लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं.
जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले.
बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही. यामुळे मला कल्पना रंजन करत राहण्याची सवय झाली. कोणत्याही देव, संत, खेळाडू, देशभक्त, राजे, ग्रंथ यांचं नाव कानावर पडताच मनात लगेच विचारचक्र सुरू होतं, ते लवकर थांबतच नाही. सिनेमा पाहिला तर किमान आठवडाभर त्याचं विश्लेषण मनात सुरू राहतं. प्रयत्न करूनही विचार थांबत नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल बॅकग्राऊंड ला जसं संगीत चालू असते. तसे सारखे दोन किंवा जास्त व्यक्ती संभाषण करत आहेत हे जाणवत राहते. अनेकदा अतर्क्य जे कधीच ऐकले, वाचले नाही असे संभाषण पाहून मीच आश्र्चर्यचकित होतो. रात्री हा प्रकार खूपच ठळक ऐकू येतो. खूप प्रयत्न करुन या संवादातील एखादं वाक्य नीट लक्षात घेऊन हे काय आहे हे पाहिले तर संदर्भहीन, असंबद्ध वाक्य असल्याचं ध्यानात येते. मुन्नाभाई एमबीबीएस मधील केमिकल लोच्या सारखा हा प्रकार आहे का असे वाटते.
आजपर्यंत कुणा डॉक्टरला मी याविषयी विचारले नाही. पण आता मनाची शक्ती फारच ड्रेन झाल्यासारखी वाटते.
कृपया हा मानसिक आजार आहे, की आणखी काय आहे आणि याला उपाय काय हे सहानुभूतीने समजावून सांगावे ही माबोकरांना विनंती.
हे नक्की काय असावे?
Submitted by चैतन्य रामसेवक on 4 August, 2019 - 09:35
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
कृपया माबोवरील वैद्यकीय पदवी
कृपया माबोवरील वैद्यकीय पदवी असणाऱ्या कुणाला याबाबतीत काही मार्गदर्शन करता येईल काय?
तुम्हाला खरेच हा त्रास होत
तुम्हाला खरेच हा त्रास होत असेल तर तात्काळ डॉक्टर गाठणे. ऑल द बेस्ट.
https://www.webmd.com
https://www.webmd.com/schizophrenia/auditory-hallucinations
धन्यवाद साधना जी. मला ही
धन्यवाद साधना जी. मला ही संभाषणं जसं आपण एकदम शांत झाल्यावर आपलाच श्वासोच्छवास ऐकू येतो तसे लक्षपूर्वक ध्यान दिले तरच नीट कळतात. पण कायम सुरू असल्याने दैनंदिन जीवनात फारसा फरक नाही. झोप कमी झाली आहे.
https://www.webmd.com
https://www.webmd.com/schizophrenia/auditory-hallucinations
>> यात अनेक कारणे दिली आहेत. नेमके कारण काय हे कसं कळेल. मानसोपचारतज्ज्ञ स्किझोफ्रेनिया व्यतिरिक्त इतर कारणे लक्षात घेतील काय.
तुमच्या आजाराबाबत अधिक माहिती
तुमच्या आजाराबाबत अधिक माहिती दिलीत तर लोक सल्ला द्यायचा किंवा न द्यायचा विचार करू शकतील.
उदा. तुम्ही जन्म घेतला तेव्हां या आयडीचे नाव चेतन १०२ असे होते आता ते चेतन रामसेवक असे झाले आहे.
मागच्या जन्मात तुम्ही चंद्रभान, खान ९९, शक्तीराम, शशिराम, शशिकांत सातपुते या आयड्यांनी वावरला होतात. जयंती पी या अवतारात तुम्ही स्वतःला महिला समजत होतात. याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हणतात. ही माहिती दडवून योग्य सल्ला मिळणार नाही असे मला वाटते.
बाकी आपली मर्जी !
आता उपचार घेण्याची गरज कांदा
आता उपचार घेण्याची गरज कांदा मुळा ला आहे असे दिसतंय. नाव बदललं म्हणून असे जावयीशोध लावल्याबद्दल धन्य आहे आपल्या अकलेची.
""मागच्या जन्मात तुम्ही चंद्रभान, खान ९९, शक्तीराम, शशिराम, शशिकांत सातपुते या आयड्यांनी वावरला होतात. जयंती पी या अवतारात तुम्ही स्वतःला महिला समजत होतात.""
>> एवढं काय नुकसान केले होते तुमचे या आयडींनी कांदा मुळा. ?
असले हलकट, पोरकट आरोप करण्यापेक्षा काही तरी चांगले लिहावं. नाक खुपसून खुपसून एक दिवस नाक चपटे होईल किंवा कापलं जाईल.
ज्याचं करावं भलं तो म्हणतो
ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. वकील आणि डॉक्टरपासून काही लपवू नये म्हणतात. म्हणून चांगला सल्ला दिला तर तुमचा तोलच गेला. आता हे लक्षण सुद्धा डॉक्टरला माहीत नसेल तर तो सल्ला देऊ शकेल का ? चुकीचा सल्ला दिला तर तुमचेच नुकसान होईल.
एवढं काय नुकसान केले होते तुमचे या आयडींनी कांदा मुळा. ? >>> मी कुठे म्हटलं नुकसान केलं म्हणून. तुम्हाला असे का वाटावे ? या आयडींबाबत तुम्हाला वाटत असलेली सहानुभूती स्वाभाविक आहे. पण मी नुकसान केले असे कुठेच म्हटले नसताना तुम्ही विनाकारणच आकांडतांडव केलेले दिसतेय. मी फक्त काय काय माहीती द्यावी लागते हे सांगायचा प्रयत्न केला. पण तुम्हाला एव्हढा राग येत असेल तर राहू देत. मला काय तुम्हालाच बरं होण्यासाठी उपयोग झाला असता...
