साहित्य Ingredients:
२ वाटी जाड पोहे(नेहमी पोह्यासाठी जे वापरतो ते पोहे)
१ वाटी मुरमुरे/चिरमूरे
१ लाह्या
हिरव्या मिरच्या ३(आवडीप्रमाणे)
डाळे
शेंगादाणे(भाजून)
डाळिंब
१ वाटी घट्ट दही
मीठ
साखर
कोथिंबीर
तेल/तुप
जिरे
हळद
मोहरी (आवडीप्रमाणे)
काकडी,केळी, सफरचंद (आवडीप्रमाणे)
लोणचे (आवडीप्रमाणे)
१. पोहे २-३ वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या(पोहे जास्त भिजवायचे नाहीत फक्त ओले करायचे).
२. एका भांड्यात पोहे , मुरमुरे/चिरमुरे , ज्वारीच्या लाह्या घालून चान एकत्र करुन घ्या
३. आता डाळे , शेंगदाणे (भाजलेले), बारीक चिरलेली मिरची (अर्धी चिरलेली मिरची बाजूला ठेवावी), दही घालून छान मिक्स करा.
४. आता यामध्ये हळद(optional), चवीनुसार मीठ , साखर , डाळिंब घाला
(आपण काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता)
५. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून मिक्स करा
६. आता फोडणीसाठी कढईत तेल / तुप घाला ,तेल गरम झाले की जिरे, बारीक चिरलेली मिरची घालून १ मिनीट परतून घ्या
७. तयार फोडणी गोपाळकाला मध्ये घालून छान मिक्स करुन घ्या
गोपाळकला तयार आहे
आपल्या आवडीप्रमाणे आपण यामध्ये काकडी, सफरचंद, केळी देखील घालू शकता
रेसिपीचा पूर्ण व्हिडीओ : https://youtu.be/4JI3IVKWy3o
भारी प्रकरण दिसतय ग ....करुन
भारी प्रकरण दिसतय ग ....करुन बघते.
मस्त आहे
मस्त आहे
मस्त!
मस्त!
छान.. My fav. आम्ही यात गोड
छान.. My fav. आम्ही यात लिंबाचे गोड लोणचे पण घालतो.
छान आहे
छान आहे
शॉल्लेड!!
शॉल्लेड!!
लहानपणी अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या किर्तनात खाल्लेला गोपाळकाला कधीच विसरता येत नाही. काही कण मिळाले तरी अमृताची गोडी वाटायची.
मसाला मिरची तळून घालतात
मसाला मिरची तळून घालतात
आताच केला. मस्त झाला
आताच केला. मस्त झाला गोपाळकाला.
मीही केला. छान लागतो.
मीही केला. छान लागतो. संध्याकाळी खाऊ म्हणूनही छान लागेल.
अजून 1 थोडी वेगळी कृती
https://www.maayboli.com/node/37043
आमच्याकडे घरच्या कुटुन
आमच्याकडे घरच्या कुटुन केलेल्या पोहे-गुळ लाडु, केळ्याचे पोहे आणि तांदूळ रवा घालून अप्पे, मूगाचा शीरा, घरी कुटलेला सुंठवडा( मला अतिप्रिय) हे सर्वांना प्रसाद म्हणून आणि जेवायला, गरमागरम घावन, शेवग्याची कोरडी भाजी आणि केळफुलाची भाजी, गोड घट्ट दही आणि ताकातले तिखट पोहे अगदी हा मेनु वर्षानुवर्षे बनत आला आहे. रात्री १२ वाजता असे तुडुंब खावून पावसातल्या थंडीत मग भजन म्हणत पहाटे डोळा लागायचा.
आमच्याकडे घरच्या कुटुन
आमच्याकडे घरच्या कुटुन केलेल्या पोहे-गुळ लाडु, केळ्याचे पोहे आणि तांदूळ रवा घालून अप्पे, मूगाचा शीरा, घरी कुटलेला सुंठवडा( मला अतिप्रिय) हे सर्वांना प्रसाद म्हणून आणि जेवायला, गरमागरम घावन, शेवग्याची कोरडी भाजी आणि केळफुलाची भाजी, गोड घट्ट दही आणि ताकातले तिखट पोहे अगदी हा मेनु वर्षानुवर्षे बनत आला आहे. > भारीच! देवीका, पाककृती आणि फोटो पण टाका ना सगळ्या मेनू चा .
आमच्याकडे पातळ पोहे+भिजवलेली
आमच्याकडे पातळ पोहे+भिजवलेली चनाडाळ+हिरवी मिरची +चवीनूसार साखर मीठ + लोणचे+थोडे दही+असल्यास संत्र्याच्या फोडी असा साधा गोपाळकाला केला जातो. गोकूळाष्टमी व अनंत चतूर्दशीला घरोघरी असा गोपाळकाला प्रसाद म्हणून असतोच.
गोकूळाष्टमी व अनंत चतूर्दशीला
गोकूळाष्टमी व अनंत चतूर्दशीला घरोघरी असा गोपाळकाला प्रसाद म्हणून असतोच.>> आमच्याकडे सुद्धा.
मस्त आहे कलरफुल.
मस्त आहे कलरफुल.
धागा वर काढला..
धागा वर काढला..
मस्त दिसतात. माझ्या बहिणीकडे
मस्त दिसताएत. माझ्या बहिणीकडे दरवर्षी करतात गोपाळकाला. तिला विचारली पाहिजे तिची रेसीपी.
करा
करा
गोपाळकाला : द बिगिनिंग
गोपाळकाला : द बिगिनिंग
आज थोडे करुन बघितले.
शनिवारी हॉस्पिटलमध्ये मोठ्या पातेल्यात गोपाळकाला : द कन्ल्युजन