लहान मुलीसोबत विमानप्रवास.

Submitted by supriya19 on 14 July, 2008 - 14:06

मी प्रथमचं माझ्या २ वर्षाच्या मुलीला घेउन भारतात जात आहे. २२ तासाचा प्रवास असल्याने खुप टेंन्शन आलयं. क्रुपया काही tips देउ शकाल का? तिला coloring ची आवड फारशी नाहि. पुस्तके नेईन मी. अजुन काही tips?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या मुलीला साधारण सव्वा दोन-अडीच वर्ष वयापासून एक्झिमा/अटोपी चालू झाला तो वय वर्ष सहा पर्यंत पुरुन उरला. आणि भारतात गेल्यावरही कमी व्हायचा वगैरे असं अजिबात नव्हतं. जर उन्हाळ्यात तिथे गेलं तर घामामुळे वगैरे जास्तच त्रास व्हायचा.

आता तुमची मुलगी किती मोठी आहे आणि आता पुर्ण गेला का त्रास? कश्यानी कमी झाला?
माझ्या मुलीला जवळपास ती ३ महिन्याची असल्यापसून होतो आहे. मी सुरुवातीला hydrocortizone वापरले पण आता फक्त aquaphor, gentle naturals eczema cream वापरते आहे. तीला हाताच्या फोल्ड्समध्ये आणि पायावर थोडासा रॅश आहे. पण मागच्या वर्षी तिला भारतात गेल्यावर तिचा रॅश आणि खाज वाढले होते इतके की चेहर्‍यावर पण खूप रॅश आले होते आणि मग इकडे परत आल्यावर खूप दिवसपर्यंत अंगावर पांढरे पॅचेस होते.

तुमच्या ped नी तुम्हाला allergy tests करायला सुचवले नाहि का ? कधी कधी eczema food allergies मूळेही असू शकतो.

माझ्या मते माझ्या मुलाला/मुलीला अमक्या ठिकाणी गेल्यावर अमका त्रास झाला कि झाला नाही ह्या सल्ल्यांचा फारसा उपयोग नसतो. तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करा. शेवटी सगळी तुमची जबाबदारी असणार आहे.

बरोबर आहे असामी तुझं. शेवटी प्रत्येकाची तब्येत वेगळी असते.नी होणारा त्रास, त्याची तीव्रताही वेगळी.

अ‍ॅलर्जी टेस्टही करुन घ्यावी. म्हणजे ज्याने त्रास वाढत असेल ते आहारातून पूर्णपणे वगळायला बरं.

मी माझ्या दीड वर्षाच्या लेकीला घेऊन गेले होते मागच्या डिसेंबर मधे. मलेरिया टॅबलेटस, शॉट्स वगैरे काहीही दिले नव्हते पण इथे ऑस्ट्रेलिअन्स टी बी च्या बाबतित जरा जास्तच काळजी करतात त्यामुळे तिला भारतात जाणार म्हंटल्यावर तिच्या पेडी ने बी सी जी चा शॉट घ्यायला सांगितला होता.

भारतात तुम्ही अगदीच रिमोट जागी जाणार असाल तर मलेरिया इ इ ची जास्त काळजी घ्यायला लागते. पण पुण्या-मुंबईत, ओडोमॉस, मच्छरदाणी, गूड नाईट असले की काही त्रास होत नाही.

पाणी मात्र फिल्टर करुन, ऊकळुन द्यावे.

दुधाच्या बाटल्या नीट धुवुन, ऊकळुन घ्याव्यात. वॉटर प्युरिफायर गोळ्या मिळतात. त्या पाण्यात टाकुन त्या पाण्याने बाटल्या धुता येतात. धुतलेल्या बाटल्या पातळ फडक्याने झाकुन ठेवाव्यात म्हणजे त्यावर धुळ वगैरे पडणार नाही.

ब्रिटाचे बॉटल फिल्टर्स प्रवासात वगैरे खुप उपयोगात येतात.

