आज हैदराबाद प्रकरणातील आरोपीचं encounter करण्यात आलं.
अर्थातच हे सगळे प्रकरण घडवून आणण्यात आलं हे न समजण्याारखे आपण कोणीही दूधखूळे नाही.
या encounter नंतर समाजाच्या विविध स्तरांवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
उच्च स्तरांवरील काही प्रतिक्रया माझ्या वाचनात आल्या.
त्यात काही intelectual मानले जाणारे प्रतिथयश नट , राजकारणी, लेखक यांचा समावेश आहे.
बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.
यातील अनेक विचारवंत गेली कित्येक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या हिडीस घटनांनी मुळीच विचलित झालेले दिसत नाहीत. स्वतंत्र भारतात गेले ७५ हून अधिक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांनी समाजाचा लोप होत नाही असे त्यांचे मत आहे वाटते.त्या जश्या काही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत जणू.रोज सकाळच्या चहासोबत चावायला मसाला.
पण एक दिवस या ४ पाशवी गुन्हेगारांना रक्तरंजित शासन काय होते आणि या अचानक समाज उतरणीला लागतो की काय???
हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही.केवळ अपवाद आहे.
काही वेळा झोपलेल्या समाजाला जागे करायला अश्या अपवादांची चपराक लावायचाच लागते.सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यावर कायद्याच्या रक्षकांनी न्याय व्यवस्थेवर काढलेला हा desperate तोडगा होता.त्यांची सालटी काढायला हे विचारवंत लांडगे जमले. मग यांच्यात आणि त्या अपराध्यांमध्ये फरक तरी काय?
बाहुबली मध्ये स्त्रीलोळूप सेनापतीला शासन होते तो प्रसंग हे सगळे विचारवंत भारावून जाऊन पाहतात, मग सत्यात उतरल्यावर इतका तळतळाट कश्यासाठी?
याला hippocracy म्हणतात.
माझ्या मते हे सगळे विचारवंत केवळ भी्माचार्य आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण मान खाली घालून पाहणारे.
नको तिथे नियमांची आणि morality chi फुटपट्टी लावणारे षंढ विचारवंत.
अरे त्या निष्पाप मुलींच्या वेदनांची जरा तरी तमा बाळगा.
ती तुमची बहीण, मुलगी, आई , मैत्रीण ,बायको असती तर morality सुचली असती का रे?
केवळ संविधानाने वाटेल तशी मते प्रदर्शित करण्याचा हक्क दिले आहेत म्हणून जीभ मोकाट सोडायची.
घरी बसून वाहत्या गंगेत हात धुणे सोपे असते.
बाकी तर समाज उतरणीला लागलाच आहे या so called विचारवंतांचा मते.पण तो नेमका कोणामुळे लागला आहे त्याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
ईश्वर त्या निष्पाप जीवाला सद.गती देवो.
For we don't deserve you, we are Hippocrates!!!
आम्हाला माफ कर.
पुरोगामी
पुरोगामी
ह्या प्रश्नाच्या उत्तरा भोवतीच उन्नव च्या प्रश्नांच्या उत्तराची पार्श्वभूमी आहे
ओ बास करा पांचट महाशय.
ओ बास करा पांचट महाशय. त्यांचे एण्काऊंटर कधीच होणार नाही हे शेंबड्या पोरालाही समजते. ज्याचा कुणी वाली नाही त्याचा एण्काउंटर होईल. साध्वी प्रज्ञाला अटक झाल्यावर बोंबा मारणा-यांनी गुन्हेगाराचे समर्थन का असा प्रश्न करूच नये. ते ही गुन्हेगाराचे समर्थन केलेले नसताना. तुमचा पांचटपणा हा लिहीता लिहीता शिकण्यातून आणि वापस यू टर्न मरून आपल्या जुन्या विचारसरणीकडे जाण्यातून येतो.
एक पे कायम रहो. शिकायचेय की विचारसरणीला चिकटायचेय ?
शिकायचे असेल तर पूर्ण विचारांती प्रतिसाद लिहीत चला. विचारप्रक्रिया सुरू झाल्याबरोबर त्यातले अक्षर न अक्षर लिहून सर्वांची दमछाक नका करत जाऊ. काय म्हणायचेय हेच कुणाला कळत नाही.
