Submitted by सूलू_८२ on 14 September, 2019 - 08:37
मित्रान्नो,
सूर नवा ध्यास नवाचा तिसरा सिझन सुरु झालाय. सध्या ऑडिशन्स सुरु आहेत.
ह्यावेळेस स्पर्धक ५- ५५ वयोगटातली असतील.
सूत्रसन्चालक - पुष्कर जोग आणि स्पृहा जोशी. जज्स- अवधूत गुप्ते, महेश काळे
सोमवार- बुधवार ९.३० वाजता
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शाल्मली का नाही यावेळी?
शाल्मली का नाही यावेळी?
धनीचित्रफीत छान असते
ध्वनीचित्रफीत छान असते सगळ्यांची. किती गुण आहेत लोकांमध्ये आणि किती प्रतिकूल परिस्थितीतून येतात, शिकण्यासारखे आहे. शाल्मली नाही ते बरे आहे. आज एक लहान मुलगी आली होती, तिला हर्षद नायबलसारखं कधीही बोलावणार आहेत, ती गोड आहे, पण हर्षद तो हर्षदच. दहा हजारातून सत्तर निवडले आहेत, आता अजून कमी करणार.
विवेक परांजपे ( कीबोर्ड
विवेक परांजपे ( कीबोर्ड वाजवणारे)त्यांची बायको स्पर्धक तिचे गाणे येऊ कशी आणि त्यांच्या मुलीचा अभिनय फारच छान झाला. तमिळ मुलगी ( नाव विसरलो) चांगली गायली. या वेळेस बरेच चांगले स्पर्धक आले आहेत.
शोधतच होते हा धागा !
शोधतच होते हा धागा !
यावेळी विविध एज गृप, विविध जॉनर्स असावेत या प्रयत्नात बरेच बेटर गाणारे स्पर्धक प्राथमिक फेरीतच रिजेक्ट केले, काही निर्णय नाही पटले !
सर्वात न पटलेला निर्णय म्हणजे त्या मिसेस परांजपे , किबोर्ड प्लेयरची बायको, कित्ती ते अवास्तव कौतुक त्या काकूंचं, वशिल्याचं तट्टु कि काय म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण ! पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच डोक्यात गेल्या त्या, अतिशय उथळ आणि ड्रामेबाज त्यांचं बोलणही, अज्जिबस्त चांगलं गायलं नसून त्यांची अख्खी फॅमिली बोलवून स्टेजवर टाइमपास आणि लग्गेच फायनल राउंडमधे निवड
एक संगीत शिक्षक होते, अभिषेकीबुवांचा अभंग गायलेले, ते हवे होते, किती तयारीचे होते ते !
पार्थ कुलकर्णी, अर्जुन पांडे हे दोघेही छान गायले होते पण पुढे नाही गेले .
बहुदा विविधता आणण्याच्या नादात गळले असे अनेक गायक.
अर्थात आहेत त्यात सुध्दा बरेच चांगले स्पर्धक आहेत.
मला सर्वात तो युपीचा तेजस्वी सिंग आवडलाय, सुंदर मराठी बोलतो, जे बोलतो तेही एकदम अभ्यासु/हुशार !
अनेक प्रदेशाची लोकगीतं गातो, लोकगीतांची इन्स्ट्रुमेन्ट्स वाजवतो, लुकिंग फॉरवर्ड टु व्हॉट हि हॅज टु ऑफर !
बाकीही अनेक चांगले गायक आहेत, बघुया कसा होतोय हा सिझन, चांगला होईल असं वाटतय !
शाल्मली नाही ते फार बरय !
सर्वात न पटलेला निर्णय म्हणजे
सर्वात न पटलेला निर्णय म्हणजे त्या मिसेस परांजपे , किबोर्ड प्लेयरची बायको, कित्ती ते अवास्तव कौतुक त्या काकूंचं, वशिल्याचं तट्टु कि काय म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण ! पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच डोक्यात गेल्या त्या, अतिशय उथळ आणि ड्रामेबाज त्यांचं बोलणही, अज्जिबस्त चांगलं गायलं नसून त्यांची अख्खी फॅमिली बोलवून स्टेजवर टाइमपास आणि लग्गेच फायनल राउंडमधे निवड Uhoh >>> अगदी
अक्षया अय्यर आणी डॉ राम
अक्षया अय्यर आणी डॉ राम पंडीतही लक्षात राहिले !