पॉल्युशन बद्दल म्हणाल तर आपण जास्त वेळ घरातच असतो. उगाच लहान पोराला जास्त गर्दीच्या ठीकाणी, धुर्-धुळ अस लागेल अश्या ठिकाणी नेवुच नये. न्यायची वेळ आलिच तर शक्यतो बंद गाडीतुन, टॅक्सीतुन प्रवास करावा. किंवा मुलाच्या तोंडावर हलके पातळ रुमाल बांधावा.

डॅअक्टर ने सांगीतले होते, मोठ्या शहरातच रहा >>> मोठ्या शहरातल्या प्रदुषणाने मुलांची तब्येत ठणठणीत रहाते का ? Wink

मी इशानला अडीच महिन्याचा असताना घेऊन गेले होते. तो आठ महिन्याचा होइतो मी भारतातच होते. ह्या संपूर्ण कालावधीत उकळलेले पाणी आणि मच्छरदाणी (आणि साधारण त्या वयाच्या बाळांसाठी घ्यायची ती काळजी- हात धुणे वगैरे) ह्याशिवाय दुसरी कुठलीही उठाठेव न करता आमची ट्रिप सुखरुप पार पडली. गेल्या महिन्यात तो दोन वर्षाचा झाला तेव्हा गेलो. आताही घरचे फिल्टर केलेले पाणी देत होतो. बाकी काही औषधे वगैरे दिली नाहीत. जाण्याआधी आणि परत आल्यावर एकदा डॉक्टरला भेटुन आलो इतकेच. त्याच्या डॉक्टरनेही काही बाऊ केला नाही.

असो, जे सांगायला म्हणुन मुद्दाम ह्या बाफवर आले- मुलांना घेऊन जाण्यासाठी विनाथांबा विमान (नॉन-स्टॉप) सगळ्यात छान असे माझे मत झाले आहे. विमान उड्डाण करुन जेवण होइतो झोपायची वेळ होते आणि उतरायच्या २-३ तास आधी ते जागे होतात. मग तोंड धुणे, नाष्टा, एखाद-दोन वेळा शी-शु, मूव्ही इ करण्यात वेळ निघुन जातो. अर्थात अजून मोठी (३-४ वर्षे वगैरे) मुले जास्त त्रास देत असतील तर माहिती नाही Wink

सिंडे, विनाथांबा बद्दल एकदम सहमत. त्यांच्या बरोबर प्रवासाचा १ जास्त तासही खूप नकोसा होतो.

लहान म्हण्जे २-३ महीन्याच्या मुला/मुली ला घेऊन विमानाने प्रवास करण कितपत सेफ आहे ?

किती तासांचा प्रवास आहे ? मी मुंबई - कलकत्ता - मुंबै असा प्रवास केलाय. कलकत्ता अर्ध्या दिवसाचा हॉल्ट. मुलीचे वय २-३ महीनेच होते.
===================
माझ्या तुमच्या जुळता तारा
मधुर सुरांच्या बरसती धारा

मी न्यु यॉर्क ते मुंबई असा प्रवास तीन महिन्याच्या बाळाला घेऊन केला आहे. डायरेक्ट फ्लाइट होती त्यामुळे बहुतेक वेळ तो झोपलेला होता. कान दुखले नसावेत कारण रडला नाही.

मी पण माझ्य २.५ महिन्यांच्या मुलाला घेऊन मुंबई-तोक्यो प्रवास केला आहे. ते पण डायरेक्ट फ्लाइट नसताना..काहिही त्रास झाला नाही, दिला नाही..एवढे लहान असताना बहुतेक वेळ झोपलेली असतात मुले.फक्त दुधाची सोय नीट करावी. ब्रेस्ट फीडींग असेल तर शाल अथवा ब्रेस्ट फीडींग कव्हर मिळते घ्यावे म्हणजे बाळाला आणि आपल्याला पण सोपे जाते.अर्थात प्रवासाच्या आधी बाळाची तब्बेत वगैरे बद्दल पेडी ला नक्की कन्सल्ट करावे.

मी देखील माझ्या २.५ महिन्याच्या मुलीला घेउन मुम्बै - कोलम्बस प्रवस केलाय..सगळा वेळ प्रवसचा झोप नि खाणे ह्यातच गेला तीचा. कनेक्टिग फ्लाइट पकडताना मात्र स्ट्रोलरमधे बसायला फार त्रास दीला. एवढे लहान बाळ असेल तर जवळ सामान अगदी मोजके बाळगावे.

