Submitted by DJ.. on 19 February, 2020 - 02:40
२ मार्च पासुन 'झी मराठी' वर नवीन मालिका येत आहे जिचं नाव आहे 'माझा होशील ना'
मा.हो.ना. ही सिरिअल सोमवार ते शनिवार रात्री ८ वाजता आपल्या भेटीला येत आहे. आता लवकरच कळेल ही नवी सिरिअल आपली होते का ते..!
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
९ ला आहे ना? संभाजीराजांच्या
९ ला आहे ना? संभाजीराजांच्या सिरीयलच्या जागी?
जान्हवीची ६ आयांची सिरियल
जान्हवीची ६ आयांची सिरियल होती, तशी ही बर्याच बाबांची दिसत्ये प्रोमो वरून
8 वाजता? गुरुच्या बायकांच
8 वाजता? गुरुच्या बायकांच ग्रहण सुटतंय कि काय?!
आता पाहिला प्रोमो ८ वाजताच
आता पाहिला प्रोमो ८ वाजताच आहे.
मला वाटतं या नवीन सिरिअल मुळे
मला वाटतं या नवीन सिरिअल मुळे मानबा आणि अग्गंबाईच्या टायमिंग मधे बदल होऊ शकतो.
@ रावी म्हणतात तसं मलाही ही सिरिअल जान्हवीच्या ६ आयांच्या धरतीवर काढलेली ६ बाप्यांची सिरिअल असावी असं वाटतंय.
नको टाईम चेंज.मानबा संपू देत
नको टाईम चेंज.मानबा संपू देत.मलाही होणार सून मी टाईप वाटत आहे.हीरो आता तरी नाही आवडला.बघू कदाचित नंतर आवडेल.हिरवीण आवडली.
मला वाटतं या नवीन सिरिअल मुळे
मला वाटतं या नवीन सिरिअल मुळे मानबा आणि अग्गंबाईच्या टायमिंग मधे बदल होऊ शकतो++
स्वराज्यरक्षक मालिका संपणार आहे
मानबा संपेल असे वाटत नाही
मानबा संपेल असे वाटत नाही
प्रोमो पाहिलाय. हिरवीण
प्रोमो पाहिलाय. हिरवीण अतिसमजूतदार वाटली . हिच्याशी न बोलता तो त्या बाबांशी फोनवर बोलत बसतो. हिला अज्जिबात राग येत नाही. फक्त हसते. मालिकेच पाणी कळल.
मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे
मृणाल कुलकर्णीचा मुलगा आहे बहुतेक तो.
काय वाईट दिवस आलेत
काय वाईट दिवस आलेत प्रेक्षकांवर. आधी वाट पहावी अशा सिरिअली होत्या आता कधी संपवणारेत अस वाटतं..
अशीच एक हिंदी सिरीयल होती
अशीच एक हिंदी सिरीयल होती सोनीवर काही वर्षांपूर्वी--- सास बिना ससुराल. सुरुवात तरी तशीच असेल बहुधा. नंतर मग आले लेखकाच्या मनी आणि वाढवले पाणी,, अशी गत होईल.
नायक मृणाल कुलकर्णीचा मुलगा
नायक मृणाल कुलकर्णीचा मुलगा विराजस कुलकर्णी . नायिका मृण्मयी देशपांडे ची बहीण गौतमी देशपांडे आणि सहा किव्वा पाच सासरेबुवा असं कथानक असावं. सासरेबुवांच्या ( म्हणजे नायकाचे काका /मामा/ आजोबा इत्यादी इत्यादी ) कचाट्यात नायक . नायिकेला द्यायला वेळ नाही . नायिका वैतागलेली . मग पुढे छान छान . पुढे सगळ्या काका मामाच्या बायकांचं उपकथानक . मुख्य आजोबा सासरेबुवा ( रोहिणी हतंगडी सारखे ) अच्युत पोतदार . भरपूर स्कोप आहे कथानक वाढवायला. त्याच त्याच कथानकावर किती मालिका ?
विराजस कुलकर्णीला एका शॉर्ट
विराजस कुलकर्णीला एका शॉर्ट फ़िल्म मध्ये पाहिलं होतं.