<< ह्या प्रश्नाच्या उत्तरा
<< ह्या प्रश्नाच्या उत्तरा भोवतीच उन्नव च्या प्रश्नांच्या उत्तराची पार्श्वभूमी आहे >>
------ उन्नावची कुठली घटना ?
एका पक्षाचा आमदार सेनेगर (पक्षाचे नाव लिहील्यावर भाजप भक्त खवळतात म्हणून मी पक्षाचे नाव लिहीणे टाळतो ) आरोपी असलेली घटना का ?
त्या सेनगरच्या घटनेत FIR नोंदवतांना पोलिसांनी किती महिने लावले ? साधा FIR लिहायला अत्याचार ग्रस्त मुलीच्या वडिलांना प्राणाची आहुती द्यावी लागली... आणि मगच FIR ची नोंद झाली. नंतरही केस मागे घेण्यासाठी दबाव तंत्र वापरले गेले... आणि एका घडवलेल्या अपघातात मुलीच्या जवळच्या नातेवाईकाची हत्या करण्यात आली (अपघात घडवण्याचा उद्देश मुलीला मारणे हाच होता).
ताज्या हैद्राबादच्या घटनेतही पोलिसांनी सुरवातीला FIR नोंदवायला अक्षम्य विलंब लावला.... अनेक प्रश्न उपस्थित केले.... वेळीच कारवाई झाली असती तर ?
अडचण समजत आहे.
अडचण समजत आहे.
जावू ध्या.
तो विषयच नको
राजेश, इथे तुमच्यापेक्षा
राजेश, इथे तुमच्यापेक्षा माहिती घेऊन लोक लिहीत असतात. तुमचे आपले डायरेक्ट हुं करून चढाई सुरू. वाचत सुद्धा नाहीत प्रतिसाद पूर्ण. त्याचे आकलन होते की नाही कल्पना नाही.
उन्नाव मधे गेल्या अकरा महीन्यात ८६ घटना घडल्या आहेत बलात्काराच्या. किती जणांचे एण्काउंटर झाले. आता ज्या महीलेला जाळले ती गँगरेपची बळी आहे. बलात्कार करणारे त्रिवेदी कुटुंबातले चार जण आहेत आणि एक त्यांचा नातेवाईक आहे. जळीत झाल्यानंतर ताबडतोब फॉर्वर्ड यायला लागले की पीडीतेचं त्रिवेदी कुटुंबातल्या मुलासोबत लग्न होणार होते पण ऐनवेळी नकारातून दुश्मनी झाली इत्यादी. आता हे असे फॉर्वर्ड्स नेमके गंभीर गुन्हा झाल्यानंतर येणे हे कशाचे लक्षण आहे ?
सेनेगरची तर केसच वेगळी. जर त्या त्रिवेदी कुटुंबाचे एण्काउंटर होत नसेल तर त्याचे होणार का ? आता त्याच्याही बाजूने फॉर्वर्डस यायला लागलेत. तो कसा समाजोपयोगी कामे करतो इत्यादी.
अशा लोकांनी खरेच हैद्राबाद घटनेबद्दल अवाक्षरही काढू नये. दुतोंडी जमात आहे ही.
हो आणि हैद्राबादच्या केस मधे
हो आणि हैद्राबादच्या केस मधे सर्वच आरोपी मुस्लीम होते असे फॉर्वर्डस देखील आलेच होते. नंतर ते तोंडावर आपटले हे नशीब.
अशा केसेस मध्ये राजकारण आणू
अशा केसेस मध्ये राजकारण आणू नये हे मी प्रथम पासूनच सांगत आलो आहे.
परंतु काही लोकांना ते सोयीचे आहे म्हणून एका पक्षाला झोडपत आहेत.
इथे शिवसेना आणि राकाँ च्या दोन केसेस आहेत त्याबद्दल काय झाले हे कोणालाच माहिती नाही. आणि या केसेस महाराष्ट्रातीलच आहेत.
https://timesofindia.indiatimes.com/city/mumbai/NCP-leader-and-former-Ma...
https://www.indiatoday.in/crime/story/ahmednagar-shiv-sena-leader-booked...
