आज हैदराबाद प्रकरणातील आरोपीचं encounter करण्यात आलं.
अर्थातच हे सगळे प्रकरण घडवून आणण्यात आलं हे न समजण्याारखे आपण कोणीही दूधखूळे नाही.
या encounter नंतर समाजाच्या विविध स्तरांवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
उच्च स्तरांवरील काही प्रतिक्रया माझ्या वाचनात आल्या.
त्यात काही intelectual मानले जाणारे प्रतिथयश नट , राजकारणी, लेखक यांचा समावेश आहे.
बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.
यातील अनेक विचारवंत गेली कित्येक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या हिडीस घटनांनी मुळीच विचलित झालेले दिसत नाहीत. स्वतंत्र भारतात गेले ७५ हून अधिक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांनी समाजाचा लोप होत नाही असे त्यांचे मत आहे वाटते.त्या जश्या काही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत जणू.रोज सकाळच्या चहासोबत चावायला मसाला.
पण एक दिवस या ४ पाशवी गुन्हेगारांना रक्तरंजित शासन काय होते आणि या अचानक समाज उतरणीला लागतो की काय???
हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही.केवळ अपवाद आहे.
काही वेळा झोपलेल्या समाजाला जागे करायला अश्या अपवादांची चपराक लावायचाच लागते.सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यावर कायद्याच्या रक्षकांनी न्याय व्यवस्थेवर काढलेला हा desperate तोडगा होता.त्यांची सालटी काढायला हे विचारवंत लांडगे जमले. मग यांच्यात आणि त्या अपराध्यांमध्ये फरक तरी काय?
बाहुबली मध्ये स्त्रीलोळूप सेनापतीला शासन होते तो प्रसंग हे सगळे विचारवंत भारावून जाऊन पाहतात, मग सत्यात उतरल्यावर इतका तळतळाट कश्यासाठी?
याला hippocracy म्हणतात.
माझ्या मते हे सगळे विचारवंत केवळ भी्माचार्य आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण मान खाली घालून पाहणारे.
नको तिथे नियमांची आणि morality chi फुटपट्टी लावणारे षंढ विचारवंत.
अरे त्या निष्पाप मुलींच्या वेदनांची जरा तरी तमा बाळगा.
ती तुमची बहीण, मुलगी, आई , मैत्रीण ,बायको असती तर morality सुचली असती का रे?
केवळ संविधानाने वाटेल तशी मते प्रदर्शित करण्याचा हक्क दिले आहेत म्हणून जीभ मोकाट सोडायची.
घरी बसून वाहत्या गंगेत हात धुणे सोपे असते.
बाकी तर समाज उतरणीला लागलाच आहे या so called विचारवंतांचा मते.पण तो नेमका कोणामुळे लागला आहे त्याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
ईश्वर त्या निष्पाप जीवाला सद.गती देवो.
For we don't deserve you, we are Hippocrates!!!
आम्हाला माफ कर.
प्रत्येक मुलीला महिलेला बंदूक
प्रत्येक मुलीला महिलेला बंदूक द्यावी व कुणी अत्याचाराचा प्रयत्न केला तर मारण्याची मुभा असावी.पोलिस न्यायालयं पोसाण्यापेक्षा तो खर्च हत्यार वाटपावर करावा.
केशव तुलसी आयडिया वाईट नाही.
केशव तुलसी आयडिया वाईट नाही.
इन्स्टंट गुन्ह्यामध्ये तुमची आयडिया उपयोगी पडेल.
पण गुन्हा करणारे हे योजना बनवून सर्व शक्यतांचा विचार करून गुन्ह्याला अंतिम स्वरूप देता ते पूर्वनियोजित असते त्या मुळे धोका आणि कमजोरी ह्यांचा विचार केलेला असतो पण जे गुन्ह्याचा शिकार बनतात त्यांच्या साठी ती घटना अकस्मात घडलेली असते त्या मुळे प्रतिकार करणे शक्य होत नाही.
अगदी बोफोर्स तोफ जरी असेल स्वतः जवळ तरी तिचा वापर करण्या एवढं वेळ मिळत नाही.
गुन्हे रोकायचे असतील तर सक्षम यंत्रणा च हवी.
गुप्त माहिती,लोकांच्या वर्तनावर नजर ठेवणारी यंत्रणा,संशयास्पद हालचाल वाटली की ताबडतोप कारवाई.
