112 INDIA APP : तातडीच्या मदतीसाठी फोन व अँप

Submitted by साधना on 2 December, 2019 - 04:01

हैद्राबादची घटना ताजी असताना, काल व्हाट्सअप्पवर एक विडिओ आला. 112 India अँपची माहिती त्यात होती. काल शोधाशोध करत असताना मुंबई पोलिसांचे प्रतिसाद नावाचे अँप दिसले होते पण तिथे रजिस्ट्रेशन होत नव्हते. इथे बघूया काय अनुभव येतोय म्हणत अँप लगेच डाउनलोड केले. नाव, जन्मतारीख, फोन नंबर मागितल्यावर फोनवर ओटीपी आला. अँपने नेहमीसारखी माझे कॉन्टॅक्ट वाचण्याची, लोकेशन पाहण्याची, फोन वापरण्याची परवानगी मागितली. सहसा अँपला ही माहिती देणे मी टाळते व अँप काढून टाकते. पण ह्या माहितीशिवाय इच्छित काम करणे अप्पला अशक्य असल्याने परवानगी दिली. पुढच्या स्क्रीनवर अँप माझे लोकेशन दाखवू लागले. पोलीस, आग, मेडिकल व इतर अशी चार बटन्स दिसायला लागली.

प्ले स्टोरवर अँप

...

डाऊनलोड केल्यावर असे दिसते:

...

टेस्ट करायचे म्हणून मी पोलीस हे बटन दाबले. माझ्या फोनवरून 112 नंबरला मिसकॉल गेला. त्यानंतर अँपवर लगेच I am safe हे बटन दिसायला लागले. मी सेफच होते म्हणून ते बटन लगेच प्रेस केले. आता प्रकरण संपले असेल असे वाटले. पण नाही. क्षणार्धात माझा फोन वाजायला लागला. मुंबईतील लँडलाईनवरून मला फोन आला. 'मॅडम, तुम्ही 112 वरून पोलीस मदत मागितली. तुम्हाला मदत हवीय का?' आश्चर्याचा सुखद धक्का तर बसलेलाच, पण त्यातून सावरून मी आभार मानून फोन बंद केला.

112 INDIA अँप बद्दल गुगळुन बघितले तेव्हा कळले की भारत सरकारने फेब्रुवारी 2019 मध्ये 112 हा नंबर कुठल्याही प्रकारच्या इमेरजन्सीमध्ये वापरण्यासाठी खुला केलेला आहे. आजपावेतो 20 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही योजना कार्यान्वित झालेली आहे, इतर राज्येही येतील.

पोलीस (१००), आग (१०१), आरोग्य (१०८) आणि स्त्री सुरक्षा (१०९०) हे चार नंबर ११२ नंबराखाली आणलेले आहेत. सध्या सगळ्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यामुळे अँड्रॉइड व आयफोनसाठी अँप विकसित केलेले आहे. अँपवर ४ पॅनिक बटन्स दिलेली आहेत - पोलीस, आग, मेडिकल व इतर. आपल्या गरजेप्रमाणे बटन दाबले तर योग्य ती मदत मिळू शकते. फेब्रुवारीत मदत मिळण्याची वेळ 10 ते 12 मिनिटे इतकी होती. ती सहा महिन्यात ६ ते ८ मिनिटे इतकी कमी करण्याची योजना होती जी आतापावेतो अमलात आणली गेली असेल.

आपली क्षमता व इच्छा असल्यास आपण स्वयंसेवक म्हणून स्वतःची नोंद करू शकतो. आपल्या भागात कुणी मदतीची याचना केल्यास ती आपल्यापर्यंतही पोचून आपण तिथे धाव घेऊन मदत करू शकतो.

ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाहीत ते 112 थेट डायल करून मदत मागू शकतात. The Emergency Response Support System (ERSS) च्या वेबसाईटवर थेट लॉगिन करूनही मदत मागता येते. प्रत्येक राज्याचे इमेरजन्सी रिस्पॉन्स सेंटर त्यांच्याकडे आलेल्या प्रत्येक फोन, इमेल व अँपमार्फत आलेल्या पॅनिक कॉलचा पाठपुरावा करते.

