बलात्कार्य्राचे encounter!!!!

Submitted by मेधाविनी घरत on 6 December, 2019 - 08:54

आज हैदराबाद प्रकरणातील आरोपीचं encounter करण्यात आलं.
अर्थातच हे सगळे प्रकरण घडवून आणण्यात आलं हे न समजण्याारखे आपण कोणीही दूधखूळे नाही.
या encounter नंतर समाजाच्या विविध स्तरांवर अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
उच्च स्तरांवरील काही प्रतिक्रया माझ्या वाचनात आल्या.
त्यात काही intelectual मानले जाणारे प्रतिथयश नट , राजकारणी, लेखक यांचा समावेश आहे.
बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.

यातील अनेक विचारवंत गेली कित्येक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या हिडीस घटनांनी मुळीच विचलित झालेले दिसत नाहीत. स्वतंत्र भारतात गेले ७५ हून अधिक वर्षे घडणाऱ्या बलात्कारासारख्या घटनांनी समाजाचा लोप होत नाही असे त्यांचे मत आहे वाटते.त्या जश्या काही दैनंदिन जीवनाचा भाग आहेत जणू.रोज सकाळच्या चहासोबत चावायला मसाला.
पण एक दिवस या ४ पाशवी गुन्हेगारांना रक्तरंजित शासन काय होते आणि या अचानक समाज उतरणीला लागतो की काय???
हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही.केवळ अपवाद आहे.
काही वेळा झोपलेल्या समाजाला जागे करायला अश्या अपवादांची चपराक लावायचाच लागते.सगळ्या बाजूंनी कोंडी झाल्यावर कायद्याच्या रक्षकांनी न्याय व्यवस्थेवर काढलेला हा desperate तोडगा होता.त्यांची सालटी काढायला हे विचारवंत लांडगे जमले. मग यांच्यात आणि त्या अपराध्यांमध्ये फरक तरी काय?
बाहुबली मध्ये स्त्रीलोळूप सेनापतीला शासन होते तो प्रसंग हे सगळे विचारवंत भारावून जाऊन पाहतात, मग सत्यात उतरल्यावर इतका तळतळाट कश्यासाठी?
याला hippocracy म्हणतात.
माझ्या मते हे सगळे विचारवंत केवळ भी्माचार्य आहेत. द्रौपदीचे वस्त्रहरण मान खाली घालून पाहणारे.
नको तिथे नियमांची आणि morality chi फुटपट्टी लावणारे षंढ विचारवंत.
अरे त्या निष्पाप मुलींच्या वेदनांची जरा तरी तमा बाळगा.
ती तुमची बहीण, मुलगी, आई , मैत्रीण ,बायको असती तर morality सुचली असती का रे?
केवळ संविधानाने वाटेल तशी मते प्रदर्शित करण्याचा हक्क दिले आहेत म्हणून जीभ मोकाट सोडायची.
घरी बसून वाहत्या गंगेत हात धुणे सोपे असते.
बाकी तर समाज उतरणीला लागलाच आहे या so called विचारवंतांचा मते.पण तो नेमका कोणामुळे लागला आहे त्याचा विचार होणे अत्यंत आवश्यक आहे.
ईश्वर त्या निष्पाप जीवाला सद.गती देवो.
For we don't deserve you, we are Hippocrates!!!
आम्हाला माफ कर.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पण एक दिवस या ४ पाशवी गुन्हेगारांना रक्तरंजित शासन काय होते आणि या अचानक समाज उतरणीला लागतो की काय??? हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही >>>>+ ११११

जणू काही इतके दिवस रामराज्य होतं आणि या घटनेने कायदा , लोकशाही , मानवाधिकार सगळं धोक्यात येऊन गुंडाराज यायला वेळ लागणार नाही , सिरीयाच होईल आता लगेच भारताचा .. झालं ते चांगलंच झालं आहे .

नीट वाचा, मी सद्गती बलात्कारीत तरूणी साठी म्हटले आहे.
लेख तिच्या favor madhye ahe .

बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.

जणू काही इतके दिवस रामराज्य होतं आणि या घटनेने कायदा , लोकशाही , मानवाधिकार सगळं धोक्यात येऊन गुंडाराज यायला वेळ लागणार नाही , सिरीयाच होईल आता लगेच भारताचा .. झालं ते चांगलंच झालं आहे .>>>>अगदी खरं आहे .