आणि गुन्हेगारांना कडक आणि लवकर शिक्षा ह्याच पद्धतीने जावं लागेल
काही वर्षापूर्वी एक मिलिट्री
काही वर्षापूर्वी एक मिलिट्री ऑफिसर कारने जात असताना ती आणि तिच्या १६ वर्षीय मुलीवर चार जण गाडी वाटेत अडवून बलात्कार करू शकतात आणि तेहि तिचा नवरा आणि मुलगा सोबत असताना तर सामान्य मूली आणि स्त्रीयाबाबत काय बोलावे ज्याना सेल्फ डिफेन्स टेक्निक्स बद्दल गमभनसुद्धा येत नाही.
तात्पर्य - स्त्रियांकडे पिस्टल असून / देवून बलात्कार थांबणार नाहीत. समाजात सुसंकृत नागरिक बनवण्याची प्रोसेस फक्त प्रथमिक शाळेपुरता मर्यादित न ठेवता तिला पर्यत्न पूर्वक व्यापक स्वरूप देणे आणि त्याची नियमित अंमल बजावणी होणे आवश्यक आहे तरच हां बलात्कार संबधी गुन्ह्याचा ग्राफ कमी कमी होत अखेर शून्यावर स्थिरावेल.
ताई तुमचा या intellectual
ताई तुमचा या intellectual लोकांवर फार राग दिसतो. असल्या विरोध करणाऱ्या लोकांनाच गोळ्या घालाव्या का? आता ते कोण हे ओळखायचे कसे तर कंबोडिया देशात पॉल पोट या नेत्याने चष्मा घालणारे ते सगळे Intellectual असे ठरवून त्यांना गोळ्या घातल्या होत्या.
निर्भया प्रकरणी न्यायालयाने
निर्भया प्रकरणी न्यायालयाने न्याय दिला का? जो दिला गेला तो न्याय होता का? त्याची आलंबजावणी झाली का? त्यातल्या एकाला शिवण मशिन आणि १०००० देऊ केल्याचे माहिती आहे का? त्यावर तुम्ही सारे खुश आहात का?
या प्रश्नांची उत्तरे शोधा.
आणि हे आरोपी निर्दोष आहेत, असा समज कशावरून करून घेतलाय नक्की एनकाउंटरचा विरोध करणाऱ्या लोकांनी?
हैदराबाद आरोपीचं एन्काउंटर
हैदराबाद आरोपीचं एन्काउंटर होऊ शकतं कारण ते ट्रक ड्रायव्हर आणि cleaner होते.उन्नावमधली एक मुलगी आज लढाई हरलीय. दुसरी हरल्यात जमा आहे.
दोघींच्या मारेकऱ्यांचा एन्काउंटर होईल का?
आरोपी दोषी असले तरी त्यांना
आरोपी दोषी असले तरी त्यांना शिक्षा द्यायचा अधिकार पोलिसांना नाही हे समजायला विचारवंत असायची गरज नाही.
एन्काऊंटर योग्य नाही म्हणणारे
एन्काऊंटर योग्य नाही म्हणणारे आरोपी निर्दोष आहेत असे मानतात असा समज कसा करून घेतला एन्काऊंटरचे समर्थन करणाऱ्यांनी?
ज्या पोलिसांनी
ज्या पोलिसांनी प्रियांकाबद्दलची तक्रार नोंदवण्यात आणि शोध घेण्यात कर्तव्यच्युती केली त्यांचं मॉब लिंचिंग व्हावं असं म्हटलं तर विचारवंतांचा शिक्का बसणार नाही ना?
आरोपी निर्दोष आहेत असे आता
आरोपी निर्दोष आहेत असे आता तरी म्हणता येत नाही.
पण हैदराबाद पोलिस ची एन्काऊंटर ची पद्धत चुकीची आहे .
हे एन्काऊंटर योग्य असे म्हणतात ते राक्षसी वृत्ती मध्ये देव शोधत आहेत.
हा राक्षस कायद्या chya बाटलीत बंद आहे ते योग्य आहे तो मोकळा झाला तर समाजातील प्रतिष्ठित लोकांना,बलाढ्य लोकंना ,अधिकारी लोकांना,काही धोका करणार नाही पण कमजोर वर्ग,स्त्रिया,मुल ह्यांना देशोधडीला लावेल ह्याचे भान ठेवा .