ही योजना केंद्र सरकारने निर्भया फंडमार्फत सुरू केलेली आहे.

कुठलीही वाईट घटना घडली की आपल्याला खूप वाटते की आपण काही मदत करू शकलो असतो. ही चिडचिड व हतबलता सोशल मीडियावर व्यक्त होते. जर ह्या अँपवर आपण स्वयंसेवक म्हणून रजिस्टर केले तर आपल्या चिडचिडीला दिशा मिळेल, कुणा बिचाऱ्या व्यक्तीला मदत मिळेल.

इतके चांगले अँप असूनही सरकारी पातळीवरून त्याचा प्रचार केलेला दिसत नाही. हैद्राबादच्या घटनेत तिथल्या एका मंत्र्याने 'बहिणीला फोन करण्याऐवजी १०० नंबरवर फोन करायला हवा होता' अशी प्रतिक्रिया दिल्यावर त्याच्यावर टीकेची झोड उठली. पण कदाचित मदत मिळू शकली असती, प्रसंग टाळता आला असता. असो. घडून गेल्यावर बोलण्यात काही अर्थ नाही.

अशी मदत मिळण्याची संधी उपलब्ध असेल तर आपण ती घ्यावी. यात नुसती पोलीस मदतच नाही तर आग व आरोग्यही समाविष्ट आहे. कित्येकदा घरात फक्त वृद्ध व्यक्ती असतात. कुणा एकाच्या बाबतीत मेडिकल इमेरजन्सी उद्भवली तर दुसऱ्याला काय करावे सुचत नाही, हाक मारून बोलावण्याच्या अंतरावर कुणी नसते, मुले बाळे लाम्ब दूरदेशी असतात. अशा वेळी हे अँप वापरून तात्काळ मदत मिळवता येईल. अमेरिकेतील ९११ सारखा याचा वापर व उपयोग व्हावा ही सरकारची अपेक्षा आहे.

अँपचा वापर करून आपले रक्षण करण्याचा प्रयत्न करणे आपल्या हातात आहे. आपण सगळ्यांनी हे नक्की करावे असे मला वाटते.

वेबसाईट : https://ners.in/

ट्रॅकिंगचे काम कसे चालते याची माहिती देणारा विडिओ:

https://youtu.be/b0dOfFZXBMQ

Group content visibility: 
Public - accessible to all site users

इतर शंका उपस्थित करण्यापूर्वी माहिती आणि एप चाचणीबद्दल धन्यवाद.

शंका अन संभाव्य अडचणी असतात बऱ्याच.

अगदी मुख्य म्हणजे समोरची व्यक्ती कशी आहे याचा अंदाज येतच नाही.

साधनाताई,
लेख whatspp वर पाठवू का? (अर्थात तुमच्या नावासकट)

सर्वांचे आभार.

मनिम्याउ, शेअर कर. माहिती शक्य तितक्या लोकांपर्यंत पोचायला हवी.

साधनाताई पुन्हा एकदा चेक कर ॲप. मी हे लॉन्च झाले तेंव्हाच डालो केले होते पण नंतर ते काम करत नव्हते. आज न्युजमधेही याचा उल्लेख होता की ही सुविधा महाराष्ट्रात बंद का आहे? सुरू असेल तर चांगलेच आहे. न्युजमधे असेही सांगीतले की ॲन्ड्रॉईड फोनचे पावर बटन तिन वेळा दाबले की तुम्हाला मदतीचा कॉल येतो.

हे App चालू आहे. मी दुपारी चेक करून बघितलं. मिनिटभराच्या आत हेल्प हवीये का विचारणारा कॉल आलेला.