महाराष्ट्रात खुनी उमेदवार निवडून येत नाहीत हा पण एक गैरसमज आहे. आताच उच्च न्यायालयाने खुनाबद्दल शिक्कामोर्तब केलेले अरुण गवळी हे सुद्धा मुंबईतील चिंचपोकळी येथून आमदार म्हणून निवडून आलेलेच होते.
कोणत्याही पक्षाचे आमदार खासदार हे फौजदारी गुन्ह्यात आरोपी नाहीत असे नाहीच.
श्री संजय राऊत हे सुद्धा दंगे करणे, लोकांना धमकावणे, प्राणघातक शस्त्रे बाळगणे आणि त्यांचा वापर करणे अशा गुन्ह्यात आरोपी आहेत हे त्यांच्या राज्यसभेच्या शपथपत्रातच लिहिलेले आहेत. तेंव्हा कोणताही राजकारणी हा धुतल्या तांदळाचा नाही.
"बळी तो कान पिळी" हि म्हण सत्य आहे
एकवेळ असे गृहीत धरून चालले की
एकवेळ असे गृहीत धरून चालले की पीडितांसाठी मनापासून झगडणारा एखादा गट आहे, त्यांना न्याय मिळावा म्हणुन सदैव झगडतो आहे, पण पूर्ण न्यायव्यवस्थेतील (फिर्याद नोंदवून घेणे ते दिलेली शिक्षा अमलात आणणे पर्यंत) ढिसाळपणामुळे गुन्हा सिद्ध झालेले सुद्धा अजुन उजळमाथ्याने फिरताहेत म्हणुन हतबल होऊन त्यातील कोणी संतापाच्या भरात, गुन्हा सिद्ध झाल्यावर असे एन्काऊंटर केले असते आणि पुढे येऊन 'होय मी न्याययंत्रणेला जागं करण्यास, एक मोठा धक्का देण्यास असं केलं आहे, आता त्यात सुधारणा होतील आणि वेळेत न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे' असं म्हटलं असतं तरी गोष्ट एकवेळ वेगळी असती, ही अपवादात्मक केस ठरली असती.
इथे ज्यांना तक्रार नोंदवून घ्यायला सुद्धा रस नसतो त्यांनी अचानक प्रकरण अगदीच भयानक निघालं आणि लोक संतप्त होऊन निदर्शने करत आहेत, आपली नाचक्की होते आहे हे पाहून त्या (किंवा अजून कुठल्या?) दबावाखाली केलेलं हे एन्काऊंटर आहे.
या दोन्हीतील फरक लक्षात येतो का बघा.
इतर कुणा पीडितेवर अन्याय होत असेल पण त्याची मीडियात / लोकांत बोंब नाही, कसला दबाव नाही तिकडे त्यांचे नेहमी सारखे दुर्लक्षही सुरू असेल, तशात त्यांनी आधी फेक एकाउंटर्सही केले आहेत ज्यात निरपराध मारले गेले, त्याच्या लिंक्स इथे / दुसऱ्या धाग्यात भरत / पुगा यांनी दिल्या आहेत. पीडितांना न्याय मिळावा म्हणुन ते झटत नाहीयेत. अशा एन्काऊंटर्सचे समर्थन केले तर काटा काढायला / मोठा दबाव असताना ऍक्शन दाखवायला उद्या निरपराधीही मारले जाऊ शकतात.
या एन्काऊंटरला या कारणांस्तव समर्थन नाहीये, आरोपी निर्दोष वाटत होते / किंवा त्यांचा पुळका आला म्हणुन नव्हे.
-----
परत एकदा भूमिका मांडण्याचा हा प्रयत्न.
स्वतःची गैरसोय झाली की
स्वतःची गैरसोय झाली की राजकारण आणू नये हा देखील हातकंडा जुना झाला.
एकाच्या बाबत एण्काउंटर आणि दुस-या बाबतीत नाही हा भेदभाव सांगितला की राजकारण होते का ? शिवाय जी मंडळी करताहेत त्यांचा बचाव कशाला करायचा ?