हे एन्काऊंटर योग्य असे
हे एन्काऊंटर योग्य असे म्हणतात ते राक्षसी वृत्ती मध्ये देव शोधत आहेत. >>
राजेशभाऊ अगदी योग्य वाक्य आहे हे.
त्वरित न्याय हवा या अपेक्षेत गैर काहीच नाही.
एन्काऊंटरने तो त्वरीत न्याय झाला असे त्यांना वाटते आहे, पण हे एन्काऊंटर पीडितेला न्याय देण्यास केले गेले आहे का किमान याचा तरी विचार आधी करावा.
अरे बसले की गप्प आता समर्थक.
अरे बसले की गप्प आता समर्थक. हरले. आता तरी बास
बायकांना शस्त्रे द्यावीत
बायकांना शस्त्रे द्यावीत म्हणजे कुणी त्यांच्या वाट्याला जाणार नाही असे ऐकायला बरे वाटले तरी गुन्हेगार जर ठरवून गुन्हा करत असतील तर कपटाने ते शस्त्र हस्तगत करतील आणि त्याच्याच धाकाने अत्याचार करतील.
मुलींना पिस्तुल वगैरे चालवणे, ते उत्तम स्थितीत ठेवणे ह्या गोष्टी शिकवणार कोण? स्कूटर वा सायकल चालवताना वा मूल कडेवर असताना ही शस्त्रे सज्ज करुन गुन्हेगारांवर चालवता येतील असे मला वाटत नाही.
पोलिसांनी आपले काम जास्त चांगले केले पाहिजे. सरकारी पगार, ओव्हरटाईम, पेन्शन वगैरे त्यांना भरपूर दिले जावे. पण कुचराई झाल्यास ते आयुष्यातून उठतील अशी शिक्षा असली पाहिजे. मग कदाचित ते चांगले काम करतील. त्यांच्या हातात आधुनिक शस्त्रे आणि प्रशिक्षण दिले तर कदाचित जास्त उपयोगी ठरेल.
लिन्चिंग वा एन्काऊंटर हे झोपलेल्या न्यायव्यवस्थेला उठवण्याकरता झटका म्हणून उत्तम आहे पण तसा पायंडा पडला तर जंगल राज होईल. पाकिस्तान वा सोमालिया सारखी स्थिती भारताची होईल.
सामो, गप्प बसण्याचा प्रश्न
सामो, गप्प बसण्याचा प्रश्न नाहीये गं.
जर आरोपी दोषी होते, तर त्यांना मृत्यू मिळायला हवा होता शिक्षा म्हणून आणि तो मिळाला, हे महत्त्वाचे आहे. न्यायालय हे काम निर्भया प्रकरणी अजून तरी करू शकले आहे काय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.
पण हे सगळे मुख्य प्रश्नांना बगल देत आहेत हे समजले, म्हणून दुर्लक्ष करते आहे.
मधुरा मीही समर्थक आहे पण गप्प
मधुरा मीही समर्थक आहे पण गप्प बसायचे ठरवले आहे. अशी एक सणसणीत चपराक आपल्या सिस्टिमला हवीच होती. असो!! मौन!
एक सणसणीत चपराक आपल्या
एक सणसणीत चपराक आपल्या सिस्टिमला हवीच होती.>>>>>>>>>> अगदी अगदी......
काही लोक माबोवर पडीक असतात.
काही लोक माबोवर पडीक असतात. तुम्ही पूर्व म्हणाला कि पश्चिम कसे बरोबर म्हणून वाद घालत बसतात. तुम्ही पश्चिम म्हणालात तर पूर्व म्हणत वाद घालतात.
टाईमपास चालू असतो- मजा घ्या ...
अरे बसले की गप्प आता समर्थक.
अरे बसले की गप्प आता समर्थक. हरले. आता तरी बास Wink
काही लोक माबोवर पडीक असतात. तुम्ही पूर्व म्हणाला कि पश्चिम कसे बरोबर म्हणून वाद घालत बसतात. तुम्ही पश्चिम म्हणालात तर पूर्व म्हणत वाद घालतात.
टाईमपास चालू असतो- मजा घ्या ...
वामपंथी योग्य तेच बोलतात हो. ते म्हणतील ती पूर्व दिशा
हातकड्या घातलेल्या चार खुनशी
हातकड्या घातलेल्या चार खुनशी आरोपींनी दहा सशस्त्र पोलिसांकडून त्यांची शस्त्रे हिसकावून घेतली त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करून जखमी करत पळून जाण्याचा प्रयत्न केला. शेवटी शौर्याची पराकाष्ठा करीत जखमी पोलिसांनी चौघा क्रूरकर्मा नराधमांना महत्प्रयासाने गोळ्या घातल्या.