बऱ्याच so called विचारवंतांनी समाज फार भयानक दिशेने जाऊ लागलाय अशी चिंता व्यक्त केलीय.
माझ्या मते मी त्यांना उत्तर देण्याचा हा छोटासा प्रयत्न करते आहे.

ईश्वर त्या निष्पाप जीवाला सद.गती देवो.
>>> बलात्कारी होते ते - निष्पाप कसले?

>>>>>>>>

च्रप्स, त्या निष्पाप जीव त्या पिडितेला म्हणत आहेत.
बाकीच्या लेखावरून त्यांनी पोलिसांच्या कृत्याचे समर्थनच केलेले आहे आणि लेख त्या बलात्कारी लोकांच्या आणि पोलिसांनी स्वतः दिलेल्या न्यायाला कायदेभंग म्हणणाऱ्या लोकां विरूध्दच आहे.
_________

डॉक्टर, अगदी झणझणीत लेख आहे. पूर्ण अनुमोदन.

Dhanyavaad Madhura Tai.
Me lekhak nahi, parantu tathakathit vicharvamtanche dhoran agadi डोक्यात गेले.
म्हणून तिर्मिरित लेख लिहिला.

बलात्कार्य्राचे encounter ---> बलात्काऱ्याचे
Plz correct the typos...major and miscellaneous
__________________

एक प्रश्न -
असाच कोणी कुख्यात गुंड जो बलात्कारी आहे हे सर्वश्रुत आहे पण कायद्याच्या पळवाटेने कधीही शिक्षेस पात्र ठरला नाहीये असा इसम कुठल्याही निमित्ताने हॉस्पिटलला एडमिट झाला तर त्याच्या कुकर्माची शिक्षा म्हणून डिम्पल कापड़ियाच्या जख्मी औरत सारखे शस्त्रक्रिया करून त्याला पुन्हा बलात्कार करण्याच्या लायकीचे ठेवणार नाही एवढे धारिष्टय एक डॉक्टर म्हणून दाखवणार की नुसता trp साठी हिपोक्रेसीयुक्त धागा आहे हां ?

डॉक्टर मनाली, उद्या जर तुमच्या डॉक्टर सहकाऱ्याला डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे पेशंटचा मृत्यू झाला अशा आरोपावरून पोलिसांनी अटक केली आणि एन्काऊंटर करून मारून टाकलं तर मेणबत्त्या घेऊन मोर्चा काढू नका. पोलिसांनी न्याय केला असे समजा.

>>>>>>म्हणून तिर्मिरित लेख लिहिला.>>>>> प्रातिनिधीक लेख आहे हा. भावनाप्रधान लोकांचे प्रतिनिधीत्व करणारा. मग त्यात मीही येते. पण म्हणुनच एक बरे वाटते की हाताची ५ बोटे सारखी नसतात पण सर्वेसर्वा पंजा बनतो. तसे आपल्या सारखे सगळेच भावनाप्रधान नसतात, विचारी, संयत असतात, त्यांचे वेगळे विचार असतात. या सर्वांतून काहीतरी न्यायव्यवस्थेला, देशातील परिस्थितीला विधायक वळण लागावे.

गुन्हेगारांना कायद्याने हात पाय तोडून चौरंग करायची शिक्षा दिली असती तरी त्या कायद्याचे समर्थन मी करेन. बलात्कार हा एक निर्घृण गुन्हा असून बलात्काराच्या शिक्षेच्या नुसत्या कल्पनेनेसुद्धा वासनांध लोकांचं डोकं ठिकाणावर येईल अशी तरतूद कायद्यात झाली तर त्याचंही स्वागत आहे.
आता, हैद्राबाद पोलिसांनी परस्पर केलेला न्याय? सदर घटनेत आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे होते. Cctv फुटेज वगैरे.. जलदगती कोर्टातुन निकाल येऊन आरोपींना शिक्षा झालीच असती (अर्थात जन्मठेप झाली असती तर मला वैयक्तिक पातळीवर वाईटच वाटलं असतं, बलात्कारीना फक्त मृत्यूदंडच व्हायला पाहिजे), पण तेवढे कष्ट न घेता पोलिसांनी एन्काऊंटर करून प्रश्न सोडवला आणि विशेष म्हणजे या एन्काऊंटर बद्दल सोशल मीडिया फार खुश आहे, त्यांनी हैद्राबाद पोलिसांचं अभिनंदन केलं आहे*

