वारसदार! - भाग ७ - अश्वत्थामा!

Submitted by महाश्वेता on 24 July, 2019 - 21:35

भाग - ६

https://www.maayboli.com/node/70722

विनायक त्याच्या खोलीतल्या पलंगावर झोपला होता...
मनात अनेक विचारांची वावटळ चालू होती.
आपला अंदाज चुकला, की आपली बुद्धी कमी पडली?
की संकेतच दिशाभूल करण्यासाठी दिले होते?
यात त्याच्या हातून पहिला खून पडलाय याचा त्याला काहीएक पश्चाताप नव्हता.
आणि प्रियरंजनकडून जिवंत येणारा मी म्हणजे?
दारावर टकटक झाली.
"विनायक, चल जेवण करून घे." रामन आवाज देत होता.
"भूक नाहीये मला," विनायक रागात म्हणाला.
इस्माईलच्या गोडाऊनमध्येच जेवणाची सोय होती. एका जुनाट लाकडी टेबलाच्या आजूबाजूला समान मापाचे ठोकळे ठेवून ती रचना केली होती.
"भाई, तो येत नाहीये."
इस्माईलच्या चेहऱ्यावरची रेष हलली, आणि पुन्हा तो निर्विकार चेहऱ्याने जेवण करू लागला.
हे बघून बाकीचे सर्व मुकाट जेवण करु लागले.
जेवण झाल्यावर सगळे आपापल्या घरी निघाले. गोडावूनवरची पोरं आपल्या जागी झोपायला गेली.
इस्माईलने गल्ला गोळा केला. सगळं तिजोरीत ठेवलं. तिजोरी लक्षपूर्वक बंद केली.
याकूब जायला निघणार, तेवढ्यात इस्माईलने आवाज दिला.
"याकूब, रहमत की बिर्याणी मिलेगी क्या अभी?"
"भाई खतम हो गई होगी."
"उस्को बोल, इस्माईलने बस एक प्लेट बनाने को बोला है. बनने के बाद आके टेबलपर रख दे. "
"जी भाई." याकूब निघाला.
◆◆◆◆◆
टकटक!
"कोण आहे," विनायक ओरडला.
"साले कमरेमे संडास नही है, अगर बाहर से बंद करू तो मर जायेगा. खोल!!!"
विनायकने दरवाजा उघडला. इस्माईल हसत मध्ये आला.
विनायक पुन्हा फुरगटून बसला.
"इतनी भी क्या बेरुखी, विनायकमियाँ..."
"प्रियरंजनकडून आजपर्यंत कुणी जिवंत नही आलं. मला मृत्यूच्या तोंडात ढकललं." विनायक फुरफुरत म्हणाला.
"आपनेही तो दाव लगाने को कहा था, फिर अब क्यो नाराजगी?"
"भाई, मी डाव माझ्या कर्तृत्वावर, बुद्धीवर, हुषारीवर लावायला लावला होता. नशिबावर, माझ्या नियतीवर नाही..."
इस्माईल पुन्हा हसला. "फिर आप बच कैसे गये दोनो बार?"
विनायकने क्षणभर विचार केला, आणि म्हणाला. "
नियतीच्या मनात जे असतं तेच घडतं. त्या सटवीने जो टाक भाळी टाकलाय, त्याव्यतिरिक्त दुसरं काही नशिबात नसतं हेच खरं..."
विनायक, इस्माईलची नजर शून्यात लागली. "चल आज तुझ्याच भाषेत बोलूयात."
विनायक चरकला...
"आज दुपारपर्यंत स्वतःच्या मनगटावर दृढ विश्वास असणारा विनायक आता नशिबाची भाषा बोलतोय? हा विरोधाभास चांगला तर नक्कीच नाही."
"इस्माईलभाई..."
"ऐकून घे, पूर्ण. मग बोलूयात. "
इस्माईलने खिशातून एक कागद काढला, आणि विनायकच्या हातात सोपवला.
"वाच हा कागद..."
विनायक कागद वाचू लागला.
'रंजनभाई,
