१ किलो भेंडी (कोवळी असेल तर फार छान!)
दोन मोठे चमचे गरम मसाला
चवीनुसार ति़खट
मीठ
पाऊण वाटी तेल
हिंग
एक वाटी बारिक चिरलेला कांदा
एक जुडी कोथिंबीर
एक मोठा चमचा चिंचेचा कोळ
गुळाचा खडा
खसखस, तीळ आणि शेंगदाणे भाजून, कुटून सगळा कूट साधारण एक वाटी व्हावा.
आलं लसून हिरवी मिरचीचं वाटंण एक मोठा चमचा.
भेंडी धुवून, कोरडी करून घ्यावी. चिरताना एका भेंडीचे दोन तुकडे आणि मधे पण चीर.
एका वाडग्यात तेल सोडून बाकी इतर जिन्नस व्यवस्थीत एकत्र करून घ्यावे. (अगदी भेंड्या सुध्दा.)
कढईत तेल गरम करून, हिंग घालून हे मिश्रण त्यात ओतावं.
नीट ढवळून भेंड्या शिजेपर्यंत (झाकण न ठेवता) भाजी शिजवावी.
वरून चिरलेली कोथिंबीर घालावी.
भाजी शिजताना कांदा व्यवस्थीत गळतो.
आलं लसणाचा उग्र वास पण निघून जातो.
भाजीत ओला किंवा सुका नारळ अगदी ऐच्छीक.
भेंडीत मसाला भरण्याची गरज नाही. व्यवस्थीत आत शिरतो, भाजी शिजल्यावर.
(No subject)
ओह, आत
ओह, आत मसाला भरण्यापेक्षा सोप्पी दिसतेय करायला. बघेन करुन लवकरच.
अनेकानेक
अनेकानेक धन्यवाद मृण


मला जमली करायला भाजी तर मी पण फोटो टाकीन
------------------------------
झाडावर प्रेम करा, झाडा’खाली’ नको!
कॄती तर
कॄती तर सहीच पण फोटो लयी टेंप्टींग हाय.
धन्यवाद मॄण.
मृ, आज
मृ, आज करणार आहे ह्या रेसिपीने भेंडी. लक्षात राहिलं तर फोटो काढून टाकेन.
मी साधारण
मी साधारण अशीच करते भरलेली भेंडी पण फेरफार एवधाच - कान्दा अजिबात नाहि. मसाला साहित्य - एका वाटीत बेसन, लाल तिखट, धणे-जिरे पावडर, जरा जास्त हीन्ग, चवी पुरते मीठ, थोडी जास्त आमचुर पावडर एकत्र करावे. भेंडी तेलावर परतवुन घेतली की हा मसाला घालुन, नीट ढवळून भेंड्या शिजेपर्यंत भाजी शिजवावी.
करायाल सोपी आणि पटकन होते.
अजुन १
अजुन १ सोपी रीत खर तर अचानक आलेल्या पाहुण्यांसाठी सुपर हीटः
हल्दिराम चे गुजीया पाकीट मिक्सर मधुन काढुन मग भरली भेंडी करणे
ही माझी
ही माझी भरली भेंडी!
धन्स मृण आणि पिंकू.. मी दोघींच्याही कृति एकत्र केल्या.. कांदा-लसूण ऐवजी बेसन आणि चिंचेच्या कोळाऐवजी लिंबाचा रस.
भाजी आवडली ही. अनेक दिवसांपासून करायची होती. पुन्हा धन्स
--------------------------------------
जगात मागितल्याशिवाय एकच गोष्ट मिळते- सल्ला!
पूनम, मस्त
पूनम, मस्त दिसतेय भरली भेंडी! आता बदल म्हणून तु केलीस तशी नक्की करून बघेन. मला सांग इतकी छान हिरवी कशी राहिली भाजी?
मृ, तुझ्या
मृ,
तुझ्या कृतीने भाजी करुन बघितली. एकदम मस्त झाली होती. फोटो काढायच्या आधीच संपली
--------------------------------------------
Mothers are the necessity of invention.
-Calvin and Hobbs
मृण, कांदा
मृण, कांदा घातला की हिरवा रंग थोडा बदलतोच.
मी ही भाजी नेहेमी लोखंडाच्या कढईत करते, त्यामुळे हिरवी राहते
रुनी, मृणची रेसिपी म्हणजे हमखास हिट होणारच, त्यामुळे केल्याकेल्या फोटो काढायचा
इश्श! मला
इश्श! मला हरभर्याच्या झाडावरून उतरता येत नाहीये गं बाई!
.
कांदा न घालता पण कधी इतकी छान हिरवी होत नाही मी केलेली भाजी. आता तू म्हणतेस तसं लोखंडाच्या (बिडाच्या) तव्यावर करून बघेन.
मृ, ह्या
मृ, ह्या वीकांतला सर्व तुझ्याच पाककृती होत्या आमच्या घरी
छान झाली होती भाजी. पण ह्या भेंडीला तवा भेंडी म्हणतात ना ? मी खसखस + तीळ + दाण्याचा कुट ऐवजी तीळकुट + डाळं बारीक करुन घालते आणि नारळ. (स्त्रोतः आई :)).
मृ, भेंडी
मृ,
भेंडी हिरवी रहायला हवी असेल तर अजुन एक टीप. भेंडी आधी तेलात तळुन घ्यायची.
