शेअर मार्केट हा अनेकांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. अनेक जण श्रीमंत व्हायचे स्वप्न बघून या क्षेत्रात येतात. काही यशस्वी होतात तर काहींच्या पदरी निराशा पडते. निराश होऊन शेअर मार्केटकडे पाठ फिरवणाऱ्यांचं प्रमाण हे 95% आहे असं मध्यंतरी कुठेतरी वाचलं होतं. मी सुद्धा दीड वर्षांपूर्वी या क्षेत्रात आलो. दीड वर्ष म्हणजे मी अजून या क्षेत्रात नवखाच आहे. या क्षेत्रात येण्याचं कारण म्हणजे इन्ट्राडे. हा एक भुलभुलैय्या आहे. जेव्हढे पैसे तुम्ही टाकता त्याच्या दहा पट किंवा वीस पट पैसे तुमचा ब्रोकर तुम्हाला देतो. म्हणजे जर तुमच्याकडे दहा हजार असतील तर इन्ट्राडे मध्ये तुम्ही 2 लाखापर्यंत शेअर घेऊ शकता. या मोहाला बळी पडून अनेकजण आपले हात पोळून घेतात. मी सुद्धा सुरवातीला दहा हजार घेऊन लाख दोन लाखाची गुंतवणूक करायचो. पण सखोल ज्ञान नसल्याने तोटा होत होता. पैसे मिळायचे परंतु ज्या दिवशी लॉस व्हायचा त्या दिवशी ओव्हर ट्रेडिंग करून अकाउंट खाली करायचो. नंतर हळूहळू गोष्टी समजत गेल्या आणि ट्रेडिंगमध्ये सुधारणा होत गेली. एक गोष्ट समजली की हा खेळ एन्ट्रीचा नसून एक्झिटचा आहे. 9.15 ला शेअर मार्केट सुरू होतं. हे एक चक्रव्यूह आहे जर एक्झिट माहीत असेल तरच एन्ट्री घ्या नाहीतर तुमचा अभिमन्यू होईल. हा धागा काढण्याचा उद्देश असा की जे चार्ट्स आहेत त्यात कोणाला काही इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. मायबोलीवर याचा सखोल अभ्यास असणारे अनेक मान्यवर आहे त्यांनी आपले मत मांडून इतरांच्या ज्ञानात भर करावी.
उद्या सोमवारी मला infy चार्ट इन्ट्राडेसाठी प्रॉमिसिंग वाटतोय. गेले 8-10 दिवस तो एकाच रेंजमध्ये फिरत होता ती रेंज तोडून त्याने वरती क्लोजिंग दिले तसेच या स्टॉकने इलीअट वेव्ह थेअरीची तिसरी वेव्ह सुरू केले असा माझा अंदाज आहे. येत्या काही दिवसात हा शेअर चांगले रिटर्न्स देऊ शकतो.
इंट्राडे चार्ट्स
Submitted by बोकलत on 5 January, 2020 - 00:20
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चांगला धागा.
चांगला धागा.
मी पण नवखाच आहे शेअर मार्केटमध्ये.
वेळे अभावी नीट टेक्निकल ऍनालिसिस जमत नसल्याने मी सध्या इंट्रा डे ट्रेडिंग क्वचितच करतो. बहुतेक करून ऑपशन्स रायटिंग करत असतो.
मी Infosys average ६४० ने घेतला होता आणि दोन दिवसांपुर्वीच प्रॉफिट बूक केले. मोठा ब्रेक आउट सध्या येणार नाही असा माझा अगदी मर्यादीतच माहितीतील अंदाज होता जो साफ चुकीचाही असू शकतो.
इतरांचे व्ह्यूज वाचायला आवडतील.
वाह! रोचक विषय आहे.
वाह! रोचक विषय आहे.
वाह! रोचक विषय आहे.
वाह! रोचक विषय आहे.
ह्या धाग्यावर वर मी वाचकाच्या
ह्या धाग्यावर वर मी वाचकाच्या भूमिकेत असणार आहे.
शेअर मार्केट विषयी सखोल ज्ञान (खरे तर बिलकूल च ज्ञान )नसल्या मुळे कोणतेच मत व्यक्त करणे आपल्या तत्वात बसणारे नाही.
इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग
इन्ट्राडे बाईंग, सेलिंग, लॉंग टर्म शॉर्ट टर्म संधी दिसत असतील तर त्यावर चर्चा व्हावी. >>>>>>>>
असे असेल तर धाग्याचे नाव ट्रेडींग आयडीया वगैरे करावे. धाग्याच्या नावावरुन फक्त इन्ट्राडे विषयी चर्चा अपेक्षित आहे असे वाटत आहे.
चांगला धागा. ह्या क्षेत्रात
चांगला धागा. ह्या क्षेत्रात नुकतीच सुरुवात केली आहे.