त्यात त्याची आई मृणाल कुलकर्णीचं असते.
काही खास वाटला नाही ऍक्टिंग मध्ये.
त्याच्या आईच्या लेव्हलचा तर मुळीच वाटला नाही.
गौतमी देशपांडेची सोनी वरची सारे तुझ्याचसाठी सिरीयल मी बघायचे.
सगळ्या डेली सोप्सच्या हिरवणी जश्या असतात तशीच ती वाटली.
झी ची आणखी एक रटाळ मालिका.
निखिल रत्नपारखी आवडतो पण
निखिल रत्नपारखी आवडतो पण त्याच्यासाठी ही मालिका बघणार नाही. मृणाल कुलकर्णी ओव्हर hyped आहे. नुसते रडूबाईचे रोल, त्या मृणाल दुसानिस सारखे, व्हरायटी काहीच नाही, देहबोलीत कायम एक संथपणा. प्रत्येक रोलसाठी बक्षीस, मुलाखती आणि कौतुक ठरलेलं. उंच माझा झोका यात ज्या कर्तृत्ववान बायकांना बक्षिसं मिळाली त्या चला हवा येऊ द्या मध्ये आल्या होत्या तर तिथेही तिला बोलावलं होतं काही संबंध नसताना, महिला दिग्दर्शिका म्हणून. आता मृण्मयी देशपांडेंसारख्या मुली लेखन, दिग्दर्शन सगळंच करत आहेत. तिचं अति कौतुक होतं सुरुवातीपासून हेमावैम.
गौतमी मला आवडते पण तिच्यासाठी
गौतमी मला आवडते पण तिच्यासाठी आख्खी मालिका बघत नाही, फार क्वचित सारे तुझ्याचसाठी बघितली. ती उत्तम गाते पण त्यात बॉक्सर होती. मृण्मयी पण आवडते मला.
मृणाल कुलकर्णी पेक्षा मला तिची बहिण मधुरा अभिनयात फार उजवी वाटायची, अतिशय सहज करायची पण ती ह्या क्षेत्रात जास्त रमली नाही, तिने फार कमी काम केलं. दूरदर्शनवर पूर्वी एका कार्यक्रमाची सूत्रधार पण होती ती, तेव्हाही आवडली होती. ४०५ आनंदवन आणि हिंदी मालिकेत बघितलं होतं तिला, त्यात मृणाल मुख्य नायिका होती. शरदचंद्र चटर्जी यांच्या कांदबरीवर आधारित होती ती सिरीयल.
अशीच एक हिंदी सिरीयल होती
अशीच एक हिंदी सिरीयल होती सोनीवर काही वर्षांपूर्वी--- सास बिना ससुराल. सुरुवात तरी तशीच असेल बहुधा. नंतर मग आले लेखकाच्या मनी आणि वाढवले पाणी,, अशी गत होईल.>>>>>>>>> +++११११११ सांस बिना ससुराल सारखि असेल तर छान असेल. मला खुप आवडायची टोस्टी, तेज , सगळेच. अगदी शेवटी ती सिरीयल भरकटली.
छान
छान
सास बिना ससुराल सोनी वर होती
सास बिना ससुराल सोनी वर होती सिरीयल त्यात सात पुरुष दाखवलेत एक वडील, भाऊ आणि मुले.
https://en.wikipedia.org/wiki/Saas_Bina_Sasural
आज पहिला भाग पाहिला.नायकाचे
आज पहिला भाग पाहिला.नायकाचे नाव आदित्य आहे. नायिकेचे नाव सई आहे. आज त्यांचा MBA चा रिझल्ट लागला. आदित्य पहिला आला. सईला 36% मिळाले. सईची मैत्रीण डोक्यात गेली आहे. आदित्यचे आईवडील त्याच्या लहानपणी accident मध्ये गेले. आप्पा हे आदित्यच्या आईचे वडील.
राम नाही वाटत आहे ह्यात काही
राम नाही वाटत आहे ह्यात काही आज तरी.
आता तस सांगता येणार नाही
आता तस सांगता येणार नाही मालिकेबद्दल.कालचा भाग काही विशेष नाही वाटला.गौतमीचा स्क्रीन प्रेझेन्स छान आहे.अँक्टिंग आओके वाटली.विराजहसही प्रोमोपेक्षा बरा वाटला.