सर्वात न पटलेला निर्णय म्हणजे
सर्वात न पटलेला निर्णय म्हणजे त्या मिसेस परांजपे , किबोर्ड प्लेयरची बायको, कित्ती ते अवास्तव कौतुक त्या काकूंचं, वशिल्याचं तट्टु कि काय म्हणतात त्याचं उत्तम उदाहरण ! पहिल्यांदा ऐकल तेंव्हाच डोक्यात गेल्या त्या, अतिशय उथळ आणि ड्रामेबाज त्यांचं बोलणही, अज्जिबस्त चांगलं गायलं नसून त्यांची अख्खी फॅमिली बोलवून स्टेजवर टाइमपास आणि लग्गेच फायनल राउंडमधे निवड Uhoh
एक संगीत शिक्षक होते, अभिषेकीबुवांचा अभंग गायलेले, ते हवे होते, किती तयारीचे होते ते !
पार्थ कुलकर्णी, अर्जुन पांडे हे दोघेही छान गायले होते पण पुढे नाही गेले .
बहुदा विविधता आणण्याच्या नादात गळले असे अनेक गायक. >> +१११
वूटवर कलर्स मराठी अँवॉर्ड सची
वूटवर कलर्स मराठी अँवॉर्ड सची वोटिंग सुरू झाले आहे.मी सध्या स्वामिनी सोडून ,तेही वूटवर एकही मालिका बघत नाही, त्यामुळे कथाबाह्या कार्यक्रमालाच वोट केल आहे.
सूत्रसंचालक म्हणून स्प्रुहाला केल आणि ममांना पण केल कारण यावेळी जरी बायस असले तरी पूर्ण सिझनच गंडल्यामुळे ममांनाच पूर्णपणे दोषी नाही ठरवता येणार.
ते voting करायचं असेल तर
ते voting करायचं असेल तर सर्वांना करायला लागते का मीन्स एक दोघांना करता येतं का. मला तो शिवा आणि त्याची बहिण आवडते.
स्पृहाचा एकंदरीतच वावर मला
स्पृहाचा एकंदरीतच वावर मला आवडतो
ऑप्शन्स आहेत......अन्जु
ऑप्शन्स आहेत......अन्जु.ज्याला हव त्याला करु शकता.
कालची शेवटची काही गाणी (देवाक
कालची शेवटची काही गाणी (देवाक काळजी पासून पुढे) पाहिली. आवडली.
देवाक काळाजी हे दुसरंच होत.
देवाक काळाजी हे दुसरंच होत. त्त्याआधी एक देवीचा गोंधळ होता
तीच तीच गाणी फार गायली जातात
तीच तीच गाणी फार गायली जातात.काहीतरी बदल करायला हवा.
विशिष्ट गीतकार संगीतकार जोडी,संगीतकार गायक/गायिका जोडी,एखाद्यि रागावर आधारित गाणी,रिजनल गाणी.
तसच वेगवेगळ्या राउंड्स ठेवायला हरकत नाही,म्हणजे पूर्वी हिंदी सारेगमप मध्ये होती तशी कॉर्ड राउंड,दोन गायकांना एकाच गाण्याची दोन कडवी गायला लावणे.
कितीतरी इंटरेस्टिंग बदल करता येतील.पण चँनेल काही बदलायला तयार नाही.
त्या परांजपे काकूंबद्दल +१११!
त्या परांजपे काकूंबद्दल +१११! मी सगळ्या ऑडिशन राउअंड्स नाही पाहिल्यात पण नेमका हा दिवस पाहिला.