आरोपींशी घडलेल्या धुमश्चक्रीची अशी रक्तरंजित शौर्यगाथा वर्णन करणार्या तत्वनिष्ठ पोलिसांना 'हेच खरे गुन्हेगार कशावरुन?' असा अविश्वास दाखविणारा अनैतिक प्रश्न विचारणाऱ्या विचारजंतांचा जाहीर निषेध.
हैदराबाद आणि उन्नावची तुलना
हैदराबाद आणि उन्नावची तुलना होऊ शकत नाही. दोन पूर्ण वेगळ्या केस आहेत.
उन्नावची 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' कॅटेगरीतील केस होती.
<<< हैदराबाद आणि उन्नावची
<<< हैदराबाद आणि उन्नावची तुलना होऊ शकत नाही. दोन पूर्ण वेगळ्या केस आहेत.
उन्नावची 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' कॅटेगरीतील केस होती.>>>
------ दोन्ही घटना माणुसकीला काळिमा फासणार्या आहेत. एका घटनेत काही तासात होत्याचे नव्हते झाले दुसर्या घटनेत अनेक महिने, अनेक वेळा अत्याचाराला सामोरे जावे लागले. आता तर पिडिताचे प्राणच गेले... काय म्हणायचे? (सुटका झाली असे लिहायला पण लाज वाटते
).
पिडिताची जात वेगळी आहे म्हणून तो गुन्हा तेव्हढाही गांभिर्याने घेण्यासारखा वाटत नसेल... किंवा लग्नाचे आमिष दाखवले म्हणजे गुन्ह्याची गंभिरता / तिव्रता कमी होत असेल तर... अशी सामाजिक मानसिकता गुन्ह्याएव्हढीच गंभिर आहे. काहींसाठी गुन्हा कुणी केला, पिडिता कुठल्या जातीची धर्माची आहे हे पण महत्वाचे आहे. त्यावर प्रतिक्रिया किंवा तुलना होत नाही असे निष्कर्ष काढायचे.
उन्नावमध्ये दोन केसेस आहेत.
उन्नावमध्ये दोन केसेस आहेत. पहिल्या केस बद्दल मौन पाळणंच काहींना सोयीचं आहे.
दुसर्या केसमध्ये त्या मुलीला जिवंत जाळलं हे क्षम्य दिसतंय.
दोन्ही केसेसची तुलना होऊ शकत नाही याची कह्री कारणं पीडित आणि आरोपींच्या सामाजिक स्थानात आहेत.
छत्तीसगढमध्ये २०१२ साली झालेल्या एका मास एनकाउंटरचा चौकशी अहवाल समोर आलाय. त्याची लिंक दुसर्या धाग्यांवर आलेली आहे. स त रा लोक मारले गेले. स त रा. नक्षलवादी असं लेबल लावून.
हा अहवाल ही एनकाउंटर सिस्टिमला चपराक आहे का नाही ते माहीत नाही.
हैद्राबाद मध्ये आता एनकाउंटर करणार्या पोलीस अधिकार्याने याही आधी असाच एनकाउंटर केल्याचा दाखला आहे. मुंबईमध्ये काही पोलिस अधिकारी एनकाउंटर स्पेशालिस्ट म्हणून प्रसिद्ध होते. त्यातला एक आता विधानसभा निवडणुकीला उभा होता.
निर्भयाप्रकरणी न्यायालयाने स्वतःचे काम केव्हाच केले आहे. आता प्रकरण सरकारच्याच हाती आहे. (आता) बलात्कार्यांना ३/७/११ दिवसांत फाशी दिली जाते असं प्रचार सभांत सांगणारा माणूस या सरकारचा प्रमुख आहे.
जे पोलीस बलात्काराची तक्रार महिनोन महिने नोंदवून घेत नाहीत, त्यासाठी एखाद्या मुलीला मुख्यमंत्री निवासस्था नी जाऊन आत्म दहन करावं लागतं, जे पोलीस प्रियांका रेड्डीच्या कुटुंबीयांना तुमची मुलगी पळून गेली असेल असं म्हणतात तेच पोलीस तुमचे हिरो आहेत कारण तुम्हाला सू ड उगवल्याचं समाधान मिळतंय.
