मंडळी दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब लोकांना सेवा व जीवनावश्यक वस्तू विकत घेताना उत्पन्नाचा मोठा वाटा खर्च करावा लागतो.
मला सुचलेला साधा उपाय असा आहे.
समजा मुंबई शहर आहे तर संपुर्ण शहरातील लोकांनी आठवड्यातील एका दिवशी दुध विकत घ्यायचं नाही की दुधाचे पदार्थ देखिल विकत घ्यायचे नाही.
एखाद्या दिवशी पाच किलोमीटर चालावं लागले तरीही रिक्षा बस करायची नाही. लांब अंतरावर जाणाऱ्यांनी रेल्वे, बसचा वापर करावा.
एका ठराविक दिवशी भाजीपाला विकत घ्यायचा नाही. एखाद्या दिवशी हॉटेलात जाणं कंपलसरी बंद ठेवायचं. एखाद्या दिवशी सिनेमा गृहात जायचं नाही. एखाद्या दिवशी कपडे खरेदी करायची नाही. एखाददिवशी अंडी मटण मासे विकत घ्यायचे नाही.
असे व्रत केल्यासारखे संपूर्ण शहराने ती गोष्ट करायची नाही. असे नाही की अगोदरच साठेबाजी करून ठेवायची. एक दिवस भाजीपाला, मासे मटण, हॉटेल यावर नियंत्रण ठेवायचं.
संपुर्ण शहरात जर असं पाळले गेले तर त्या वस्तूंचे दर नक्कीच थोडे का होईना कमी होतील.
तर मंडळी तुमच्या सूचना जरूर करा. वाट पाहतो.
( धागा ही गाजराची पुंगी आहे, वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली! )
असं केलं तर?
Submitted by आर्यन वाळुंज on 22 February, 2020 - 04:46
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
६० च्या दशकात चीन युध्दावेळी,
६० च्या दशकात चीन युध्दावेळी, अन्नधान्याची टंचाई होती. सैन्याला रेशन मिळावे /पुरावे म्हणून तात्कालिन पंतप्रधानांनी (मोरारजी देसाई?) जनतेला एक दिवस उपवासाचे आवाहन केले होते आणि उद्देश सफल झाला होता असे ऐकून आहे. कालखंडाबाबत चुभूद्याघ्या.
जाणकारांनी अधिक प्रकाश टाकावा.
मोरारजी नाही बहुतेक. वसंतराव
मोरारजी नाही बहुतेक. वसंतराव नाईक यांनी सोमवारी उपवास करावा असे आवाहन केले होते असे वाचल्याचे आठवते.
भारतात अन्नधान्याचा तुडवडा
भारतात अन्नधान्याचा तुडवडा निर्माण झाल्यावर अमेरिकेकडून मदत म्हणून निकृष्ट धान्य घेण्यापेक्षा स्वाभिमानी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींनी भारतीय जनतेला एक दिवस उपवास करण्याचे आवाहन केले होते.
होय लालबहादूर शास्त्री यांनी.
होय लालबहादूर शास्त्री यांनी. आणि ते आयुष्यभर सोमवारी उपवास करत.
कोल्हापुरात मटणाच्या भावावरुन
कोल्हापुरात मटणाच्या भावावरुन आंदोलन झाले होते. त्यांनी अशी युक्ती आठवडाभर करायला हवी होती.
पण कोल्हापूरकर (मांसाहारी) एक दिवसही मटणाशिवाय राहू शकत नाहीत.
आर्यन सर्व शक्य आहे पण
आर्यन सर्व शक्य आहे पण लोकांची एकी होत नाही झाली तर टिकत नाही.
ह्या मुळे अत्याचार अन्याय होत राहतात
अत्याचार आणि अन्याय कसला
अत्याचार आणि अन्याय कसला त्यात? रिक्षा महाग झाली आणि परवडत नाही तर रोज चालत जा, नाही कोण म्हणतंय? महागाईच्या नावाने खडे फोडण्याआधी लोकांना needs आणि wants मधला फरक आधी कळला पाहिजे.
नीडस् आपण ठरवून कमी करु शकतो.
नीडस् आपण ठरवून कमी करु शकतो. वांटस् या पुऱ्या होतात आणि नाही सुध्दा. अत्याचार वगैरे नाही.
एखाद्या गोष्टीचा ग्राहकांना पर्याय नाही म्हणून उत्पादकानं, सेवादात्यानं जास्त किंमत लावत असेल तर असे उपाय करुन चाप लावता येईल असे वाटते.
राजे हो आपण आपल्या पुरता बघत
राजे हो आपण आपल्या पुरता बघत आहोत, दूध महागल म्हणून अचानक एक दिवस डिमांड शून्य करून टाकली तर तो दिवस दूध उत्पादक मरेल. नफेखोरी करणारे वरच्या वर मोकळेच राहतील. आणि हेच खरे बाजार भाव चढवणारे खिलाडी असतात. व्यापारी, दलाल, एजन्ट हि साखळी कमी करणे हाच खरा उपाय!