मृ, तुझ्या
मृ, तुझ्या पद्धतीची भेंडी आवडली ग. हा बघ फोटो
मला भेंडी
मला भेंडी आवडत नाही त्यामुळे मी भेंडीची कुठलीच भाजी करू धजत नाही. पण मला हा मसाला आवडला होता. वाचल्यापासून तो मसाला वापरून काहीतरी करून बघायचं डोक्यात होतं. शेवटी भेंडीच्या ऐवजी तोंडली घातली, दोन उभ्या चिरा देऊन.... मस्त झाली होती भाजी. फक्त चिंच्-गूळ घातला नाही, साखर घातली थोडी आणि तीळ, शेंगदाणे, खसखस आणि सुकं खोबर्याच्या कूटाबरोबर ओलं खोबरंही घातलं. सहीच झाली होती भाजी एकदम.
सायो, खरंच
सायो, खरंच खूप टेम्प्टिंग दिस्तेय भाजी! मसाल्याचा लाल रंग तर तोंडाला पाणी आणातोय.
मंजु, हा मसाला घालून भेंडी, तोंडली, परवरं आणि वांगी पण करता येतात. वरून पाणी न घालता तेलात भाजीच्या अंगच्या पाण्याच्या वाफेवर शिजवली की झालं!
छोटे
छोटे बटाटे, चकत्या करुन किंवा बारीक चिरुन कारली पण छान लागतात ह्याच मसाल्यात.
मृण, मी पण
मृण, मी पण केली ग ही भाजी. फोटु काढला सेलफोनच्या कॅमेर्याने आता तो सापडत नाही कुठे लपवला देव जाणे. परत करेन तेव्हा टाकेन.... पण थँक्यु हं !!!
----------------------------------------------------------------
~मिनोती.
हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा.
तेलुगू
तेलुगू पद्धतीचा एक भेंडीचा प्रकार खूप छान आहे. त्यात आधी भेंडी बारीक चिरून घ्यायची. मग त्यावर हातानी बेसन शिंपडायचे जेणेकरून्स सर्व तुकड्यांवर बेसन समान पसरेल. मग ती भेंडी कमीतकमी तेलामधे तळून घ्यायची. नंतर मग नेहमीची फोडणी करून भाजी बनवायची. छानच चव लागते. फक्त तेवढ तेलाकडे दुर्लक्ष केलं तर.
बी, चांगली
बी, चांगली आहे ही रेसिपी.
बी, बेसन
बी, बेसन 'लावलेली' भेंडी microwave पण करून शिजविता येते. तेल घालावे लागेल आणि एक किंवा दीड मिनिटाच्या अंतराने चेक करावे लागेल. भेंड्या microwavable भांड्यात पसरून ठेवायच्या. भेंडी शिजल्यावर फोडणी वरून कालवायची. Seasoning set करायचे. अशीच तोंडली पण करता येते, पण बारीक लांबट चिरावी लागेल. नाहीतर लवकर शिजत नाही.
तळताना
तळताना बेसन जळंत नाही का?
मृ, बेसन
मृ, बेसन जळत नाही कारण बेसन शिंपडून झाले की लगेच थोडेसे मीठ पण शिंपडावे आणि मग पातेलं सुपात आपण जसे पाखडतो तसे किंचित वरखाली करून सर्वकाही एकजीव करण्याचा प्रयत्न करावा. मग ते पातेल दोन मिनिटे झाकून ठेवावे जेणेकरून मीठाचे पाणी होईल. तेवढा ओलावा बेसनाला पुरेसा आहे. त्यामुळे बेसन कोरडे राहत नाही आणि तळताना जळत नाही.
भेंडी जर
भेंडी जर जरड असेल तर तमिळ लोकं भेंडी सांबार करतात. चिकट भेडींचे काय करावे असा जर प्रश्न पडत असेल तर हा सांबार चांगला पर्याय आहे.
एका भेंडींचे तीन ते चार तुकडे करावे. मग सर्व तुकडे उकळून शिजू द्यावे. त्यात मीठ घालावे. मुगाचे पातळसर वरण करून त्यात चिंचेचे पाणी घालावे. थोडासा गुळ घालावा. नीट ढवळून घ्यावे. मग त्यात शिजलेली भेंडी घालावी. आता नेमीची फोडणी करून त्यात भेंडी घालावी आणि चांगले पाच सहा चमचे सांबार पावडर घालावी. दोन तीन उकळी आल्यात की एक चांगला सांबार तयार. फक्त एकच दक्षता घ्यावी की शिजवलेल्या भेंडीचे पाणी देखील असतेच. वर हे वरण. मग सांबार खूप नको व्हायला म्हणून आपला अंदाज उपयोतात आणावा. पण मुगाची डाळ फार घट्ट करू नये.
psg, तुझी
psg, तुझी भाजी aquarium मध्ये डीश ठेवून फोटो काढल्यासारखी का दिसते आहे? की आधीच संपू नये म्हणून खरंच तेथे ठेवली होतीस ?
मिलिंदा?
मिलिंदा? Aquarium?????
टेबल मॅट आहे ती, आणि बाऊल काचेचा आहे 
------------------------------------------
Times change. Do people??
तुझी भाजी
तुझी भाजी aquarium मध्ये डीश ठेवून फोटो काढल्यासारखी का दिसते आहे? ///////
अगदी मलाही तेच वाटले
ऍक्वेरियम
ऍक्वेरियममधे फळं कधीपासून ठेवतात?
ती फळं
ती फळं नाही मत्स्यालयातले दगडगोटे वाटत आहेत..
Pages