Submitted by मनिम्याऊ on 21 December, 2019 - 23:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ:
१० मिनिटे
लागणारे जिन्नस:
ओला-कोवळा वाणीचा (ज्वारीचा) हुरडा 1 मोठी वाटी
.
कांदा १ बारीक चिरलेला
हिरव्या मिरच्या 2
कोथिंबीर
दही / लिंबू
मीठ
हळद
फोडणीसाठी
हिंग
मोहरी
तेल
चिमुटभर साखर
क्रमवार पाककृती:
हुरडा भरड वाटून घ्या
एका कढईत फोडणीसाठी तेल कडकडीत गरम करून घ्या.
त्यात हिंग, हळद, मोहरी आणि हिरव्या मिरच्या घाला.
चिरलेला कांदा घालून गुलाबी रंग येईतो परतून घ्या.
आता त्यात भरडलेला हुरडा घालून खमंग परता.
मीठ आणि चमचाभर दही, साखर घालून नीट मिसळून घ्या
थोडे पाणी घालून झाकण ठेवा आणि वाफ येऊ द्या.
सकाळी सकाळी कोवळ्या उन्हात बसून भरपेट खा.
वाढणी/प्रमाण:
2
अधिक टिपा:
पचायला हलका, अत्यंत पौष्टिक आणि तितकाच चवदार नाश्ता.
आवडत असल्यास यात उकडलेले तुरीचे दाणे घालू शकता
माहितीचा स्रोत:
आई
आहार:
पाककृती प्रकार:
प्रादेशिक:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
छान
छान
भारी दिसतोय
भारी दिसतोय
एकदम भारी! सोबत अधमुरं दही!
एकदम भारी! सोबत अधमुरं दही! मस्तच!
तोंपासु रेसिपी!
तोंपासु रेसिपी!
मस्तच हो मनिम्याऊ........
मस्तच हो मनिम्याऊ........
पण पुण्यासारख्या शहरात हा हुरडा कुठला मिळायला!
त्यामुळे तुमची पाककृती करून कशी बघणार?
हुरडा हा घरी बनवण्याचा पदार्थ
हुरडा हा घरी बनवण्याचा पदार्थ नाही
हा शेतात बनवून शेतात बसूनच खाण्यात मजा आहे..
ओला हरभरा शेतात भाजून खाणे.
ओल्या भुईमुगाच्या शेंगा शेतात भाजून खाण्यातच मज्जा आहे
पण पुण्यासारख्या शहरात हा
पण पुण्यासारख्या शहरात हा हुरडा कुठला मिळायला!
त्यामुळे तुमची पाककृती करून कशी बघणार?
Submitted by दीपा जोशी >>>>> शनिपार जवळ ज्या शेतकरी बायका भाज्या विकतात, त्यांच्याकडे असतो. बाजीराव रोडवर देसाई बंधु आणि बेहेरे कडे पण कच्चा हुरडा मिळतो.
हुरडा हा घरी बनवण्याचा पदार्थ नाही
हा शेतात बनवून शेतात बसूनच खाण्यात मजा आहे. >>>> बरं तर हुरडा राहू दे, पुण्यात शेतं कुठे मिळतील ते सांगा.
बरं तर हुरडा राहू दे, पुण्यात
बरं तर हुरडा राहू दे, पुण्यात शेतं कुठे मिळतील ते सांगा
हुरडा ची मज्जा शेतात
पण आपण शहरात हुरड्याची चव घेवू शकतो पण ती spl moments नाही अनुभवू शकत असे मला सांगायचे होते
छान प्रकार!
छान प्रकार!
मला आठवते पुर्वी आई असा हुरड्याच्या दिवसांत हुरडा वाळवून साठवत असे. आणि कधी मधी असा खायला उकडून खायला कांदा, लिम्बु, शेंगदाणे, कोथिंबीर वैगेरे वापरून नाष्टा बनवित असे.
पण आपण शहरात हुरड्याची चव
पण आपण शहरात हुरड्याची चव घेवू शकतो पण ती spl moments नाही अनुभवू शकत असे मला सांगायचे होते>>>>>>>>>>>> अश्या कितीतरी गोष्टीत आहते ज्या आपण मिस करतो.म्हणून केवळ ती स्पेशल मोमेन्ट किंवा ती व्यक्ती जिच्या हातची चव काही औरच किंवा ते ठिकाण असेच म्हणत जगायचं आणि जगणं सोडून द्यायचं. आता या घडीला जे लोक ज्या ज्या वयाचे असतील त्यांनी सगळ्यांनीच शेतात बसून हुरडे, मके, पोपटी केलीच असेल असे नाही किंवा लहानपणी जे अनुभवले तेच आता अनुभवायला मिळेल असे नाही. बनवायचे आणि खायचे अशा वस्तूसाठी आठवणी काढून टिपे गाळत बसण्यात काय मजा.
मस्त टेस्टी दिसतंय.
मस्त टेस्टी दिसतेय रेसिपी.
मस्त दिसतोय.
मस्त दिसतोय.
मनिमाउ , खुप छान दिसत आहे
मनिमाउ , खुप छान दिसत आहे पदार्थ. सासुबाई करतात पण त्यात कांदा घातलेला पाहिलं नव्हत. आता अस करून बघायला सांगते त्यांना.