ओट्स म्हणजे बारीक केलेला पुठ्ठा आहे हा समज काहीकेल्या जात नाही आणि नाश्त्याकरता हा प्रकार बेस्ट असतो. तर हा मसाला ओट्स करून पाहिले. सुरेख चवीचं प्रकरण जमलं म्हणून इथे देतो आहे.
- कुठलेही क्विक कुकिंग ओट्स (प्लेन, मसाला इ.) - पाऊण ते एक मध्यम वाटी
- अर्धी वाटी मटार दाणे
- अर्ध गाजर
- एक पातीचा कांदा, पातीसकट
- एक सिमला मिरची
- २ मध्यम टोमॅटो
- मीठ (मसाला ओट्स असतील तर त्या प्रमाणात कमी)
- जरासं लाल तिखट, हळद
- मॅगी कंपनीचे मसाला ए मॅजिक मसाल्याचे २ पाकिटं (हे नसतील तर त्या प्रमाणात तिखट, हळद + गरम मसाला घ्यायला लागेल; अर्थातच चवीत आठआणे फरक)
- गरम पाणी
- चमचाभर तेल
- सगळ्या भाज्या मध्यम बारीक चिरून घ्या
- चमचाभर तेलावर कांद्याच्या (पात नाही) फोडणीचं अंथरूण द्या, जरा मौ जाहला की मटार, गाजर, सिमला इ. घालून जरा परता
- यात आता सगळे कोरडे मसाले घालून काही सेकंद परतून पाणी घाला. हे भाज्या शिजणे + ओटस ला लागेलाइतकं घालायचंय.
- भाज्या बोटचेप्या झाल्या की ओट्स घालून ३/४ मिनिटं चांगलं रटरटू द्या. ओट्स क्विक कुकिंग वाले असल्यानी तेव्हड्या वेळात शिजतात.
- वरून कांद्याच्या पातीनी सजवून गरमागरम खायला घ्या.
- भाज्या, मीठ, मसाले, तिखट आवडीनुसार कमी जास्त करता येतात. मुळात ओट्स ला अंगची विशेष चव नसते सो आपल्या चवीचं करता येतं.
- पाण्याचं प्रमाण एकदा ओट्स च्या पाकिटावर पाहून घेणे, साधारण पणे ४० ग्रॅम (मध्य आकाराच्या वाटीने अर्धी ते पाऊण वाटी) ओट्स ला २०० एमएल (एक मध्यम आकाराचा पाणी प्यायचा पेला) पाणी लागतं.
ओटस आणि पुठ्ठा
ओटस आणि पुठ्ठा
अगदी अगदी.(बहुतेक देवाने हा चव नसलेला पदार्थ फक्त कोणतं तरी पीठ कमी पडत असल्यावर भर घालायला म्हणून बनवला असेल.)
तुमच्याकडे हल्ली रेसिपीबरोबर
तुमच्याकडे हल्ली रेसिपीबरोबर फोटो दिल्याने अगदीच फाऊल होतो असं दिसतंय.
आता हे करून बघा
छान केले.
आता हे करून बघा
https://www.maayboli.com/node/63086
मस्त आहे रेसिपी.. रोज प्लेन
मस्त आहे रेसिपी.. रोज प्लेन ओट्स खाऊन कंटाळा आला कि करायला एकदम परफेक्ट आहे..
त्या पेक्षा हे सर्व घालून
त्या पेक्षा हे सर्व घालून उपसां/ सांजा शेवई उपमा वगैरे करावे.
त्या पेक्षा हे सर्व घालून
त्या पेक्षा हे सर्व घालून उपसां/ सांजा शेवई उपमा वगैरे करावे.
नवीन Submitted by अमा on 13 February, 2020 - 00:10 >>>>>
स ह म त
प्लेन ओटस खूप उरले, आणि
प्लेन ओटस खूप उरले, आणि खाण्यायोग्य नसले तर त्याचा आंघोळीत बॉडी आणि फेस स्क्रब उत्तम होतो.
योकु तुम्ही कोणत्या कंपनीचे
योकु तुम्ही कोणत्या कंपनीचे ओट्स घेतले?
सफोला की quicker ओट्स?
