गूगल फोटो आता बंद होणार का?

Submitted by साधना on 15 August, 2019 - 09:53

गूगल फोटो उघडताना मला या महिनाभरात तीन चारदा तरी पॉप up मेसेज आला की 'गुगल क्लाऊड जुलै 15 पासून बंद होणार, तुमचा डेटा डाउन लोड करून घ्या. तुम्ही डाउनलोड करून घेतलाय असे आम्ही समजून तुमचा सगळा डेटा डिलीट करू.'

म्हणजे गुगल फोटो हे फिचर आता बंद होणार का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी गुगल फोटो ॲप वापरतो. मला तर असा काही मेसेज नाही आला. गुगल फोटोच बंद होतय की जी ड्राईव्ह देखील बंद होतय?
तसेही माझे फोटो आयक्लाऊड आणि ड्रॉपबॉक्सवर असतात.

१) मला अजून तरी मेसेज दिसला नाही.
२) तुमच्या डिवाइसमधली अड्रेस बारमधली लिंक तपासा.
-----------
३) दुसऱ्या डिवाइसमध्ये फायरफॉक्समध्ये photos_dot_google_dot_com वर लॉगिन केल्यावर आणि वेगळ्याच अकाउंटलाही मेसेज येतात का?
__________________
बाकी गुगल डॉक्स या मुख्य अकाउंटमधून गुगल फोटोज हा फोल्डर बाहेर काढण्यात आला आहे. त्यामुळे शेअरिंग लिंक्स अगोदर गुगल फोटोजच्याच असतील तर चालतील. गुगल डॉक्सच्या नाही चालणार.
एका जीमेलला १५जिबी फ्री स्टोरेज मिळते डॉक्सला त्यात सर्व धरून होते.
हे पाहा
CNET news

गूगल ड्राईव वर जर तुमचे काही

गूगल ड्राईव वर जर तुमचे काही फोटोज असतील तर ते आधी गुगल फोटोज अ‍ॅप मध्ये सिंक होत असत आणि फोटोज अ‍ॅप मध्ये दिसत.
गुगल नी आता ड्राईव्ह आणि फोटोज चं सिंक बंद केलंय. डेटा डिलीट वगैरे काही करणार नाहीत.

Ok, परत मेसेज आला तर स्क्रीनशॉट घेऊन देते इथे.

मी फक्त मोबाईल वर फोटो काढते व ते आपोआप गुगल फोटोवर अपलोड होतात. मी दुसरीकडे कुठेही फोटो ठेवले नाहीत, त्यामुळे धास्ती वाटते.

आपोआप गुगल फोटोवर अपलोड होतात.

- आपोआप म्हणजे तसा डिफॉल्ट नव्या मोबाईलांत असतो तो काढता येतो. ते फोटो 'हाइ क्वालटी' उर्फ कम्प्रेस्ट (भयानक) असतात. चारपाच एमबी'चे फोटो १२०-१४० केबी'चे होतात. पुढे कधी प्रिंट्स करायची वेळ आली तर उपयोगाचे नाहीत. पण ते १५ जीबी फ्री स्टोरेजमध्ये मोजले जात नाहीत.
हा डिफॉल्ट सेटिंग्ज मधून बदलता येतो -१) फुल रेझलुशन आणि २)जे अपलोड करु तेच. हे मात्र दिलेल्या क्लाउड स्टोरेजमध्ये गणले जातात.

बाकी मोबाईल मधले app गुगल प्ले स्टोर'वरचे अधिकृत आहे का? दुसऱ्या कोणत्या app store स्टोरवरचे नाही ना?( nine app?/ oppo ? /vivo ?/?)
App न वापरता साइट वापरून पाहा.

पुढे काय झाले?
-----------------
गुगलचे - https://cloud.google.com/gcp/?
अमेझॉनचे - aws (मायबोलीने फोटोंसाठी सर्वर मेमरी घेतलीय?)
माईक्रोसॉफ्टचे azure
अशा पेड सर्वीसीज बिजनेससाठी आहेत ना?

एक प्रोब्लेम माझ्या गूगल फोटो सोबत झाला होता. मी आधीच्या मोबाईलवरचे पिक्स अपलोड करून ठेवले होते. ते अपलोड झालेत असेही दाखवत होते. आधीचा मोबाईल खराब होऊन बंद पडला. नवीन घेतला त्यात गूगल फोटो वर मी आधी अपलोड केलेले फोटो दिसलेच नाहीत. (सेम अकाउंट आहे.) Sad सगळा डेटा लॉस! Sad

फोटो दिसलेच नाहीत. लपविलासतुहिरवाचाफा हे गाणं लिहिलं तेव्हा गुगलच होतं.

फुकट ते पौष्टिक समजणारे लोक गूगलसारख्या सोयी वापरतात. त्यांना स्वतः:ची खाजगी माहिती इतरांना द्यायला काही वाटत नाही. मग गूगल आणि फेसबुकसारख्या कंपन्या ही माहिती जाहीरातींसाठी वापरतात. त्यामुळे गूगल फोटो बंद पडले तर आनंदच आहे. डिजिटल डेटाचा बॅकअप घेण्याची सवय लावून घ्या.

मग गूगल आणि फेसबुकसारख्या कंपन्या ही माहिती जाहीरातींसाठी वापरतात. ....डिजिटल डेटाचा बॅकअप घेण्याची सवय लावून घ्या. >> +१११

मायबोलीवर फोटो अपलोड करायचा असेल तर मला फक्त गुगल फोटोंवरुनच करता येतो. फोटो बकेट वरुन नाही करता येत. आजही काही फोटो 'निसर्गाच्या गप्पा' या धाग्यावर अपलोड केल्या आणि त्या झाल्याही व्यवस्थित.

फोटो बकेट वरुन नाही करता येत

माझे काही फोटो पाच वर्षांपूर्वी फोटोबकेटवर टाकून धाग्यात टाकले होते. ते कसेबसे दिसताय कधीकधी. त्यावेळी अकाउंट फ्री होतं . आता पेड आहे. पेड'वरचेच शेअर करता येतात.

क्याम्रांंचा (डिएसलार वगैरेंचा) सेल फुकट फेसबुक/जीमेल नसते तर वाढलाच नसता. कारण काढलेले फोटो इतरांना दाखवता नाही आले तर उपयोग काय?

माझा हा प्रतिसाद कुणाला दुखवण्यासाठी नसून सत्य स्थिती आहे. १९८५ नंतर फिल्म मागे पडून डिजिटल सेंसरचे क्याम्रे आले, फोटोग्राफी परवडू लागली. पण 2004 ला जीमेलने फ्री स्टोरेज 1 जीबी दिले, काम थोडे सोपे झाले. तोपर्यंत हौशी फोटोग्राफर एकत्र येऊन, फोटोंच्या प्रिंटस काढून ,हॉल भाड्याने घेऊन, कुणा पावण्याला उदघाटनाला बोलावून खिशाला चाट मारून आपले फोटो इतरांना फुकट दाखवत.
अवांतर झालं.