चंदन बटव्याची जुडी (इथे अमेरिकेत ही भाजी आता कॉमनली पटेल वगैरे मध्ये मिळते)
अर्धा कप तुर डाळ,
लाल सुक्या मिरच्या,
गोडा मसाला १ टि स्पुन
लाल तिखट १ टि स्पुन
बेसन पीठ १ चमचा
शेंगदाणे कच्चे मुठभर
लसून आवडी नुसार,
गुळ
मीठ
मेथी दाणे पाव टि स्पुन/ ओवा पाव टि स्पुन (ऑप्शनल. माझ्या सगळ्या बेसन घातलेल्या भाज्यात मी हे घालते. तुम्ही स्किप केलेत तरी चालेल.)
चंदन बटवा निवडून घ्यावा व स्वच्छा धुवुन निथळत ठेवा.
तुरीची डाळ निवडून घ्या.
इन्स्टंट पॉट वर सॉते मोड ऑन करा. चार चमचे तेल घालून त्यात जीरे आणि लसून ,ओवा ,मेथी दाणे लाल मिरच्या घालून परतून घ्या. आता त्यात धुतलेली डाळ घाला. परतून घ्या .
शेंगदाणे आणि भाजी (चिरायची गरज नाही) घाला. त्यावर सर्व भाजी भिजुन + अर्धा कप एवढे पाणी घाला.
झाकण लावा. हाय प्रेशर चार मिनिट सिलिंग मोड.
चार मिनिटानी क्वीक रिलिज करुन त्यात बेसन चमच्याने हलवत घाला. गोडा मसाला, तिखट ,गुळ घाला .
आता परत झाकण लावून २ मिनिट प्रेशर सिलिंग मोड.
क्वीक रिलिज आणि आता भाजी एकसारखी मिळून येण्यासाठी चमच्याने घोटून घ्या. पातळ पीठल्यापेक्षा थोडी पातळ भाजी. पीता येण्यासारखी कंसिस्टंसी असावी.
(घोटणे वगैरे सारखी पेशन्स ठेवायची कामे फक्त आई लोकच करु शकतात. मी हँड ब्लें डर मिरच्यांचे तुकडे न होवू देता अर्धा मिनिट फिरवले. )
आता मस्त एकसारखी भाजी तयार झाली कि वरून जीरे , मोहरी हिंग फोडणी द्या. मीठ चवीनुसार घाला.
इन्स्टंट पॉट वर वार्म मोड मध्ये ठेवा.
गरम भात, तुप आणि ही भाजी छान लागते.
(मी बेसन चाळून ठेवते. म्हणजे डायरेक्ट घातले तरी गुठळ्या होत नाहीत.)
हँड ब्लेंडर ने फिरवता तेव्हा अगदी नाजुक पणाने. माझ्या कडे जो हँड ब्लेंडर आहे तो खुपच पॉवरफुल आहे. त्यामुळ मी १५-२० सेकंद फिरवते.
छान आणि सोपी रेसिपी. अशी पातळ
छान आणि सोपी रेसिपी. अशी पातळ भाजी गरम तूप भातावर घेऊन खायला छान लागते.
सगळ्याच पातळ पालेभाजीची कृती वाचताना मला एक गोंधळ असतो की भाजीबरोबर डाळ दाणे शिजवले तर भाजी घोटून घेताना ते क्रश होणार नाहीत का? हँड ब्लेंडरने केले तर नक्कीच होतील. आमच्या स्वयंपाक मावशी भाजी आणि तूरडाळ एकत्र शिजवतात आणि दुसऱ्या छोट्या छोट्या वाटीत डाळ दाणे.
सीमा , चन्दन बटवा आणि सुन्दर
सीमा , चन्दन बटवा आणि सुन्दर बटवा एकच का? प्लिज जमल तर ताज्या भाजिचा ( म्हणजे शिजायच्या आधिचा) फोटो टाकशिल का?
प्राजक्ता एकच गं. खरतर आम्ही
प्राजक्ता एकच गं. खरतर आम्ही चंदन बटवाच म्हणतो. इथली आणखी एक मैत्रिण म्हणाली सुंदर बटवा म्हणुन ते नाव लिहिल. मला वाटल कि चंदन बटवा कुणाला माहित आहे कि नाही काय माहित.
![bathua.PNG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u182/bathua.PNG)
![bathua2_0.PNG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u182/bathua2_0.PNG)
मीरा , डाळ मिक्सच व्हायला पाहिजे आणि एकसारखी कंसिस्टंसी येण्यासाठी .शेंगदाणे नाही क्रश होत नाहीत पण अगदीच अक्खे हवे असतील तर बीटर ने घोटून घेतलेस तरी चालेल.