<< श्री संजय राऊत हे सुद्धा
<< श्री संजय राऊत हे सुद्धा दंगे करणे, लोकांना धमकावणे >>
----- देशाचे विद्यमान गृहमंत्री साहेब यांच्याबाबत आपले मत वाचायला आवडेल....
ज्यांनी एखाद्या पक्षाचे
ज्यांनी एखाद्या पक्षाचे वकीलपत्र घेतले आहे त्यांनी कृपया राजकारण आणू नये म्हणून टाहो फोडू नयेत ही विनंती. हैद्राबादच्या घटनेत सर्व आरोपी मुस्लीम आहेत असे फॉर्वर्ड फिरण्यामागे काय मानसिकता असेल हे सांगायला हवे का ?
हेडलाईन मॅनेजमेंट असते. जिथे घटना ठळक मथळ्यात दिली जाते आणि क्रौर्यासहीत मांडली जाते तिथे जनमत प्रक्षुब्ध होत असते. एरव्ही एकाखाली एक पान क्र. चार, सहा, आठ वर खालच्या कोप-यात उत्तर प्रदेशात बलात्कारीतेचा खून अशी चार ओळीची बातमी असली की लोक वाचून दुर्लक्ष करतात. कुणाचंही रक्त उसळत नसते अशा वेळी. कधी कधी एखा खाली एक अशा सहा बातम्या आल्या तरी रोजचे मरे म्हणून लोक फाट्यावर मारतात अशा घटना.
सर्वच घटनातले क्रौर्य सारखेच असते. मात्र काही अशा पद्धतीने उजेडात येत नाहीत. उन्नावची घटना तर सुरूवातीला उजेडात नव्हती आली. पीडीतेने पोलीस स्टेशनसमोर जाळून घेतले म्हणून लक्ष वेधले गेले. नाहीतर काय ?
याला राजकारण आणू नये म्हणून बोळवण करणार का ? आपण काहीही बोंबा माराव्यात आणि प्रतिवाद झाला की साळसूदपणाचा आव आणायचा. समोरच्यावर राजकारण केल्याचा आरोप करून भोकाड पसरायचे आणि आपण लै सज्जन चा आव आणायचा. बास की आता.
सुबोध खरे, मी इथे पक्षीय
सुबोध खरे, मी इथे पक्षीय राजकारण हा मुद्दा आणलेला नाही. उन्नावमधल्या एकाच केसमध्ये राजकीय व्यक्ती आहे. पीडित आणि अन्याय कर्ता यां च्या सामाजिक स्तरावरूनच गुन्हा नोंदणीकर णापासून न्यायदानापर्यं तची प्रक्रिया कशी चाले ले हे ठरते हे उघड आहे. मग ती केरळमधली नन वि. प्रीस्ट असो किंवा माजी खासदार चिन्म यानंद आणि कॉलेज विद्यार्थिनी.
पपण आपण सामान्य माणसाने रि अॅक्ट होतानाही फक्त असाच विचार केला तर आपण व्यवस्थेवर चिडलो आहोत हे कसे पटावे?
मानव +१. मी केव्हापासून तेच लिहितो आहे.
वर राजेश यांनी नागपूरमधल्या एका गुंडाचा स्त्रियांच्या (?) जमावाने केलेल्या लिंचिंगचा उल्लेख केला, त्याला व्यवस्थेबद्दलची चीड म्हणता येईल.
उन्नाव मधे एका पक्षाचे नाव
उन्नाव मधे एका पक्षाचे नाव (पुन्हा भक्तांच्या नाजूक भावनेला ठेच पि पोहोचते म्हणून भाजपा टाळतो) पुढे आल्यावरच रा कॉ , सेना यांचे यांनी पण असे गंभिर गुन्हे केले आहेत आणि लिंका पुढे येतात....
महिलांवर अन्याय करणारा कुठल्याही पक्षाचा असेल ते अत्याचारी /घृणास्पद कृत्य सर्वकाळात निषेधार्ह आहे..... तिथे पक्ष, जात, धर्म, आरोपीची समाजातली पत असे निकष लावून भुमिका ठरवू नका..... please.
