५ सफरचंद
४ चमचे तुप (आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करु शकता)
पाऊण वाटी साखर
वेलची पुड
साय
काजू , बदाम
१. सफरचंद धुवून ,त्याचे २ काप करुन त्यामधल्या बी काढून किस करुन घ्या
२. कढई मध्ये तुप घ्या
३. तुप गरम होत आलेकी , काजू बदाम तुपावर २ मि. परतून घ्या
४. आता मध्यम आचेवर सफरचंदाचा किस घालून ,सफरचंदातील पाणी कमी होइपर्यंत छान परतून घ्या(मध्ये मध्ये हलवत राहायच आहे )
५. १५ मिनीट झाल्यावर त्यमध्ये साखर ,वेलची पुड घालून ते एकत्र करुन घ्या
७. एकसारख मध्यम आचेवर हलवत राहायच आहे
८. २ मिनीटानी साय घालून एकत्र करुन घ्या
९. मिश्रण जाडसर होईपर्यंत आणि कढईपासून वेगळे झालेकी आपला सफरचंदाचा हलवा तयार आहे
*सफरचंदाचे प्रमाण किती आहे यावर पाककृतीसाठी लागणारा वेळ कमी जास्त होईल
*खायचा केशरी रंग घातला तरी चालेल (गाजर हलव्या सारखा रंग येईल)
*सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे आणि पाककृती चालू करावी
मस्त!
मस्त!
पण फळे नुसतीच खायला आवडतात.
मस्त रेसिपी.
मस्त रेसिपी.
सफरचंद कापुन ठेवल्यावर काळे पडतात ना. ही रेसिपी करताना अस काही होत का ?
धन्यवाद देवकी , 'सिद्धि'
धन्यवाद देवकी , 'सिद्धि'
हो टिप लिहायची रहीली
सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे
ओके
ओके ....थॅक्स. बघते करुन.
अरे वा ! सही दिसतोय !
अरे वा ! सही दिसतोय !
किती किसाला किती साखर घेतली?
किती किसाला किती साखर घेतली?
५ सफरचंदाच्या किसासाठी वर
५ सफरचंदाच्या किसासाठी वर दिलेल्या १वाटी साखरेतली मी साधारण पाऊण वाटी साखर वापरली
(कारण सफरचंद किसून ते खाऊन बघितले तर थोडे गोड होते त्यामुळे पुर्ण वाटी साखर वापरली नाही )
सहित्याचे माप लिहीले नाही त्याबद्दल क्षमा .बदल करते
धन्यवाद .
धन्यवाद .
मला हवं होतं कि पाच सफरचंदाचा किस किती वाट्या झाला आणि त्याला किती वाटी साखर? पाउण वाटी साखर घातलीत असं म्हणताय नं . ठिक आहे करुन बघिन म्हणजे समजेलच. सफरचंदाचा जॅम केलाय , हलवा करुन बघाय्ला पहिजे.
सफरचंद लवकर काळे पडतात
सफरचंद लवकर काळे पडतात त्यामुळे जेवढे पटकन होईल तेवढे पटकन किसून घ्यावे >>>एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यात १/२ tsp मीठ टाकावे त्या पाण्यात सफरचंदाचे मोठे तुकडे टाकून नावाला धुतल्यासारखे करावे आणि स्वछ कॉटन फडक्याने पुसावे. सफरचंद काळे पडत नाही.
सफरचंदाचा जॅम केलाय >>>>>
सफरचंदाचा जॅम केलाय >>>>> कृती येऊ दे.
सफरचंदाचा जॅम केलाय >>>>>
सफरचंदाचा जॅम केलाय >>>>> कृती येऊ दे.>>>>> देवकी
मी रुचिरा मध्ये दिल्या प्रमाणे करते. मला पाकृ लिहीता येत नाही अजिबात. बघते हं प्रयत्न करुन.
सफरचंदाचा जॅम केलाय >>>>>
सफरचंदाचा जॅम केलाय >>>>> कृती येऊ दे.>>>>देवकी विपू त लिहीलीये, बघ.
आताच पाहिली ग.धन्यवाद!
आताच पाहिली ग.धन्यवाद!
मागे एकदा केला होता, त्यात
मागे एकदा केला होता, त्यात घरात उरलेले पेढे ढकलले होते, छान लागत होते
मी विकास गोडसे. आग्ररोड गृपवर
सफरचंद फारसे आवडत नाही, परंतू करून बघीन.