आजतक हमारे सौदे में कभी रुकावट नहीं आई. आपने जो बोला, वो माल मैने भेजा. आजतक कभी इस सौदे मै नुकसान हुवा, तो मेरे आदमियो की जान आपने नुकसान के बदले ले ली. पर आज, ये इस्माईल, मेरे इस लडके की जान की भिख मांग रहा है. जो नुकसान होगा, इस्माईल चुका देगा, बस इसको सहीसलामत वापस आने देना...'
विनायक वाचता वाचता थांबला.
"थांबलास का विनायक, वाच पुढे, रंजनने काय प्रत्युत्तर दिलंय ते."
विनायक पुढे वाचू लागला.
'इस्माईल,
सही घोडे पे दाव लगाया है, गुजारीश की जरुरत नहीं. कागज नही आता, फिर भी लडका सहीसलामत आ जाता.'
विनायकचा राग बराच कमी झाला.
"इस्माईलभाई तरीही तुमच्या निर्णयाचं समर्थन होत नाही. शेवटी तुम्ही मला मृत्यूच्या सापळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केलाच. माझ्या नशिबानेच मी वाचलो."
"तुझ्या नशिबाने कि बुद्धीने विनायक? कारण डाव तर तुझ्या बुद्धीवर लावला होता, नशिबावर नाही."
"माझ्या नियतीने आज मला जिंकवूनही हरवलं इस्माईलभाई, आज मला चुकीचं ठरवलं."
"ठीक आहे, तुला काय वाटलं होतं, अकिला आणि शकीलाच्या संकेतांवरून?"
"अकिलाने अलीला काजळ देऊन दोन बोटे दाखवली. काजळ, काजल, काळा रंग किंवा काळ..."
"जबरदस्त, अजून सांग."
"शकीलाने मला लालभडक गुलाब देऊन दोनचा इशारा केला. लाल रंग. रक्त..."
"वाह!"
"दोन बोटे, दोन अंक, एकतर दुसऱ्यांदा जो बंदूक चालवेल तो, किंवा बंदुकीतला दुसरा शॉट..."
"मग तर तू बरोबर निघालास विनायक, तू चुकला नाहीस.  तू दुसऱ्यांदा बंदूक चालवलीस, आणि तू जिंकलास. "
"इस्माईलभाई, खेळ इतकाही सरळ असता, तर हा खेळ कुणीही खेळलं असतं. असामान्य खेळाचे संकेतही असामान्य असतात. म्हणून मी अंदाज केला, कि दुसरा शॉटनेच गोळी चालेल. दोघांच्याही दुसऱ्या शॉटला गोळी असेल इस्माईलभाई. आणि जेव्हा अलीने पहिल्यांदा वार केला, तेव्हा मात्र माझा चान्स हुकला. कारण अलीचा पहिला शॉट, मग माझा पहिला शॉट, पुन्हा अलीचा दुसरा शॉट... म्हणजे माझ्याआधी त्याचा दुसरा शॉट. माझा काळ...
...पण नशीब आणि नियती आपल्या हातात नसते, हेच खरं इस्माईलभाई..."
"विनायक, तुझा बाप नेहमी तुला एक गोष्ट सांगायचा... आज एक खरीखुरी गोष्ट ऐक." इस्माईल म्हणाला.
...आणि त्याने गोष्ट सांगण्यास सुरुवात केली.
★★★★
"क्यो अकिला, आजकल तबियत जरा सुजी हुई लग रही है!"
"पाचवा महिना है इस्माईलभाई." अकिला लाजत म्हणाली.
"अरे वाह! फिर अभी के अभी छोड दे ये काम."
"पंधरा दिन मैं छोड दूंगी, अण्णा को भी बोला है."
"बढिया." इस्माईल म्हणाला.
"अकिला बाहर जा." अण्णा आत येत म्हणाला.
अकिला बाहेर गेली...
"इस्माईल, येडा झाला तू? जमीर विकायला लावतोय मला. दोस्तीसाठी..."
"अण्णा, दोस्ती के लिये नही..."
"फिर?"
"जब मैने तुझको शेट्टी से बचाया था, तब तू बोला था, भाई, एक दिन बोलके देखो... अण्णा जान दे देगा. बस वही कर्ज चुका दे. फिर तू आझाद है, तेरे वादे से."