निर्भया आणि प्रियांका आपल्याम्हणून, आपल्यासारख्या असतात म्हणून त्यांच्याबाबत काही झालं की आम्हांला जाग येते, आम्ही रस्त्यावर, फेसबुकवर, सोशल मीडियावर येतो. बाकीच्या मुलीं आपल्यासारख्या थोड्याच असतात? आपल्याला काय त्याचं?
आपल्या सारख्या आहेत आणि
आपल्या सारख्या आहेत आणि आपल्या सारख्या नाहीत हा काय प्रकार आहे?
प्रत्येक बलात्कारी व्यक्तीला कठोर शिक्षा झाली पाहिजे आणि कायदा, न्यायव्यवस्था ती वेळेवर देऊ शकत नाही, हा मुद्दा आहे.
इथली लोकं कुठला विषय कुठे घेऊन जातील काही सांगता येत नाही.
आणि त्यांचा एनकाउंटर मुद्दामच
आणि त्यांचा एनकाउंटर मुद्दामच झालाय असं गृहीत धरलंच आहे, पण त्याने ते बलात्काराच्या गुन्ह्यात निर्दोष सिद्ध होत नाहीत.
पण त्यामुळे ते पोलिस दोषी
पण त्यामुळे ते पोलिस दोषी असल्याचं सिद्ध होतंय. तुम्ही ते मान्य केल्याबद्दल अभिनंदन.
स्वतः पोलिस हा कायदा व्यवस्थेचा मोठा भाग आहेत आणि तेच बलात्कार, स्त्री अत्याचार प्रकरणी हलगर्जीपणा करतात हे पुन्हा पुन्हा सिद्ध होतंय. आता एन्काउंटर करणारे हैद्राबाद पोलिस पुढच्या मिसिंग कंप्लेंटवर तडक अॅक्शन घेतील याची काय गॅरंटी?
आणि जे पोलिस गुन्हेगारांना शिक्षा देण्यात असमर्थ ठरतात तेच सिस्टिमला चपराक देता त असं तुम्ही म्हणताय?
एन्काउंटर करताना त्या पोलिसांच्या डोक्यात निर्भयाचे अपराधी नव्हते, तर स्वतः ची कर्तव्यच्युती आणि त्यामुळे गेलेला एक जीव आणि जनक्षोभ होता.
हा एनकाउंटर योग्य होता, तर उन्नावप्रकरणातल्या आरोपींचा एनकाउंटर का नको?
एनकाउंटर हे रेअर असतात असं तुम्ही समजत असाल तर याचं कारण बहुसंख्य एनकाउंटरमध्ये मारल्या जाणार्या लोकां बद्दल तुम्हांला काही पडलेलं नसतं. ते प्रियांका प्रकरणातले आरोपी असले तर तुम्हांला आनंद होतो आणि अॅपल कंपनीचा एक्झिक्युटिव्ह असला तर राग येतो. बाकीच्या असंख्य एनकाउंटर्सबाबत मला काय त्याचं?
----
आपल्यासारख्या आहेत आणि नाहीत हा मुद्दा आहे कारण त्यावरच आपल्या संतापाची पातळी ठरते. उन्नावमधल्या आमदाराच्या अत्याचाराला बळी पडलेल्या मुली बद्दल आणि मुलीच्या कुटुंबाबद्दल तुम्हांला एक अक्षरही लिहावंसं वाटलेलं नाही, याचं कारण काय असेल?
तिन्ही बलात्कार , स्त्री अत्याचार आणि जिवे मारण्याच्या घटना आहेत. त्या कुठल्या कुठे का वाटाव्यात?
उन्नाव पीडीतेला न्याय देताना
उन्नाव पीडीतेला न्याय देताना उत्तर प्रदेश पोलीस
उन्नावमधल्या काल मृत्यूमुखी
उन्नावमधल्या काल मृत्यूमुखी पडलेल्या मुलीच्या वडिलांनी हैद्राबादसारखाच न्याय मागितलाय. त्यांना सांगा, तुमची केस वेगळी आहे.
तेलंगणच्या एका मंत्र्या चं वक्तव्य : This is a lesson. If your conduct is wrong, you won't benefit from any court trial, prison sentence or subsequent bail as the case drags on. There will not be anything like that anymore. Through this, we have sent across a message that if you do something that's so wrong and cruel, there will be an encounter,"
प्रियांकाची बहीण म्हणतेय - मी हॅपी कशी असू शकेन? खूप गोष्टी बदलायची गरज आहे. अशा पुरुषांचा स्त्रियांबद्दलचा दृष्टिकोन...