पण इलिअट वेव्ह वगैरे बाऊन्सर जातात.
असे असेल तर धाग्याचे नाव
असे असेल तर धाग्याचे नाव ट्रेडींग आयडीया वगैरे करावे. धाग्याच्या नावावरुन फक्त इन्ट्राडे विषयी चर्चा अपेक्षित आहे असे वाटत आहे.>>> चर्चेचा मुख्य विषय इन्ट्राडे ट्रेडिंग असणार आहे. त्यामुळे हे नाव ठेवलंय. सगळ्यांचे आभार.
चांगला धागा.
चांगला धागा.
एखादा विशिष्ट शेअर घेऊन त्यावर चर्चा केली तर जास्त चांगले होईल. त्या शेअर साठी वेगळा धागा काढला तरी चालेल. उदा. इन्फोसीससाठी मापृ यांनी वेगळा धागा काढला तरी चालेल, कारण त्या शेअरवर ते लक्ष ठेवून असतात.
राजकारणाचे धागे जसे ओसंडून वहात असतात अगदी तसंच इथेही घडू शकेल. पण इथली चर्चा ही अर्थपूर्ण असेल. त्यातून बरेच शिकता येईल. पैसेही मिळवता येतील. राजकारणाच्या धाग्यावरील प्रतिस्पर्धी इथे मित्रही होऊ शकतील.
थोडक्यात मायबोलीवरचे मराठी माणसांनी मराठी माणसांच्या उन्नतीसाठी चालवलेले मराठीतले मनीकंन्ट्रोल.कॉम

असाच एक धागा ऐसीवरचा.
http://aisiakshare.com/node/7396
हा आहे मिसळपाववरचा.
http://www.misalpav.com/node/45418
माहिती कुठेही असो. मराठी लोकांची बचत वृध्दीगंत होओ या हेतूने लिहितोय.
Wtchlist for 06.01.2020
Wtchlist for 06.01.2020





1. Infy
2. Voltas
3. UBL
4. AsianPaint
5 Equitas
6. LIichsgfin
7. Siemens
8. Axisbank
Rupee fall चा फायदा infyला
Rupee fall चा फायदा infyला होईल,
तसेच MACD देखील bullish आहे
आज काही चांगले शेअर्स खूप
आज काही चांगले शेअर्स खूप पडले का घ्यावेत का?
माझ्या मते आता घाई नको नवीन
माझ्या मते आता घाई नको नवीन काही घ्यायची.आज खूपच पडलंय मार्केट. तीन चार दिवस बघू काय करतंय.
घाई नको हे बरोबरंय.
घाई नको हे बरोबरंय.
पण सिप सारखी खरेदी करायचीच असेल तर सपोर्ट लेव्हल जवळ करावी असे वाटते.
मी इंट्रा डे करत नाही. पण
मी इंट्रा डे करत नाही. पण माझे व्हॅलु इन्वेस्टिंग करून झाले आहे. आता इथून बोध घेउन काही प्ले करावे इतकेच. बाकी ओव्हर ऑल मार्केट खूपच ओव्हर व्हॅलुड आहे. आता आत पडणे जोगे नाही.
Watchlist for 07.01.2020
Watchlist for 07.01.2020






1. NTPC
2. POWERGRID
3. ITC
4.LICHSGFIN
5. INDUSINDBK
6. VEDL
सध्याच्या अमेरिका इराण इश्यू
सध्याच्या अमेरिका इराण इश्यू मुळे पडणाऱ्या मार्केटमध्ये टेक्निकल चार्ट्सवर अवलंबून रहावे का?
निफ्टी इन्ट्राडे चार्टवर कालच्या फॉलवर Fibonacci retracement नुसार निफ्टी ११९१० ला जाईल असे दिसतेय, यावर काही कॉमेंट?
आज ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह
आज ग्लोबल मार्केट पॉझिटिव्ह आहे.
ITC काल माझ्या पण लिस्ट मधे
ITC काल माझ्या पण लिस्ट मधे आला. २५० तरी जाईल असे वाटते. SL day close below 234
११-२० दिवसापुर्वी झिरोधावर
११-२० दिवसापुर्वी झिरोधावर डिमंट खात उघडल. नवखा असल्याने कळत नव्हत की कोनता शेअर विकत घेऊ. हो नाही करत एक १५६४ वाला शेअर विकत घेतलाच . ५ ६ दिवस किंमत कमी जास्त होत होती. थोडी भीती देखिल वाटत होती. पण २ दिवसांनी किँमत वाढायला सुरूवात झाली आणी माझ्या शेअरची किँमत १९९४ झाली मी पटकन विकुनही टाकला. पहिल्यांदाच शेअर मार्कैट मध्ये पाऊल टाकल आणी माझा फायदा झाला ४०० रुपये खुप लहाण किँमत जरी असली तरी आतापर्यंत ज्या शेअर मार्केट बद्दल मला फक्त कुतुहल वाटायच त्या शेअर मार्केट मध्ये मला पहिला नफा मिळाला.