त्या उनाव घटनेत बॉयफ्रेंड/ नवरा असे लिहीतांना थोडीतरी लज्जा बाळगा... पिडित व्यक्तीवर अनेक वेळा बलात्कार झालेला आहे, आणि आता अत्यंत अमानुषपणे मारले आहे.
बलात्कार होताना संरक्षणार्थ
बलात्कार होताना संरक्षणार्थ ठार केले तर कुणी गळे काढत नाही. महीलेच्या संरक्षणार्थ कुणीही हे काम करू शकतो. अनेकदा लोक छेडछाड होत असताना बघ्याची भूमिका घेत असतात. हेच लोक प्रतिक्रिया देताना सर्वात पुढे असतात. यांना नैतिक अधिकार आहे का ?
ज्या महिलांना त्रास झाला आहे त्यांनी ठेचून मारणे हे बेकायदेशीर असेल नसेल, पण त्याचा निषेध करणे चुकीचे आहे. पोलीस त्या गुंडाला प्रोटेक्शन देत होते. याचाच अर्थ त्याचा कधीच एण्काउंटर झाला नसता. याच गोष्टीला आक्षेप आहे. पोलिसांना योग्य ठरवताना जरा तरी विचार करावा.
मुंबई एण्काऊंटर्सच्या खूप सुरस आणि चमत्कारीक कहाण्या आहेत. काहींनी शंभर शंभर एकर जमिनी, महाबळेश्वर, पांचगणीला शाळा वगैरे विकत घेतल्या आहेत.
भाजप चा असला तरीही गुन्हेगार
भाजप चा असला तरीही गुन्हेगार हा गुन्हेगार म्हणूनच वागवला गेला पाहिजे.
उद्या मध्य प्रदेशात भाजपचा गुन्हेगार काँग्रेस मध्ये गेला म्हणून पवित्र होत नाही किंवा उत्तर प्रदेशात काँग्रेसचा गुन्हेगार उमेदवार भाजप मध्ये गेला तर पवित्र होत नाही.
मी परत परत तेच सांगतो आहे.
गुन्हेगार कोणत्याही पक्षाचा असो त्याला न्याय तोच लावला पाहिजे यात अजिबात शंका नाही.
हा धागा केवळ "बलात्कार आणि न्याय" याचा आहे त्यात राजकारण आणून मूळ मुद्द्याला बगल दिली जात आहे.
सुबोध खरे माझा पोस्टवर पण
सुबोध खरे माझा पोस्टवर पण तुम्ही तेच तुणतुणं वाजवलं आहे. तिथे प्रश्न विचारले की कांगावा करून पळ काढला आहे. त्यात राजकारण कसे काय आले होते हे सांगा. कुठेही ही टेप नका लावू. त्यामागचा कावा लक्षात आला आहे.
<उद्या पब्लिक मॉब कस्टडीतल्या
<उद्या पब्लिक मॉब कस्टडीतल्या रेपिस्टला मारायला कमी करणार नाही ; > हेही होऊन गेलं आहे या देशात. अगदी महाराष्ट्रातही मुलं पळवणारे म्हणून जमावाने काहींचे मॉब लिंचिंग केले. पोलिसांना रोखून धरले होते. ईशान्येकडच्या एका राज्यात पोलीस को ठडीतल्या की तुरुंगातल्या माणसाला मारले गेले होते.
< शिवाय ह्या घटनेने निदान गरीब / कनिष्ठवर्गीय गुन्हेगारी वृत्तीच्या टोळक्यांना तरी धाक बसला असावा , की या गुन्ह्यानंतर पकडले गेलो तर जीवही जाऊ शकतो> hear hear.
तेच उन्नाव सारख्या प्रकरणात एन्काउंटर झाला तर सगळ्यांनाच धाक बसेल. पण तसं लिहायलाही बोटं धजावत नाहीत. पुन्हा एकदा अजापुत्रं बलिं दद्यात.
सरसकट एन्काऊंटर चुकीची ठरवू
सरसकट एन्काऊंटर चुकीची ठरवू नका.
घातक शस्त्र हातात असलेल्या गुंडाला कसे पकडायचे?
ह्याचे शास्त्र अजुन विकसित झालेलं नाही.
अशा वेळी गोळ्या च घालाव्या लागतात
ओ. तुम्ही धागा भरकटवताय.