बहिणीचा फोनकॉल, पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी केलेली वणवण, , तिचा शोध घ्या अशी पोलिसांना विनवणी करत असताना कळलेलं भयानक सत्य या गोष्टी अजूनही तिच्या डोक्यात फिरताहेत. बहिणीशी संपर्क तुटला त्यानंतर जलदगतीने तपासणी झाली असती, तर माझी बहीण वाचू शकली असती, असं ती म्हणतेय. याबाबत पोलिसांना जाग यावी म्हणून कोणाचं एनकाउंटर करायचं?
एन्काऊंटर करणे कधी कधी
एन्काऊंटर करणे कधी कधी अपरिहार्य असते.
जसे मुंबई मधील gangwar मोडून काढण्यासाठी एन्काऊंटर चा वापर केला गेला आणि यशस्वी पण झाला.
कायदेशीर मार्गाने जावून gangwar संपवता आले नसते.
तसे च बलात्कार सारख्या गुन्ह्यात (छेडछाड, संगमताने सेक्स नंतर बलात्काराचा आरोप,हे प्रकार सोडून)
एका पेक्षा जास्त व्यक्तींनी बलात्कार करून हत्या केली असेल किंवा शारीरिक इजा केली असेल अश्या गुंडांचे चे एन्काऊंटर एक नियमावली बनवून तात्पुरतं कायदेशीर करावे .
काय फरक पडतो ते माहीत पडेल.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या अधिकारात असे एन्काऊंटर केले जावे
पोलिस एन्काउंटरचे समर्थन
पोलिस एन्काउंटरचे समर्थन करणार्यांनी न्युयॉर्क सेन्ट्रल पार्क जॉगर्स केसबद्दल वाचावे. https://en.wikipedia.org/wiki/Central_Park_jogger_case
ही १९८९मध्ये तेव्हा निर्भयाप्रमाणेच अमेरिकेभर गाजलेली घटना होती. लोकांच्या भावनांचा उद्रेक होत होता. पोलिसांनी कडक कारवाई करून आरोपींना पकडले, त्यांना शिक्षा झाली. आरोपींच्या सुदैवाने त्यांचे 'एन्काउंटर' झाले नाही, फाशी झाली नाही. २००२मध्ये असे उघडकीला आले की ज्या ५ जणांना पकडले होते त्यांनी गुन्हा केलाच नव्हता. खरा गुन्हेगार दुसराच होता. हे डीएनए चाचणीने सिद्धही झाले. या पाच आरोपींच्या आयुष्याच्या ऐन जवानी/उमेदीतली ५ ते १२ वर्षे कोण भरून देणार?>
ट्वणे सरांनी आपलीच विकीलिंक सिलेक्टिव्हली वाचलेली दिस्ते. हे पाच महात्मे त्यावेळी गुन्हेगारीच्याच हेतूने सेंट्रल पार्क मध्ये घुसलेल्या
तीस चाळीस जणांच्या टोळक्यांपैकी होते . त्यांनी त्या रात्री मांडलेल्या नंगानाचाची माहिती विकीवर दिलेली आहे. आठ दहा जणांना जबरदस्त मारहाण करून त्यांना लुटण्यात आले त्यापैकी काही घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता. यांची पाच दहा 'उमेदीची ' वर्षे तुरुंगात गेल्याने कितीतरी भावी व्हिक्टिम्सचे जीव, प्रॉपर्टी आणि अब्रू वाचली असेही म्हणता येईल. या बद्दल आठ दहा मिलियन डॉलर्स taxpayer च्या खिशातून म्हणजे अगदी म्होप किंमत झाली म्हणता येईल.
त्या पकडल्या गेलेल्या
त्या पकडल्या गेलेल्या मुलांच्या ठिकाणी तुमचा भाऊ, मुलगा, बाप, मित्र, नवरा असता तर अश्या एन्काऊंटर चे समर्थन तुम्ही केले असते का?>
माझ्या भावाने किंवा मुलाने असे कृत्य केले (मला नवरा नाही) तर त्याचा एन्काऊंटर झाल्याचे मला फारसे वाईट वाटणार नाही.
Pages