दुसऱ्या बाजूला, उत्तर प्रदेशातील उन्नाव मधल्या दोन घटना.. पहिल्या घटनेत आरोपी भाजप आमदार सेनगर, आणि दलित पीडिता. जलद न्यायाअभावी त्या पीडित तरुणीच्या सगळ्या कुटुंबाची वाताहत झाली, तिच्या वडील आणि काकांना जीवे मारण्यात आलं. खुद्द पीडितेचा accident घडवून आणण्यात आला, तिच्या वकीलावर देखील प्राणघातक हल्ला झाला. आरोपी अजूनही तकलादू कायद्यामुळे ह्या गोष्टी करू शकत आहेत! दुसऱ्या घटनेत, जामिनावर सुटलेल्या आरोपींनी बलात्कार पीडितेलाच पेटवून टाकलं. 90 टक्के भाजलेल्या त्या तरुणीने स्वतः ambulance बोलावली.

हैद्राबाद पोलिसांनी जे केलं ते चूक की बरोबर, हा मुद्दा बाजूला ठेवून लोकांनी या एन्काऊंटरचं स्वागत एवढं वाजत गाजत का केलं? याचं उत्तर वरच्या दोन घटनांमध्ये आहे. सामान्य जनतेचा कायदा आणि व्यवस्थेवर विश्वासच उरलेला नाही याचं हे द्योतक आहे.
सकाळी सकाळी बातमी वाचल्यावर मी देखील खुश झालेलो, पण थोडा अधिक विचार केल्यावर यातला फोलपणा लक्षात आला. गुन्हेगारांविषयी कोणतीही सहानुभूती नाही, उलट गुन्हेगार स्वस्तात सुटले, असंच मला वाटतं. परंतु, अशक्त कायद्याबद्दल मला नक्कीच सहानुभूती आहे. गुन्हेगार संपले, पण न्याय अजून झाला नाही.

-राव पाटील
०६ डिसेंबर २०१९.

सामान्य जनतेचा कायदा आणि व्यवस्थेवर विश्वासच उरलेला नाही याचं हे द्योतक आहे.
आजिंक्याराव sir, agadi barobar.
Toch khara problem ahe.

पोलिस एन्काउंटरचे समर्थन करणार्‍यांनी न्युयॉर्क सेन्ट्रल पार्क जॉगर्स केसबद्दल वाचावे. https://en.wikipedia.org/wiki/Central_Park_jogger_case
ही १९८९मध्ये तेव्हा निर्भयाप्रमाणेच अमेरिकेभर गाजलेली घटना होती. लोकांच्या भावनांचा उद्रेक होत होता. पोलिसांनी कडक कारवाई करून आरोपींना पकडले, त्यांना शिक्षा झाली. आरोपींच्या सुदैवाने त्यांचे 'एन्काउंटर' झाले नाही, फाशी झाली नाही. २००२मध्ये असे उघडकीला आले की ज्या ५ जणांना पकडले होते त्यांनी गुन्हा केलाच नव्हता. खरा गुन्हेगार दुसराच होता. हे डीएनए चाचणीने सिद्धही झाले. या पाच आरोपींच्या आयुष्याच्या ऐन जवानी/उमेदीतली ५ ते १२ वर्षे कोण भरून देणार?

या प्रकरणातले आरोपी निर्दोष होते असे म्हणायचे नाहिये. पण हा जर प्रिसिडन्स झाला तर उद्या निर्दोष मेले तर त्याचा दोष कोणाला?
तुम्ही प्रचंड श्रीमंत आहात, तुमची मुलगी एक अत्यंत महागडी गाडी चालवताय, ती औषध घेते ज्यामुळे रक्तात थोडा मद्यांश सापडतोय. तिच्या गाडीत बिघाड झाला, ब्रेक लागले नाहीत आणि त्यामुळे रस्त्यावरची एक तरुण बाई व तिचे तान्हे मूल मेले. लोकक्षोभ झाला, मिडियात रिपोर्ट आले की अतिश्रीमंत आई बापाची लाडावलेली मुलगी , दारू पिउन बेफाम गाडी हाकत रस्त्यावरच्या गरिबांचा खून करते. पोलिस एन्काउंटर करतात. लोक खूश. तुम्ही ??

