एक ते दीड पाउंड चिकन थाय पीसेस, २ मध्यम कांदे, ६-७ लसूण पाकळ्या, १ इन्च आले, १ गोंगुरा उर्फ अंबाडीची जुडी, तिखट,मीठ, हळद वगैरे.
चेट्टिनाड गरम मसाल्यासाठी:
२ चमचे धणे, १ चमचा जिरे, १ चमचा बडीशेप, पाव चमचा मेथी दाणे, १०-१५ मिरे, ५-६ लवंगा, २ पेर दालचिनी, १ चक्रीफूल, १ इन्च दगडफूल, ३ वेलदोडे, ५-६ लाल सुक्या मिरच्या, १ जायपत्री, २-३ चमचे सुके खोबरे किंवा डेसिकेटेड कोकोनट पावडर.
आमच्या इथे अंजपर म्हणून चेटिनाड स्टाइल रेस्टॉरन्ट आहे. तिथे हा प्रकार पहिल्यांदा खाल्ला आणि आवडला. तिखट, मसालेदार आणि बर्यापैकी आंबट रश्श्यात अगदी टेंडर शिजलेले चिकन! ऑफिस मधे एका तेलगू कलीग ला विचारले तर तिची सांगायची पद्धत म्हणजे. "आय मेक इट आल द ठैम, जस्ट फ्राय युज्वल अनियन जिंजर गार्लिक, युज्वल मसाला. अँड पुट गोंगुरा लीव्ज इन इट " मसाला काय याचे डीटेल सांग म्हटले तर " इट्स नथिंग, आय पुट माय मॉम्स गरम मसाला. यूज एनी गरम मसाला" असे काहीसे ऐकून मनात म्हटले आपणच बघू ट्राय करून. असा कसा "एनी गरम मसाला" चालेल?! मग तिला फक्त गोंगुरा कसा किती वापरायचा तेवढे विचारून घेतले.
थॅन्क्सगिव्हिंगच्या सणाचा मुहूर्त जवळच होता. अमेरिकनांचा ऑफिशियल ओवरइटिंग डे! ट्रॅडिशनल टर्क्यांऐवजी आख्ख्या कोंबड्या वगैरे अतिउत्साहाने भाजून झाल्यात पूर्वी आमच्या. आता आपले आपसूक आपल्या देसी फूड च्या लायनीवर आलो. करी, राइस, पराठा अन रायता असा मेनू!
तर गोंगुरा करी करायची ठरवली. मसाला साधारण चेटिनाड पद्धतीचा करून प्रयोग करायचा ठरला, आणि पहिल्याच फटक्यात एकदम जमूनच आला की बेत! स्वतःवरच खूष!
तर कृती अशी- सगळे मसाल्याचे पदार्थ भाजून मिक्सर मधे बारीक करून घ्या. दोन पैकी एक कांदा पातळ चिरून थोड्या तेलावर ब्राउन होईपर्यन्त परतून घ्या. हा भाजलेला कांदाही मिक्सर मधे वाटून घ्या. चिकन धुवून हवे तसे तुकडे करून एका भांड्यात काढा. त्याला आधी तयार केलेला गरम मसाला, वाटलेला कांदा, तिखट, मीठ, हळद नीट लावून एकसारखे करून झाकून अर्धा तास ठेवून द्या.
तोवर इतर तयारी करता येईल. कांदा बारीक चिरून घ्या. आले लसूण वाटून घ्या. गोंगुरा निवडून, धुवून बारीक चिरून घ्या.
कढई मधे एक ते दीड डाव तेल गरम करा. त्यात चिरलेला कांदा घालून परता, मग आले लसूण घालून कच्चा वास जाईपर्यन्त परता.
