले की काय माहित नाही, पण साधारण समस्या तीच पण अगदीच अतर्क्य. १९७५ च्या आसपासच्या अमेरिकेतली कथा, दुसरे महायुद्ध संपले तरी बरेच पावरफुल नाझी अमेरिकेत आयडेन्टिटी बदलून रहतायत आणि सुपिरियर रेस चे आपले घोडे छुप्या मार्गांनी पुढे दामटत आहेत, तर त्यांना शोधून त्यांना मारणारी मुख्यत्वे ज्युइश लोकांची एक गुप्त टीम (त्यातल्या काहींचा ऑश्विझ मधला इतिहास आहे), तर हे लोक म्हणजे हंटर्स! ज्यू वि. नाझी, ब्लॅक वि. व्हाइट, श्रीमंत - गरीब , बायोटेररीजम, असा सगळा काला आहे.
१ सीझन आणि १० भाग आहेत प्राइम वर.

गिल्टी पाहिली का कुणी?>>>> बकवास. सुरवात केली होती. अर्धं पण नाही बघू शकले. एकदमच बोर आहे.

स्वप्निल जोशीची समांतर वेब सिरीज बघितली. झकास आहे.... मजा आली. कथा, सिनेमॅटोग्राफी फारच सुंदर आहे. सीजन टू ची वाट बघतोय

समांतर मी आजच बघायला सुरुवात केली, तीन एपिसोड्स बघितले.

स्वप्नील जोशी एरवी फार आवडत नाही पण काय सॉलिड काम केलंय, अगदी सहज. वेबसिरीजमधे शिव्या बिनधास्त दाखवतात का, बीप बीप नाही येत आणि smoking च्या वेळी धुम्रपानविरोधी लिहिलेली लाईन जात नाही का.

आम्ही समांतर बघून संपवली काल. मस्त आहे. स्वनिल जोशी च काम भारी.. !सिनेमॅटोग्राफी पण भारी आहे एकदम. पुस्तकात पुढे गोष्ट आहे का अजून ? की आता पाणी घालून वाढवणार?

समांतर मस्त आहे. स्वजो बारीक झालाय आणि दुनियादारी पासून कोसो दूर आलाय. शेवटपर्यंत हा नितीश भारद्वाज आहे यावर विश्वास बसत नव्हता. खटकलेल्या गोष्टी म्हणजे शिव्या आणि किसिंग सीन. वेबसिरीज करतोय तर हे टाकायलाच पाहिजे म्हणून टाकलंय असं वाटतं. सुरुवातीला कुमार साधा कारकून वाटतो पण पन्हाळ्याला त्याला मोठा साहेब असल्यासारखी वागणूक मिळते. चक्रपाणी लगेच सापडला असं वाटलं कारण मध्ये तीस वर्ष गेलेली असतात आणि आधी तो वखारीतला माणूस अचानक अपघात होऊन मरतो वगैरे, खूप कठीण आहे तो सापडणं असं वाटत असतानाच तो लगेच सापडतो. स्वजो एवढ्या रात्री जंगलातून जातो आणि चक्रपाणी पडक्या मोठ्या घरात रहात असतो वगैरे उगाचच सस्पेन्स. या पुस्तकाची मागणी आता भरपूर वाढणार.

पुस्तकं वाचलं नसल्याने काहीच कल्पना नाहीये, त्यामुळे बघायला मजा येतेय. अर्थात पुस्तकाची सिरीयल किंवा मूवी करताना कथा हवी तशी बदलतात, ग्रहण हे एक उदाहरण. ते पुस्तकपण वाचलं नव्हतं आणि सिरीयल पण बोअर झाली म्हणून बघितली नाही पण हे नऊच भाग आहेत हे एक बरं, त्यामुळे बघेन.

कुठे पाहिली समांतर? >>> MX player वर आहे.

कोणी नेटफ्लिक्स वर वर्किन मॉम्स पाहिली आहे का?
वेगवेगळ्या शैक्षणिक, कौटुंबिक, आर्थिक, व्यावसायिक स्तरातल्या नव्याने पालक बनलेल्या बायकांचा एक ग्रुप आणि मुले झाल्यानंतर सगळ्याच बाबतीत, विशेषतः करीयर च्या आघाडीवर, झालेली आयुष्यातली लहान मोठी स्थित्यंतरं हा विषय आहे. पण डार्क कॉमेडी अंगाने घेतलेला आहे. थोडीशी फ्लीबॅग शी कंपेअर करता येईल. तिच्यासारखीच आपल्या मर्जीने जगणारी फ्री स्पिरिटेड, स्टिरिओटाइप मधे न बसणारी ग्रे शेड फीमेल कॅरेक्टर्स (कनेडियन सीरीज असल्यामुळे जरा जास्त लिबरल) बघून मला तरी मजा आली Happy
नेफ्लि वर ३ सीझन्स आहेत. चौथा अजून यायचाय असे कळले.

MX player वर आहे.>>> अग ते इकडे नाही दिसत अ‍ॅट लिस्ट मला तरी एरर मेसेज येतोय. नॉट अवेलेबल इन युवर रिजन म्हणून.

हॉटस्टार वरची आऊट ऑफ लव्ह पाहिली. ठीक होती पण जरा जास्त रेंगाळली आहे असं वाटलं. ५ भागांऐवजी ४ भागात संपवता आली असती. कुन्नूर गाव खूप सुंदर दिसलंय. अभिनय ही चांगले झाले आहेत पण तरी शेवट कळला नाही मला

सुरुवातीला कुमार साधा कारकून वाटतो पण पन्हाळ्याला त्याला मोठा साहेब असल्यासारखी वागणूक मिळते.

>> +१
हे तिकडे स्वतंत्र धाग्यावर पण लिहा चंपा.

Hotstar वर ती स्पेशल OPS म्हणून सिरीज आलीये ती बघताय का कोणी? मला अर्धवट राहिलेल्या वेबसिरीज किंवा सिझन बघायला आवडत नाही (फार हुरहूर लागून राहते). सो कोणी बघितली असेल तर पूर्ण झाली की सांगा कशी आहे ते

पण तरी शेवट कळला नाही मला

>> नक्की काय कळलं नाही? इथे शेवट लिहिला तर स्पॉयलर होईल ज्यांनी नाही बघितली त्यांच्यासाठी.

पियू मी मोबाईलवरूनच टाईप करते, कॉपी पेस्ट कसे करायचे माहित नाही. एवढं सगळं तिथे कोण लिहीत बसणार. मुळात वेगळा धागा काढायला ती काय GOT नव्हती, पण हौस एकेकाची. समांतर बद्दल बोलतेय मी Happy

समांतर सीरीज बघत असताना खाली उमेश कामत-प्रिया बापटची 'आणखी काय हवं?' सीरीज दिसली.
कशी आहे? कुणी पाहिली आहे का?
त्याचा पहिल्या एपि.चा पहिला सीन छान होता, सामान चढवताना मोबाइल व्हायब्रेट होतो, तो.

पण नंतरचे सीन्स नाटकातले असल्यासारखे वाटले. संवाद जास्त, कॅमेरा मूव्हमेंट ना के बराबर,
प्रि.बा.ची वेषभूषा सामान शिफ्टिंगच्या दिवसाची अजिबातच वाटली नाही. तिचा तो ड्रेस मात्र आवडला.

दोघंही काम छान करतात, म्हणून बघाविशी वाटतेय. ६ च भाग आहेत.

Pages