हे ईश्वरा घाणीत पाय द्यायची
हे ईश्वरा घाणीत पाय द्यायची इच्छा नव्हती. घाणीत पाय दिल्याबद्दल माफ कर.
हा लेख एक सापळा होता. कोड
हा लेख एक सापळा होता. कोड लॅंग्वेज मध्ये लिहिलेला. हा नवीन प्रयोग करून पाहिला. धन्यवाद.
मिसळ पाव वर कुणासाठी सापळा
मिसळ पाव वर कुणासाठी सापळा होता ?
तिकडच्या आपटे साठी. आपटेचा
तिकडच्या आपटे साठी. आपटेचा पुनर्जन्म शोधत होतो.
दोन्हीकडे कुणीच भीक घातली
दोन्हीकडे कुणीच भीक घातली नाही असे दिसतेय.
तु का उडून राहीलास मग. भीक
तु का उडून राहीलास मग. भीक मागण्यासाठी नव्हतंच लिहिले. कार्य सफल झाले. कोड लॅंग्वेज कळणार नाही तूला.
म्हणजे मग जस्ट मज्जा म्हणुन
म्हणजे मग जस्ट मज्जा म्हणुन तुम्ही नसलेला प्रॉब्लेम , प्रॉब्लेम आहे अस म्हणुन भासवलत. लोक मग तुम्हाला सल्ला देत होते ते मुर्ख होते ? :रागः
कुणीतरी कळकळीने पदरचे पैसे घालून साईट काढत, कुणीतरी सल्ला देत आणि तुम्ही मग एक प्रयोग होता म्हणुन सांगून मोकळे होता. छान. टीन एजर मुलांनी असले उद्योग केले तर समजू शकू कारण अजुन एवढे मॅचुअर नसतात. पण तुम्ही चांगले १८ + असावेत असा अंदाज आहे. मला माहित आहे यावर तुम्ही काहीतरी उलट पालट लिहाल.
पण कित्ती दिवस नुस्ती बघ्याची भुमिका घ्यायची आणि या चांगल्या साईटचा असा तुम्हाला फायदा घेवू द्यायचा म्हणुन रागाने लिहून टाकल.
चार लोकांच्यात प्रत्यक्ष वावरताना पण तुम्ही असेच वागता का हे विचारून बघा स्वतःला. आणि दुसरं म्हणजे हे करून आपण काय व्हॅलुअ अॅड करतो याचाही विचार करा. उद्या आपल्या पुढच्या पिढीने ही साईट वाचायला सुरुवात केली तर वरच्या तुमच्या धाग्याचा अगदी विनोद निर्मिती ,बाष्कळ गप्पा,टाईमपास अस म्हणुन सुद्धा उपयोग नाही आहे.
याला मंत्रचळ नावाची मानसिक
याला मंत्रचळ नावाची मानसिक विकृती म्हणतात यावर इंटरनेट वर खूप माहिती आहे. ही विकृती व्हिटॅमिन देफिसि यांसी मुले होते आणि औषदे घेऊन नक्की बरी होते... ठाण्याला डॉक्टर जोशी नावाचे एक मानसोपचार तज्ञ आहेत त्यांनी अनेकांना यातून बरे केले आहे
तुमच्या आजाराबाबत अधिक माहिती
तुमच्या आजाराबाबत अधिक माहिती दिलीत तर लोक सल्ला द्यायचा किंवा न द्यायचा विचार करू शकतील.
उदा. तुम्ही जन्म घेतला तेव्हां या आयडीचे नाव चेतन १०२ असे होते आता ते चेतन रामसेवक असे झाले आहे.
मागच्या जन्मात तुम्ही चंद्रभान, खान ९९, शक्तीराम, शशिराम, शशिकांत सातपुते या आयड्यांनी वावरला होतात. जयंती पी या अवतारात तुम्ही स्वतःला महिला समजत होतात. याला मल्टिपल पर्सनॅलिटी डिसऑर्डर असे म्हणतात. ही माहिती दडवून योग्य सल्ला मिळणार नाही असे मला वाटते.
बाकी आपली मर्जी !
Submitted by कांदामुळा on 4 August, 2019 - 22:4
>> सीमा जी असे हलकट लोकांनी प्रतिसाद दिले म्हणून मला गुगली टाकावी लागली. नालायक लोकांचे थोबाड बंद करण्यासाठी ""हा लेख एक सापळा होता. कोड लॅंग्वेज मध्ये लिहिलेला. हा नवीन प्रयोग करून पाहिला. धन्यवाद."" असा प्रतिसाद दिला.पण त्याचे थोबाड बंद पडले नाही.
Gujji ji खूप धन्यवाद. मंत्रचळ
Gujji ji खूप धन्यवाद. मंत्रचळ म्हणजे ओसीडी. एकच विचार सारखा मनात येत राहणे, किंवा एकच कृती वारंवार करत राहणं. मला कर्णपिशाच्च सारखं कोणी तरी बोलतंय हे कळतंय पण लक्ष दिले की निरर्थक संभाषणं असल्याचं समजतं. हे मंत्रचळ मध्ये येतं का?
माझ्याही बघण्यात अशी एक
माझ्याही बघण्यात अशी एक व्यक्ती होती. त्याला एका मांत्रिकाने झाडूने झाडले आणि कसल्याश्या झाडपाल्याची एक आठवडा धुरी दिली तेव्हापासून त्याला परत काही त्रास झाला नाही असे मला त्याचा एका मित्राकडून कळाले.