हे नेटवरन फोटो घेतले आहेत.
इन्स्टंट पॉट मधून करायला सोपी वाटली . कुकर मधल्यासारखी भाजी शिट्टी झाल्यावर बाहेर येणे वगैरे प्रकार नाहीत. इन्स्टंट पॉट आता उपयोगी वाटू लागला आहे. नेक्स्ट प्रयोग रगडा पॅटीस आणि रिसोटो . मागच्या आठवड्यात पाव भाजी , मसाले भात करून पाहिले. जमले.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
दही अज्जिब्बात जमले नाही. धसका घेतला आहे कारण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये ओर्गॅनिक दुधाचा पाऊण कार्ट्न वाया गेला.
बॅक टु डॅनन/ गोपी किंवा अवन मध्ये करणे .
सीमा छान पाककृती. चंदन बटवा
सीमा छान पाककृती. चंदन बटवा करून पाहीन असा.
एक प्रश्ण : चंदन बटवा व चाकवत ह्या दोन वेगवेगळ्या भाज्या आहेत. पण ही एकच पाकृ. दोन्ही साठी लिहिलीय का ?
चंदनबटवा खरोखरंच बटव्याच्या
चंदनबटवा खरोखरंच बटव्याच्या आकाराचा असतो ना?
ही फोटोतली पानं करडईसारखी दिसताहेत. बथुआ म्हणजे सरसो का साग असं गुगलवर दिसतंय. करडई, मोहरी एकाच वर्गातली असतील म्हणून पानं सेम असतील कदाचीत. पण माझ्यामतेतरी हा चंदनबटवा नाही.
(मी तज्ञ नाही).
छान रेसिपी. करुन बघेन.
छान रेसिपी. करुन बघेन.
माझ्या माहीती नुसार ,
चंदन बटवा आणि सुंदर बटवा हे एकच आहे. हिन्दी मध्ये यालाच बथुआ म्हणतात.
पण चाकवतीची भाजी वेगळी असते.
चंदन बटवा कधी खाल्ली / ल्ला
चंदन बटवा कधी खाल्ली / ल्ला नाहीये. पण करून बघणार. ही पाने आंबाडीसारखी आंबट असतात का?
सीमा, मस्त.
सीमा, मस्त.
ही पाने आंबाडीसारखी आंबट असतात का? <<< नाही, माधव.
लसणात काटकसर करू नये. छान लागते भाजी.
चाकवताला तेलुगूमध्ये बतवा
चाकवताला तेलुगूमध्ये बतवा म्हणतात असं एका भाजीवाल्याने सांगितलं होतं. कन्नडमध्ये चकवता म्हणतात.
भाजी बऱ्याच वेळा करते. खूपच आवडते. कुकरमध्ये शिजवूनच करते.
चंदन बटवा ही थंडीत होणारी
चंदन बटवा ही थंडीत होणारी भाजी सरसो का साग मधे सरसोच्या भाजी बरोबर घालतात. त्याची पाने लहान असतात एकदम.
चाकवताची पाने मोठी असतात. वर दिलेला पहिला फोटो बटव्याचा तर दुसरा चाकवताचा आहे.
खालील लिंकवर दोन्हीचे फोटो आहेत :
http://www.zeemarathidisha.news/Details?NewsId=5442170149648456160&title...
सीमा मस्त वाटते आहे रेसिपी.
सीमा मस्त वाटते आहे रेसिपी. आमच्या इथे इंग्रो मधे दिसली नाही ही ताजी भाजी कधी. फ्रोझन पाकिटं असतात. ताजी कधी दिसली तर करून पाहीन. बेसन लावलेल्या पालेभाज्या चिल्लर पब्लिक आवडीने खातात
करडई, मोहरी एकाच वर्गातली असतील म्हणून पानं सेम असतील कदाचीत. पण माझ्यामतेतरी हा चंदनबटवा नाही.
(मी तज्ञ नाही). >> करडई सूर्यफूलाच्या फॅमिलीतली. लेट्युस पण याच फॅमिलीतले.
मोहरी , मुळा, पत्ताकोबी, अरुगुला हे सर्व ब्रासिका फॅमिलीतले
बथुआ हे माठ, राजगिरा, किन्वा हे सर्व एका फॅमिलीतले -
चंदन बटवा म्हणजेच चाकवत ना ?
