Submitted by supriya19 on 14 July, 2008 - 14:06
मी प्रथमचं माझ्या २ वर्षाच्या मुलीला घेउन भारतात जात आहे. २२ तासाचा प्रवास असल्याने खुप टेंन्शन आलयं. क्रुपया काही tips देउ शकाल का? तिला coloring ची आवड फारशी नाहि. पुस्तके नेईन मी. अजुन काही tips?
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
येप...पूपचे डायपर बदलण साफ
येप...पूपचे डायपर बदलण साफ चुकिच आहेच.. मी पीच पण बदलल नाहिये खर तर बॅसिनेट मधे कधीच.
माझी लेक २ महिन्यांची असताना २ दिवसांतुन एकदा शी करायची.. अख्या प्रवासात तिने शी केली नाही आणि अगदी विमान लँड व्हायच्या १ तास अगोदर केली.. मग देशात पुन्हा २ दिवस शी नाही तेव्हा मात्र अनेक सासवा, इतर माणस ह्यांच्या कडुन जे काही ऐकलय .. कंटाळा आलेला अगदी.........
Just एक सजेशन. ज्यानी अजुन
Just एक सजेशन. ज्यानी अजुन stroller घेतले नसतील त्याना उपयोगी पडेल म्हणुन लिहिती आहे.
graco च्या वगैरे travel system खुप जड आहेत. आता त्यानी lightweight काढल्या आहेत. पण चाक मोठीच आहेत. त्यामुळ लुफ्थान्सा ,डेल्टा विमानकंपन्या, त्या trevel system वजनान हलक्या असल्या तरी allow करत नाहीत.
त्या ऐवजी जर peg perego सारख्या कंपनीचे stroller घेतले तर ते वजनान अतिशय हल्के आहेतच पण चाक छोटी असल्यामुळ सगळ्या विमान कंपन्या allow करतात. खुप जास्त आरामशीर पण आहेत. फोल्ड करायला सोपे आहेत. Drawback एकच म्हणजे "महाग " आहेत. पण भारतात जाताना परत छोटा स्ट्रॉलर घेण्याचा खर्च इ वाचतो. Totally worth the money.
बेबीज आर अस मध्ये मिळतो. आता बरेच नविन आलेत पण माझ्याकडे त्याच हे model आहे.
http://www.pegperego.com/page.php?sid=43f4d5b2ea7b2ad08c4ecbb3b652c36c&p...
मला अजुनही माझ्या मुलीसाठी घेतलेला तो one of the Best Product वाटतो.
peg perego महाग वाटत असेल तर
peg perego महाग वाटत असेल तर zooper, Maclaren, combi, inglesina हे चांगले alternatives आहेत. ह्यांची last year models (न वापरलेली) normally ebay वर २०-३०% कमी किमतीमधे मिळतात.
सीमा, अनुमोदन. मी इशानसाठी
सीमा, अनुमोदन. मी इशानसाठी काँबीचे कॉम्पॅक्ट स्ट्रोलर घेतले होते. स्ट्रोलरची पाठ पूर्ण आडवी होते त्यामुळे अगदी लहान असताना सुद्धा इशान त्यात आरामात रहायचा. हेच स्ट्रोलर अजूनही वापरतो.
शिवाय स्टाफ ने नीट हाताळले नाही तर स्ट्रोलर बरोबरचे कार सीट ही वाया जाईल असे वाटते >>> न्याती, विमानात शिरेपर्यंत स्ट्रोलर आपल्याच ताब्यात असते. उतरल्यावर काही विमान कंपन्या स्ट्रोलर सरळ बॅगेज क्लेममधे पाठवतात. पण बहुतेक तरी विमानाच्या बाहेर लगेच मिळते. इथे आल्यावर तर मिळतेच. भारतातच बॅगेज क्लेममधे पाठवतात. तू विमान कंपनीला फोन करुन विचारुन घे.