अर्धा चमचा हळद आणि १ ते दीड चमचा काश्मिरी लाल तिखट घाला. झेपत असल्यास थोडे जास्तही घातले तरी चालेल. त्यातच मसाला लावून ठेवलेले चिकन घालून परता. थोडे परतले गेले की पाणी ( हव्या त्या प्रमाणात घाला, मी दीड कप घातले. हा रस्सा फार पातळ करत नाहीत) आणि लागेल तसे मीठ घालून मध्यम आचेवर झाकण लावून ठेवा. ३-४ मिनिटांनी उकळी आली की गोंगुरा घालायचा. हे चिकन जरा आंबटच असते. तरीही शेवटी आपल्या टेस्ट वर आहे. तेलगू मैत्रिण आख्खी जुडी घालते म्हटली होती पण मी सावधपणे सुमारे अर्ध्यापेक्षा जरा जास्त - पाउण पेक्षा कमी जुडी वापरली. पाने चिरून वाटी दीड वाटी झाली असावीत. मला तेवढी परफेक्ट वाटली. तर ही बारीक चिरलेली पाने उकळत्या करी मधे घालून पुन्हा झाकण लावून ४-५ मिनिटे शिजू द्या.नीट हलवून गॅस बंद करा आणि झाकण लावून जरा ५ मिनिट वाफ जिरू द्या. गोंगुरा चिकन तय्यार!
एक ऑप्शनल सिझनिंग - छोट्या पळीत २-३ चमचे तेल गरम करून त्यात २-३ लाल मिरच्या टाका आणि तो तडका वरून या भाजीला द्या! भारी लागले हे!
गरमागरम वाफाळता बासमती राइस किंवा पराठ्यांसोबत खायला द्या. मला स्वतःला भाताबरोबर खायला जास्त आवडतो हा प्रकार.
- पनीर, बटाटे इ. वापरून केलीच तर मग ती वेगळी रेसिपी म्हणून खपवावी.
- पुढच्या वेळी लाल तिखट कमी करून त्याऐवजी कांदा वाटताना २-३ हिरव्या मिरच्या घालण्याचा विचार आहे. हि.मि .चा झणका चांगला लागेल असे वाटते.
- एकदा "एनी गरम मसाला" वापरून करून बघायलाही हरकत नाही.
वा वा भारी!
वा वा भारी!
अंबाडीची पानं शिजतात इतकी लगेच?
नक्की करून पाहणेत येईल.
अधिक टिपा
ही रेसिपी नॉनव्हेज खाणार्या
ही रेसिपी नॉनव्हेज खाणार्या मैत्रिणींबरोबर शेअर करेन.
मलाही अंबाडी कुकरला न शिजवता नीट शिजली का हा प्रश्न पडला.
हो पाने घातल्यानंतर साधारण
हो पाने घातल्यानंतर साधारण ५ एक मिनिटे उकळले मी. नंतर झाकून वाफ मुरु द्यायला अजून ४-५ मिनिटे. शिजली तेवढ्यात. एकदम बारीक चिरली होती म्हणूनही असेल.
डिश मस्त दिसतेय.
डिश मस्त दिसतेय.
मी येनी गरम मसाल्याऐवजी वर दिलेला मसाला वापरून आपले ते हे ब्याड वर्ड वापरून करीन ही करी. पण ब्याड वर्ड + अंबाडी जरा साशंक काँबो वाटतेय बगूयात तरी करून एकदा. नवीन काही ट्राय करायला आवडतं तसंही.
भारी दिसतेय गोंगुरा चिकन!
भारी दिसतेय गोंगुरा चिकन!
वा मस्त आहे रेसिपी. ट्राय
वा मस्त आहे रेसिपी. ट्राय करून बघेन नक्की.
बादवे, आत्ता आंबाडी मिळाली का? उन्हाळ्यात येते ना?
छान वाटतेय रेसिपि
छान वाटतेय रेसिपि
भारी दिसतेय डिश. भाताबरोबर
भारी दिसतेय डिश. भाताबरोबर नक्कीच छान लागेल.
मस्त झालेली दिसतेय डिश.
मस्त झालेली दिसतेय डिश.
चिकन सोबत पालेभाजी छान कॉम्बिनेशन आहे, गोंगुरा तर मसतच.
भारी दिसतिये डिश. लगेच उचलून
भारी दिसतिये डिश. लगेच उचलून खायला लागावसं वाटतय.
छान रेसेपी. फोटो टेंप्टिंग
छान रेसेपी. फोटो टेंप्टिंग आहे.
फोटो खूपच टेम्पटिंग.
फोटो खूपच टेम्पटिंग.