चंदन बटवा म्हणजेच चाकवत ना ? इथल्या माहिती नुसार तरी तेच वाटतय.
https://en.wikipedia.org/wiki/Chenopodium_album
चंदन बटवा ही थंडीत होणारी भाजी सरसो का साग मधे सरसोच्या भाजी बरोबर घालतात. त्याची पाने लहान असतात एकदम.
आंबट चुका गुगल करुन पहा. तो फोटो येईल. मिनोतीच्या ब्लॉग वर पण आहे फोटो.
चाकवताची पाने मोठी असतात. वर दिलेला पहिला फोटो बटव्याचा तर दुसरा चाकवताचा आहे.>>>
नाही ग. दोन्ही फोटो त्याच भाजीचे आहेत इथे दिलेत ते. तु जी लिंक दिली आहेस त्यातला पहिला फोटो आंबट चुका आहे.
चाकवत आणि आंबट चुका मध्ये
चाकवत आणि आंबट चुका मध्ये कन्फ्युजन होत आहे बहुदा सगळ्यांचे.![Sad](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/sad.gif)
![ambat chuka.PNG](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u182/ambat%20chuka.PNG)
हा आंबट चुका
आता दुकानात गेले कि फोटो काढते. आमच्याकडे कुठलीही भाजी मिळते अलिकडे. ते कंटोला का काय असत ते आणुन करून बघायच आहे मला.
माझा मेन गोल ही भाजी
माझा मेन गोल ही भाजी लिहिण्याचा होता इन्स्टंट पॉट मध्ये कशी करता येत त्याचा. ते बाजुलाच राहिल.![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
कँटोला म्हणजे गोल काटेरी
कँटोला म्हणजे गोल काटेरी साळींदर ?
सीमा, छान.
सीमा, छान.
दही खुप सोपे आहे. तु कसे केलेस? थंडीत जरा जास्त विरजण घालून ३ तास ठेवते. छान होते.
सिलिंग मोड म्हणजे काय? मला हे शब्द आयपीवर पाहिल्याचे आठवत नाहीत.
पटेल ४० मैल दूर आहे, त्या ऐवजी कोणती भाजी वापरता येईल?
सिलिंग मोड म्हणजे काय>>>
सिलिंग मोड म्हणजे काय>>> झाकणावर असते ती शिट्टी. त्यात दोन मोड असतात एक वेंट आणि सिलिंग.
माझा मेन गोल ही भाजी
माझा मेन गोल ही भाजी लिहिण्याचा होता इन्स्टंट पॉट मध्ये कशी करता येत त्याचा. ते बाजुलाच राहिल>> सॉरी ! सुरवात मी केली फोटो टाकायला सान्गुन.
मस्त रेसिपी. काय म्हणतात इथे
मस्त रेसिपी. काय म्हणतात इथे चंदन बटव्याला? मोठ्या ग्रोसरी स्टोअरला गेले की बघेन.
हो इथे नाही पाहिलेली ही भाजी
हो इथे नाही पाहिलेली ही भाजी पटेल मधे. शोधून करून बघायला पाहिजे आता मुद्दाम.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
बटव्याची चर्चा वाचून अळशी, जवस , फरसबी, पावटा वगैरे चर्चा आठवल्या
दह्याचा माझाही इंपॉ मधला पहिला प्रयोग फसला होता. मग समजले की मी नुस्तेच दूध वार्म करत होते विरजण्या आधी. दह्याचा हमखास फॉर्म्युला म्हणजे आधी व्यवस्थित वर येईपर्यन्त दूध उकळायचं, मग रूम टेम्प. ला येईपर्यन्त थंड करायचं आणि मग आपलं गोपी किंवा देसी दही वापरून विरजण लावून ६-७ तास योगर्ट मोड वर ठेवायचं. हे केल्यावर दही एकदाही चुकलेले नाही तेव्हापासून.
अजून टिप म्हणजे दही लावताना इंपॉवर झाकण नेहमीचं इंपॉ चं वापरायचं नाही. नाहीतर भाज्यांचा वगैरे वास येतो दह्याला. त्याऐवजी ताट किंवा कोणतेही स्वच्छ झाकण वापरायचं.
माझा मेन गोल ही भाजी
माझा मेन गोल ही भाजी लिहिण्याचा होता इन्स्टंट पॉट मध्ये कशी करता येत त्याचा. ते बाजुलाच राहिल. Lol
सॉरी गं.. पण दोन्ही भाज्या वेगळ्या असल्याने जरा शंका आली. मीपण फोटो टाकते जमले तर.