"इस्माईल, माझ्या जीवाची किंमत माग, किसी और की नहीं."
"दो दिन पहले रांगपुरामें एक औरत को जिंदा जला दिया गया, उसका कसूर क्या था? एक महिना पहले जान बुझकर किसीने हिंदुओ की मूर्ती तोड डाली, दंगे हुए, दो लोगो की जाने गई, वो लोग तो दंगोमैं शामिल भी नहीं थे, उनका कसूर क्या था?
असिफ दुबई मैं बैठा है, और ये राक्षस अली यहा! अगर आज ये जिंदा बच गया, तो कभी कोई उसके आगे सर नही उठयेगा, क्योकी समंदरमैं बस अल्ला का बंदा जिंदा बचता है!!! अण्णा याद रख, किशन भगवान को मानता है ना तू, अगर किशन भगवान ने सोचा होता, की भाई नही, द्रौपदी तो अभी कौरवो की हुई, जिता है उसे दुर्योधनने, फिर मेरा क्या हक उसको साडी पहनानेका, तो आज महाभारत अलग होती, औरत के प्रकोप से वो भी ना बच पाते, करन, भीष्म, द्रोणाचार्य की तरह."
"साला इस्माईल, हिंदू मै हूँ, और महाभारत तू पढा राहा है." अण्णा हसत म्हणाला.
इस्माईलच्याही चेहऱ्यावर हसू पसरलं...
"चल, वचनासाठी आज मी अभिमन्यू बनायलाही तयार आहे. बचेगा तेरा लडका."
"तू अभिमन्यू नहीं है, तू है किशन, कन्हैया जो आज अर्जुन को बचायेगा!" इस्माईल म्हणाला.
"नाही इस्माईल, अभिमन्यू मीच आहे, चक्रात अटकलेला. पण तू कोण मग या महाभारतात?"
इस्माईलने थोडावेळ विचार केला, आणि खोलवर काहीतरी आठवल्यासारखं शून्यात बघत तो म्हणाला.
"मी... अश्वत्थामा!!!"
खेळ सुरू झाला होता.
विनायक आणि अली समोरासमोर बसले होते.
...त्याच क्षणी दोघांसमोर दोन रिव्हॉल्वर आल्या...
...अण्णाने आणून ठेवल्या...
◆◆◆◆◆
विनायक सुन्न झाला. त्याला काय बोलावं ते कळेनाच.
"इस्माईलभाई, का?" तो कसाबसा उच्चारला.
"विनायक, संकेत, चिन्हे, दिशादर्शक हे नियतीशी बांधील असू शकतात, पण नियती त्यांच्याशी नाही. तुझं नियंत्रण तुझ्या विचारशक्तीवर असू शकतं, पण नियतीनेही तसंच चालावं, अशी अपेक्षा करणं म्हणजे भवसागरात काडीच्या आधाराने पोहोण्यासारखंच...
...तुझ्यावर माझा पूर्ण विश्वास होता बेटा, पण तुझ्या नशिबाने तुझ्यासमोर येणाऱ्या बंदुकीवर नाही..."
इस्माईल थांबला.
"इस्माईलभाई, एक विचारू?"
"विचार ना."
"इतकी शुद्ध मराठी शिकलात कुठे तुम्ही? आणि यापूर्वी असं का बोलला नाहीत?"
"जैसा तेरा एक कल है विनायक, वैसा मेराभी एक गुजरा हुवा कल है... आजतक मुझे बस यही पता है, की तुम्हारा नाम विनायक है और तुम गोवाके रहनेवाले हो. पर...
...माझा भूतकाळ माझी भळाभळा वाहणारी जखम आहे बेटा, अश्वत्थाम्यासारखी!!!"

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

khup
e divasni changli
katha vichalya milai
su shi atavan zali

एकदम भारी...
एकच नंबर....
पुढचे भाग लवकर येऊ द्यात.....