पोलिसांनी कुठल्या परिस्थितीत केलेले एन्काउंटर 'न्याय्य' आणि कोणत्या परिस्थितीतले 'अन्याय्य' हे कोण ठरवणार? लोकक्षोभ हे मापक होणार का?

<<< या पाच आरोपींच्या आयुष्याच्या ऐन जवानी/उमेदीतली ५ ते १२ वर्षे कोण भरून देणार? >>>

@टवणे सर
The five men sued the city for discrimination and emotional distress; the city settled in 2014 for $41 million. They also sued New York State, which settled in 2016 for $3.9 million total.
त्यांच्या दृष्टीने प्रत्येकी अंदाजे ८ मिलियन हा सौदा कदाचित इतका वाईट नाही.

पोलिस सामान्य जनता नव्हेत. ते कायद्याचे रक्षक आहेत. गुन्हे न घडतील याची आटोकाट काळजी घेणं, गुन्हा घडल्यानंतर फिर्यादीशी व्यवस्थित वागून तत्परतेने गुन्हा नोंदवून त्याचा मुळासकट तपास करून आरोपींना पकडणं ही त्यांची जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. शिक्षा ठरवणं आणि लगोलग अंमलात आणणे हे त्यांच्या कार्यकक्षेत येत नाही. ते सरकारचे नोकर आहेत आणि त्यांनी त्यांच्या अधिकाराचे उल्लंघन करून स्वतः कायदा हातात घेणे हाच एक मोठा गुन्हा आहे.
त्यांनी केलेला तपास योग्य आहे, आरोपी कोण आहेत याची सत्यासत्यता न्यायव्यवस्थेने करणेच उचित आहे. यात असणार्‍या त्रुटी दूर करण्यासाठी जनमताचा, सरकारचा रेटा हवा. गुन्हा घडू नये म्हणून समाजाची मानसिकता बदलायचा जसा दीर्घ पल्ल्याचा उपाय करायची नितांत गरज आहे त्याचबरोबर सक्षम तत्पर पोलिस यंत्रणा सामान्य माणसांसाठी उपलब्ध असणे तितकेच गरजेचे आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याकडे दुर्दैवाने नाहीयेत, त्या व्हाव्यात म्हणून जनता आणि सरकार कुणीच फारसे उत्साही दिसत नाहीत किंवा त्याची चर्चा करत नाहीत. गुन्हेगारांना एन्काउंटर करून मारणे हा तात्पुरता लोकांना बरं वाटावं म्हणूनचा उपाय आहे..... त्याने काही साध्य होईल असे वाटत नाही.

एखादी व्यक्ती संकटात असतानाही घरी फोन करते, पोलिसांना फोन करायचे तिला सुचत नाही ही बाब किती गंभीर आहे यावर सगळे मौन साधून आहेत. तिने फोन करायला हवा होता असं आपल्याला पश्चातबुद्धीने वाटत असले तरी आपल्या कुणालाही संकटात सापडल्यावर पहिला पर्याय १०० ला फोन करणे आहे असे वाटत नाही कारण पोलिस मदत करतील ही अपेक्षा भाबडी आणि अवास्तव आहे असंच आपल्या मनात कळतनकळत बिंबलेलं असतं.....

Patlay.Ekda tari ase whayla hawech hote .thoda dhak jarab basayla Hawa. Slow law process mule ase Lok anek varsha aaramat jagtat.. yamule kadachit aapli process ,rules Jara tari jage hotil.... Aaj tichya aatmyala Shanti milel.