४०० रुपये खुप लहाण किँमत जरी
४०० रुपये खुप लहाण किँमत जरी असली तरी <<<< तुमच्या इन्व्हेस्टमेंटवर २५ % परतावा मिळालाय की. अजून काय हवे.
एका ठिकाणी वाचले की मार्जिनचे जे बदललेले नियम आहेत त्यामुळे काल बाजारात पोझिशन्स क्व्हर झाल्या. असूही शकते.
बहुतेक करून ऑपशन्स रायटिंग करत असतो. <<<< मानव, तुम्ही काय प्रकारे करता ? म्हणजे शेवटच्या आठवड्यात वगैरे का ?
मी नेक्स्ट एक्सपायरीचे
मी नेक्स्ट मन्थली एक्सपायरीचे स्ट्रँगल्स राईट करतो, निफ्टीचे. ते साधरण १ ते दोन आठवडे ठेवतो (इन्व्हेस्टमेंटच्या २.५% प्रॉफिट मिळत असेल तर आधीच स्क्वेअर ऑफ करतो).
आणि बँकनिफ्टीचे विकली एक्सपायरीचे फक्त कॉल्स राईट करतो सोमवार किंवा मंगळवारी, बहुत करून गुरुवारी ते आऊट ऑफ मनी एक्सपायर होतात.
मी हे गेले दोन महिन्यांपासूनच सुरू केले आहे ट्रायल बेसिसवर.
महिना ४ % च्या वर रिटर्न्स आहेत सध्या. मी जरा जास्तच लांब स्ट्राईक प्राईस वाले ऑप्शन्स राईट करतो.
मला वाटते नीट फाईन ट्युन केले तर महिना सरासरी ६% आसपास रिटर्न्स मिळू शकतील फार रिस्क न घेता.
अरे वा. छान.
अरे वा. छान.
हे कसे करायचे ते तपशीलात लिहाल का?
मला हे एकदा करून पहावयाचे आहे.
भागवत सर, सध्या फक्त ट्रायल
भागवत सर, सध्या फक्त ट्रायल बेसिसवर करत आहे, आणि दोन महिनेच झालेत. जरा अजुन अनुभव आला की मग लिहीन. ऑप्शन्सचा वेगळा धागा आहे का कुठला? असेल तर तिथे चर्चा यावर चर्चा करता येईल.
अहो, तुम्हीच काढा. जाणकार
अहो, तुम्हीच काढा की हो नवीन धागा. जाणकार आपोआपच येतील. सगळ्यांनाच उपयोग होईल.
तुम्ही सध्या हा प्रकार कसा करता आहात येवढे लिहिले तरी ती प्रस्तावना पुरेशी होईल.
बघा जमतंय का.
फक्त कॉल्स << फक्त कॉल्स ?
फक्त कॉल्स << फक्त कॉल्स ? पुट्स नाही का ?
नाही, बँकनिफ्टीचे फक्त कॉल्स
नाही, बँकनिफ्टीचे फक्त कॉल्स राईट करतो, एक्सपायरीच्या २ - ३ दिवस आधी.
ओके ऑप्शन्स रायटिंगचा धागा काढून माझे प्रयोग लिहीतो, जाणकारांकडून अधिक मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच
बँकनिफ्टीचे फक्त कॉल्स राईट
बँकनिफ्टीचे फक्त कॉल्स राईट करतो, एक्सपायरीच्या २ - ३ दिवस आधी. << हे सहीये. वेगळच आहे. प्लीज लिहाच.
हायझनबर्ग तुम्ही ऑप्शन वर
हायझनबर्ग तुम्ही ऑप्शन वर धागा काढणार होतात. प्लिज काढा आणि लिहा. तिथे मी काय करतो हे लिहिता येईल.
म्हणजे ऑप्शन्सची लोकांना आधी चांगली माहिती मिळेल आणि मी काय करतो हे लौकर लक्षात येईल.
ओके ऑप्शन्स रायटिंगचा धागा
ओके ऑप्शन्स रायटिंगचा धागा काढून माझे प्रयोग लिहीतो, जाणकारांकडून अधिक मार्गदर्शन मिळाले तर चांगलेच>>> +111111111
सगळ्यांच्या प्रयोगांवर एकच
सगळ्यांच्या प्रयोगांवर एकच धागा काढायचा की वेगवेगळा?
मी एक मेथड शिकून फॉलो करत आहे. मस्त चालू आहे.
Pages