आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा

Submitted by हर्पेन on 16 November, 2019 - 05:16

नमस्कार मंडळी ,

आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात मैत्री संस्था अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. २००१ मधे झालेला भुज भूकंप, २००४ मधे आलेली त्सुनामी, २००९ मधे लेह येथे ढगफुटीमुळे अचानकच आलेला पूर, नेपाळमधील भूकंप, २०१३ मधे उत्तराखंड राज्यात आलेला त्यानंतरचा केरळ राज्यातला आणि ह्यावर्षीचा आपल्या महाराष्ट्रातला महापूर अशा अनेक वेळप्रसंगी मैत्री संस्थेने आपत्ती व्यवस्थापन, स्थानिकांना मदत आणि पुनर्निर्माण कार्यामधे सहभाग घेतला आहे.

हवामान बदलाचे दुष्परिणाम स्वरुप आज कोल्हापूर सांगली पुण्यात देखिल कमी वेळात खूप जास्त आणि अचानक पडणारा पाऊस आणि त्यामुळे येणारा पूर यांचा धोका अनुभवास आलेला आहे. हा धोका या पुढे येणार्‍या काळातही संभवतो. एकंदरितच या आणि अशा आपत्तीजन्य परिस्थितीचा मुकाबला करतेवेळी काय करावे कसे वागावे ह्याबाबत अनभिज्ञता बहुतांश सुशिक्षितांमधेही जाणवते.

मदत करायची ईच्छा आहे पण काय करायचे कसे करायचे ते माहीतच नाही असे माझ्यासारखे अनेक जण आज आपल्यात आढळतील. तर अशा सर्व लोकांसाठी येणार्‍या परिस्थितीला तोंड देण्यास सुसज्ज राहता येण्यास मदत होईल अशा प्रकारची एक कार्यशाळा मैत्री संस्थेने परिवर्तन नावाच्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केली आहे.

तरी सर्व संबंधितांनी ह्याचा लाभ घ्यावा. तसेच आपापल्या परिचितांमधे हा धागा शेअर करून ह्या माहितीचा प्रसार करावा ही विनंती.

Maitree DM W.jpg

इंग्रजीतून माहिती

Maitree DMW Eng.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पूरक वाचन -
१. मैत्रीचे एक कार्यकर्ते तन्मय कानिटकर यांचा महाराष्ट्र टाईम्स मधे आलेला लेख
https://maharashtratimes.indiatimes.com/editorial/article/floods-floods-...

२. आपत्ती व्यवस्थापन कार्यात सहभागी, 'मार्गी' ह्या मायबोलीकराचे अनुभव खालील धाग्यावर वाचता येतील.
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़ https://www.maayboli.com/node/55171
जम्मू- कश्मीर मदतकार्याच्या आठवणी- १ https://www.maayboli.com/node/54953