माझ्या ४ महिन्यान्च्या बाळाला घेउन प्रवास करायचा आहे. इथुन न्यु जर्सी ३ तास ड्राईव्ह आणि पुढे मुम्बई.
वरचे सगळे वाचले आहे, अजुन काही सूचना/टीपा आहेत का?
सिन्ड्रेला, स्वाती स्ट्रोलर घेउन जाणे आवश्यक आहे का? प्रवासात डायपर बदलणे वगैरे कसे करायचे?

न्याती, तुम्ही तुमच्या airlines कडे बेसिनेटची request करा. तुम्हाला diaper तिकडे बदलता येइल किंवा restrooms मध्ये baby changing pad असतात. त्यावर डायपर बदलायचे. बेबी फूड, फॉर्मुला, औषधी ई. ziplock बॅग मध्ये दिसेल असे ठेवायचे. Direct flight असेल तर उत्तम पण जमल्यास baby carrier नेणे. 4 months baby असल्यामुळे पाठीला बांधायच्या carrier पेक्षा front carrier बरे पडेल. babies r us किंवा वालमार्ट मध्ये मिळेल ते. बेबी पीत असेल तर रेडी टू फीड मिल्क बॉट्ल्स घेणे. बर्‍याच बाळांना त्याची चव आवडत नाही.
शक्यतो कमी सामान ठेवा हातात. जर direct flight नसेल तर स्ट्रोलर बरोबर असु द्या. stroller गेटवर मिळेल का airlines ला विचारून घ्या. ब्रेक जर्नीमध्ये उपयोगी पडेल.
All the best & happy journey!

स्ट्रोलर हवाच. कार सीट नेऊ नका अजिबात >> ४ महिन्याच्या बाळाला कारसीटशिवाय स्ट्रोलर मध्ये बसवता येतं का? Uhoh

नात्या, बरा आहेस ना? स्ट्रोलर फ्लॅट करुन झोपवता येतं की. किंवा रिक्लाईन करुनही बसवता येतं. ४ महिन्याचं बाळ थोडंसं मान सावरायला लागलेलं असतं. भारतात कार सीट ची काय गरज? निष्कारण ओझंच ना?

स्ट्रोलर फ्लॅट करुन झोपवता येतं की. किंवा रिक्लाईन करुनही बसवता येतं. >>> मोदक. कार सीट कारमधे लावुन त्यातच बाळाला ठेवणार असाल तरच न्यावे. बहुतेक लोकांचा अनुभव की बाळाला मांडीतच ठेवतात.

विमान टेक ऑफ आणि लँड होताना एअर प्रेशर च्या बदलाने काही वेळा मुले घाबरी होतात्/रडतात त्यासाठी इअर प्लग घ्यावे.

त्यावेळी फिड करणे सगळ्यात बेस्ट... मी माझी लेक २ महिन्यांची असताना देशात गेले होते.
मी तेव्हा फिड करत अस्ल्याने बबी फुड वगैरेची गरज नव्हती.
काहिहि त्रास होत नाही.. बॅसिनेट हवच, चिनुने म्हंट्ल्या प्रमाणे चेंज त्यात किंवा रेस्टरुम मधे चेंजिग स्टेशन वर करता येत.

आणि काळजी नको मुल मस्त झोपतात विमानात.

स्ट्रोलर किंवा बेबी कॅरियर मस्ट.. कारसिट नकोच..