सफोलाचे मला फार तिखट वाटतात.
ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांना ओट्स खायला सांगतात.
इट्स अ रिच सोर्स ऑफ फायबर.
प्लेन ओटस खूप उरले, आणि
प्लेन ओटस खूप उरले, आणि खाण्यायोग्य नसले तर त्याचा आंघोळीत बॉडी आणि फेस स्क्रब उत्तम होतो. >>>
ओट्सचा ग्रनोला करून कुणी खात
ओट्सचा ग्रनोला करून कुणी खात नाही का ? पुठ्ठा वगैरे अजिब्बातच वाटत नाही.
योकु, मॅगी मसाला घालून वगैरे चांगल लागेल पण हे ओट खाण्याचा उद्देश्य जर न्युट्रिशिअस काहीतरी खाण असेल तर तो साध्य होत नाही. त्यापेक्षा मग उपमा खाल्लेल काय वाईट ?
मी प्लेन ओट्स पाणी, मीठ घालून
मी प्लेन ओट्स पाणी, मीठ घालून शिजवते. त्यात दही / ताक घालायचे आणि वरून फोडणी ( असंख्य प्रकारे) घेऊन खायचे. आमच्या घरी हे खूप आवडतं. जर काही तोंडीलावण असेल तर ते घ्यायचे. कनिष्ठ नागरिक पापड, फरसाण पण घेतात; आम्ही त्याशिवाय आवडीने खातो.
मॅगी मसाला २ पाकिट? एवढे
मॅगी मसाला २ पाकिट? एवढे मसाले घालुन ओट्स खाण्याची काय मजबूरी आहे?
एवढे मसाले घालुन ओट्स
एवढे मसाले घालुन ओट्स खाण्याची काय मजबूरी आहे?>> अनुमोदन्. त्या ऐवजी एक प्लेट हैद्रा बादी हलीम खा. एक एक महिना एनर्जी राहिल तुम्हाला.
मला हा प्रश्न आहे की नंतर
मला हा प्रश्न आहे की नंतर अनाथ मसाल्याविन हीन दिन झालेल्या 2 मॅगी पाकिटाना कसं खपवायचं? ☺️☺️☺️
(आताच वर जाऊन वाचलं एके असलेल्या पाकीट मधला नाही, वेगळा क्यूब मिळतो तो वाला मसाला.त्यामुळे ही कमेंट फ़ौल मानावी.)
आम्ही क्वेकर चे प्लेन ओटस आणून थोडे भाजून बारीक करून भाकरीत किंवा मग नुसते भिजवून डोसा करायला वापरतो.खाववतात.
गोड़ वडया करा
गोड़ वडया करा
क्वेकर चे प्लेन ओटस पाण्यात
क्वेकर चे प्लेन ओटस पाण्यात शिजवुन -दुधात नाही - गरम असताना खजूराचे बारीक तुकडे घालुन खाते. छान लागतात.
अर्थात १५-२० दिवसातुन एकदाच खाते.
सस्मित,अमा,मस्त प्रतिसाद!
सस्मित,अमा,मस्त प्रतिसाद!
प्लेन ओट्स खाणं खरच कठीण आहे.
प्लेन ओट्स खाणं खरच कठीण आहे. ते संपवायला हा उपाय चांगलाय.
इथे अॅपल सिनॅमन, मॅपल ब्राऊन शुगर वगैरे फ्लेवर्ड व्हरायटी मिळते ती छान लागते.
बाकी फॉर मी पुठ्ठा/कार्डबोर्ड =प्रेट्झल्स
मी दोन्ही प्रकारच्या (प्लेन
मी दोन्ही प्रकारच्या (प्लेन आणि मसाला) ओट्स वर हा प्रयोग केलेला आहे. प्लेन ओट्स क्वेकर चे होते न मसाला वाले सफोला चे. अर्थातच मसाला वाल्याचा केलेला प्रकार जास्त आवडला.
मसाला घालून केलेला प्रकार पोषणमूल्यांच्या दृष्टीने कमी कसा काय ठरेल?