वरदा +१
भयंकर पण वास्तव आहे हे! Sad

ना कोर्ट्,ना तारिख, ना जज्ज ,ताबडतोब न्याय ! हा सिनेमात एकायला बर वाटणारा डायलॉग जर असा प्रत्यक्षात यायला लागला तर न्यायव्यवस्थाच धोक्यात येइल

वरदा +१
अनेक फेक एन्काऊंटर्स मध्ये निरपराध लोक मारले गेले आहेत. एन्काऊंटरला पोलिसांना समर्थन देताना याचा विचार करा.
असा पायंडा पडेल हे फिअर मोंगरींग नाहीय, हे अनेक फेक एन्काऊंटर्स मधून लक्षात येईल. आणि जनप्रक्षोभ काय करू शकतो याचे उदाहरण म्हणजे मुले पळवणारे या संयशवरून जमावाने मारलेले निरपराध लोक.

हैद्राबाद केस मध्ये राजकीय पोळी शेकणे सुरू झाले आहे हे खरे आणि दुर्दैवी आहे पण त्याला काउंटर अटॅक म्हणुन या एन्काऊंटरचे जोरदार समर्थन योग्य ठरत नाही.

आपली सडलेली न्यायव्यवस्था पूर्ण मोडीत काढायला हवी.

पोलिसांपेक्षा डॉक्टर जास्त उच्चशिक्षित असतात. ते न्यायनिवाडा पोलिसांपेक्षा जास्त चांगला करू शकतील. कित्येक गुन्हेगार शिक्षा वाचवायला आजारी असल्याचं नाटक करून हॉस्पिटलमध्ये भरती होतात. डॉक्टरांनी या गुन्हेगारांचा खून करावा किंवा त्यांचे अवयव कापावेत किंवा त्या वेळच्या जनक्षोभानुसार त्यांच्या मर्जीप्रमाणे शिक्षा द्यावी. ही शिक्षा देऊन गुन्हेगार तडफडत असतानाचे व्हिडीओ काढून सोशल मीडियावर टाकावेत कारण इतर गुन्हेगारांना वचक बसायला हवा.

डॉक्टरांनी गुन्हेगारांची सालटी काढली नाही तर यांच्यात आणि त्या अपराध्यांमध्ये फरक तरी काय? डॉक्टरांकडे समाजाचे ऋण फेडायची संधी वरचेवर चालून येते ती जर त्यांनी साधली नाही तर निव्वळ पांढऱ्या कोटातले लांडगे ही त्यांची जनप्रतिमा जी बनतेय ती योग्यच म्हणायला हवी.
अर्थात गुन्हेगार डॉक्टरांविरुद्ध क्षोभित जनता वरचेवर जी कारवाई करते त्याची तीव्रताही वाढवायची गरज आहे. नाहीतर हा समाज षंढ म्हणयाच्याही लायकीचा राहणार नाही.

Intellectual आणि विचारवंत नसलेल्या मद्दड डॉक्टरांसाठी:
माझे वरचे प्रतिसाद औपरोधीक आहेत, जाऊन पेशंटवर अत्याचार करणे चालू ठेऊ नका.

विचारवंत डॉक्टर पेशंटबरोबर चांगलेच वागत असणार याची मला खात्री आहे.

बलात्कार आणि हत्या या घटना अत्यंत संतापजनक आहे... त्यात कुठलाही वाद नाही. पण म्हणून आरोपी असणार्‍यांना पोलिसांनी कारस्थान करुन जिवाने मारणे याचे समर्थन करता येत नाही.

न्यायालयाच्या बाहेर आरोपींना शिक्षा देण्याच्या प्रकारांला केवळ पोलिसच जबाबदार आहेत असे नाही, त्यांना असे कृत्य करायचे तोंडी आदेश देणारे आणि कृत्याला पाठिंबा देणारे नागरिकही तेव्हढेच जबाबदार आहेत.

<< हे encounter नियमबाह्य असले तरी चूक नाही.केवळ अपवाद आहे. >>
------- encounter नियमबाह्य आहे हे मान्य करत आहात पण encounter चूक नाही हे परस्पर विरोधी आहे.
आज अपवाद वाटत असणारी घटना पुढे नियमीत अंतराने घडणारच नाही याची काही काय शाश्वती ?

ती तुमची बहीण, मुलगी, आई , मैत्रीण ,बायको असती तर morality सुचली असती का रे?>>>>>

या लॉजिकनेच दुसरा प्रश्न पुढे येतो , त्याचे उत्तर लेखिकेने द्यावे

त्या पकडल्या गेलेल्या मुलांच्या ठिकाणी तुमचा भाऊ, मुलगा, बाप, मित्र, नवरा असता तर अश्या एन्काऊंटर चे समर्थन तुम्ही केले असते का?