फोनला नेटवर्क नसेल तिकडे काय उपयोग असल्या एपचा ?
त्यापेक्षा हा एक लेख वाचनात आलाय तो बरा वाटला -

#सेफ्टी_फर्स्ट!! (सुरक्षिततेचा मूलमंत्र)

- स्मृती कुळकर्णी-आंबेरकर

होणाऱ्या घटना चुकत नाहीत! टाळताही येत नाहीत. पण १२ गावचे (Exactly, ४ खंड आणि २४ देशांचे) पाणी प्यायलेली सोलो ट्रॅव्हलर म्हणून मी काही गोष्टी नक्की सुचवू इच्छिते! अत्याचार कोणावरही होतात, कुठल्याही वयात होतात, मुलगा-मुलगी दोघांवरही होतात पण मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण जास्त आहे म्हणून खास टीप्स

Part 1
Domestic Safety -

★ एखादा वाईट प्रसंग, घटना #अनोळखी_ठिकाणीच होते असं नाही. बरेचदा आपल्या पायाखालच्या, नेहमीच्या रस्त्यावरही होऊ शकते. Don't be Predictable!!! तीच वेळ, तोच रस्ता, तीच पार्किंगची जागा याचं रोजचं दळण दळू नका!! घरून बाहेर पडल्यावर १०० पावलं वाचवून तुम्ही एखाद्या ठिकाणी लवकर पोहोचत असाल तर आठवड्यातून २ दिवस लांबचा रस्ता घ्या. १० मिनिटं लवकर निघा. मध्ये एखादं काम असेल तर ते काम करून वाट वाकडी करून इच्छित स्थळी पोहोचा! ऑफिसच्या ठिकाणी कधीतरी वेगळ्या ठिकाणी गाडी लावा. थोडक्यात, घरच्यांव्यतिरिक्त कोणालाही तुमची वेळ, जागा याचे वेळापत्रक माहित असता कामा नये.

★ कुठे निघालोय याची माहिती घरच्यांना प्रत्यक्ष, फोनवरून किंवा तेही शक्य नसेल तर Sms, Whatsapp वर कळवा.

★ रस्त्यावरून चालताना किंवा सार्वजनिक ठिकाणी फोनवर खाजगी, वैयक्तिक बोलणे टाळा. कुठे जाणार आहात किंवा कुठे राहणार आहात याची माहिती द्यायची असेल तर text मेसेज पाठवा. फक्त भिंतीला कान नसतात तर तुमच्या आजूबाजूच्या सगळ्यांना असतात आणि काही लोकं याचा गैरवापर करू शकतात.

★ उबर, ओला याचे लोकेशन शेअर करता येते. कारमध्ये बसल्यावर शक्य असेल तर घरच्यांबरोबर तुमचा रूट आवर्जून शेअर करा.

★ फुकट किंवा कमी पैश्यांमध्ये कोणी तुम्हाला लिफ्ट देत असेल तरीही हा पर्याय निवडू नका. (ईस्थर अनुया हिची २०१४ सालची केस यावर बेतलेली आहे.)

★ क्षुल्लक वाटणारी पण महत्त्वाची गोष्ट. बुक केलेल्या कारमधून प्रवास सुरु झाल्यावर मुली कानात गाणी लावून बिनधास्त झोपून जातात. कारमध्ये एकट्या प्रवास करत असाल तर काहीही करून जाग्या आणि सतर्क राहा. (सगळेच ड्रायव्हर्स वाईट असतात असे नाही, पण हलगर्जीपणा चांगला नाही!)

★ फोन लवकर डिस्चार्ज होत असेल तर पोर्टेबल चार्जर सोबत घेऊन फिरा. तो वेळोवेळी चार्ज असेल याकडे लक्ष द्या. २५% बॅटरी असताना तसाच फोन घेऊन निघायची रिस्क घेऊ नका. २०% बॅटरी झाली तर पटकन उतरते आणि अगदी ५ मिनिटांमध्येही फोन बंद पडू शकतो.