अनावश्यक गोष्टींना महत्त्व
अनावश्यक गोष्टींना महत्त्व देणे अन्नाच्या बाबतीत वाढत आहे. गरीब लोकांचाही कल इकडे वाढू लागला आहे.
एक उदाहरण म्हणजे तांदुळ. एक किलो तांदुळातले पोषणमुल्य हीच त्याची खरी किंमत असते. चांगला दिसणारा, लांब शितं दिसणारा भात होईल, किंवा सुगंध येईल तशी किंमत वाढवतात (१५ ते २५० रु काहीही) पण पोषणमुल्यात काही फरक पडत नाही. नेहमी हाच महागडा तांदुळ वापरणे श्रीमंतांना शक्य असते.
तांदुळाच्या भरपूर उत्पन्न देणाऱ्या, रोगराई न होणाऱ्या ज्या जाती आहेत ( उदाहरणार्थ उकडा) कुणाला नको आहेत.
--------
थोडक्यात सांगायचे तर केवळ चमचमीत छान लागते ती महाग वस्तु खाण्याचे प्रमाण वाढले आहे. कधीतरी ठीक आहे. पण मागणी वाढल्याने इकॉनमी ढासळते, गरीबी वाढते.
माझ्या मते हा चुकीचा उपाय आहे
माझ्या मते हा चुकीचा उपाय आहे व याने उलटाच परिणाम होईल. कारण या सर्व वस्तू व सेवा देणाऱ्यांचा तोटा होईल; आणि असे असूनसुद्धा या वस्तू किंवा सेवा स्वस्त होणार नाहीत.
जर मागणी कमी झाली तर दर कमी होन्या ऐवजी उत्पादन कमी केले जाईल; त्यामुळे अपेक्षित परिणाम होणार नाही. वस्तू व सेवांचा दर हा मागणीवर नाही तर उत्पादन खर्चावर अवलंबून असतो. त्यामुळे मागणी कमी करण्याऐवजी उत्पादन खर्च कमी होणे, व लोकांची क्रयशक्ती वाढणे हा उपाय मलातरी जास्त संयुक्तिक वाटतो.
तूर डाळ दोनशे रुपये किलो झाली
तूर डाळ दोनशे रुपये किलो झाली म्हणून दोन तीन वर्षांपूर्वी फार गहजब चालला होता. अशा वेळी तूरडाळीला पर्याय मुगडाळ, मठडाळ सारख्या डाळी विकत घ्यायच्या महिना दोन महिने तूरडाळ विकत घ्यायची नाही.
वस्तू व सेवांचा दर हा मागणीवर
वस्तू व सेवांचा दर हा मागणीवर नाही तर उत्पादन खर्चावर अवलंबून असतो.
>> असं सरसकट नाही. अॅपल कंपनी फोन वीस पंचवीस हजार रुपयांत बनवून लाखभर रुपये किंमतीला विकते.
ज्यां वस्तूंचे उत्पादन संघटित
ज्यां वस्तूंचे उत्पादन संघटित क्षेत्रात होते तिथे वस्तू ची किंमत हे उत्पादक ठरवतात आणि वस्तू चे उत्पादन अतिरिक्त करत नाहीत त्या मुळे किमती सुद्धा कमी होत नाहीत.
तुम्ही वापर कमी केला की ते उत्पादन कमी करतात.
तांदुळाच्या भरपूर उत्पन्न
तांदुळाच्या भरपूर उत्पन्न देणाऱ्या, रोगराई न होणाऱ्या ज्या जाती आहेत ( उदाहरणार्थ उकडा) कुणाला नको आहेत
>>>>>
उकडा हा तांदळाचा प्रकार आहे, जात नव्हे.
होय उकडण्याची प्रक्रिया
होय उकडण्याची प्रक्रिया केलेला तांदूळ असतो तो.
फोन आणि धान्य सारखे नव्हे
फोन आणि धान्य सारखे नव्हे
एपल कम्पनी फोन बंद करून कपाटात तीन वर्षेपण ठेवू शकते , शेती माल नाशवन्त असल्याने बार्गेनिंग पोटेन्शल मर्यादित असते
पर्याय योग्य वाटत नाही.
पर्याय योग्य वाटत नाही. बिचार्या भाजी, रेस्टॉरंट वाल्यांचे आधीच काय कमी नुकसान झालेय का त्यात भर टाकायची कल्पना योग्य नाही.
चैनी खातर च्या वस्तू जसे सतत नवीन मॉडेल चे फोन, कार्स घेत राहणे, ब्रँडेड कपडे घेत सतत ट्रेंड मधे राहणे ह्या वर अंकुश लाऊ शकतो.
बोकु मामा स्कुल्स ऑफ
बोकु मामा स्कुल्स ऑफ इकॉनॉमिक्स,
__/\__
भविष्यात GOI चे आर्थिक सल्लागार किंवा RBI चे गव्हर्नर इत्यादी जागांसाठी अतिशय योग्य कॅण्डीडेट.