E-अंका करता साहित्य आवाहन

Submitted by शब्दांश प्रकाशन on 12 December, 2019 - 03:51

'स्त्री' शब्द ऐकल्यावर तुम्हाला कोण आठवते? सतत आपली काळजी घेणारी आई, सतत आपल्याशी भांडणारी पण इतरांशी भांडताना ठामपणे आपल्या बाजूने उभी राहणारी बहीण, पारावरच्या खाऊ देणाऱ्या आजी की चेष्टा करणारी मैत्रीण? अगदी ऐतिहासिक किंवा पौराणिक आख्यायिकांतील एखादी स्त्री व्यक्तीरेखा सुद्धा नजरेसमोर तरळून जाईल कदाचित. कोणीही आठवले तरी मनात भावनांचा ओलावा हा पसरतोच.
अश्याच मनात ठसलेल्या स्त्री व्यक्तीरेखेबद्दलच्या
तुमच्या मनातल्या भावना व्यक्त करा कवितेतून, लेखातून अथवा कथेतून. आणि पाठवून द्या आमच्या email address वर:
facebookalwayson@gmail.com

आवाहनास कारण की, आम्ही, शब्दांकुर ग्रूप काढत आहोत E- महिला विशेषांक!
तुमच्या मनाला भिडलेल्या स्त्री व्यतिरेखा केंद्रस्थानी ठेवून लिहिलेल्या कथा, कविता आणि लेखांची आम्ही आतूरतेने वाट पाहतो आहोत.
अगदी 'ओ स्त्री कल आना' हे वाक्य आठवून तुम्ही 'स्त्री' सारख्या चित्रपटाची समीक्षा लिहिलीत तर तीही स्वागतार्ह आहे आणि रुद्रम मालिकेतल्या रागिणी बद्दल लिहिलेत तर ते सुद्धा!
चाफेकळी नाकाची मस्तानी शब्द बद्ध करा किंवा शब्दांच्या पल्याडचे कर्तुत्व गाजवणारी झाशीची राणी तुमच्या लेखणीतून उमटू द्या.

आम्ही आतूर आहोत तुम्हाला समजलेल्या स्त्री व्यक्तीरेखे बद्दल किंवा व्यक्तीमत्वाबद्दल जाणून घ्यायला.
हवे तर मनात उमटलेली छबी रेखांकित करा.

महत्त्वाच्या बाबी:

१. साहित्य स्वरचित हवे. चित्र असेल तर स्वत: रेखाटलेले हवे.
२. कुठल्याही ठिकाणी प्रकाशित झालेले नको.

या संदर्भात आम्हाला मिळालेले साहित्य E-अंकात समाविष्ट करण्याची परवानगी साहित्यिक स्वेछेने देत आहे, असे गृहीत धरले जाणार आहे. त्याच बरोबर, आम्ही स्वयंसेवी साहित्य संघ असल्या कारणाने अंक विनामूल्य वाचण्याकरिता उपलब्ध करून देत असतो. म्हणूनच साहित्यिकानेही कुठल्याही आर्थिक व्यवहाराची अपेक्षा ठेवू नये, ही नम्र विनंती आहे.

साहित्य पाठवायची अंतिम तारीख : १५ जानेवारी २०२०

विशेष नोंद: साहित्यात स्त्री केंद्रस्थानी असणे, हे सोडून बाकी कुठलेही बंधन अथवा शब्द मर्यादा नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत - धन्यवाद.

पुरोगामी गाढव - शब्दांकुर हे हिन्दी प्रकाशन आणि या आमच्या मराठी स्त्री विशेष E-अंकाचा काहिही संबंध नाही.
शब्दांकुर हे ग्रुपचे नाव आहे.

> सतत आपली काळजी घेणारी आई, सतत आपल्याशी भांडणारी पण इतरांशी भांडताना ठामपणे आपल्या बाजूने उभी राहणारी बहीण, पारावरच्या खाऊ देणाऱ्या आजी की चेष्टा करणारी मैत्रीण?> यांच्याबद्दल निबंध वाचूनवाचून अजीर्ण झालंय Sad

लिव्हिंग लीजण्ड लता मंगेशकर, लीझ माईटणर, नाईटींगेल, बो डेरेक, पामेला अ‍ॅण्डरसन, थॅचर बाई, नीरा राडीया अशा बायांबद्दल लिहीलं तर नाही चालणार का ?

> सतत आपली काळजी घेणारी आई, सतत आपल्याशी भांडणारी पण इतरांशी भांडताना ठामपणे आपल्या बाजूने उभी राहणारी बहीण, पारावरच्या खाऊ देणाऱ्या आजी की चेष्टा करणारी मैत्रीण?> यांच्याबद्दल निबंध वाचूनवाचून अजीर्ण झालंय>>>

मग शिव्या घालणारी आई, प्रॉपर्टीत हक्कासाठी दावा ठोकणारी बहीण, पारावर बसून अमक्यातमक्याचं कार्टं (कार्टी) कसं वाया चाललंय हे चांडाळपणे चघळणारी खाष्ट आजी आणि येताजाता तत्वज्ञान शिकवणारी जाडी मैत्रिण यावर लिहा-वाचा. हाकानाका.

हाआ Rofl Rofl

पण जर खरंच असे लेख आले तर तो माझ्यादृष्टीने चांगला अंक असेल.
तुमच्या नात्यातल्याच हव्यात असं काही नाही पण आतापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला भेटलेल्या unconventional स्त्रिया (शक्यतो वाईट!) असा विषय द्यायला हवा अंकासाठी.

लिव्हिंग लीजण्ड लता मंगेशकर, लीझ माईटणर, नाईटींगेल, बो डेरेक, पामेला अ‍ॅण्डरसन, थॅचर बाई, नीरा राडीया अशा बायांबद्दल लिहीलं तर नाही चालणार का ?>>>>>>>>> चालेल.

पण आतापर्यंतच्या आयुष्यात तुम्हाला भेटलेल्या unconventional स्त्रिया (शक्यतो वाईट!) >>>
यात ऑनलाईन भेटलेल्या add करा. माबोवर पाच-पन्नास सापडतील. Proud

शब्दान्कुर, हा अन्क ऑनलाईन कुठे वाचायला मिळेल? लिन्क देता का प्लिज? गुगलून पाहिल पण काहीच फायदा झाला नाही.

प्रश्न - 'स्त्री' शब्द ऐकल्यावर तुम्हाला कोण आठवते?

उत्तर -राजकुमार राव

आणि पुरुष म्हटल्यावर नाना आणि रीमा