अजून टिप म्हणजे दही लावताना
अजून टिप म्हणजे दही लावताना इंपॉवर झाकण नेहमीचं इंपॉ चं वापरायचं नाही >> म्हणके आयपी बंद न करता फक्त आतील दह्याच्या भांड्यावर ताटली ठेवायची?
सुनिधी, आयपीचं झाकण न लावता
सुनिधी, आयपीचं झाकण न लावता तो चालू कसा होईल?
आणि चालू झाला नाही की योगर्ट मोड काय नी सॉटे मोड काय?!
दह्याचा माझाही इंपॉ मधला
दह्याचा माझाही इंपॉ मधला पहिला प्रयोग फसला होता. मग समजले की मी नुस्तेच दूध वार्म करत होते विरजण्या आधी. >> मै , एक्जॅटली हेच केलेले कि ग मी.
यु ट्युब वाल्या बाईने फसवले मग मला. : राग :
आता परत करते तु लिहिलयस तस.
निलाक्षि/प्राजक्ता , जोक करत होते इन्स्टंट पॉट चा . नो वरीज. खर तर इन्स्टंट पॉट एकदम मोटिव्हेशनल गोष्ट झालीये माझ्यासाठी. कधी नाही ते जरा बर्यापैकी स्वयंपाक वेगवेगळा करु लागले आहे.
इन्स्टंट पॉट मधले फसलेले प्रयोग अजुन सांगितलेच नाहीत .![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
योगर्ट मोड मधे बिना झाकणाचा
योगर्ट मोड मधे बिना झाकणाचा किंवा ताटली झाकली तरी आयपी चालू होतो. आयपीवरच नेहमीच्या पॅन चे झाकण किंवा ताटली ठेवायची म्हणतेय मी. आतल्या भांड्यावर झाकण नाही ठेवले तरी चालेल.
![instant-pot-glass-lid.jpg](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/u31/instant-pot-glass-lid.jpg)
कारण असे की आयपीच्या झाकणाची सिलिकोन ची रिंग असते ती बाय डिफॉल्ट ओडर्स अॅब्सॉर्ब करते. कितीही धुतले तरी वास येतोच. म्हणून ताटली किंवा इतर झाकणाने झाकते मी. अशी:
थँक्स मैत्रेयी, अंजली-१२.
थँक्स मैत्रेयी, अंजली-१२.
अजुन एक, तुम्हाला ६-७ तास दह्याला लागतात? ३ तासात होतं खरंतर. प्रयत्न करुन पहा. सॉरी, या धाग्यावर दह्याची चर्चा वाढवत आहे पण सुरु झालीये तर म्हटले अर्धवट का सोडा?
> करडई सूर्यफूलाच्या
> करडई सूर्यफूलाच्या फॅमिलीतली. लेट्युस पण याच फॅमिलीतले.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
मोहरी , मुळा, पत्ताकोबी, अरुगुला हे सर्व ब्रासिका फॅमिलीतले
बथुआ हे माठ, राजगिरा, किन्वा हे सर्व एका फॅमिलीतले - > अच्छा. माहितीबद्दल धन्यवाद मेधा
===
ही कोणती भाजी आहे? फोटो इथून मिळाला. मी चंदनबटवा म्हणून जी भाजी बघितलेली ती ही असू शकेल. पान गोलकार आत वळून पॉकेटसारखा आकार झालेला, आणि पानाच्या कडा करवतीसारख्या होत्या.
बथुआ-चंदनबटवा-चाकवत वर झालेल्या जुन्या चर्चा:
बथुवा एक पालेभाजी.
बथुवा/ बथुआ पराठा
सरसों का साग
कोणती भाजी आहे? फोटो इथून
कोणती भाजी आहे? फोटो इथून मिळाला. _____ हा चुका आहे.amee,तुम्ही त्या इथून शब्दावर क्लिक करुन नंतर चन.बच्या फोटो वर क्लिक करा.त्यात चंब वेगळा दाखवला आहे.
सीमाने चंबचा बरोबर फोटो दिला आहे.
अॅमी हा आंबट चुका आहे .
अॅमी हा आंबट चुका आहे . ग्रीन सॉरेल .
पुढची रेसिपीची लिंक क्लिकच
पुढची रेसिपीची लिंक क्लिकच केली नव्हती मी
![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
पण चुक्याचा हा फोटो आणि वरचे सीमाने दिलेले तीन फोटो वेगवेगळे दिसताहेत. या फोटोत पानं गोल, टोकदार आहेत. वरच्या फोटोत चुका समोरून ब्लन्ट, आकार लंबगोल/आयताकृती आहे.