ओ. तुम्ही धागा भरकटवताय.
घातक शस्त्र हातात असलेल्या
घातक शस्त्र हातात असलेल्या गुंडाला कसे पकडायचे?
ह्याचे शास्त्र अजुन विकसित झालेलं नाही. >> मग १९२५ पासून काय गोट्या खेळल्या का ?
ह्या धाग्याच्या तो विषय नाही.
ह्या धाग्याच्या तो विषय नाही.
पण खून,बलात्कार,विरोधी लोकांवर अत्याचार करणाऱ्या घटनांची लिस्ट काढली
तर काँग्रेस,समाजवादी,
कम्युनिस्ट ,पुरोगामी विचाराचे पक्ष.
ह्या लोकांची लिस्ट एवढी मोठी दिसेल की तिथे bjp म्हणजे किस झाड की पत्ती
वाटेल.
टाका लिस्ट.
टाका लिस्ट.
सुबोध खरे माझा पोस्टवर पण
सुबोध खरे माझा पोस्टवर पण तुम्ही तेच तुणतुणं वाजवलं आहे. तिथे प्रश्न विचारले की कांगावा करून पळ काढला आहे. त्यात राजकारण कसे काय आले होते हे सांगा. कुठेही ही टेप नका लावू. त्यामागचा कावा लक्षात आला आहे.
तुमच्या त्या पोस्ट मधील फोटो मध्ये पार्श्वभूमीवर "भाजपचे पोस्टर्स" दिसत आहेत हा "योगायोग आहे किंवा अनवधानाने झाले" असे तुमचे म्हणणे असेल तर मी माझे म्हणेन मागे घेईन.
तिकडचे धुणे इथे धुवू नका एवढीच आपल्याला विनंती आहे.
त्यात तुम्हाला कावा वाटत असेल तर माझा नाईलाज आहे.
बाकी आपला माझ्याबद्दल पूर्वग्रह असावा असे वाटते.
कारण राजेश हा माझा डू आयडी किंवा एकच व्यक्ती असावि असा बिनबुडाचा आरोपही तुम्ही केला आहे.
मी जालावर माझ्याच मूळ नावाने वावरतो आणि माझी ओळख लपवण्याची किंवा विचारसरणी बदलण्याची मला कधीही गरज पडलेली नाही.
तुमच्या त्या पोस्ट मधील फोटो
तुमच्या त्या पोस्ट मधील फोटो मध्ये पार्श्वभूमीवर "भाजपचे पोस्टर्स" दिसत आहेत हा "योगायोग आहे किंवा अनवधानाने झाले" असे तुमचे म्हणणे असेल तर मी माझे म्हणेन मागे घेईन. >>>>> अच्छा, म्हणजे ती मिर्ची लागली होय तुम्हाला. म्हणजे मी जाऊन ती पोस्टर्स लावली आणि मग फोटो काढले म्हणायचेय का ?
तुमच्या माहितीसाठी सांगतो, उन्नाव बलात्कार आणि जळीत प्रकरणी काढलेल्या महिलांच्या मूकमोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याची ही छायाचित्रे आहेत. छायाचित्र पोलिसांची वृत्ती दाखवण्यासाठी आहेत. एकीकडे एण्काउंटर आणि एकीकडे बलात्काराच्या आणि जळीताच्या प्रकरणी कावराई करण्याबद्दल केलेल्या मागणीला दुसरी ट्रीटमेंट देण्याबद्दल आहेत ती. पण म्हणतात ना चोराच्या मनात चांदणे तसे झाले असेल बहुतेक तुमचे. आता पोलिसांनाच विचारा की भाजपची छायाचित्रे असलेल्या ठिकाणी का मारहाण केली ते. ते एकच चित्र आहे, दुस-या चित्रात आंदोलक महीलेला खाली पाडून तिच्या छाताडावर महिला पोलीस बसलेली आहे. त्यात रस्ता आला आहे. हे पण राजकारणच आहे का ?