मी ही भारतात जाण्यापूर्वी
मी ही भारतात जाण्यापूर्वी मॅक्लारेन घेतला होता. अर्थात तेव्हा माझा मुलगा सव्वा वर्षाचा होता त्यामुळे तो ग्रॅकोचा स्ट्रोलर न्यायचा ही नव्हताच मला. लहान बाळं असतील तर फार चॉईस नाही.
हे लहान मुलां बाबत नाही
हे लहान मुलां बाबत नाही माझ्या बाबत :)... विमान लँड होतांना माझ्या कानात खुप त्रास होतो ह्यावर काही ऊपाय आहे का ??? प्लीज कळवा.
ब्रिटिश एअर वेज कधीही
ब्रिटिश एअर वेज कधीही स्ट्रोलर , कार सीट गेटपाशी देत नाहीत. अगदी बिझिनेस क्लास वाल्यांना सुद्धा नाही. अतिशय उर्मट सेवा असते स्ट्रोलरच्या बाबतीत ! *(&*&*^&%%^$%$##
एअर इंडियाही नाही. बॅगेज
एअर इंडियाही नाही. बॅगेज क्लेमशी स्ट्रोलर येतो हातात.
काँटि.ने हातात दिले होते
काँटि.ने हातात दिले होते गेल्या वेळी. ब्रिटिश एअरवेजची वेगळी पॉलिसी असेल. पण परत आल्यावर तर नक्कीच विमानाच्या दाराशी मिळतो.
सास, दोन चार Lifesavers
सास, दोन चार Lifesavers सारख्या hard candies पर्स मधे घेऊन जा. लँडिंगच्यावेळी चघळ. कानातले दडे कमी होतील.
डेल्टापण स्ट्रोलर विमानाच्या
डेल्टापण स्ट्रोलर विमानाच्या दाराशी देते.
खरं सांगायचं झालं तर मला तर
खरं सांगायचं झालं तर मला तर स्ट्रोलरचा भारतात काहीच उपयोग वाट्त नाही. मग कशासाठी न्यायचा? इथे तर सोडायला कोणी तरी येतच तेव्हा पाहिजे असल्यास तिथुन पुढे नेऊ नये, हे माझं स्पष्ट मत आहे. मला पहिल्याच वेळी अनुभव आला, विमान पार कोसावर उभ करुन तिथुन बसनी एअर पोर्टवर घेऊन गेले. अश्यावेळी कमीत कमी सामानच बरं. अश्यावेळी स्ट्रोलर विमानाच्या दाराशी दिले तरी बाळगत पुढे न्या.
आभार स्वाती
आभार स्वाती
भारतातील लोकांना सांगितले तर
भारतातील लोकांना सांगितले तर ते १-२ महिन्यापुरती बाबागाडी उपस्थित करतील की. पण विमानतळात आत आपण आपलेच असतो. तिथेच खरा प्रोब्लेम.
प्रिती, कधी कधी कटकट होते खरी
प्रिती, कधी कधी कटकट होते खरी त्या स्ट्रोलरची. जेव्हा मूल झोपलेलं असतं नी एका हातात बॅग घेऊन त्याला ढकलत न्यावं लागतं पण त्यावर उपाय म्हणजे लाईटवेट स्ट्रोलर.
मला अश्या वेळी स्ट्रोलर
मला अश्या वेळी स्ट्रोलर पेक्षा बेबी कॅरेज जास्त सोयीचं वाटतं. बाळाला त्यात बसवुन खांद्याला अडकवलं की एक बॅग ओढता येते.
भारतात उपयोग का नाही म्हणे ?
भारतात उपयोग का नाही म्हणे ? मला तर भरपूर उपयोग झाला.
सिंडे, मलाही. शॉपिंगला वगैरे
सिंडे, मलाही. शॉपिंगला वगैरे गेलं तिकडे की मुलं त्यात झोपतात की आपण मोकळे शांतपणे हे ते बघायला. मी अजूनही नेते बरोबर. आणि आणखीन एखाद वर्ष नक्कीच नेईन.
