रेषेवरची अक्षरे...
रेषेवरची अक्षरे...०८
---------------------------->
http://sites.google.com/site/reshewarachiakshare2008/?pli=1
माणसं लिहीत होती.
भाषा मरत असताना,
संस्कृतीला धोका असताना,
ब्रेनड्रेन होत असताना,
साहित्यिक नियतकालिकं माना टाकत असताना
माणसं लिहीत आलीयेत.
माणसं लिहितायत. अजूनही.
पायांखालची माती आणि खिशातली चलनं बदलत गेली.
छपाईची माध्यमं आणि मक्तेदार्या बदलत गेल्या.
लिखाणाची भाषा कात टाकत गेली.
लांबी अधिकाधिक आटत गेली.
तरीही
माणसं लिहितायत.
नव्या दमानं. अजूनही.
प्रेम, प्रेमभंग, पाऊस. नॉस्टाल्जिया, स्वदेस.
कंटाळा, स्टॅग्नेशन. पुन्हा प्रेम.
न चुकता पडणारी तीच ती भव्यदिव्य स्वप्नंबिप्नं.
त्यांचे तेच ते माती खायला लावणारे अपेक्षित शेवट.
आणि याच चिखलामातीतून रसरशीतपणे वर येणारी काही जिवंत झाडं हिरवीगार
माणसं भाषेत रुजवत आलीयेत.
माणसं लिहितायत. अजूनही.
झाडांची दखल घ्या न घ्या.
ती असतातच माती आणि पाण्यासकट. सावल्या पेरत.
तशीच माणसांची अक्षरं तरत आलीयेत.
परभाषांची आक्रमणं, कॉपीराइट्सच्या साठमार्या आणि छापखान्यांच्या मक्तेदारीतून. विचार पेरत.
माणसं लिहीत आलीयेत.
माणसं लिहितायत.
अजूनही.
-- संपादक मंडळ
(रेषेवरची अक्षरे--०८)
-------------------------------------------
दिवाळी अंकाच्या वैभवशाली शतकी परंपरेला आपल्या नेटवरील अक्षरांच्या माध्यमातून मानाचा मुजरा करत आहेत हे काही ब्लॉगर्स.. रुढार्थाने हा दिवाळी अंक नाही तरीही दिवाळीच्याच निमित्ताने केलेला हा एक पहिलावहिला ब्लॉग्जसंकलनाचा प्रयत्न.
कसा वाटला ते जरुर कळवा.
ह्म्म्म्म
ह्म्म्म्म्म्म्म,
कुणीतरी म्हटलंय, "ज्ञानेश्वरी लिहिल्यानंतर अजुन काही लिहायची गरज आहे का?"
Good One
अप्रतिम!
अप्रतिम!
एकाच वेळी निराश आणि आनंदी, हताश तरीही आशावादी वाटायला लावणारी कविता आहे.. सुंदर!!
तुमचा साहिरवरचा लेखही असाच ह्रदयस्पर्शी होता.. आणखी काय लिहिलंयत तुम्ही मायबोलीवर?
ट्युलिप,
ट्युलिप, अंक सुंदर आहे. सर्व कविता आवडल्या. हळुहळू वाचत्येय.
या उपक्रमाबद्दल सर्वांचे अभिनंदन!
अप्रतिम
अप्रतिम आहे ही कविता!
झाडांची दखल घ्या न घ्या.
ती असतातच माती आणि पाण्यासकट. सावल्या पेरत.>> प्रचंड आवडल्यात या ओळी.
छान
छान ट्युलिप, संकल्पना आवडली. सगळेच लेख छान आहेत.
अंक सुंदर
अंक सुंदर आहे. मायाजाळावर इतके लिखान उपलब्ध असतान त्यातून निवड करने कठिन काम नक्कीच झाले असनार.
धन्यवाद
धन्यवाद मंडळी. अंक जरुर वाचा सगळाच.
आणि ती कविता /राईटप चं श्रेय मेघना भुस्कुटेचं आहे. तिचा ब्लॉग वाचला आहेत का तुम्ही? खूपच सुरेख लिहिते ही मुलगी. सुरेख आणि वेगळं.
हा ह्यावर्षी पण आला का ?
हा ह्यावर्षी पण आला का ?
हो. ही घे लिन्क >>>
हो. ही घे लिन्क >>> http://reshakshare.blogspot.com/
अॅक्चुअल अंकाची pdf link मिळेल तिथेच.
धन्यवाद
धन्यवाद
टयुलिप, खूप सुंदर आहे
टयुलिप, खूप सुंदर आहे कविता.
एकाच वेळी निराश आणि आनंदी, हताश तरीही आशावादी वाटायला लावणारी कविता >> अगदी असंच
अंकही चाळला. सवडीने पूर्ण वाचायलाच हवा असं वाटतंय.
आभार.
अंक झक्कास आहे .
अंक झक्कास आहे .
धन्स ग ट्यु. २००८ चा वाचल्या
धन्स ग ट्यु. २००८ चा वाचल्या पासून २००९ चा शोधतच होते.
ब्लॉगवर वाचलं होतंच आता
ब्लॉगवर वाचलं होतंच आता पुन्हा इथं वाचतोय
सुरेख मांडले आहे. शांता शेळके
सुरेख मांडले आहे. शांता शेळके यांच्या, खालील उतार्याची आठवण झाली -
"मानवी संस्कृती हा एक वाहता प्रवाह आहे. त्याला किनारे आहेत. माणसे आपापसात लढतात. चोर्यामार्या करतात. एकमेकांचा वध करतात. खूप संघर्ष करतात. त्यांच्या रक्ताने हा प्रवाह भरुन जातो आणि इतिहास या संघर्षाची, रक्तपाताची इमानेइतबारे नोंद करतो. पण त्याच वेळी याच या प्रवाहाच्या दोन्ही तीरांवर, शांतपणे, कुण्याच्या ध्यानातही येणार नाही अशा रीतीने, माणसे प्रेम करतात. विवाहबद्ध होतात. मुलाबाळांना जन्म देऊन त्यांचे संगोपन करतात. गाणी म्हणतात, नाचतात आणि कविता लिहतात. मानवी संस्कृतीचा इतिहास म्हणजे खरोखर या प्रवाहाच्या तीरावर जे घडते त्याचा इतिहास असतो, असायला हवा. पण इतिहासकार निराशावादी असतात त्यामुळे संस्कृतिप्रवाहाच्या तीरावर जे जीवन फुलत असते त्याकडे ते दुर्लक्ष करतात आणि तिच्या रक्तलांच्छित प्रवाहाचेच चित्रण करत राहतात. "
छान लिहिले आहे..
छान लिहिले आहे..
सामो..छान आहे हा शांता शेळके यांचा उतारा..