हेच उत्तर तुम्हाला तिथे देता आले असते. पण फक्त तुणतुणे वाजवून पळ काढला. नाहीतर तिथेही हेच थुत्तर फोड उत्तर मिळाले असते. तुम्ही कुठेही तुमची धुणी धुवायला स्पेशल परवानगी मिळालीय का तुम्हाला आर्मीत काढली तशी ?
कारण राजेश हा माझा डू आयडी
कारण राजेश हा माझा डू आयडी किंवा एकच व्यक्ती असावि असा बिनबुडाचा आरोपही तुम्ही केला आहे. >>> असा आरोप कुठे केला आहे ते वाक्य कॉपी पेस्ट करा बरं.
ओहो. सुबोध खरे आणि राजेश १८८
ओहो. सुबोध खरे आणि राजेश १८८ यांना उन्नावचे नाव घेतलेले का आवडले नाही ते लक्षात येतंय.
छान छान.
तिथेही हेच थुत्तर फोड उत्तर
तिथेही हेच थुत्तर फोड उत्तर मिळाले
आपली मनोवृत्ती समजली.
आपल्याशी वितंडवाद घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही.
धन्यवाद
सुबोध खरे हा स्वतंत्र आयडी
सुबोध खरे हा स्वतंत्र आयडी आहे नी माझा स्वतंत्र आयडी आहे.
दोन्ही व्यक्ती वेगळ्या आहेत.
कोणत्या ही व्यक्ती नी व्यक्त केलेली मत सर्वानाच मान्य नसतात हे मला माहीत आहे.
तसेच मी व्यक्त केलेल्या मतावर वेगवेगळ्या व्यक्ती वेगवेगळा विचार करतील .
काही ना पटतील काहींना बिलकुल पटणार नाहीत तर काहींना दखल घेण्याचा लायकीची सुद्धा वाटणार नाहीत हे स्वाभाविक आहे.
त्या विरोधी मत व्यक्त करणाऱ्या व्यक्तीचं सुद्धा मी स्वागत च करतो.
विशिष्ट पक्षाच्या विचार धारेशी विशिष्ट प्रसंगावर अनुकूल मत व्यक्त करणारी व्यक्ती त्या पक्षाचा कार्यकर्ता असतो किंवा प्रचारक असतो हे काही सत्य विधान नाही.
अनुभव,बाजूची राजकीय सामाजिक परिस्थिती नुसार लोकांचे विचार निर्माण होत असतात.
हैदराबाद च्या गुन्हेगारांचे एन्काऊंटर झाले मग bjp चा नेता ज्या गुन्ह्यात सामील आहे त्याचे का एन्काऊंटर झाले नाही.
त्या नेत्याचे सुधा एन्काऊंटर करण्याची मागणी hyadrabad संबंधित घटनेचे समर्थन करणारे का करत नाहीत.म्हणजे ते bjp वाले आहेत.
हा विचारच हास्यास्पद आहे.
भारतात आर्थिक आणि राजकीय दृष्टीने सशक्त असलेल्या व्यक्तीला कोणतेच कायदे नसतात हे nagad सत्य आहे इथे पक्षीय भेदभाव नाही.
तिथेही हेच थुत्तर फोड उत्तर
तिथेही हेच थुत्तर फोड उत्तर मिळाले
आपली मनोवृत्ती समजली.
आपल्याशी वितंडवाद घालण्याची माझी अजिबात इच्छा नाही.
धन्यवाद >>>> तुमच्या प्रतिसादात तुम्ही बरं तुमचीच लाल असा शब्दप्रयोग केला होता. मी उत्तर दिल्यानंतर तो संपादित केलात. थुत्तरफोड हा शब्द त्या मानाने फारच सौम्य आहे आणि मायबोलीवर अगदी सामान्य आहे. तुमचीच लाल असा शब्द वापरणा-याने दुस-याची मनोवृत्ती काढावी ही गंमतच नाही का ?
ताक : हे सुद्धा थुपो उत्तर आहे आणि ते सामान्य आहे.
अहो ताई,
अहो ताई,
त्या समाज सेवक सेनगर ला शिक्षा झाली बरं. कळावे. नोंद असावी.
(टीप: हा प्रतिसाद लेखिकेसाठी आहे. खऱ्या लोकांनी स्वतःला ताई समजून घेऊ नये)
Pages