बलात्कार घडला की काही ठराविक प्रकारचा माहोल तयार केला जातो.
आणि तो प्रकार निंदनीय आहे.
पाहिले तर पुरुष हा स्त्री चा कट्टर वैरी आहे आणि स्त्री ला सर्वात जास्त धोका हा पुरुषानं पासून आहे असे बिंबवले जाते.
मुळात बलात्कार करणारी व्यक्ती ही विकृत असते ,गुन्हेगारी प्रवृत्तीची असते सर्व सामान्य विचाराचा पुरुष बलात्कार करत नाहीत.
शारीरिक आकर्षण म्हणून सर्वच पुरुष स्त्री कडे आकर्षित होतात पण बलात्कार हा विकृत आणि गुन्हेगारी वृत्ती चेच लोक करतात.
स्त्री आणि पुरुष ह्यांच्या मध्ये दरी निर्माण करणारे विचार निंदनीय आहेत.
बहुसंख्य पुरुष हे बलात्कार ची बळी पडलेल्या स्त्री chya पाठी खंबीर पने उभे असतात हे चित्र जे समाजात दिसते कधी त्याचा सुधा उदो उदो करणे गरजेचे आहे.
माहोल बिघडला,देशात स्त्री संकटात,अश्या प्रकारचा प्रचार सत्य परिस्थिती शी विपरीत आहे..
माज पहिल्या पासून मत आहे .छोटे गुन्हे करणारेच मोठे गुन्हे करतात .
त्या अगदी प्राथमिक स्तराचे गुन्हे सुधा कोण्ही वारंवार करत असेल तर त्या व्यक्तीला जेरबंद करून समजा पासून दूर ठेवा.
मग खोटी सर्टिफिकेट बनवणे,ट्रॅफिक चे नियम मोडणे,दादागिरी करणे अशा प्रकारच्या सर्व गुन्हा च समावेश आला.
बलात्कार हा खूप गंभीर गुन्हा आहे आणि त्या गुन्हा साठी कठोर शिक्षा असायलाच हवी ह्या विषयी मतभेद नाहीत .त्या साठी कडक कायदे आहेत
पण काही महाभाग त्याच कायद्यांचा स्वतःच्या फायद्या साठी, दुष्मनी काढण्यासाठी गैर वापर करतात हे सुधा कटू आहे पण सत्य आहे .
त्या मुळे कायद्याचे गांभीर्य आणि परिणाम कमी होतो.
Haydrabad मधील घटनेत आरोपी चे एन्काऊंटर झाले ह्या विषयी विविध मत आहेत..
आपली न्याय व्यवस्था आणि पोलिस यंत्रणा ह्या विषयी लोकांना विश्वास. नाही .
कारण लोकांचा अनुभव चांगला नाही.
ज्याला न्याय हवा आहे त्याला न्याय कसा मिळणार नाही ह्याची पुरेपूर काळजी ह्या दोन्ही यंत्रणा घेतात.
अपवाद असतील.
त्या मुळे एन्काऊंटर चे लोकांनी स्वागत केले.
आतील भावना लोकांनी खुश होवून व्यक्त केल्या.
आणि दुसरा भाग असा आहे पोलिस यंत्रणा कशी काम करते,कमजोर लोकांना जबरदस्तीने आरोपी बनवले जाते,
खोटे पुरावे खरे केले जातात.
त्या मुळे पोलिस न्यायाने वागतील आणि योग्य व्यक्तीचा च एन्काऊंटर करतील ह्याची सुतराम शक्यता नाही.
न्यायालयात कमीत कमी काही नियम तरी असतात आरोपी ठरवण्यासाठी.
त्या मुळे पोलिस नी शिक्षा देणे भविष्यात समाजासाठी खूप धोकादयक ठरेल.
म्हणून तर विचार पूर्वक सविधान लीहले गेले आहे आणि त्याच मार्गाने शिक्षा होणे सक्तीचे आहे.
बदल करायचा असेल तर आपल्या यंत्रणा बदलल्या पाहिजेत जेणे करून न्याय सहज आणि लवकर मिळेल.

Pages

Back to top