क्वेकर चे प्लेन ओटस पाण्यात
क्वेकर चे प्लेन ओटस पाण्यात शिजवुन -दुधात नाही - गरम असताना खजूराचे बारीक तुकडे घालुन खाते. छान लागतात.
अर्थात १५-२० दिवसातुन एकदाच खाते.>>>> सेम पिंच. मी रोज न चुकता ओटसच खाते. मावे मधे १ मिनिटात पाण्यात शिजतात मग त्यात कधी सफरचंदाचे तुकडे (साल काढून), मिक्स ड्रायफ्रूट्स किंवा खजूर घालून मस्त ब्रेफा होतो. समहाऊ ते फ्लेवर वाले किंवा मसाले वाले हे नाही खाऊ शकणार बहुतेक.
योकु, बेसिक प्रिंसिपल इन
योकु, बेसिक प्रिंसिपल इन (देसी) कुकिंगः चविष्ट/ मसालेदार == वाईट.
ब्लँड, बेचव = चांगलं.
हे कितीही फनी वाटलं तरी १००% सत्य मानून मी चालतो.
प्लेन ओट्स दुधात खजुर घालून आवडतात, पण रोज कंटाळा येतो. हे असे लक्षात ठेवेन पुढच्यावेळी.
सफोला मसाला ओटस मध्ये
सफोला मसाला ओटस मध्ये प्रिझर्व्हेटिव्ह असतात.फ्लेवर पाहिल्यास किंचित अजिनोमोटो पण असू शकेल.म्हणजे मॅगी टाळून मसाला ओटस खायला चालू करणं हा थोडा फसवा हेल्दीपणा मानता येईल.
घरी कमी तेलात फोडणी दिल्यास ठीक.
पण मलाही ओट ब्लॅंड चांगले लागतात.किंवा रूप लपवून डोसा बॅटर किंवा भाकरी पिठात किंवा आप्पे.
क्वेकर किंवा केलॉग्ज ओट्स
क्वेकर किंवा केलॉग्ज ओट्स आणि सफोला मसाला ओट्स वडिलांना आठवड्यातून तीन वेळा देतो. प्लेन ओट्स ते दुधातून खातात.
न कंटाळता खातात. हे हेल्थफुल आहे, असं समजून खात असतीलही.
मसाला ओट्सच्या व्हेजी ट्विस्टमध्ये ३.२% भाज्या आणि २% सुकं खोबरं आहे. फ्लेवर एन्हॅन्सर्स म्हणून सोडियमची संयुगं आहेत . ओनियन पावडरही आहे. नेहमीचे भारतीय मसालेसुद्धा आहेत. पण अजिनोमोटो नाही. हे आता तपासलं. फ्लेवर खूप स्ट्राँग आहे. टँगी टमाटो, पावभाजी असेही फ्लेवर्स आहेत.
मी स्वतः नुसते ओट्स कधीच खाल्लेले नाहीत. वर लिहिलंय तसं डोसा बॅटरमध्ये ढकललंय.
योकु ची रेसिपी म्हणून
योकु ची रेसिपी म्हणून उत्साहाने बघायला आले.
इथे बरेच जण ओट्स ची टेस्ट आवडत नाही म्हणून डोस्यामध्ये वैगरे मिक्स करून खातो असे म्हणत आहेत. आवडत नसताना सुद्धा खायलाच पाहिजे एवढे खरंच ओट्स पौष्टिक आहेत का? ओट्स नक्की कसले बनले असतात. इव्हन ऑफिस मध्ये पण ब्रेकफास्ट मध्ये ओट्स च खातो हे हल्ली बरेच जण सांगतात. ओट्स जर लगेच शिजतात तर मग pre cooked असतील ना? म्हणजे मग प्रोसेस्ड फूड झाले ना?
आवडत नाही तरी खायची जबरदस्ती
आवडत नाही तरी खायची जबरदस्ती वगैरे नाही.
'रोज नाश्ता काय ' या अल्गोरिदम च्या कोम्बो बॉक्स मध्ये अनेक पैकी एका ऑप्शन मध्ये बसवायचा तो पदार्थ आहे.प्रेमही नाही रागही नाही.त्याचं असणं हे जुन्या भिंतीवरील फिक्या डागाप्रमाणे.नसून आनंद होणार नाही आणि असून खंत नाही .(एक ओट आदमी को फिलॉसॉफर बना देता है ☺️☺️)
mi_anu अग मी सिरियसली
mi_anu अग मी सिरियसली विचारतेय.