कसले किंचाळल्यासारख्या गात होत्या तरी घेतले त्यांना. तट्टू घ्यायचेत तर गुपचूप तरी घ्या. असली शोभा कशाला करता?! त्यांच्या मुलीला स्टेज वर बोलावून नाचायला सांगणे वगैरे अत्यन्त उथळ वाटले.
तो अवधूत सतत लोकांच्या जाडी , वय इ. वरून काहीही इनअप्रोप्रिएट बोलत असतो!
ऑप्शन्स आहेत......अन्जु
ऑप्शन्स आहेत......अन्जु.ज्याला हव त्याला करु शकता. >>> थँक यु. पण सगळ्या कॅटेगरीत द्यायला लागेल ना, मी फक्त शिवाची सिरीयल बघते. त्यातल्याच लोकांना देईन, वोटींग केलं तर.
वादक म्हणून शो मधे असलेल्यांच्या नातेवाईकांनी भाग घेतलेला चालला का. कधी कधी नियम असतो ना की जे शोत सहभागी आहेत, त्यांच्या नातेवाईंकाना स्पर्धक म्हणून घेत नाहीत.
तीच तीच गाणी फार गायली जातात
तीच तीच गाणी फार गायली जातात.काहीतरी बदल करायला हवा. >>>>> अगदी अगदी. सॅड गाणी खुप गायली जातात. चान्गल्या मूडसची, युथफुल गाणी सुद्दा गा ना. नव्या मराठी सिनेमातील सुद्दा चालतील.
गाणी छान होताएत, ती अक्षता
गाणी छान होताएत, ती अक्षता अय्यर आवडली खुपच आणि मुरांबा मधलं गाणं कोणी गायलं होतं ते ही आवडलं. अवधूत ची कमेंट पटली. वरती ईथे कोणत्या परांजपे काकूंबद्दल बोलताएत सगळेजण? बघितल्या नाहीत, आता बघीन.
या वेळेस स्पृहा कंबर मोडल्या सारखी उभी राहातेय असं वाटलं बघून. कोणाला नाही वाटलं का कि मलाच वाटतय? थोडी गबाळीपण दिसतेय
मला स्वतःला स्पृहा खुप आवडते,
मला स्वतःला स्पृहा खुप आवडते, तिचा स्टेजवर चा वावर छान असतो, पण हे तीनचार एपिसोड असं वाटलं.
अरेरे रे, बघितल्या परांजपे
अरेरे रे, बघितल्या परांजपे काकू :कपाळावर हात मारणारी बाहुली: रात अकेला है वाल्या हे म्हंणलं असतं तर लगेच कळलं असतं, आज दो लब्जोकी है गायलं, ठिकठाक गायलं . किंचाळण्याकडे कल जास्त आहे.
त्या परांजपे काकूंंच अति
त्या परांजपे काकूंंच अति कौतुक होत आहे.मला आजच गाण तर अजिबात नाही आवडल.तरी मेरीट दिल.
त्यांना ठेवण्यासाठी चांगल्या स्पर्धकाला काढायला नको.
त्या परांजपे काकूंंच अति
त्या परांजपे काकूंंच अति कौतुक होत आहे.मला आजच गाण तर अजिबात नाही आवडल.तरी मेरीट दिल.
त्यांना ठेवण्यासाठी चांगल्या स्पर्धकाला काढायला नको. >>> + ११
कालचा भाग छान झाला.
कालचा भाग छान झाला. मुनव्वर अलीच 'कलन्क' च शीर्षक गीत तर उत्तमच!
कालचा स्पृहाचा ड्रेस छान होता
कालचा स्पृहाचा ड्रेस छान होता आणि पहिले ती साडीमध्ये थोडी गबाळी वाटत होती तशी नव्हती वाटत काल. फक्त ते कानातले त्या ड्रेसला आणि गळ्यातल्या सोनेरी माळांना सूट होत नव्हते असं वाटलं, पण झुमके आजकाल कशावरही घालतात त्यामुळे चालसे.