नात्या,
बरोबर विचारलस. बर्‍याच स्ट्रोलर मधे इतक्या लहान बाळाला थेट बसवता, झोपवता (recline करूनही) येत नाही. बर्‍याच stroller वर तशी चक्क safety warning असते.
कार सिट च वजन होत हे बरोबर आहे पण कार सीट मधे ठेवून बाळाला हातात उचलता येतं.. शिवाय भारतात सर्वच ठिकाणी स्ट्रोलर व्य्वसथित न्यायला जागा/रस्ते असतातच असेही नाही.
अर्थात मुंबईतील वास्तव्य फक्त २-३ आठव्ड्यांचच असेल तर कार सीट नेण्यात काही विशेष फायदा नाही.
आम्ही ५ महिन्याच्या बाळी ला घेवून आलो होतो ह्युस्टन दुबई असा १२ तासाचा असह्य प्रवास केला होता.
पण कार सीट चा उपयोग अन वापर प्रचंड झाला हे नक्की. सहा सात महिन्यांनी बाळ कार सीट मधे मावत नाहीत किंव्वा कुरुबुरतात तेव्हा अपोआपच ती अडगळीत जाते.
फिडींग हा सर्वोत्तम उपाय, नाहीतर बाटलीतील दूध, अगदीच तेही बाळ नसेल घेत तर तोंडात passifier ठेवून द्या.. ते चोखत राहिल्याने, कानात दडे बसत नाहीत.

विमान प्रवासासाठी - बाळ मान सावरत असेल तर umbrella stroller is best. त्यात सामान ठेवता येत नाही, पण जेव्हा बाळ त्यात नसते तेव्हा बाळ, बॅग आणि stroller असे सगळे सांभाळून सहज फिरता येते. बाळाला stroller मधे ठेवल्यास फारच सुटसुटीत. शिवाय वजन कमी.

बर्‍याच लोकांनी बॅसिनेट मध्ये डायपर चेंज करता येतात असं लिहीलंय म्हणून एक मत नोंदवतेय .. शक्य असेल तेव्हा डायपर बाथरूम मध्ये जाऊनच बदलणं योग्य असं वाटतं .. विमानातल्या (छोट्या) बाथरूम्स् मध्येही चेंजिंग स्टेशन्स् असतात, एअर होस्टेसेस् ची मदत घेता येते ..

बाळ कितीही लहान असलं तरी सहप्रवाशांचा विचार करून etiquettes पाळावेत असं वाटतं ..

सशल Happy एका डायपर चेंज नंतर विमानाच्या दोन्ही आईल मधे दोन एअर होस्टेस परफ्युम चे स्प्रे मारत फिरत आहेत असे चित्र डोळ्यासमोर उभे राहिले Happy

ते अम्ब्रेला स्ट्रो. एका हाताने नीट फिरत नाहीत. त्यापेक्षा ग्रेको वगैरेचा मोठा स्ट्रो. असला तर तो एका हाताने फिरतो तरी, किंवा मग त्यात बाळ किंवा बाळाची बॅग पैकी काही ठेवून दुसरे हातात घेता येते Happy

बाळ कितीही लहान असलं तरी सहप्रवाशांचा विचार करून etiquettes पाळावेत असं वाटतं >>> Happy

एक तर बॅसिनेटमधे पुरेशी जागा नसते. ते आधीचं डायपर कुठे ठेवणार ? त्यापेक्षा चेंजिंग स्टेशन सुटसुटीत पडतं. एअर होस्टेसेस् ची मदत न घेता आरामात बदलता येतं. तसही बॅसिनेटमधे डायपर बदलू देत नाहीत. मी इशानचे डायपर सॉइल्ड आहे की काय चेक करत होते फक्त तर एअर होस्टने घाईने येऊन "इथे बदलु नको' सांगितले होते Sad

सशल, तुला १००० मोदक. बसल्या जागेवर पूपचे डायपर बदलल्यावर बाकीच्या प्रवाशांची काय अवस्था होते ह्याचा अनुभव घेतलाय मागे. टॉयलेटमध्ये जाऊन बदलायला थोडा त्रास पडतो ख्रा पण तेच योग्य.

माझ्याकडे ग्रॅको चे इन्फन्ट ट्रॅव्हल सिस्टीम आहे, तो न्यायचा म्हणजे फार जड होईल. शिवाय स्टाफ ने नीट हाताळले नाही तर स्ट्रोलर बरोबरचे कार सीट ही वाया जाईल असे वाटते.

माझ्याही कडे ग्रॅकोचीच ट्रॅव्हल सिस्टीम होती. त्यातल्या स्ट्रोलरची सीट पूर्ण फ्लॅट होते आणि दोन तीन रिक्लाईन पोझिशन्सही आहेत. माझ्यामते फक्त स्ट्रोलर पुरेसा असावा.

Pages