तिथल्या कार छोट्या असतात
तिथल्या कार छोट्या असतात (आमच्याकडे जी आहे ती.), स्ट्रोलर ठेवल्यावर काही जागाच उरत नाही, आणि सगळे बाळाला घ्यायला इतके उत्सुक असतात की स्ट्रोलरमधे ठेवायची कधीच मला गरज नाही वाटली. हे माझं मत आहे (आधी पण सांगितलय
).
कॉन्टीनेन्टल एअरलाईन्स मधे
कॉन्टीनेन्टल एअरलाईन्स मधे माझ्या ४ वर्षाच्या लेकी च्या तिकिटावर किती बॅगा आणि प्रत्येकी किती वजनाच्या नेता येतील? तिला स्वताची वेगळी सीट आहे आता.
प्लिज सान्गा...
तोषवी, तिच्या ति़कीटावर २५
तोषवी, तिच्या ति़कीटावर २५ किलोची एक (बहुतेक एकच असावी) चेकइन बॅग आणि एक हॅंडबॅग नेता येईल.
चार वर्षाची लेक म्हणजे
चार वर्षाची लेक म्हणजे रेग्युलर मोठ्यांसारखच तिकिट ना? नेहमी प्रमाणे मोठ्या इतकच सामान नेता येत मग.
हो सीमा. आपल्याला चेकईन मध्ये
हो सीमा. आपल्याला चेकईन मध्ये एकच बॅग अलाऊड असते की दोन असतात? लक्षात नाही.
विमान नाही पण प्रवास आहे. मी
विमान नाही पण प्रवास आहे.
मी माझ्या १ वर्षाच्या मुलीला घेवुन गणपती पुळ्याला जाणार आहे. तिच्या खाण्यापीण्याच कस बघता येईल आणी अजुन काय काळजी घेतली पाहीजे.
निकिता..दुधासाठी अमुल चे
निकिता..दुधासाठी अमुल चे टेट्रापॅक मिळतात..आणि ते फ्रीझ शिवायहि टिकतात ..त्यामुळे ते नेउ शकतेस..आणि बरोबर लाडु , वड्या असेहि करुन घेउ शकतेस..म्हणजे मध्ये कधिहि काहि मागितले तरी देता येउ शकते..
आम्ही १० महिन्यांच्या मुलीला
आम्ही १० महिन्यांच्या मुलीला घेउन अमेरिकेत (युएस एअरवेज ने) डोमेस्टिक प्रवास करत आहोत. तिचे वेगळे तिकीट काढले नाहिये. असे असताना कार सीट + बेस चेक इन किंवा कॅरी करु देतात का? फोन करुन विचारले असता नेमके उत्तर मिळाले नाही. कुणाला अनुभव आहे का?
बेस चे माहीत नाही पण कार सीट
बेस चे माहीत नाही पण कार सीट तुम्हाला चेक इन करावे लागेल. हे चार्जेस आता एअरलाईनप्रमाणे बदलतात पण अजूनही बहुतेक एअर लाईन्स स्ट्रोलर आणि कार सीट ला चार्ज करत नाहीत. कोणती एअरलाईन आहे?
सॉरी, यूएस एअरवेज आहे हे आत्ता वाचले. त्यांच्या वेबसाईट वर नक्की असेल ही माहिती.
असे असताना कार सीट + बेस चेक
असे असताना कार सीट + बेस चेक इन किंवा कॅरी करु देतात का? >>> कॅरी करता येणार नाही. स्ट्रोलर नेता येइल. तिच्यासाठी बॅसिनेट रिक्वेस्ट टाका आतापासूनच.
डोमेस्टिकसाठी बॅसिनेट?
डोमेस्टिकसाठी बॅसिनेट?
हम्म. थॅन्क्स. आम्ही मुव्ह
हम्म. थॅन्क्स.
आम्ही मुव्ह करतो आहोत. कार सीट नेता आले तर तेवढेच नवीन घ्यायचे वाचेल. शिवाय नाही नेता आले तर कार रेंट करताना तेही अॅड करावे लागेल आताच.
Pages