परांजपे काकूंंच अति कौतुक होत
परांजपे काकूंंच अति कौतुक होत आहे.मला आजच गाण तर अजिबात नाही आवडल.तरी मेरीट दिल.
त्यांना ठेवण्यासाठी चांगल्या स्पर्धकाला काढायला नको.>>>+1111111 UP , मुनव्वर अली चं गाणं मला पण खुप आवडलं. ती एक स्वराली म्हणून आहे तिचा पण आवाज खुप छान आहे, पण तिला मार्कस् जास्त नाही दिले
हो ,त्या स्वरालीचा आवाज मला
हो ,त्या स्वरालीचा आवाज मला पण आवडला.पण त्या रविंद्र ला कस घेतल,तो गौरव महाराष्ट्राच्या कुठल्यातरी पर्वात फायनलिस्ट होता,जिंकला नाही.
त्या इंदौरच्या कनकश्रींच गाणं
त्या इंदौरच्या कनकश्रींच गाणं झाल का?
पण त्या रविंद्र ला कस घेतल,तो
पण त्या रविंद्र ला कस घेतल,तो गौरव महाराष्ट्राच्या कुठल्यातरी पर्वात फायनलिस्ट होता,जिंकला नाही.>>>>>>>> होय का ? काही कल्पना नाही , मी गौरव महाराष्ट्राचा बघत नव्हते.
अख्ख्या आठवड्यात एकही पोस्ट
अख्ख्या आठवड्यात एकही पोस्ट नाही? अखेरीस ईथल्या रसिक मडळींनी 'ध्यास' सोडलेला दिसतोय..!
काय करणार म्हणा.. या खेपेस मुख्य कार्यक्रमापेक्षा ऑडीशन्स बर्या होत्या असे म्हणायची वेळ आली आहे. त्यातही ज्या रेट ने हिंदी गाणी गात आहेत, राज ठाकरे न बोलावता स्वतः पाहुणे म्हणून हजर होतील (अलिकडे हे बरेच दिसू लागले आहे! ) आणि कार्यक्रम बंद पाडतील - 'लाव रे तो व्हिडीयो'. चुकून मराठी गाणी घेतलीच तर डायरेक्ट कोळीवाड्यावर नेतात... किंवा अजय अतुल किंवा शिंदे शाही... बाकी काही शिल्लकच नाही वाटते मराठी मध्ये.
आणि गायक स्पर्धकांबद्दल काय लिहावे? त्यांच्या गायनापेक्षा त्यांच्या अदा, नृत्त्य, शाळा, कॉलेज, कपडे, व्याधी... ईत्यादी सर्वाचाच ऊदो ऊदो आहे.. हाताच्या बोटांवर मोजण्या एव्हडे ४ आहेत पण त्यांचे काम ५ मिनिटात आटोपते.
अवधूत गुप्ते मात्र नेहेमीप्रमाणेच जमेची बाजू. स्वतः एक परीपूर्ण कलाकार असल्याने अचूक व योग्य मार्गदर्शन करतो. थोडा मीठ मसाला जास्त असला तरी मुद्दे व मार्गदर्शन एकदम योग्य असते.
बाकी महेश म्हणे जिथे कुठे आहे तिथून ऐकून मार्क देणारे...! पण चार ( पन्नास )शब्द बोलल्याशिवाय मार्क देऊ शकेल का? अवघड वाटतय!
असो ईंडीयन आयडॉल सुरू होत आहे.... ऑडीशन्स तर तूफान आहेत... Indi Ido is in completely different league than others हे पुन्हा पुन्हा जाणवते.
रच्याकने: सर्वांच्या लाडक्या परांजपे काकू स्पर्धेसाठी नव्हे तर निव्वळ झळकण्यासाठी आल्या आसाव्यात... तेव्हा मनाला लावून घेऊ नये. आणि पुष्कीsssss ला 'मंच्यावर' चढण्या आधीच खाली ढकलून दिलेल दिसते.
योग पुर्ण पोस्टी ला अनुमोदन
योग पुर्ण पोस्टी ला अनुमोदन
Pages