★ रस्ता मोकळा असेल किंवा एखाद्या सुनसान गल्लीमध्ये शिरलात तर तुमचे पाचही सेन्स ऑर्गन्स जागरूक असू द्या. डोळे (सतर्क), कान (मोकळे), नाक (गंध जाणवू शकेल), हात (मोकळे) आणि सगळ्यात महत्त्वाचे डोके (#विचारमुक्त)! कानात एअरफोन घालून गाणी ऐकत चालू किंवा स्कुटी वगैरे ड्राईव्ह करू नका. समोरून कोणी आलं किंवा मागून कोणी पाठलाग करतोय असा संशय आला तरी मोकळ्या हातांनी मुकाबला करू शकाल याची तयारी ठेवा.

★ अनोळखी ठिकाणी अंधार झाल्यावर शक्यतो जाणे टाळा.

★ तुमच्या ओळखीचा, नेहमीचा रस्ता असला तरी रस्त्यावरची लोकं, उभे राहणारे टवाळखोर लोकं यांच्यापासून आपल्याला काही होणारच नाही अशारितीने बिनधास्त राहू नका. (याचा अर्थ असा नाही, घाबरून राहा, पण ती लोकं सतत दिसत असतील तर सजग राहा.)

★ काळजी घेऊनही पाठून, समोरून हल्ला झाला तर बचावाच्या काही बेसिक टेक्निक शिकून घ्या. डोळे, जबडा, सेंटर पॉईंट अश्या जागांवर जोरावर मुक्का मारून तात्पुरती सुटका करून घ्या. हातपाय गाळून घाबरून धीर सोडू नका. नखं हे आपले हत्यार आहे. प्रसंग पडला तर चावा, नखं रुतवा, केस खेचा, त्यांच्या कानात जोरात किंचाळा पण स्वतःची सुटका करून घेण्याचे ध्येय ठेवा!

★ महिला सुरक्षिततेसाठी अनेक ऍप्स आहेत. असुरक्षित वाटलं तर लगेच त्याचा वापर करा. काही घडेल याची वाट बघू नका.
- Pratisaad (ASK) (महाराष्ट्र पोलिस)
- SOS stay safe
- Women safety shield
- Nirbhaya : Be Fearless
- CitizenCOP
यापैकी कोणतेही app डाऊनलोड करून ठेवा.

★ हल्ला झालाच तर महिलांच्या सेफ्टीकरिता बरीच प्रोडक्टसही बाजारात उपलब्ध आहेत. सतत एकटीने प्रवास करावा लागत असेल तर यापैकी कुठलेही एक साधन पर्समध्ये कायम ठेवावे.
- Women Safety electric torch
- Pepper Sprey
- Automatic Alarm Watch
हे सगळे ऑनलाईन मिळते.

★ Last but not the least
Be Alert - Be Safe !!

या भागात आपण डोमेस्टिक सेफ्टीबद्दल जाणून घेतलं पुढच्या भागात आपण International and overall safety बद्दल जाणून घेऊया.

© स्मृती कुळकर्णी- आंबेरकर
१ डिसेंबर २०१९

पण रिटर्न आलेला कॉल रिसीव झाला नाही (रिसीव करता आला नाही) तर काय ही एक शंका आहे>>>>

ह्याचा अर्थ मदतीची गरज आहे असा होईल ना? बहुतेक पोलीस येतील शोधत.

पण रिटर्न आलेला कॉल रिसीव झाला नाही (रिसीव करता आला नाही) तर काय ही एक शंका आहे>>>>

ह्याचा अर्थ मदतीची गरज आहे असा होईल ना? बहुतेक पोलीस येतील शोधत.

या ॲप बद्दल काहीच माहीत नव्हते.

शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

स्वयंसेवक म्हणून नाव नोंदवले आहे.

पण रिटर्न आलेला कॉल रिसीव झाला नाही (रिसीव करता आला नाही) तर काय ही एक शंका आहे>>>>true caller मधून no block असेल आपोआप,तो unblock करा

ह्याचा अर्थ मदतीची गरज आहे असा होईल ना? बहुतेक पोलीस येतील शोधत.>>>>नाही आले साधनाताई,नाही आले कुणी,काल मैत्रीणीला हे अँप दाखवत होते तेव्हा असाच प्रकार झाला,2 वेळा फोन उचलताच नाही आला,आम्ही दोघी पण घाबरलो पोलीस येतात की काय आता,पण कसलं काय.