सिरियसली:
सिरियसली:
ओटस खाणे सोपे पडते.त्यातल्या त्यात प्लेन आणि शिजायला वेळ लागतो असे निळे क्वेकर घेतले तर आठवड्यातून एखादा दिवस पोटभरीचे स्नॅक्स होते.अगदी चटपटीत चविष्ट(पोहे/उपमा/समोसा इ. सारखे) नसल्यानं निर्मोहीपणे प्रमाणात खाल्ले जाते.डोसा/भाकरीत फिलर म्हणून टाकता येते.
ओट्स वापरणार असाल तर क्विक
ओट्स वापरणार असाल तर क्विक कुकिंग नको, रोल्ड वापरा. रेडी मिक्स-मसाला वगैरे नको.
मी ओट्स वापरते ते ऑल पर्पझ फ्लोर( मैदा) याला पर्याय म्हणून बेकिंग मधे किंवा पांढर्या तांदळाला पर्याय म्हणून डोश्यात. लेक आणि नवर्याचा मित्र या दोघांसाठी ग्रॅनोला करते, दिवसभराच्या वडवडीत सोबत खाऊ म्हणून ठेवायला हा पर्याय कुठल्याही हवामानात त्यांना सोईचा होतो. नवरा रोज ओटमिल खातो कारण ते मावेत झटपट शिजतात, पावणेसहाला ब्रेकफास्टसाठी बेरीज घातलेले ओटमिल सोईचे होते, लंच टाईमपर्यंत निभाव लागतो.
खरेतर भारतीय आहारात बरीच तृणधान्ये वापरली जातात त्यामुळे होल ग्रेनची गरज सहज भागते. कडधान्यांच्या वापरातून सोल्यूबल फायबरही आहारात असतो. त्यामुळे आवडत नसेल तर मुद्दाम ओट्स आहारात हवेतच अशातला भाग नाही. पाश्चात्य आहारपद्धतीत मैद्याचा वापर भरपूर असतो, कढधान्ये फारशी वापरत नाहीत , हिरव्या पालेभाज्याही आहारात पुरेश्या नसतात. साहाजिकच डॉक्टर ओट्स खायचा सल्ला देतात.
मसाला ह्या भारतीय शब्दामध्ये
मसाला ह्या भारतीय शब्दामध्ये कोणकोणते जिन्नस समाविष्ट असू शकतात आणि त्यातले नक्की कोणते नुकसानकारक आहेत? किती प्रमाणात आणि किती क्वांटिटीमध्ये खाल्ले तर?
मला वाटते हळद हिंग कढीलिंब आले लसूण कोथिंबीर धने जिरे मिरी मोहरी तमालपत्र वेलदोडे जायफळ दगडफूल बादेलफूल ( बादयान, चक्री फूल) दालचिनी लवंग अनारदाणे कलौंजी हे जिन्नस ज्या प्रमाणात आपण सर्वसाधारणपणे वापरतो त्या प्रमाणात (quantity) ते हानिकारक नसावेत. मिरचीचा अतिवापर कदाचित हानिकारक असावा.
हीरा,
हीरा,
भारतीय मसाल्याचे पदार्थ हानीकरक नाहीत मात्र जे प्रोसेस्ड प्रकारासोबत लहान मसाला पाकिट प्रकरण येते टाळावे या मताची मी आहे. त्यात मीठाचे प्रमाण, नक्की मसाले म्हणून काय घातले आहे, स्टॅबिलायझर म्हणून काय आहे हे नीट वाचून ज्याने त्याने निर्णय घ्यावा. मी भारतीय मसाले घरी केलेले वापरते आणि परदेशी पद्धतीचे , जसे की टॅको सिझनिंग , केजुन मिक्स , ड्राय रब वगैरे देखील घरी तयार केलेले वापरते. मसाल्यात काय घटक वापरले आहेत आणि त्यांचा दर्जा काय आहे हे माहित असणे मला गरजेचे वाटते.
Pages