यम्मी दिसतेय. मी एरवी अंबाडी
यम्मी दिसतेय. मी एरवी अंबाडी पाण्यात शिजवून घेते, बाहेरच , कुकरला नाही ,म्हणून शंका आहे की डायरेक्ट फोडणीला घातलेली कशी लागेल? चिकन घरी करत नाही त्यामुळे रेसिपी बहिणीला देण्यात येईल, ती करेल (आणि मी खाईन)
धाग्याचं शीर्षक नजरेसमोर आलं
धाग्याचं शीर्षक नजरेसमोर आलं की काही क्षणांकरता स्पायरो गायरा चिकन असं वाटतं.
धाग्याचं शीर्षक नजरेसमोर आलं
धाग्याचं शीर्षक नजरेसमोर आलं की काही क्षणांकरता स्पायरो गायरा चिकन असं वाटतं.>>>>
मस्त दिसत आहे.
मस्त दिसत आहे.
स्पायरो गायरा
स्पायरो गायरा
पराग- गोंगुरा मिळतेय की आता पण. त्याचा कोणता सीझन असतो का काही कल्पना नाही पण जर्सीचा पटेल केव्हाही कुठूनही काहीही आणू शकतो
अंबाडी शिजण्याचा वेळ इतका घड्याळ लावून लिहिलेला नाही. कमी जास्त असेल पण कुकर किंवा साइड ला वेगळी शिजवलेली नाही हे नक्की.
चिकन पख्तुनी म्हणून अफगाणी
चिकन पख्तुनी म्हणून अफगाणी डिश आहे
त्यात शेपू घालतात
भारीच दिसतेय गं.. करून बघेन
भारीच दिसतेय गं.. करून बघेन मी.
मला असाच एक छान मसाला काँबिनेशन सांगितले माझ्या तेलगू कलीगने... नल्ला कारम पावडर आणि करी पावडर (दोन्ही प्रिया ब्रँड).
ड्राय चिकन स्टार्टर ला एकदम मस्त. तिखट असते ही पावडर.
चेट्टिनाड रेसीपीज आर फ्रॉम
चेट्टिनाड रेसीपीज आर फ्रॉम पुडुकोट्टाइ रीजन ऑफ तमिल नाडू.
गोंगुरा चिकन हे आंध्रा तेलंगणा मधले आहे. ह्या सारखेच एक सब्जी गोश्त म्हणून रेसीपी आहे छान आहे ती पण.
सब्जी गोश्त म्हणजे काय? पालक
सब्जी गोश्त म्हणजे काय? पालक घालून का?
गोश्त म्हणजे मटण असेल ?ना
गोश्त म्हणजे मटण असेल ना? चिकन नाही.
Full recipe lihite office
Full recipe lihite office madhun
छान रेसिपी.
छान रेसिपी.
गोश्त म्हणजे मटण चिकन नाही.
सब्जी गोश्त मध्ये मिक्स भाज्या आणि मटण असते. पालक गोश्त मध्ये पालक आणि मटण.
वरिल दोन्ही प्रकार वेगवेगळे आहेत.
<<< गोश्त म्हणजे मटण चिकन
<<< गोश्त म्हणजे मटण चिकन नाही
मग गोश्तचा अर्थ काय?
<<< गोश्त म्हणजे मटण चिकन
----------------
गोश्त हा फारसी शब्द आहे. अर्थ
गोश्त हा फारसी शब्द आहे. अर्थ - मांस किंवा फळाचा गर.
गोश्तीन म्हणजे मांसाचे पदार्थ.
अच्छा, मला फक्त मांस हा एकच
अच्छा, मला फक्त मांस हा एकच अर्थ माहित होता. अधिक माहितीसाठी धन्यवाद
गोश्त हा फारसी शब्द आहे. अर्थ
गोश्त हा फारसी शब्द आहे. अर्थ - मांस किंवा फळाचा गर.
गोश्तीन म्हणजे मांसाचे पदार्थ.>>>धन्यवाद चिनूक्स
>>> गोश्त म्हणजे मटण चिकन
>>> गोश्त म्हणजे मटण चिकन नाही
मला वाटतं 'मटण'नंतर विरामचिन्ह द्यायचं राहून गेलं त्यांचं. ते वाक्य "गोश्त म्हणजे मटण; चिकन नाही." असं वाचा म्हणजे अर्थ लागेल (
आणि सब्जी गोश्तमध्ये फळांचा गर घालायची हुक्की येणार नाही).Pages