2 वेळा फोन उचलताच नाही आला,आम्ही दोघी पण घाबरलो पोलीस येतात की काय आता,पण कसलं काय>>>>

नेटवर बघितले तर काही रिस्पॉन्स आहेत पोलीस आल्याचे. तू परत पोलीस पॅनिक बटन प्रेस कर व फोन आल्यावर विचार, मी जर फोन उचलू शकले नाही तर पुढे काय होते.
हे अँप वापरायचा प्रसंग कोणावर येऊ नये असे मनापासून वाटते पण वेळ आलीच तर माहीत असायला हवे.

लोक फोन करून सतत चौकशी करणार हे गृहीत धरले गेले असणार.

उपयुक्त माहिती.ऍप टाकून ठेवणार आहे.
पोलीस फोर्स, त्यांच्या संख्येला पण मर्यादा आहेत.जितके स्वयंसेवक वाढवता येतील तितके चांगलेच.
अडचणीच्या काळात जवळ ठेवलेल्या काही उपायांपैकी हा एक असू शकेल.

तू परत पोलीस पॅनिक बटन प्रेस कर व फोन आल्यावर विचार, मी जर फोन उचलू शकले नाही तर पुढे काय होते.
हे अँप वापरायचा प्रसंग कोणावर येऊ नये असे मनापासून वाटते पण वेळ आलीच तर माहीत असायला हवे.>>>>हो बरोबर आहे,मी करते पुन्हा try

अ‍ॅप ची कल्पना चांगली आहे आणि नीट राबवली तर खूप दिलासा मिळेल हे खरे. पण असे प्रत्येक जण इन्स्टॉल करून टेस्ट कॉल करायला लागला तर कसे चालेल ? तो इमर्जन्सी नंबर आहे ना? कस्टमर सर्विस ला विचारायचे प्रश्न इमर्जन्सी ला कॉल करून का विचारयचे? हा अब्यूज नाही का झाला त्या सोयीचा. आपल्याकडे कुठल्याही सोयीचा नीट वापर करण्याचा पब्लिक अवेअरनेस वाढवण्याची गरज आहे.
अशाने इतकी चांगली सोय आणि इन्फ्रास्ट्रक्चर असूनही हळू हळू निकामी होऊन जाईल. उगीच कॉल केल्यास दंड बसेल अशी काहीतरी सोय हवी.

कस्टमर सर्विस ला विचारायचे प्रश्न इमर्जन्सी ला कॉल करून का विचारयचे? हा अब्यूज नाही का झाला त्या सोयीचा.

सहमत. ही सिस्टीम कशी चालणार याबद्दल पूर्ण माहिती सरकारने सर्वत्र प्रदर्शित करायला हवी

Anti-social एलमेंट्स नी स्वयंसेवक म्हणून register केलं तर? मला वाटतं 100 is the best idea.

कस्टमर सर्विस ला विचारायचे प्रश्न इमर्जन्सी ला कॉल करून का विचारयचे? हा अब्यूज नाही का झाला त्या सोयीचा.

सहमत. ही सिस्टीम कशी चालणार याबद्दल पूर्ण माहिती सरकारने सर्वत्र प्रदर्शित करायला हवी

App baddal mahiti dilyabaddal Dhanyawad, mulichya ani mazya mobile madhe download kela .

ह्या ऍप ची माहिती करून दिल्याबद्दल धन्यवाद.
रच्याकने कुणी pepper sprey कॅरी करत का?
ते खरंच एफ्फेक्टिव्ह आहे का?
हल्ली ola, uber, किंवा अगदी ऑटोमध्ये सुद्धा बऱ्याच घटना घडतात.
तेव्हा ऍप पेक्षा pepper sprey किंवा इतर उपाय जास्ती उपयोगी ठरतील असं वाटत.
अमेझॉन वर आहे pepper sprey.
नवऱ्याचं म्हणणं आहे एक pepper sprey जवळ ठेव असं.

Pages