पण घरामध्ये असलेल्या व्रुध्द माणसाला कसला ना कसलातरी आजार असायलाच हवा,हा हट्ट हे मालिकावाले कधी सोडणार?
बघू कशी नेतात पुढे.
झी वाल्यानी सगळ्या स्टार
झी वाल्यानी सगळ्या स्टार किड्स ना डेली सोप्स मध्ये काम देण्याचा मक्ता घेतलाय वाटत.
आधी अग्गबाई मधलं डबडं आणलं आता मृणाल कुलकर्णी चा मुलगा म्हणून त्या विराजसला घेतलंय.
मी त्याची यू ट्यूब वर एक शॉर्ट फ़िल्म बघितली आईची जुई असंच काहीतरी नाव आहे. काही खास वाटला नाही.
तसंच त्या गौतमीच आहे मृण्मयी दे. बहीण म्हणून मिळालं काम.
मला ती नाही आवडत एवढी. इन फॅक्ट मला तिची बहीणही आवडतं नाही.
बबड्या आधी कलर्स मराठी आणि
बबड्या आधी कलर्स मराठी आणि स्टार प्रवाह वर होता, झीने त्याला पहीला चान्स नाही दिला. इ टीव्ही होता तेव्हा मेंदीच्या पानावरचा हिरो होता आणि नंतर दुर्वामधे होता. गोठ बघताना दुर्वाचे प्रोमोज असायचे म्हणून माहीतेय आणि मेंदीच्या पानावरमधे भाचेजावई काम करायचे म्हणून थोडे दिवस बघितली होती. अर्थात फेमस सर्वांना झी करतं म्हणा.
तो विराजस कुल्कर्णी ढ आहे,
तो विराजस कुल्कर्णी ढ आहे, अभिनयात...
मृणाल कुळ्कर्णी जरा बरी तरी,
झी वाल्यानी सगळ्या स्टार
झी वाल्यानी सगळ्या स्टार किड्स ना डेली सोप्स मध्ये काम देण्याचा मक्ता घेतलाय वाटत.
आधी अग्गबाई मधलं डबडं आणलं आता मृणाल कुलकर्णी चा मुलगा म्हणून त्या विराजसला घेतलंय. >>>>>>> आशुतोश गोखलेला सुद्दा झीमने सन्धी दिली.
फेमस सर्वांना झी करतं म्हणा.>
फेमस सर्वांना झी करतं म्हणा.>>हो तेच.
इतर चॅनेल वर काम करून एवढं फेम मिळतं नाही जेवढं झी वर मिळतं. आय मीन त्याला तरी नसतंच मिळालं...
तो विराजस कुल्कर्णी ढ आहे, अभिनयात...>>+++1
आशुतोश गोखलेला सुद्दा झीमने सन्धी दिली>>आशुतोष गोखले कोण?
आशुतोष गोखले विजय गोखलेचा
आशुतोष गोखले विजय गोखलेचा मुलगा, तुपारेमध्ये होता जयदीप झालेला. सध्या ' रन्ग माझा वेगळा' चा हिरो आहे.
ईतर वाहिन्यावर छोटे रोल
ईतर वाहिन्यावर छोटे रोल करणाऱ्यांना झी मराठी लीड रोल देते जसे ललित प्रभाकर, शशांक केतकर, ओमप्रकाश आणि आता बबड्या. हिरविणीचंही तसंच असावं.
आशुतोष गोखले विजय गोखलेचा
आशुतोष गोखले विजय गोखलेचा मुलगा, तुपारेमध्ये होता जयदीप झालेला>>अच्छा तो होय.. तो छानय. दिसायला छान आहे ऍक्टिंग पण चांगली करायचा. आता त्याचं रोलच तसा वेडसरासारखा लिहिला होता त्याला तो तरी काय करणार म्हणा..
पण मला तो चांगला वाटायचा तु पा रे मध्ये.
मी स्टार प्रवाह घेतलं नाहीय पॅक मध्ये म्हणून मी ती सिरीयल बघितली नाहीय. गुड दॅट ही गॉट लीड रोल देर. !
Pages